ज्वालामुखी–१ : हिमाचल प्रदेश राज्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. हे एक्कावन्न शक्तिपीठांपैकी एक असून कांग्रा जिल्ह्यात कांग्रा—हमीरपूर मार्गावर डेरा गोपीपूरच्या आग्नेयीस दहा किमी.वर वसले आहे. येथील ज्वालामुखी (वज्रेश्वरी) देवीच्या मंदिरात व परिसरात ज्वलनशील वायूचे आणि उष्णोदकाचे फवारे आहेत. मंदिरात मूर्तीऐवजी एका कुंडातून येणाऱ्या ज्वलंत वायूच्या झोतावर पुजाऱ्याने टाकलेल्या तुपाच्या आहुत्यांमुळे त्यांतून सतत ज्वाला उसळत असतात. येथे शारदीय नवरात्रात व चैत्रात मोठा उत्सव होतो.
कांबळे, य. रा.