बहिर्ग्रहाचे त्रिभांतर : (१) सूर्य, (२) पृथ्वी, (३) ग्रह (षड्भांतर वा प्रतियुती), (४) ग्रहाची कक्षा. क आणि ख या ग्रहांच्या त्रिभांतर स्थिती.

त्रिभांतर : दोन खस्थ ज्योतींच्या भोगांमध्ये [⟶ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति] जेव्हा ९०° चा फरक असतो तेव्हा त्या फरकास त्रिभांतर असे म्हणतात. सामान्यतः सूर्य आणि चंद्र किंवा कोणताही ग्रह यांच्या संदर्भात ही संज्ञा वापरतात. शुद्ध किंवा वद्य अष्टमीस सूर्य–चंद्रामध्ये त्रिभांतर असते व तेव्हा सूर्यप्रकाशाने अर्धे चंद्रबिंब उजळलेले दिसते. बुध आणि शुक्र हे अंतर्ग्रह असल्याने त्यांचे सूर्याशी कधीही त्रिभांतर होणे शक्य नाही. बहिर्ग्रह सूर्यापासून त्रिभांतरी असताना त्यांच्या प्रकाशित भागाचा अधिकात अधिक क्षय झालेला असतो. हा क्षय इतका कमी असतो की, नुसत्या डोळ्यांनी हा फरक किंवा क्षय जाणवात नाही. त्याचे दूरदर्शकातूनच निरीक्षण करावे लागते.

गोखले, मो. ना.