निवेश-उत्पाद ​विश्लेषण ‌‌‌​: अर्थशास्त्रातील नोबेल पा​रितो​षिकाचा ​विजेता प्राध्यापक लेआँटिएफ याने उत्पादनाचे अनुभवा​धिष्ठित पृथक्करण करताना अर्थव्यवस्थेच्या सार्व​त्रिक समतोलाच्या घटना ​विचारात घेण्याचा जो प्रयत्न केला, त्याला ‘​निवेश-उत्पाद विश्लेषण’ असे नाव आहे. हे विश्लेषण केवळ उत्पादना​विषयी असून त्यामध्ये मागणी-​सिद्धांताचा ​विचार केलेला नाही. ​शिवाय ते प्रत्यक्ष अनुभवावर अ​धिष्ठित असून अर्थव्यवस्थेतील विविध उद्योग आपापल्या योजना व कार्यक्रमांसाठी परस्परांवर कसे अवलंबून आहेत, हे दाखविण्याचा या विश्लेषणपद्धतीत प्रयत्न केला आहे. एखाद्या उद्योगासाठी लागणारा कच्चा माल हा अन्य उद्योगांच्या उत्पादनातूनच ‌‌‌उपलब्ध होतो व म्हणूनच ते परस्परावलंबी असतात. उदा., पोलादापासून रेल्वे वाघिणी तयार होतात व त्या वा​घिणींचाच उपयोग पोलादाची व पोलादासाठी लागणारा कोळसा आ​णि कच्चे लोखंड यांची वाहतूक करण्यासाठी होत असतो. यातून मुख्य प्रश्न उद्‌भवतो तो हा की, अखेर उपभोक्त्यांसाठी उत्पादातील ​किती ​निव्वळ ‌‌‌उत्पादन ​शिल्लक राहू शकेल व ते शिल्लक राहावे म्हणून उत्पादन कार्यक्रमासाठी प्रत्येक वस्तूच्या उत्पादापैकी किती भाग खर्च करावा लागेल. ही समस्या सुलभ करणाऱ्या काही गृहीतकृत्यांचा अवलंब करून एखाद्या अर्थव्यवस्थेत अखेर उपयोगासाठी विशिष्ट प​रिमाणात वस्तू उपलब्ध होण्यासाठी त्या त्या ‌‌‌वस्तूंचे उत्पादन ​किती प्रमाणावर केले पा​हिजे, याचा अंदाज करता येतो. ​विविध ‌‌‌वस्तूंच्या मागणीचे प्रमाण माहीत झाल्यास भ​विष्यकाळात त्यांचे उत्पादन किती केले असता अर्थव्यवस्थेचा सार्वत्रिक समतोल साधता येईल, हे ​निवेश–उत्पाद–विश्लेषणपद्धतीचावापर करून काढता येते. साह​जिकच हे विश्लेषण राष्ट्रीय ​विकासाच्या ‌‌‌आ​र्थिक ​नियोजनासाठी व राष्ट्रीय उत्पन्न लेखांकनासाठी अ​तिशय उपयोगी पडते.

निवेश–उत्पाद विश्लेशणासाठी सामान्यतः निवेश–उत्पाद तक्ता तयार करावा लागतो. या तक्त्याची प्रत्येक आडवी ओळ त्या उद्योगाचा उत्पाद ​निर​निराळ्या उद्योगांच्या उत्पादन प्र​क्रियांसाठी व अं​तिम उपभोगांसाठी कसकसा वापरला जातो, ‌‌‌हे आकड्यांनिशी दर्शविते. तक्त्याचा प्रत्येक उभा स्तंभ प्रत्येक उद्योगाने उत्पादनासाठी वापरलेल्या ​विविध उत्पादक साधनांचे प्रमाण आकडेवारीने दर्श​वितो. असा ​निवेश–उत्पाद तक्ता समग्र अर्थव्यवस्थेसाठी एकाद्या कालखंडापुरता (उदा., वर्षासाठी) तयार करता येतो व ‌‌‌त्यावरून अर्थव्यवस्थेतील ​विविध ​विभागांमधील वस्तू व सेवा यांचा प्रवाह कसा वाहतो, हे समजते. एका ​त्रिविभागीय अर्थव्यवस्थेच्या ​निवेश–उत्पाद तक्त्याचे उदाहरण पुढे ​दिले आहे :

