कॅसिटेराइट : (टिन स्टोन). खनिज. स्फटिक चतुष्कोणीय समूहाचे बुटके, प्रसूच्याकार, टोकाशी लघुकोणी प्रसूची असलेले (आ. अ)किंवा कधीकधी सुईसारखे प्रचिनाकार असतात. सामान्यपणे संस्पर्शी (चिकटलेले)किंवा अन्योन्यवेशी(एकमेकांत घुसलेले)व कधीकधी कोपराच्या आकाराचे यमल(जुळे स्फटिक) आढळतात (आ.आ)(010)हे सामान्य यमलनपृष्ठ असते स्फटिकविज्ञान अरीय,अपसारी अंसतर्रचना असणाऱ्या किंवा वृक्काकार(मुत्रपिंडाच्या आकाराच्या)कणांच्या स्वरुपात आढळते पाटन (100)अस्पष्ट [पाटन] उपंशंखाभ किंवा खडबडीत, ठिसूळ, कठिनता ६.७ वि.गू.६.८-७.१. बहुधा अपारदर्शक, कधीकधी दुधी काचेप्रमाणे पारभासी व क्वचित पारदर्शक असते. चमक हिऱ्यासारखी. स्फटिक सामान्यत चमकदार. रंग उदी किंवा काळा कधीकधी लाल, करडा,पांढरा किंवा पिवळा.कस रंगापेक्ष फिका.रा.स. SnO2. यात कधीकधी अल्पसे फेरिक ऑक्साइड (Fe2O3 )असते. क्वॉर्टझ शिरा, प्लेसरे,जलोढीय (गाळांचे)व कायांतरित (रुपांतरित) निक्षेप किंवा पेग्मटाइटांच्या भित्ती यांच्यामध्ये हे वुल्फ्रॅमाइट,शीलाइट इत्यांदीच्या जोडीने आढळते. मलाया.इंडोनेशिया, थायलंड, बोलिव्हिया, झाईरे(बेल्जियम काँगो), नायजेरिया इ. ठिकाणी याचे महत्वाचे साठे आहेत. हे कथिलाचे प्रमुख धातुक(कच्ची धातू) असून मुख्यत त्याच्यापासून कथिल मिळविले जाते. कृत्रिम रीतीनेही कॅसिटेराइट तयार करता येते. कथिल या अर्थाच्या ग्रीक शब्दावरुन हे नाव पडले आहे.
ठाकूर , अ. ना.
“