विश्वकोश : कोशरचनेचा एक वैशिष्ट यपूर्ण प्रकार. ज्ञान-विज्ञानांच्या एक वा अनेक विषयांतील अद्ययावत माहितीचे वस्तुनिष्ठ पद्धतीने संकलन करून ते साररूपाने विविध नोंदीच्या, म्हणजे छोट या, मध्यम वा मोठ या लेखांच्या स्वरूपात जिज्ञासूना उपलब्ध करून देणारा एक वा अनेक खंडांचा संदर्भग्रंथ म्हणजे विश्वकोश होय. विश्वकोश ह्या शब्द ‘एन्साय्‌क्लोपीडिआ’ ह या इंग्रजी शब्दाचा मराठी पर्याय होय. ज्ञानकोश, मह्याकोश हे अन्य पर्यायी शब्द आहेत. ‘एन्साय्‌क्लोपीडिआ’ ह्या शब्द ‘सर्वसाधारण स्वरूपाचे शिक्षण’ ह या अर्थाच्या Enkyklios (सर्वसाधारण) आणि Paideia(शिक्षण) ह या मूळ ग्रीक शब्दांवरून आलेला आहे. कला आणि शास्त्रे ह यांचे ज्ञान ह्या प्राचीन ग्रीक विद्यालयांतून देण्यात येणाऱ्या उदार शिक्षणाचा गाभा होता, ह या वस्तुस्थितीच्या संदर्भात ह्या अर्थ पाहता येतो.

विश्वकोशाचे प्रकार : विश्वकोशाचे अनेक प्रकार आहेत. ज्ञानविज्ञानांच्या सर्व शाखांतील अद्ययावत माहितीचे संकलन साररूपाने विविध नोंदीतून देणाऱ्या विश्वकोशांना ‘सर्वविषयसंग्राहक विश्वकोश’ असे म्हटले जाते. स्थूल मानाने सर्वसंग्राहक विश्वकोशाचे दोन रचनाप्रकार आढळतात : (१) ज्ञान-विज्ञानांच्या सर्व शाखांशी संबंधित अशा विविध नोंदी नियोजित संख्येच्या खंडांतून अकारविल्हे देणारा विश्वकोश. अशा विश्वकोशात अंक (लिपिप्रकार /गणित), अंकाई-टंकाई (भूगोल), अंकित राष्ट्रे (राज्यशास्त्र), अंकुरण (वनस्पतिविज्ञान) ह यांसारख्या वेगवेगळया विषयांशी निगडित असलेल्या नोंदी, त्यांचा वर्णानुक्रमे वा अकारविल्हे जो क्रम ठरेल, त्या क्रमानुसार येतात. उदा., एन्साय्‌क्लोपीडिआब्रिटानिका, एन्साय्‌क्लोपीडिआअमेरिकाना, कोलिअर्स एन्साय्‌क्लोपीडिआ चेंबर्स एन्साय्‌क्लोपीडिआ आणि द वर्ल्ड बुक एन्साय्‌क्लोपीडिआ हे पश्चिमी देशांतील काही विख्यात विश्वकोश. मराठीतील उदाहरणे द्यावयाची, तर ⇨ श्रीधर व्य कटेश केतकर (१८८४-१९३७) ह यांचा मह्याराष्ट्रीय ज्ञानकोश (२३खंड १९२०-१९२९) आणि तर्कतीर्थ ⇨ लक्ष्मणशास्त्री जोशी संपादित मराठी विश्वकोश ( प्रकाशित खंड १५, १९७६-१९९५)  ह यांची देता येतील. हे अनेक खंडी आहेत. तथापि असे सर्वसंग्राहक विश्वकोश अवघ्या एका खंडाचेही असू शकतात : उदा., विल्यम एच्. हॅरिस आणि जुडिथ एस्. लेव्ही संपादित द न्यू कोलंबिया एन्साय्‌क्लोपीडिआ (१९७५). सर जॉन समरस्केल ह यांनी संपादिलेला ह या प्रकारातला एक खंडी विश्वकोश द पेंगविन एन्साय्क्लोपीडिआ (१९६५)- तर अवघ्या ६४७पृष्ठांचा असून ह याचा आकारही लह्यान आहे. डेव्हिड क्रिस्टलसंपादित केंब्रिज पेपरबॅक एन्साय्‌क्लोपीडिआ (१९९३ ९६५पृष्ठे) ह याचाही उल्लेख करता येईल.

