पेरांबूर : तमिळनाडू राज्याच्या मद्रास जिल्ह्यातील आधुनिक औद्योगिक वसाहत. ही वसाहत मद्रास शहराच्या उपनगरांत मोडते. हे उपनगर बकिंगहॅम कालव्यांच्या पश्चिमेस, मद्रासच्या वायव्येस ११ किमी. वर असून रुंदमापी दुहेरी लोहमार्गांने मुंबईशी जोडलेले आहे. इंटिग्रल कोच फॅक्टरी हा रेल्वेचे डबे तयार करण्याचा प्रसिद्ध कारखाना येथे आहे. हा ७.३५ कोटी रुपयांचा प्रकल्प १९५५ मध्ये सुरू झाला. त्याची सुरुवातीची निर्मितिक्षमता प्रतिवर्षी ३५० डब्यांची होती १९६०-६१ मध्ये ती प्रतिवर्षी ६०० डबे इतकी वाढविणयात आली. १८७४ साली सुरू झालेल्या कार्‌नॅटिकबकिंगहॅम या प्रसिद्ध कापडगिरण्या याच परिसरात आहेत.

खांडवे, म. अ.