कर्कसंक्रमण : २२ जूनच्या सुमारास विष्टंभाच्या वेळी सूर्याची उत्तर क्रांती सर्वांत अधिक (२३ २७’) असते. कारण त्यावेळी सूर्य खगोलीय विषुववृत्ताच्या जास्तीत जास्त उत्तरेला म्हणजे खगोलीय कर्कवृत्तावर असतो. त्यानंतर सूर्य उलट किंवा दक्षिणेकडे जाऊ लागतो व दक्षिणायनास सुरुवात होते. याच वेळी सूर्याचा सायन (संपात चलन लक्षात घेऊन सूर्य आपल्या वार्षिक भासमान गतीत खगोलीय विषुववृत्त जेव्हा ओलांडतो त्यास संपात म्हणतात) कर्क राशीत प्रवेश होत असतो. म्हणून सूर्याच्या या उलट फिरण्याच्या क्रियेला सायन कर्कसंक्रमण म्हणतात.

ठाकूर, अ. ना.