कान्हेरी : बौद्ध लेण्यांसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध स्थळ. ही लेणी मुंबईच्या उत्तरेस सु. 26 किमी. वर साळशेट (साष्टी) बेटावर 112 गुहांमध्ये खोदलेली आहेत. कृष्णगिरी  या शब्दाचा कान्हेरी हा अपभ्रंश असावा. येथील स्तंभांवर व स्तंभशीर्षपादांवर अनेक उत्कीर्ण लेख आहेत. त्यावरून ह्या लेण्यांची सुरूवात गजसेन आणि गजमित्र या श्रेष्ठींनी गौतमीपुत्र सातकर्णी ह्या सातवाहन राजाच्या कालात (814-880) चालू होते असे दिसते. सुरूवातीची लेणी हीनयान पंथाची असून नंतरची लेणी महायान पंथाची आहेत, असे या लेण्यातील अवशिष्ट भागांवरून दिसते. सध्या ह्या गुहांतील जो भाग सुस्थितीत आहे, त्यावरून तेथे एक फार मोठा बौद्ध मठ असावा. दहाव्या क्रमांकाचे लेणे मोठ्या सभागृहासारखे आहे त्याची लांबी 26) मी., रूंदी 12( मी. व उंची 15) मी. आहे.

कान्हेरी : पस्तिसाव्या गुहेतील शिल्पपट्ट

तसेच 35 व्या गुहेतील सभागृह ही मोठे असुन त्या गुहेत एक शिल्पफलक आहे. त्यात पद्मपाणी, तारादेवी व बोधीसत्व ह्यांच्या सुंदर आ.त्या आढळतात. ह्याशिवाय नागराजा, नागिनी व गुडघे टेकुन पुजा करणाऱ्या भक्तांचा समुह कोपऱ्यातुन दिसतो. ह्याच गुहेच्या उजव्या कोपऱ्यात दिपांकरजातक कथेतील काही आ.त्या दिसतात. बाकीची बहुतेक लेणी बौद्ध भिक्षुसांठी बांधलेले विहार असुन त्यात अनेक लहान लहान खोल्या आहेत. मात्र उत्तरेकडील तीन गुहांत तीन डागोबा व खोदलेले 34 स्तंभ आहेत. त्यांच्या शिर्षांवर शिल्पे खोदलेली आहेत. तेथेच बुद्धाच्या व अवलोकितेश्र्वराच्या भव्य मूती्र आहेत. ह्याशिवाय छतावर लाकडी काम केले असल्याचा पुरावा मिळतो. काही गुहातुन भित्ती चित्रे रेखाटलेली असावी, असे त्यावरील अस्पष्ट रेषांवरून दिसते.

संदर्भ :  Burgess James, Report on the Buddhist Cave Temples &amp Their Inscriptions, Varanasi, 1964.

देव, शां. भा.