किश : कीश, काइस. इराणच्या आखातातील इराणचे बेट. क्षेत्रफळ ११६⋅५ चौ. किमी. लोकसंख्या १,६८६ (१९५४). हे इराणच्या दक्षिणेकडे १६ किमी. व लिंगे बंदरापासून ८० किमी. पश्चिमेस आहे. सु १६ किमी. लांब, ७ किमी. रुंद व समुद्रसपाटीपासून ३७ मी. उंच असलेले हे बेट थोडीबहुत शेती, मच्छीमारी व मोत्यांच्या धंद्यासाठी प्रसिद्ध आहे. अकराव्या-चौदाव्या शतकांत इराण, मेसोपोटेमिया, अरबस्तान आणि हिंदुस्थान येथील मालाच्या व्यापारामुळे हे खूप भरभराटलेले होते.

शाह, र. रू.