कॅस्कॅरिला बार्क : क्रोटन इल्युटेरिया व क्रो. कॅस्कॅकरिला (कुल-यूफोर्बिएसी) या ब्रहामातील लहान वृक्षांच्या सालीला हे नाव दिले जाते. ⇨जमालगोटा व ⇨पांढरी या भारतात आढळणाऱ्यावनस्पतींच्या वंशातील हे वृक्ष असल्याने त्यांची काही शारीरिक लक्षणे सारखी आहेत. या सालीत राळेसारखा पदार्थ, अनेक तेले, कॅस्कॅरिलीन हे कडू द्रव्य इ. पदार्थ असतात. क्विनीनचा अंशही नसताना ⇨सिंकोनाऐवजी ती मलेरियावर वापरीत. वस्तुतः हिच्यात औषधी गुण जवळजवळ नाहीत तथापि क्वचित जठरोत्तेजक व पौष्टिक औषधी म्हणून हिचा उपयोग करतात. जळताना सुवास येतो म्हणून तंबाखूत हिचा भुगा मिसळून ओढतात.
पहा : यूफोर्बिएसी.
हेर्लेकर, न. द.