जट्रोफा पोडॅग्रिका : (इं. ग्वातेमाला ह्यूबर्ब कुल-युफोर्बिएसी). उष्ण कटिबंधामध्ये सर्वत्र बागेत आढळणाऱ्या या लहान क्षुपाचे (झुडपांचे) मूलस्थान न्यू ग्रॅनडा आहे. याचे खोड फुगीर, पाने मोठी, छत्राकृती व फुले लहान व लालभडक असून ती ऑगस्ट ते ऑक्टोबरात येतात. सामान्य संरचना ⇨यूफोर्बिएसी  अथवा एरंड कुलात वर्णिल्याप्रमाणे. ती एकलिंगी असून संवर्त पेल्यासारखा, पंचदली प्रदले लाल व पाच केसरदले सहा ते आठ तंतू लाल, बिंब पिवळे व पाच प्रपिंडांचे (ग्रंथींचे) असते. किंजपुट बिंबावर टेकलेला असून किंजल आखूड व किंजल्काच्या अनेक हिरव्या शाखा असतात [ → फुल]. बोंड हिरवे व तीन कप्प्यांचे असते. नवीन लागवड बी व फांद्यांनी करता येते. हे शोभेकरिताच लावतात.

जमदाडे, ज. वि.

 जट्रोफा पोडॅग्रिका