झाँबा : पूर्व आफ्रिकेतील मालावी प्रजासत्ताकाची राजधानी. लोकसंख्या २०,००० (१९७१). हे न्यासा (मालावी) सरोवराच्या दक्षिणेस सु. ११२ किमी. व ब्लँटायरच्या ईशान्येस ६० किमी.वर आहे. झाँबा पर्वताच्या आग्नेय उतारावर शिरे हायलँड्‌समध्ये मळेवाल्यांचे गाव म्हणून १८८५ मध्ये हे वसलेले असून येथे शासकीय कार्यालये, संसदभवन, मालावी विद्यापीठाला जोडलेले शेतकी महाविद्यालय इ. आहेत. येथील पुष्कळसे लोक शासकीय सेवेत असले, तरी बरेच जण भोवतीच्या दुग्धोत्पादन-केंद्रे, तंबाखू-मळे यांत तसेच भातशेती, मासेमारी, नरम लाकूड उत्पादन इ. व्यवसायांत आहेत.

लिमये, दि. ह.