तिबेटी भाषा–साहित्य : भाषा : चीनच्या पश्चिमेला असलेल्या पठारापासून ब्रह्मदेशापर्यंत पसरलेल्या ⇨ तिबेटो–ब्रह्मी  भाषासमूहातील तिबेटी ही एक महत्त्वाची भाषा आहे. तिचा लिखित पुरावा इसवी सनाच्या आठव्या शतकापासून उपलब्ध आहे.

लिपी : उत्तर भारतात आठव्या शतकात प्रचलित असलेली ब्राम्ही लिपी तिबेटीच्या लेखनासाठी वापरली जाते. तिच्यातील अक्षरांचे लिप्यंतर पुढीलप्रमाणे :

क, ख, ग, ङ्.

च, छ, ज, ञ.

त, थ, द, न.

प, फ, ब, म.

च़, छ़, ज़, व.

झ्य, झ, र, ल.

श, स, ह, आ.

प्रत्येक व्यंजनचिन्हात हा स्वर समाविष्ट आहे. व्यंजनाला जोडून येणारे , , , यांसाठी स्वतंत्र चिन्हे आहेत. हीच चिन्हे या स्वराला जोडून लिहिली, की तो तो स्वर मिळतो. म्हणजे ला चे चिन्ह जोडून हा स्वर इत्यादी. संयुक्त स्वर नाहीत. संयुक्त व्यंजने सामान्यपणे एकाखाली एक व्यंजने लिहून मिळतात. मराठीतील ‘क्ल’ या चिन्हाप्रमाणे. यांतील पहिल्या सोळा चिन्हांचे, या चिन्हाचा आणि शेवटल्या सहा चिन्हांचे उच्चार संस्कृतप्रमाणे आहेत. च़,  छ़,  ज़ हे मराठी दंत्य च, छ, ज आहेत. झ्य हा इंग्लिश measure यातील S प्रमाणे आणि हा rose यातील S प्रमाणे घर्षक आहेत.

तिबेटीत संयुक्त व्यंजने भरपूर असून ती शब्दांरंभी व शब्दान्तीही आढळतात. एकावयवी शब्द भरपूर आहेत.

व्याकरण : नाम : नामात तीन लिंगे आहेत. वचने दोन आहेत. नपुसंक लिंगात स्त्रीपुरुषभेद दाखविण्यासाठी पुरुषदर्शक पो आणि स्त्री दर्शक मो हे रूप नामाबरोबर वापरले जाते : शिङ्झाड’–पो शिङ् ‘पुरुष झाड’ – मो शिङ् ‘स्त्री झाड’. नामाला प्रत्यय लावून विभक्तीचे कार्य होते : या ‘याक’ याची रूपे प्र. व द्वि. या, तृ. याख्‌खि, च. याख्‌ला, प. याख्‌ने, ष. याख्‌खि अशी आहेत. एकवचनाच्या रूपाला छो हा प्रत्यय जोडून होते. याची अनेकवचनाची रूपे याख्‌छो, याख्‌छ, याख्‌छोला, याख्‌छोने, याख्‌छ अशी आहेत. 

सर्वनाम : 

ङा, , ङा 

– 

राङ्‘मी’

ङान्‘आम्ही’

ख्य, ख्य 

– 

राङ‘तू’

– 

ख्यन्‘तुम्ही’

खो, खो

– 

राङ्‘तो’ 

– 

खोन्‘ते’

मो‘ती’

– 


याची स्वामित्वदर्शक रूपे ङे ‘माझा’, ख्यरे किंवा ख्यक्यि ‘तुझा’, खोरे ‘त्याचा’ इ. म्हणजे षष्ठीचा प्रत्यय लागून होतात.

स्वत्ववाचक रूप रङ् हे आहेः ङा ‘मी’, पण ङाराङ् ‘मी स्वतः’.

दर्शक सर्वनामे : दि ‘हा’, थे ‘तो’, दिछो ‘हे’, थेछो ‘ते’.

विशेषण : नामापूर्वी येणारे विशेषण विकाररहित असते. ते नामानंतर आले, तर त्यालाच नामाचे प्रत्यय लागतात : खाङ्पा छुङ् छुङ् गी ‘लहान घराचा’ म्हणजे खाङ्पा ‘घर’, छुङ्छुङ् ‘लहान’, गी ‘चा’.

