नान्‌को : चीनच्या उत्तर होपे प्रांतातील एक ऐतिहासिक ठिकाण. पीकिंगच्या वायव्येस सु. ४०कि मी. वर लोहमार्गावरील हे ठिकाण सु. ५७९ मी. उंचीवर आहे. जवळच याच्या पूर्वेस सोळांपैकी तेरा  मिंग बादशाहांच्या थडग्यांची अर्धवर्तुळाकार रांग प्रेक्षणीय आहे. वायव्येस नान्‌को खिंड आहे.

चौधरी, वसंत