कॅसाइट भाषा : एक प्राचीन मृत भाषा. तिलाच कोसियन असेही नाव दिलेले आढळते. एलामाइट भाषेच्या परिसराजवळ झॅग्रास मध्ये कॅसाइट किंवा कोसियन लोक रहात होते. ही घटना इ.स. पू.सु.१६०० ते१००० यांच्या दरम्यानची आहे. कॅसाइट भाषेतील फक्त काही विशेषनामे व अकेडियनमध्ये भाषांतर केलेले शब्द उपलब्ध आहेत. सूर्याला ‘शुरिअश्‌’ शब्द आहे. तो संस्कृत सूर्य याला जवळचा असला, तरी इतर शब्दांचा संबंध कोणत्याही ज्ञात भाषेशी लावता येत नसल्यामुळे या भाषेचे वर्गीकरण करणे अशक्य आहे. हे शब्द असे : `दकश'(तारा), `नुला'(राजा) `शिर’ (धनुष्य) इत्यादी.

 

कालेलकर, ना. गो.