कपाळफोडी : (तेजोबती हिं. कानफुटी गु. कारोलिओ क. मणिजुब्बळी सं. कर्णस्फोट इं. बलून व्हाइन, ब्‍लिस्टर क्रीपर लॅ. कार्डिओस्पर्मम हेलिकॅकॅबम कुल-सॅपिंडेसी). या वर्षायू (एक वर्ष जगणाऱ्या) किंवा बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या) आरोही (वर चढणाऱ्या) ⇨ ओषधीचा प्रसार बहुतेक सर्वउष्ण देशांत असूनकपाळफोडी : (१) फुलासह फांदी, (२) फूल (पुष्पमुकुट काढल्यावर), (३) फळ     कपाळफोडी : (१) फुलासह फांदी, (२) फूल (पुष्पमुकुट काढल्यावर), (३) फळ भारतात (मैदानी प्रदेश व महाराष्ट्रात सर्वत्र) कुंपणातून ती सामान्यपणे आढळते. पाने एकांतरित(एकाआड एक), संयुक्त, त्रिदली, टोकाचे दल त्रिदलकी, क्वचित सर्वच द्विगुणत्रिदली [Ž→ पान] फुले पांढरीलहान, चतुर्भागी असून चवरीसारख्या वल्लरीवर सप्टेंबर–डिसेंबरमध्ये येतात त्याखाली दोन गुंडाळणारी प्रताने (तनावे) असतात फुलांची संरचना व इतर शारीरिक लक्षणे ⇨ सॅपिंडेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे. फळ (बोंड) त्रिधारी, तीन कप्प्यांचे, टोकदार व फुग्यासारखे बी गोल व काळे आणि अध्यावरण पांढरे झाडात सॅपोनीन (साबणासारखा फेस देणारे संयुग) असते. संधिवात व ताठरलेल्या गात्रांवर ही वनस्पती गुणकारी मूळ मूत्रल (लघवी साफ करणारे), सारक, स्वेदोत्पादक (घाम आणणारे), चर्मरक्तकर (चामडी लाल करणारे), आर्तवजनक (मासिक पाळी सुरू करणारे), कटिवातावर उपयुक्त पानांचा रस कानदुखीवर चांगला असतो.

कपाळफोडी : (१) फुलासह फांदी, (२) फूल (पुष्पमुकुट काढल्यावर), (३) फळ

जमदाडे, ज. वि.