(२) सर्वसंग्राहक विश्वकोशांचा दुसरा प्रकार म्हणजे एकाच योजनेखाली एकेका विषयासाठी वा विषयगटासाठी एकेक स्वतंत्र खंड मुक्रर करून त्या-त्या विषयाशी वा विषयगटाशी संबंधित अशा नोंदी त्या खंडात अकारविल्हे देणे. उदा., ऑक्सफर्ड ज्यूनिअर एन्साय्‌क्लोपीडिआ (१२खंड व सूचीचा १३वा खंड १९४८ – १९६४). ह या विश्वकोशाचा प्रत्येक भाग ह्या‘प्रकृतिविज्ञान’, ‘कला’, ‘विश्व’, ‘कृषी आणि मत्स्योद्योग’ अशा एकेका विषयाला वा विषयगटाला वाहिलेला आहे. अशी रचना असलेल्या कोशांचा एक फायदा असतो. ज्याला ज्या विषयात वा विषयगटात स्वारस्य असेल, त्याला त्या विषयाला वा विषयगटाला वाहिलेला खंड सोयीने पाहता येतो. पहिल्या प्रकारातल्या विश्वकोशात मात्र अशा वाचकाला त्याच्या जिज्ञासेच्या विषयातील नोंदी त्या विश्वकोशाच्या विविध खंडांत अकारविल्हे जशा विखुरलेल्या असतील तशा पाह्याव्या लागतात.

तत्त्वज्ञानासारख्या एकच एक विषयाशी अथवा सामाजिक विज्ञाने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मानवशास्त्र, इतिह्यास आदी विषयांच्या गटाशी निगडित अशीही कोशरचना केल्याचे आढळून येते. अशी कोशरचना जेव्ह्या एकाच विषयाला वाहिलेली असते, तेव्ह्या ती ‘एकविषयसंग्राहक विश्वकोश’ म्हणून ओळखली जाते. उदा., पॉल एडवर्ड्‌सह यांनी संपादिलेला द एन्साय्‌क्लोपीडिआ ऑफ द फिलॉसफी (८खंड, १९६७).  मराठीतील उदाहरण द्यावयाचे झाल्यास दे. द. वाडेकरसंपादित मराठी तत्त्वज्ञान मह्याकोशाचे (३खंड, १९७४) देता येईल. एखादा कोश जेव्ह्या एखाद्या विषयगटाला वाहिलेला असतो, तेव्ह्या तो ‘अनेक-विषयसंग्राहक विश्वकोश’ ठरतो. उदा., डेव्हिड एल् सिल्स ह यांनी संपादिलेला इंटरनॅशनल एन्साय्‌क्लोपीडिआ ऑफ द सोशल सायन्सिस (१७खंड, १९६८). तसेच स. मा. गर्गेसंपादित भारतीय समाजविज्ञान कोश (६खंड, १९८६ – १९९३). हर्बर्ट रीड ह यांनी संपादिलेला व वास्तुकला, शिल्पकला, चित्रकला, संगीत अशा काही कलाविषयांच्या गटाला वाहिलेला द टेम्स अँड हडसन एन्साय्‌क्लोपीडिआ ऑफ द आर्टस् (१९६६) ह्या एकाच खंडाचा आहे.

काही विश्वकोश हे केवळ निरनिराळ या क्षेत्रांत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावलेल्या नामवंत व्यक्तींच्या चरित्रांचे असतात. ‘चरित्रे’ ह्याच एक विषय मानला, तर अशा कोशांची गणना ‘एकविषयसंग्राहक विश्वकोशा’त करता येईल. तशी ती काही अभ्यासक करतातही परंतु ‘संकीर्ण स्वरूपाचे विश्वकोश’ असाही एक कोशरचनाप्रकार कल्पून त्यातही चरित्रकोश अंतभूर्त करता येतील. ह्या सर्व प्रकारच्या कोशरचनांना पश्चिमीविश्वकोशकारांनी ‘एन्साय्‌क्लोपीडिआ’ असेच म्हटले आहे. तसेच वर्तमानकालीन घटनासंबंधी सर्वसमावेशक अशी माहिती देणाऱ्या ग्रंथांनाही ‘विश्वकोश’ म्हणता येईल, अशी भूमिका एन्साय्‌क्लोपीडिआ ब्रिटानिकासारख्या मान्यवर विश्वकोशाने घेतली आहे. उदा., द वर्ल्ड ऑल्मनॅक अँड बुक ऑफ फॅक्ट स.

