कार्स्ट भूमिस्वरूप : यूगोस्लाव्हियाच्या `कार्स्ट’ विभागात आढळणा.या भूमिस्वरूपाला व फ्रांन्स, इंग्लड, अमेरिका, क्यूबा, फिलिपीन्स, इंडोनिशिया इ. देशांच्या काही भांगात आढळणाऱ्या तशाच भूमिस्वरूपाला कार्स्ट भूमिस्वरुप म्हणतात. चुनखडकाच्या प्रदेशात हवेतील कार्बन डाय-ऑक्साइडामुळे किंचित अम्लधर्मी झालेले पावसाचे पाणी खडकांच्या फटींत शिरून चुन्याचा काही अंश विरघळविते. त्यामुळे फटी रुंदावतात पाणी भूपृष्ठाखालून वाहते व पुढे कोठेतरी बाहेर येते भूपृष्ठाखाली लहानमोठया गुहा तयार होतात दीर्घ काळानंतर काहींच्या छपरांपासून लोंबणारे व तळावर उभे असलेले अधोमुख व ऊर्ध्वमुख लवणस्तंभ तयार होतात जमिनीवर विवरे तयार होऊन लांबट दरी बनते आणि तेथे न विरघळलेल्या पदार्थांमुळे तयार झालेली मृदा व पाणी यांवर शेती होऊ शकते.  छोटया प्रवाहांचा बहुधा अभावच असतो, कारण पावसाचे पाणी चटकन जमिनीतच शिरते. काही गुहा तेथील आश्चर्यकारक नैसर्गिक दृश्यांमुळे प्रवांशाचे आकर्षण ठरल्या आहेत.

विवरे व कार्स्ट भूमी यांच्या निर्मितीची प्रक्रिया

कुमठेकर, ज.ब.