वेसनगर : बेस. मध्य प्रदेश राज्याच्या विदिशा जिल्ह्यातील ऐतिहासिक व प्राचीन अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेले गाव. हे विदिशा रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेस सु. ३ किमी. वर बेटवा आणि बेस या नद्यांदरम्यानच्या प्रदेशात वसलेले असून विदिशा शहराशी रस्त्याने जोडलेले आहे.

  बेस म्हणजेच पूर्वीचे बेदिश-गिरी, वेस्सनगर अथवा वेसनगर असल्याचे मानतात. महावंस या पाली ग्रंथात चेतिय, चेतियनगर किंवा चेतियगिरी (चैत्यगिरि) असे नामोल्लेख आढळतात, प्राचीन वैश्यनगर, विदिशा(भिलासा) म्हणजेच वेसनगर असे तज्ञांचे मत आहे. सांप्रतचे विदिशा हे जिल्ह्याचे ठिकाण जुन्या विदिशा (वेसनगर) नगरापासून जवळच वसविण्यात आले आहे.

पहा : विदिशा.

चौंडे, मा. ल.