काँग्जबॅर : आग्नेय नॉर्वेच्या बुस्केरू (द) प्रांतातील प्रमुख शहर. लोकसंख्या १०,२२० (१९६०). हे लॅगन नदीकाठी, ऑस्लोच्या नैर्ऋृत्येस ६४ किमी. आहे. ऑस्लो-स्टाव्हांगर लोहमार्गावरील हे प्रस्थानक असून आसपास चांदीच्या खाणी आहेत. येथे नॉर्वेची टांकसाळ आहे. शस्त्रास्त्रे, लाकडाचा लगदा व मद्याचे कारखाने येथील प्रमुख उद्योग असून आसमंतात जलविद्युत् निर्मिती होते. खाणमहाविद्यालय हे येथील शैक्षणिक आकर्षण असून हिवाळी खेळांचे केंद्र म्हणूनही काँग्जबॅर प्रसिद्ध आहे. जुन्या खाणींमध्ये सु. ३५० मी. खोल जाणारी वैशिष्ट्यपूर्ण रेल्वे व अठराव्या शतकातले कलापूर्ण चर्च ही प्रवाशांची आकर्षणे होत.
ओक, द. ह.
“