टीघेम, फिलिप व्हॅन : (१८३९–१९१४), फ्रेंच वनस्पतिवैज्ञानिक. हे पॅरिसमध्ये मूसी नॅशनल द’ हिस्टॉइर नॅचरेल येथे प्राध्यापक होते. शरीरविषयक (अंतर्रचनेविषयी) आणि विशेषतः त्यांच्या रंभ (पाणी व अन्नरसाची ने-आण करणारा विशेष वाहक भाग) सिद्धांताविषयीच्या संशोधनाबद्दल त्यांचा ख्याती आहे. त्यातूनच बरेचसे वनस्पति -शारीराचे संशोधन पुढे सुरू झाले. डौलियट यांच्या बरोबर त्यांनी वनस्पतींच्या पार्श्विक (बाजूच्या) अवयवांच्या उगमासंबंधी संशोधन केले आहे. म्यूकोरीनी (बुरशी) या कवकांबद्दलच्या (हरितद्रव्यहीन वनस्पतींच्या गटाबद्दलच्या) व कवक तंत्राबद्दलच्या ज्ञानात त्यांनी भर टाकली आहे.

पहा : कवक रंभ.

जमदाडे, ज. वि.