तेल्लीचरी : केरळ राज्यातील कननोर जिल्ह्यातील सुरक्षित बंदर. लोकसंख्या ६८,७५९ (१९७१). हे कोझिकोडे (कालिकत) पासून ५६ किमी., कोझिकोडे–मंगलोर रेल्वे फाट्यावरील स्थानक आहे. येथे १६८३ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने मिरी व वेलदोडे यांच्या व्यापारासाठी मलबार किनाऱ्यावरील आपली पहिली वखार घातली. या बंदरातून कूर्गमधील कॉफी, चंदन केरळमधील मिरी, खोबरे व इतर पदार्थ इत्यादींची निर्यात होते. येथे माशांचे तेल काढणे, काथ्याचे पदार्थ तयार करणे, फर्निचर इ. कारखाने असून महाविद्यालयापर्यंत शैक्षणिक सोयी आहेत.

फडके वि. शं.