कामाग्वे: क्यूबाच्या पूर्व भागातील कामाग्वे प्रांताची राजधानी. लोकसंख्या १,७८,६०० (१९६७). हे हाव्हॅनाच्या पूर्वेस ४८०  किमी. व उत्तरेकडील न्वेवीटास बंदरापासून ७२ किमी. आत आहे. याचे जुने नाव प्वेर्तो प्रिन्सिपे होते. मुख्य रेल्वे व हवाई मार्ग आणि राजरस्त यांवर मोक्याच्या ठिकाणी असल्याने हे महत्त्वाचे व्यापरकेंद्र आहे. भोवतालच्या सुपीक प्रदेशात विपुल ऊस व फळे निघतात व गुरांची पैदास होते त्यांमुळे येथे दूधदुभते, कातडी कमावणे, मद्य, फर्निचर, लाकूडकाम, मांससंवेष्टन इत्यादींचे उद्योग आहेत. येथे वसाहतकालीन रस्ते, चौक, वाडे चर्च पहावयास मिळतात व शहराची संस्कृती त्यास साजेशीच सरंजामी आहे.

शहाणे, मो.ज्ञा.