विश्वकोशरचनेसाठी सामान्यत: गद्याचे माध्यम वापरले जात असले, तरी Image du monde (१२४५ ? इ. शी. द इमेज ऑफ द वर्ल्ड) ह्या प्राचीन विश्वकोश फ्रेंच ऑक्टोसिलॅबिक वृत्तात रचण्यात आला आहे. ह्या संदर्भात भारतीय परंपरेकडे पाहिल्यास व्रते, श्राद्धे, पुराणकथा, धर्मशास्त्र, ज्योतिष, खगोल, भूगोल, कृषिविद्या, वैद्यक, कला अशा अनेक विषयांची चर्चा असलेले विष्णुधर्मोत्तर हे उपपुराण ही काव्याच्या माध्यमातून केलेली विश्वकोशात्मक स्वरूपाची रचना म्हणून निर्देशिता येईल.

वाचकांच्या आणि रचनाकारांच्याही सोयीसाठी अनेक विश्वकोशांतील नोंदींचा क्रम ⇨ शब्दकोशातील शब्दांप्रमाणेच वर्णक्रमानुसार वा अकारविल्हे ठेवण्यात आलेला असतो परंतु विश्वकोश म्हणजे शब्दकोश नव्हे. शब्दकोशात शब्दांचे अर्थ दिलेले असतात आणि शब्दार्थ देण्याच्या अनुषंगाने त्यात शब्दविषय झालेल्या वस्तूची वा कल्पनेची काही थोडी माहितीही दिलेली असते. उदा., शब्दकोशात ‘आंबा’  ह्या शब्दाचा ‘एक मधुर फळ’ असा अर्थ दिला जाईल आणि त्या अर्थाच्या अनुषंगाने ‘आंबा’ ही फळांच्या वर्गात मोडणारी एक वस्तू असून तिची चव मधुर असते, अशी वा यासारखी कमीअधिक माहिती मिळू शकेल. परंतु ‘आंबा’  ह्या विश्वकोशीय नोंदीत, शब्दकोशातून मिळणाऱ्या अशा प्रकारच्या माहितीखेरीज आंब्याचे वनस्पतिकुल, त्याचा आकार, त्याची साल, त्याच्या विविध जाती, आंब्याला आवश्यक असलेल्या जमिनीचे व हवामानाचे स्वरूप, त्याला लागणारी खते, त्याच्यासाठी लागणाऱ्या पाण्याचे प्रमाण इ. सर्व प्रकारची उपलब्ध आणि अद्ययावत अशी माहिती बहुधा चित्रे, आकृत्या यांसह देण्यात येईल. शब्दाचा भाषेतील अर्थ सांगणे हे शब्दकोशाचे उद्दिष्टअसते, तर शब्दाने निर्दिष्ट होणारा ज्ञानविषय सर्वांगीण स्वरूपात समाजावून देणे ह्या विश्वकोशाचा हेतू असतो.

शब्दकोश आणि विश्वकोश या दोहोंची काही वैशिष्ट ये धारण करणारा ‘विश्वकोशात्मक’ किंवा ‘विश्वकोशीय’ शब्दकोश (एन्साय्‌क्लोपीडिक डिक्शनरी) असा एक विश्वकोशाचा प्रकार आढळतो. त्याचे विवेचन पुढे येईलच.

“लेट नॉलेज ग्रो फ्रॉम मोअर टू मोअर अँड दस बी ह यूमन लाइफ एन्‌रिच्‌ड” हे एन्साय्‌क्लोपीडिआब्रिटानिकाच्या प्रारंभीच दिले जाणारे अवतरण विश्वकोशाच्या अंतिम साध्याची कल्पना देते. अधिकांकडून अधिकाधिकांकडे ज्ञानाचे लोण पोहोचावे आणि मानवी जीवन अधिकाधिक समृद्ध, संपन्न होत जावे, हे साध्य साधण्यासाठी विश्वकोशासारखा संदर्भग्रंथ म्हणजे एक महत्त्वपूर्ण साधन होय.

