झिंडर : पश्चिम आफ्रिकेतील नायजर प्रजासत्ताकाच्या दक्षिण भागातील व्यापारी शहर. लोकसंख्या ३९,४२७ (१९७२). हे नायजर-नायजेरिया सीमेच्या उत्तरेस सु. १०४ किमी. असून आसपासच्या भुईमूग पिकविणाऱ्या अत्यंत महत्वाच्या प्रदेशाच्य़ा मध्यभागी आहे. भुईमूगावरील प्रक्रियेचे व त्याच्या व्यापाराचे झिंडर हे मोठे केंद्र आहे. येथे औष्णिक विद्युत्‌गृह व विमानतळ असून ते नायजरमधून जाणाऱ्या मोठ्या पूर्व-पश्चिम रस्त्यावर आहे.

लिमये, दि. ह.