निरूढि : द्रव्याचा हा एक गुणधर्म असून त्यामुळे पदार्थांच्या गतीतील कसल्याही बदलास विरोध केला जातो. या गुणधर्मामुळे बाह्य प्रेरणा अस्तित्वात नसल्यास, मुळात निश्चल असलेला पदार्थ निश्चलच राहतो किंवा तो गतिमान असल्यास सरळ रेषेत एकविध (एकसारख्या) वेगाने मार्ग आक्रमत राहतो (न्यूटन यांचा गतिविषयक पहिला नियम). पदार्थाचे द्रव्यमान हे त्याच्या निरूढीचे माप आहे.

शिरोडकर, सु. स.