जेव्ह्या  ज्ञानविज्ञानांची वाढ होऊन त्यांच्या शाखोपशाखा निर्माण होतात, तेव्ह्या विश्वकोशासारख्या संदर्भग्रंथांची आवश्यकता जाणवू लागते. ही आवश्यकता जिज्ञासू अभ्यासकांच्या दृष्टीने, तसेच सर्वसामान्य शिक्षित वाचकांच्या दृष्टीनेही असते. कोणताही एक विषय अन्य अनेक विषयांशी संलग्न असल्यामुळे तो विषय नीट समजून घेण्यासाठी किंवा त्या विषयाच्या अभ्यासार्थ व्यापक असा दृष्टिकोण मिळवण्यासाठी त्या संलग्न विषयांची माहिती एकत्र मिळणे, ही जिज्ञासू अभ्यासकांची गरज असते. ही गरज विश्वकोश भागवू शकतो. त्याचप्रमाणे सुशिक्षित आणि सुसंस्कृत माणसांच्या व्यह्यारांना विविध ज्ञानविषयांचे कमीअधिक अधिष्ठान असल्यामुळे त्यांनाही विविध ज्ञानविषयांची माहिती एकत्र आणि आटोपशीर पद्धतीने मिळणे आवश्यक असते. विश्वकोश त्यांना अधिक बहुश्रुत, डोळस आणि सुजाण करू शकतो. विविध ज्ञानक्षेत्रांचे परस्परांवरील अवलंबन आणि त्यात अनुस्यूत असलेली ज्ञानाची मूलभूत एकता ह्या ंचे भान आधुनिक विश्वकोशकार विशेषत्वाने ठेवताना आढळतात. विश्वकोशाचे संयोजन करताना कांद्याची रचना समोर ठेवावी असे म्हटले जाते. कांद्याचा गाभा ह्या अनेक पापुद्यांनीवेढलेला असतो. ज्ञानाची एकता ह्या गाभ्यासारखी, तर विविधता कांद्याच्या पापुद्यांसारखी असते.

विश्वकोशातील नोंदीची मांडणी सामान्यत: अकारविल्हे करण्यात येत असली, तरी तशा मांडणीला विरोधही झालेला आहे. अकारविल्हे मांडणीत कोणता विषय कोठे येईल, हे केवळ योगायोगाने ठरावे, ही बाब काहींना मान्य होत नाही.


कोशरचनेचे घटक : संहिता खंड, संहितेतील पूरक संदर्भ, ग्रंथसंदर्भ, परिभाषा, सुनिदर्शने वा सचित्रता आणि सूची हे विश्वकोशरचनेचे काही घटक होत. त्यांचा संक्षिप्त परिचय पुढे दिला आहे :

 (1) संहिता खंड : कोशरचनेचा ह्या मुख्य घटक होय. अनेक खंडांच्या विश्वकोशातील बहुसंख्य खंड प्रत्यक्ष माहितीचे – म्हणजे नोंदीचे – असतात. त्यांना संहिता खंड वा शरीरखंड (टेक्स्टव्हॉल्यूम्स) असे म्हणतात. संहिता खंडांत निरनिराळया विषयांवर छोटे, मध्यम व मोठे लेख अंतर्भूत केलेले असतात. त्याचप्रमाणे एकेका विशिष्ट विषयाची व्याप्ती वा त्याचा आवाका दर्शविणारे व्याप्तिलेख वा विस्तृत लेखही असतात.

(2) संहितेतील पूरक संदर्भ : संहितेतील पूरक संदर्भही विश्वकोशातील एक अत्यंत महत्त्वाची अशी अंतर्गत यंत्रणा होय. विश्वकोशाच्या अनेक नोंदीतून विविध विषयांची माहिती वेगवेगळ या संदर्भात निरनिराळ या रूपांत आणि भिन्नभिन्न दृष्टिकोणांतून वा हेतूंनी कमीअधिक मजकुरातून दिलेली असते. अनेक नोंदींतून स्पर्श केलेला एकच विषय किंवा एका नोंदीतून स्पर्शिलेले अनेक विषय, असे विश्वकोशाच्या संहितेचे स्वरूप सामान्यत: असते. संहिता खंडांतून ठिकठिकाणीविखुरलेली अशी अनेकांगी माहिती त्या खंडांत कोठे कोठे पाहता येईल ह्याचे निर्देशन करण्यासाठी पूरक संदर्भयथास्थळी दिले जातात.