निवेश–उत्पाद तक्ता [आकडे प्रत्यक्ष (​फिजिकल) एककांत]

                                          विभाग १ ​विभाग २ ‌​विभाग३

 

कृषी

निर्मिती उद्योग

घरगुती

एकूण उत्पादन

विभाग १–कृषी

३०

१५

५५

१०० ​क्वि. गहू

विभाग २–निर्मितीउद्योग

११०

७०

२२०

४०० मी. कापड

विभाग ३​–घरगुती

६०

१९०

५०

३०० कामगार-वर्ष श्रमशक्ती

‌‌

कृषी, ​निर्मितीउद्योग व घरगुती हे क​ल्पित अर्थव्यवस्थेचे तीन ​विभाग असून त्यांचे एकूण उत्पादन अनुक्रमे १०० ​क्विंटल गहू, ४०० मी. कापड व ३०० कामगार–वर्ष श्रमशक्ती असे आहे. तक्त्यामधील नऊ आकडे आंतरविभागीय प्रवाह दर्शवितात. ‌‌‌उदा., कृषीउद्योगाच्या एकूण १०० क्विंटल गव्हाच्या उत्पादापैकी ३० क्विंटल कृषी ​विभागातच वापरण्यात आले आहे. १५ क्विंटलचा उपयोग ‌‌‌​निर्मितीउद्योग ​विभागाने कच्चा माल म्हणून केला व ५५ ​क्विंटल गहू घरगुती ​विभागामध्ये वापरण्यात आला. तसेच कृषी ​विभागाने संबं​धित कालखंडात ३० ​क्विंटल गहू, ११० मी. कापड व ६० कामगार-वर्ष श्रमशक्ती या साधनांचा वापर केला, ‌‌‌असे वरील तक्त्यांमधील आकड्यांचा प​हिला स्तंभ दर्शवतो. असा तक्ता प्रत्यक्ष एककांऐवजी त्यांचे रुपयांत मूल्य दाखवूनही करता येतो. अशा तक्त्यांचा वापर करून ​विव​क्षित प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी एकसमयावच्छेदी समीकरणे उपलब्ध होतात व ती सोडवून ‌‌‌अर्थव्यवस्थेत सार्व​त्रिक समतोलसाधण्यासाठी ​विविध ​विभागांचे उत्पादन ​किती प्रमाणात असावे, हे ठर​विता येते.

निवेश–उत्पाद तक्ते सबंध अर्थव्यवस्थेसाठी बन​विता येतात, तसेच अर्थव्यवस्थेच्या उपांगांसाठीदेखील तयार करता येतात. ​निर​निराळ्या उद्योगांना ​विशिष्ट उपभोगाची मागणी पुरी करता यावी, म्हणून आपल्या उत्पादनकार्यक्रमाच्या योजना आखण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. ‌‌‌अर्थशास्त्रात या तक्त्यांचा वापर मुख्यत्वे राष्ट्राच्या ​किंवा त्यातील ​विशिष्ट प्रदेशाच्या मागणीचे, उत्पादनाचे, रोजगाराचे व ​विनियोगाचे आराखडे तयार करण्यासाठी केला जातो. तंत्र​विद्या​विषयक फेरफारांच्या उत्पादकतेवरील प​रिणामांचे तसेच वेतन, ‌‌‌नफा व कर यांमधील बदलांमुळे होणाऱ्या प​रिणामांचे ​विश्लेषण आणि आंतरराष्ट्रीय आ​णि आंतर​विभागीय अर्थसंबंधांचा अभ्यास करताना असे तक्ते उपयोगी पडतात. ‌‌‌साह​जिकच ​नियोजित अर्थव्यवस्थेत व ​विकसनशील राष्ट्रांमध्ये या तक्त्यांचा व ​विश्लेषणपद्धतीचा उपयोग अलीकडे योजनाकार वाढत्या प्रमाणावर करू लागले आहेत.

संदर्भ : Baumol, W. J. Economic Theory and Operations Analysis, New Delhi, 1963.

धोंगडे, ए. रा.