जम्नोत्री : यमुना नदीचे उगमस्थान. हे पुण्यक्षेत्र उतर प्रदेश राज्याच्या उत्तर काशी जिल्ह्यात ६,३१५ मी. उंचीच्या बंदरपूंछ शिखराच्या पश्चिमेस १० किमी. आहे. येथे हिमनदीतून यमुना प्रवाह सुरू होतो. जवळच छोटीशी धर्मशाळा व यमुनेचे लाकडी मंदिर आहे. त्यातील यमुनेची कृष्ण पाषाणाची व गंगेची पांढऱ्या संगमरवराची मूर्ती बर्फामुळे अश्विनी पौर्णिमेपासून अक्षय्यतृतीयेपर्यंत खालच्या खरसाळी गावात नेतात. जम्नोत्रीला भात शिजविता येईल इतक्या उष्ण पाण्याची कुंडे आहेत. येथपर्यंत जाणे कष्टाचे आहे.
कुमठेकर, ज. ब.
“