कस्तुरी बैल : गो-कुलातील ओव्हिबॉस वंशाचा प्राणी.याची ओव्हिबॉस मॉस्कॅटस ही एकच  जिवंत जात असून ती फक्त उत्तर कॅनडा आणि ग्रीनलँडमध्ये आढळते.कस्तुरी बैलांचे जीवाश्म (शिळारूप अवशेष)प्लाइस्टोसीन युगाच्या (सहा लाख वर्षांपूर्वीच्या)आधी सापडत नाहीत.

डोक्यासकट शरीराची लांबी१·९ – २·३ मी. शेपटी ९–१० सेंमी.आणि वजन ३२०–४१० किग्रॅ  असते.शरीर बळकट व खांद्यावर लहान वशिंड असते मान, पाय व शेपटी आखूड असतात.मुस्कट  आणि पायांचे खालचे भाग पांढरे असतात.शिंगांची बुडे अतिशय जाड व कपाळावर एकमेकांना  चिकटलेली असतात शिंगे खाली व बाहेर वळलेली असतात.याच्या अंगावर गर्द तपकिरी रंगाचे, भरडव जमिनीपर्यंत लोंबणारे केस असून त्यांच्या खाली लोकरीसारखे दाट मऊ केस असतात.  याच्या अंगाला कस्तुरीसारखा वास येतो.

यांचे कळप असतात आणि वयस्क नर कळपाचा पुढारी असतो.नऊ महिन्यांच्या गर्भावधीनंतर  मादीला एकच पिल्लू होते. याचा आयु:काल सु.२० वर्षांचा असतो. 

जमदाडे, ज. वि.