झ्मेनगॉर्स्क : रशियाच्या अल्ताई क्राई विभागाच्या खाणविभागातील शहर. लोकसंख्या १०,००० (१९४८). हे रूप्ट्सॉफ्स्कच्या आग्नेयीस ८० किमी. असून आसमंतात तांबे, शिसे, पारा, जस्त, बेरियम, टंगस्टन, सोने, चांदी, संगमरवर इत्यादींच्या खाणी आहेत. दारू गाळणे व दुग्धपदार्थ उत्पादन हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत. पूर्वी हे चांदीच्या खाणींचे केंद्र होते.

लिमये. दि. ह.