घेटो : शहराचा ज्यू वस्तीचा राखीव, पुष्कळदा तटबंदीयुक्त विभाग. कॅथलिकांनी ज्यूंसमवेत राहू नये, असा यूरोपात दीर्घकाळ निर्बंध होता. घेटोंत ज्यूंना बऱ्याच बाबतीत स्वायत्तता असे परंतु बाहेर मात्र व्यवसायबंदी, डोईजड कर, ओळखचिन्हे वापरणे, नागरिक हक्कांस नकार इ. प्रकारची अपमानास्पद वागणूक मिळे. एकोणिसाव्या शतकात व विशेषतः इझ्राएल स्थापनेनंतर बहुतेक ख्रिश्चन व इस्लामी देशांतील घेटो बंद झाले आहेत.

कांबळे, य. रा.