बहुतेक विशेषणांच्या शेवटी पो हे रूप असते. स्त्रीवाचक नामाबरोबर विशेषण आल्यास पो ऐवजी मो वापरण्यात येते. नामाचे षष्ठीचे रूप पुष्कळदा विशेषण म्हणून वापरले जातेः शिङ् ‘लाकूङ्’, शिङ्‌घी ‘लाकडाचा’ किंवा ‘लाकडी’. तुलना आणि श्रेष्ठता दाखविण्यासाठी विशेषणाला अनुक्रमे ले हे प्रत्यय लागतात. ता थेले तादि छेम्पोरे ‘त्या घोड्यापेक्षा हा मोठा आहे’. काही तुलनात्मक व श्रेष्ठतादर्शक रूपे स्वतंत्र आहेतः यख्ख ‘अधिक चांगला’, छेव ‘अधिक मोठा’.

अव्यय : अव्यये स्वतः सिद्ध असतात किंवा नाम, सर्वनाम किंवा विशेषण यांना प्रत्यय लावून मिळतात. थांद ‘आता’, याङ्क्यार ‘पुन्हा’ लाम्‌साङ् ‘लगेच’ इ. अव्यये सिद्ध आहेत. दिने ‘इथून’ (दि ‘हा’+ पंचमी) खने ‘तोंडी’ ( ‘तोंड’ + पंचमी). विशेषणापासून बनविलेली अव्यये विशेषणासारखी असतात किंवा त्यांना छेने हा प्रत्यय लागतो.

क्रियापद : धातूला विकार होत नाहीत. त्यामुळे क्रियापदाच्या रूपावरून लिंग, वचन, पुरूष किंवा प्रयोग यांचा बोध होत नाही. अशिक्षित लोकांच्या बोलीत सर्व काळांसाठी क्रियापदाचे एकच रूप वापरले जाते. कर्त्याच्या रूपावरून क्रियापदाबद्दलचे स्पष्टीकरण मिळते. तसेच क्रियापदाबरोबर वापरल्या गेलेल्या सहायक धातूवरून किंवा धातूचे विशिष्ट रूप पाहून काळाची कल्पना येते, त्याचप्रमाणे कर्त्याच्या विभक्तीवरून प्रयोग निश्चित होतो.

सहायक क्रियापदाची रूपे अशी :

ङा् – यिन्, य ‘मी आहे’.

ख्य – यिन्, य, रे, दु ‘तू आहेस’

        खो – यिन्, य, रे, दु ‘तो आहे’.

        ङान् – चो यिन्, य ‘आम्ही आहो’.

        ख्यन् – चो यिन्, य, रे, दु ‘तुम्ही आहात’.

        खोन् – चो यिन्, य, रे, दु ‘ते आहेत’.

याचीच नकारार्थी रूपे ङ मेन् ‘मी नाही’ इत्यादी.

भूत, पूर्ण भूत  अपूर्ण भूत वर्तमानकाळाप्रमाणेच आहेत. फक्त त्यापूर्वी ङेन् – ला ‘पूर्वी’ हे अव्यय लावण्यात येते. सर्व पुरुषी व वचनी योङ् हेच भूतकाळाचे रूप वापरले जाते. संकेतार्थी यना किंवा दुना वापरले जाते : ङा याख् – पो यना ‘(जर) मी चांगला असलो …’ वर्तमानकाळवाचक धातुसाधित यतु, नकारार्थी यमे आहे.

एकंदरीत क्रियापदाची रूपे सहायक शब्दांचा उपयोग अधिक करतात. हा चिनी भाषेचा प्रभाव आहे.


शब्द व वाक्ये : संख्यावाचक– चि, २ न्यि, ३ सुम्, ४ शि, ५ ङा, ६ थ्रुख्, ७ दुन्, ८ ग्ये, ९ गु, १० चु, चु – थाम् – पा. 

ख्य सु यिम् – पा ‘तुम्ही कोण?’

ख्य मिङ् – ला खोरे शि खि – य? ‘तुमच नाव काय’?

