कवला : (कौला लॅ. सिट्रिस क्रेनॅटफोलिया कुल-रूटेसी). हा एक संत्र्याचा कनिष्ठ प्रकार असून तो फक्त उत्तर प्रदेश व आसाममध्ये आढळतो. या झाडाच्या फांद्या आणि पाने खाली वाकलेली असतात. झाडाचा रंग पांढुरका असतो. फळ मोठे, साल सुरकुतलेली, मगज (गर) पिवळट व चवीने आंबट असून निकृष्ट दर्जाचा असतो. फळात बिया फार असतात. फळाच्या वरच्या बाजूला देठाच्या जागेखाली गोलाकार उठावदार रेषेसारखा भाग असतो. हवामान, जमीन, मशागतइ.संत्र्याप्रमाणे.
पहा : जंबुरी, रूटेसी संत्रे.
ठोंबरे, म.वा. पाटील, ह.चिं.