टिम्पनी : पश्चिमी वाद्यवृंदातील एक आघातवाद्य. ‘टिम्पनी’ ही इटालियन संज्ञा ‘केटल-ड्रम्स’साठी साधारणतः सतराव्या शतकापासून प्रचारात आहे. हे वाद्य तांबे, पितळ अशा धातूंच्या भांड्यांचे असून ते दोन वाडगे उलथे ठेवल्यासारखे दिसते व त्यांवर कमीजास्त ताणता येण्यासारखे कातडे बसविलेले असते. त्याचे वादन दोन काठ्यांनी करतात. जसा ध्वनी हवा असेल, त्याप्रमाणे काठ्यांच्या टोकांस लावण्यात येणारे द्रव्य बदलता येते. बहुधा मूळ स्वर व त्याचा पाचवा अशी यांची जुळणी असते. हल्ली तीन वा तीनापेक्षा जास्त ड्रम्सही वापरले जातात.

रानडे, अशोक