कपाटशयन : (आयुर्वेद). जांघ, मांडी यांचे हाड मोडले तर ते कपाटात म्हणजे लाकडी फळ्यांत जखडून ठेवणे. मोडलेल्या हाडांना व्यवस्थित बसवून कापूस व पट्टे बांधून योग्य आकाराच्या फळ्या भोवताली आवरणासारख्या ठेवून त्या खिळ्यांनी पक्क्या कराव्यात. अवयवाचे चलनवलन न झाल्याने भंगलेला भाग स्थिर राहिल्याने लवकर सांधला जातो.

जोशी, वेणीमाधवशास्त्री