कानिया, सर हरिलाल जेकिनदास : (३ नोव्हेंबर १८९० -७ नोव्हेंबर १९५१). स्वतंत्र भरताच्या सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश. भावनगर संस्थानात जन्म. १९१५ साली ॲडव्होकेटची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी मुंबईत वकिलीस सुरूवात केली. सतत परिश्रमाने व अभ्यासू वृत्तीने त्यांनी लवकरच वकिलीत नाव कमावले. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीशपद त्यांनी १९३० पासून पुढील १५ वर्षे भूषविले. संघ न्यायालयाचे न्यायाधीश (१९४६) व स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेल्या सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश बनण्याचा त्यांना बहुमान मिळाला. दिवानी कायदा व संविधान विधी यावर त्यांचे विशेष प्रभुत्व होते.

खोडवे, अच्युत