ङे – मिङ् – ला दोरजे शि – ख्यि यो. ‘माझ नाव दोर्जे’.

        ङे योख्खो केतोङ् ‘माझ्या नोकराला बोलव’.

        छारपा छेसोङ् ‘ पाऊस थांबला आहे’.

        ङा् ग्याका दोर्जेदेन थाङ् वारानासि ला द्रोखि यिन् ‘मी बोधगया आणि वाराणशीला जाईन’.

कालेलकर, ना. गो.

साहित्य : स्थूलमानाने तिबेटी साहित्याचा पहिला कालखंड  इ. स. सातवे ते तेरावे शतक हा मानला जातो. या कालखंडात बौद्ध धर्मसाहित्याचे तिबेटी भाषांतर मोठ्या प्रमाणावर करण्यात आले व त्यात भारतीय पंडितांबरोबरच तिबेटी पंडितांनीही भाग घेतला. या भाषांतर कार्याच्या अनुषंगानेच तिबेटीत धार्मिक–तत्वज्ञानात्मक परिभाषा निर्माण झाली व ती सामान्यतः विद्वानांपुरतीच मर्यादित राहिली. या पहिल्या कालखंडात तिबेटी साहित्यात दुसराही एक प्रवाह आढळतो. त्यात इतिहास, इतिवृत्ते, पुराणकथा, धार्मिक व तांत्रिक–मांत्रिक साहित्य असून ते प्राचीन तिबेटी सांस्कृतिक वारशाचे निदर्शक आहे. तून–हुआंग येथील प्राचीन लेण्यात या प्रकारच्या प्राचीन हस्तलिखित साहित्याचा मोठा संग्रह संशोधकांना उपलब्ध झाला आहे.

बौद्ध धर्मसाहित्याच्या प्रचंड प्रमाणावरील तिबेटी भाषांतरकार्यांमुळे तिबेटच्या बौद्धपूर्व ‘बॉन’ धर्माच्या अनुयायांना प्रेरणा लाभली आणि त्यांनी आपल्या पारंपरिक धर्मसाहित्याच्या संशोधन–संकलनास चालना दिली. तेराव्या शतकात तिबेटी बौद्ध साहित्यनिर्मिती थांबली. तोवरच्या साहित्यात ‘कंजुर’ (अनुवादित मूळ बुद्धवचने वा शिकवण) व ‘तेंजुर’ (अनुवादित भाष्यग्रंथ) असे दोन ठळक भाग आढळतात. तेराव्या शतकानंतर धर्ममठांच्या प्रोत्साहनाने ऐतिहासिक, प्रबंधात्मक, भाष्यात्मक साहित्याबरोबरच धार्मिक स्वरूपाची नाटके, संतचरित्रे इत्यादींची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होऊ लागली. हे बहुतेक साहित्य अर्थातच धार्मिक प्रवृत्तीचे आहे. तथापि एक महाकाव्य मात्र त्याला अपवाद असून त्यात मंत्रवेत्या गेसर राजाचे पराक्रम वर्णन केलेले आहेत. हे महाकाव्य अनेक भाटांनी आपापल्या कल्पनेप्रमाणे वेळोवेळी भर टाकून वाढविलेले दिसून येते.

सुमारे दहाव्या शतकात चीनमधून काष्ठठशांची मुद्रणकला तिबेटमध्ये प्रविष्ट झाली. परिणामतः अनेक तिबेटी मठांतून त्या प्रकारची छपाई होऊ लागली. ही परंपरा विसाव्या शतकातही टिकून होती. प्रमाणभूत लिपी व भाषा ठरविल्यानंतरही अर्वाचीन तिबेटी लेखन जुन्याच लेखनरीतीने होत राहिले आहे. आधुनिक इटालियन लेखन करताना लॅटिन वर्णलेखन (स्पेलिंग) व व्याकरणरूपे वापरावीत, तसा हा प्रकार आहे.

जाधव, रा. ग.

संदर्भ : 1. Bell, C. A. Grammar of colloquial Tibetan, Calcutta, 1919.

  2. Das, Saratchandra, An Introduction to the Grammar of the Tibetan language, Delhi, 1972.

          3. Tucci, G, Indo–Tibetica, 4. Vols, 1932–41.