विश्वकोशातील पूरक संदर्भ साधारणपणे दोन प्रकारचे असतात : (१) चिन्ह्यांकने, (२) पह्या संदर्भ. पह्या संदर्भांचे उपप्रकार तीन : (१) नोंदीत दिलेले, (२) नोंदीच्या अखेरीस दिलेले, (३) पोकळ नोंदी.

चिन्ह्यांकने  : एखाद्या नोंदीतील विवेचनाच्या ओघात आलेला निर्देश ह्या विश्वकोशात अन्यत्र आलेल्या नोंदीचा निदर्शक असल्यास त्या निर्देशामागे विशिष्ट चिन्ह्यांकन विशिष्ट प्रकारे केले जाते. ह्या निर्देशातील शब्द वा शब्दावली विश्वकोशातील एका स्वतंत्र नोंदीचे शीर्षक असून सदर विवेचनाच्या प्रवाह्यात आलेल्या माहितीशी निगडित अशी अधिक माहिती ह्या स्वतंत्र नोंदीत मिळेल, अशी सूचना ह्या चिन्ह्यांकनाने वाचकाला देण्यात येते. हे चिन्ह्यांकन-संकेत निरनिराळ या विश्वकोशांत निरनिराळ या प्रकारचे असू शकतात. पोकळ बाण व त्यापुढे तिरक्या मुद्राक्षरात नोंदीचे शीर्षक ह्या मराठी विश्वकोशाने यासाठी योजिलेला चिन्ह्यांकन – संकेत आहे. उदा., ‘अठराशे सत्तावनचा उठाव’  ह्या विश्वकोशीय नोंदीतील पुढील मजकुरातले चिन्ह्यांकन : ‘इंग्रजी सत्ता खिळखिळी करण्यासाठी व सातारच्या गादीचे पुनरूत्थान करण्यासाठी सातारकरांचा वकील ⇨ रंगो बापूजी याने सातारा, पुणे, कोल्ह्यापूर येथे गुप्त कारस्थाने सुरू केली’. एकाच नोंदीत अशी अनेक बाणांकने असू शकतात.

ह्या संदर्भ -१ : एखाद्या नोंदीतील विशिष्ट मजकुराशी निगडित अशी माहिती विश्वकोशातील अन्य नोंदीत आलेली असल्यास अशा नोंदीचा निर्देश करताना त्या विशिष्ट मजकुरापुढे ‘पह्या संदर्भ’ देऊन तो केला जातो. मराठी विश्वकोशात चौकटी कंसात [⟶] असे बाणचिन्ह वापरून त्यापुढे संबंधित नोंदीचे नाव दिले आहे. उदा., ‘अपसामान्य मानसशास्त्र’  ह्या नोंदीत ‘व्यक्तिमत्त्व-विकृती’ बद्दलचा काही मजकूर सलगपणे आलेला आहे. ह्या मजकूर संपल्यानंतर त्याच्याशी निगडित अशा ‘व्यक्तिमत्त्व’  ह्या नोंदीचा निर्देश चौकटी कंसात [⟶ व्यक्तिमत्त्व ] असा दिला आहे.

ह्या संदर्भ – २ : काही नोंदीचे संदर्भ हे एखाद्या संपूर्ण नोंदीला पूरक ठरणारे असे असतात. त्यांचा ‘पह्या निर्देश’ नोंदीच्या अखेरीस दिला जातो. उदा., ‘अंकगणित’ अशी नोंद असल्यास ‘अंक’, ‘गणित’, ‘संख्या सिद्धांत’, ‘संच सिद्धांत’ अशा काही नोंदीचे पूरक संदर्भ पह्या : अंक, गणित…… असे देता येतील.

अनेकदा एखाद्या दीर्घ नोंदीतील उपविषयच पूरक म्हणून दाखवायची गरज असते. अशा वेळी त्या दीर्घ नोंदीचे शीर्षक देऊन त्यातील उपविषय त्यापुढेच कंसात दर्शविला जातो.

