कटनी : मध्य प्रदेश राज्यातील औद्योगिक केंद्र व रेल्वे प्रस्थानक. लोकसंख्या मुर्वारा, टिकुरी, नवे कटनी रेल्वे प्रस्थानक, छावणी व शहर मिळून एकूण ८६,५३५ (१९७१). जबलपूर जिल्ह्यात मुर्वारा या तालुका ठाण्यानजिक, मुंबईच्या ईशान्येस, मध्यरेल्वेवर १,०७९ किमी. वर इटारसी–नैनी लोहमार्गाला बीना–विलासपूर मार्ग छेदून जातो, तेथे हे आहे. शोण नदीचा उगम येथून जवळच आहे. याच्या परिसरात दारूगोळा, सिमेंट, चिनीमातीची भांडी, बांधकामाचे चिरे, चुना, संकोचनमृत्तिका, रंग, रोगणे इत्यादींचे कारखाने, तांदूळ सडण्याच्या गिरण्या व एक धंदेशिक्षण शाळा आहे.

ओक, शा. नि.