कामठी :नागपूर जिल्ह्यातील ऐतिहासिक ठाणे. लोकसंख्या कँटोनमेंटसह 64,383 (1971). हे नागपूर – हौरा लोहमार्गावर नागपूरपासून 15 किमी., नागपूर-जबलपूर हमरस्त्यावर व कन्हान नदीकाठी दाट झाडीमध्ये वसले आहे. मराठी अंमलात व्यापारी दृष्ट्या हे महत्त्वाचे होते नागपूरकर भोसल्यांची छावणी येथे असल्याने लष्करी दृष्ट्या कामठीचे महत्त्व वाढले. हल्ली येथे एन्. सी. सी. अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाचे केंद्र आहे. आसमंतातील कापूस, मॅंगॅनीज, संगमरवर व बांधकामाचा दगड यांची ही व्यापारपेठ असून येथे सुती कापड, रंग, विड्या, कातडी कमावणे, विटा, कौले इत्यादींचे कारखाने आहेत.
जोशी, चंद्रहास