ह्या संदर्भ – ३ पोकळ नोंदी : विश्वकोशातील काही नोंदी ‘पोकळ’ असतात. म्हणजे वर्णानुक्रमे योग्य जागी अशा नोंदीचे शीर्षक छापलेले असते परंतु त्या नोंदीशी संबंधित अशी कोणतीच माहिती तेथे न देता, ती मिळविण्यासाठी अमुक एक नोंद पह्यावी, अशी सूचना ह्या पोकळ नोंदीच्या शोर्षकासमोर दिलेली असते. उदा., आदिग्रंथ : पह्या ग्रंथसाहिब. आदिग्रंथ हे शीखांच्या ग्रंथसाहिब ह्या पवित्र धर्मग्रंथाचे पर्यायी नाव होय. काही वाचक आदिग्रंथ ह्याच नावाने ह्या धर्मग्रंथाची माहिती मिळवण्यासाठी जातील परंतु नोंद ग्रंथसाहिब ह्या नावाने झालेली असल्याने त्यांना ‘आदिग्रंथ’ अशी नोंद सापडणार नाही. अशा वेळी ह्या ग्रंथावर विश्वकोशात माहिती दिलेली नाही, असा त्यांचा समज होऊ शकतो. तो होऊ नये म्हणून पोकळ नोंदीने सूचित केलेला विषय त्याच्या पर्यायी नावाने विश्वकोशात आलेला आहे, हे वाचकांस सांगणे आवश्यक असते.

एखादा विषय स्वतंत्र नोंदींने नव्हे, तर एखाद्या व्यापक नोंदीचा भाग म्हणून विश्वकोशात आलेला असल्यासही तशी सूचना देण्यासाठी पोकळ नोंदीची योजना करावी लागते. उदा., पाटील वतनासारख्या विषयावरील माहिती वतनसंस्थेसारख्या व्यापक नोंदीचा एक भाग म्हणून विश्वकोशात अंतर्भूत केली असल्यास ‘पाटील वतन’ ही नोंदी पोकळ होईल आणि पाटील वतन : पह्या वतनसंस्था अशी सूचना वाचकांना दिली जाईल.

(३) ग्रंथसंदर्भ : एखाद्या नोंदीखाली दिल्या जाणाऱ्या ग्रंथसंदर्भात दोन प्रकारच्या ग्रंथांचे संदर्भ असू शकतात : (१) ती नोंद तयार करण्यासाठी वापरलेले संदर्भग्रंथ. (२) त्या नोंदीतील विषयाच्या संदर्भात अधिक वाचन करावयाचे असल्यास त्यासाठी आवश्यक असलेले काही वेचक ग्रंथ. साधारणपणे हे ग्रंथसंदर्भ ग्रंथलेखकांच्या/ संपादकांच्या आडनावांच्या वर्णक्रमानुसार दिले जातात. संदर्भग्रंथ देताना प्रथम ग्रंथकार/ संपादकाचे नाव, ग्रंथनाम (सामान्यत: तिरप्या वा ठळक वेगळ या टंकात), ग्रंथाचे प्रकाशनस्थळ आणि शेवटी प्रकाशन वर्ष असा क्रम साधारणत: अनुसरला जातो. मात्र काही विश्वकोशांत ग्रंथांची प्रकाशनस्थळे दिली जात नाहीत.

काही विश्वकोशांत संदर्भग्रंथ-सूची देण्याच्या वेगळ या पद्धती अनुसरल्या जातात. उदा., कोशरचनेसाठी वापरण्यात आलेल्या सर्व ग्रंथांची सूची त्या-त्या खंडात म्हणजे खंडश: दिली जाते, तर काही विश्वकोशांत ती एकाच वेळी, खंडांच्या आरंभी – म्हणजे पहिल्या खंडात – अथवा अखेरच्या खंडाच्या अख रीस दिली जाते.

