कॅलव्हरी : ख्रिश्चनांचे इझ्राएलमधील एक पवित्र ठिकाण. हे सध्याच्या जेरूसलेम शहराच्या पश्चिमेस काही अंतरावर असून येथे येशू ख्रिस्ताला क्रूसावर खिळे ठोकून ठार मारण्यात आले, अशी परंपरागत समजूत आहे. ही जागा नवीन जेरूसलेम शहराच्या तटाच्या आतील भागातच समाविष्ट आहे असे काही मानतात, तर काहींच्या मते ही जागा दमास्कस दरवाजाजवळील गॉर्डनची कॅलव्हरी ह्या नावाने ओळखली जाणारी जागाच होय.

लिमये, दि. ह.