(४) परिभाषा : ज्ञानविज्ञानांच्या एकेका क्षेत्राची एकेक वैशिष्ट यपूर्ण परिभाषा असते आणि त्या-त्या क्षेत्रातील ठळक गोष्टी आणि बारकावे नेमकेपणाने टिपणाऱ्या पारिभाषिक संज्ञांनी ती घडलेली असते. ह्या पारिभाषिक संज्ञांभोवती त्या-त्या क्षेत्रांशी संबंधित असा भाषाव्यवह्यार फिरत असतो. उदा., अर्थशास्त्रावरील लेखन वा चर्चा त्या शास्त्राच्या परिभाषेत करावी लागते. कायद्याबाबत लिह्यावयाचे वा बोलावयाचे असल्यास कायद्याची परिभाषा वापरावी लागते. क्रिकेट, बुद्धिबळ अशा खेळांचीही परिभाषा असते आणि त्या-त्या खेळाविषयी लिहिताना-बोलताना त्या-त्या खेळांची खास परिभाषा उपयोगात आणली जाते. कोणत्याही गैरसमजाला जागा राहणार नाही, अशा प्रकारे प्रत्येक पारिभाषिक संज्ञेतून एकच एक अर्थ व्यक्त व्ह्यावा, ह्या पारिभाषिक संज्ञा घडविण्यामागील हेतू असतो. कारण अशा काटेकोर अर्थाच्या संज्ञांमुळेच कोणत्याही विषयाच्या विवेचनात नेमकेपणा येऊ शकतो.  [⟶ परिभाषा].

विश्वकोश ह्या कोणत्याही प्रकारातला असला, तरी त्यातील नोंदी ज्ञानविज्ञांनाच्या कोणत्या-ना-कोणत्या क्षेत्रांशी निगडित असल्यामुळे त्यांतील विवेचनासाठी संबंधित क्षेत्रांतील परिभाषांचा वापर करावाच लागतो. ज्ञानविज्ञानांच्या विकासाची दीर्घ परंपरा ज्या भाषांना लाभलेली असते, त्या भाषांत ज्ञानविज्ञानविषयक लेखनही मोठ्या प्रमाणात झालेले असते आणि ही परंपरा घडत असताना निरनिराळ या विषयांच्या परिभाषाही तयार होत गेलेल्या असतात. अशा तयार परिभाषा ह्याताशी असतील, तर विश्वकोशीय लेखनासाठी त्या सहजपणे वापरता येतात. लेखकांना त्या अवगत असतात. त्याचप्रमाणे अनेकदा वापरून रूढ झाल्यामुळे वाचकांनाही-किमान त्या-त्या विषयातील जिज्ञासूंना तरी-त्या परिचयाच्या झालेल्या असतात. अशी परंपरा आधुनिक यूरोपीय भाषांना लाभलेली आहे. बौद्धिक विषयांवरील प्रगल्भ लेखन त्या भाषांत होऊ लागले तेव्ह्यापासून ग्रीक-लॅटिन परिभाषांचा त्या भाषांमध्ये प्रवेश झाला. तथापि अशी परंपरा ज्या भाषांच्या पाठीशी नाही, त्या भाषांमध्ये विश्वकोशरचना करणाऱ्यांना परिभाषांची समस्या अपरिह्यार्यपणे जाणवते. ज्ञानविज्ञानांच्या विवेचनासाठी योग्यअशाभारतीय भाषांमध्ये पूर्णत: तयार नाहीत. मराठीचीही हीच स्थिती आहे. तथापि परिभाषा घडविण्याचे प्रयत्न होत आहेत. भारतात इंग्रजांची सत्ता आल्यानंतर ज्ञानविज्ञानांतील नवे विषय भारतीय शिक्षणक्रमात अंतर्भूत झाले. शालेय आणि मह्याविद्यालयीन पातळीवरील शिक्षण मातृभाषेतून देण्याचे धोरण अंमलात आल्यानंतर निरनिराळ या विषयावरील पाठ्यपुस्तके भारतीय भाषांतून तयार करावी लागणे अटळ होते. त्यामुळे मराठीतही तशा प्रयत्नांतून परिभाषा घडविण्याचे प्रयत्न झाले आहेत.ह्या प्रयत्नांतून घडलेल्यापारिभाषिक संज्ञांचा उपयोग मराठीतील विश्वकोशरचनेसाठी काही प्रमाणात होऊ शकतो.

पारिभाषिक संज्ञांच्या परश्‍न मह्याराष्ट्रीय ज्ञानकोशाची रचना करताना डॉ. केतकरांच्याही समोर होता. या ग्रंथात ‘पाश्चातत्यशास्त्रे अनेक येणार, त्याच्यासाठी संज्ञा काय योजावयाच्या या संबंधाने’ त्यांचे काही निर्णय असे होते : मुख्य संज्ञा शक्य तो संस्कृत व मराठी भाषेतील शब्द घेऊन बनवावयाच्या. इंग्रजी, अरबी, फार्सी अशा परभाषांतील संज्ञा वगळायच्या नाहीत परंतु त्या उच्चाराला सुलभ व बऱ्याच प्रचलित असल्या तरच घ्यायच्या. संज्ञा शोधताना मराठीत शास्त्रीय विषयांवर झालेले सर्व लेखन तपासले पाहिजे, कारण सर्वात उपयुक्त संज्ञा त्याच मार्गाने मिळतील अशी डॉ. केतकरांची धारणा होती. यंत्रविषयक अनेक संज्ञा मुंबईच्या आणि इतर ठिकाणच्या मजुरांनी बनवल्या असून त्या बऱ्याच महत्त्वाच्या असल्याचे आपले निरीक्षणही डॉ. केतकर ह यांनी नोंदविले आहे.

मराठी परिभाषेचा तीव्रतेने जाणवणारा प्रश्‍न सोडविण्याच्या दृष्टीने सर्व विषयांच्या परिभाषेची निर्मिती आणि प्रयोग एकाच वेळी करण्याचा प्रयत्न मराठी विश्वकोशाने केला आहे. परिभाषांच्या निर्मितीसाठी पूर्वी झालेल्या प्रयत्नांचा यथायोग्य उपयोग करून घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अनेक पारिभाषिक संज्ञा संस्कृत भाषेच्या आधाराने तयार केल्या आहेत. त्या करताना अनेकदा उपयुक्ततेचा विचार करून संस्कृत भाषेच्या व्याकरणनियमांचे काटेकोरपणे पालन करणे बाजूला ठेवावे लागले आहे. काही रूढ शब्दांवरूनही पारिभाषिक संज्ञा तयार केल्या आहेत. इंग्रजीतला एखादा शब्द निरनिराळ या विषयांमध्ये निरनिराळे अर्थ धारण करतो. पण त्या अर्थांच्या प्रतिसंज्ञा मराठीत मात्र वेगवेगळ या कराव्या लागतात. मूळ इंग्रजी संज्ञावरून अनेक मराठी प्रतिसंज्ञा केलेल्या असल्या, तरी काही मूळ आंतरराष्ट्रीय आणि इंग्रजी संज्ञा मराठी विश्वकोशात जशाच्या तशा वापरलेल्या आहेत.


मराठीतील काही विश्वकोश त्यांनी वापरलेल्या पारिभाषिक संज्ञांचा मराठी-इंग्रजी आणि इंग्रजी-मराठी असा दुहेरी संग्रह वाचकांच्या सोयीसाठी त्यांना उपलब्ध करून देतात. पारिभाषिक संज्ञा जेथे पुरेशा प्रचलित झालेल्या नसतात आणि वाचकांना मूळ इंग्रजी संज्ञाच अधिक माहीत असतात तेव्ह्या असा दुहेरी कोश उपयुक्त ठरतो. मराठी विश्वकोशात वापरलेल्या पारिभाषिक संज्ञांचा असा दुहेरी कोश १९७३साली प्रसिद्ध करण्यात आला आहे. स. मा. गर्गेसंपादित भारतीय समाजविज्ञान कोशाचा सह्यावा खंड पारिभाषिक संज्ञांचा असून सु. २५,०००शब्द त्यात अंतर्भूत आहेच. तसेच दे. द. वाडेकरसंपादित मराठी तत्त्वज्ञान मह्याकोशाच्या तिसऱ्या खंडाच्या अखेरीस तत्त्वज्ञानातील पारिभाषिक संज्ञांचा एक संग्रह जोडलेला आहे.

 विश्वकोशातील पारिभाषिक संज्ञा त्याच्या सूचीत समाविष्ट होत असल्यामुळे साधला जाणारा एक महत्त्वाचा परिणाम डॉ. केतकर ह यांनी त्यांच्या मह्याराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या सूची खंडाला लिहिलेल्या प्रस्तावनेत दाखवून दिला आहे. सूचिगत अशा विविध पारिभाषिक संज्ञांचा ‘शास्त्रीय शब्दसंग्राहकांस’ उपयोग होईल असे त्यांनी म्हटलेआहे. सूचीच्या अंतर्गत पारिभाषिक संज्ञांचा एक प्रकारचा कोशच वाचकांना उपलब्ध होतो, असा डॉ. केतकरांच्या म्हणण्याचा आशय दिसतो.

मूळ इंग्रजी संज्ञेसाठी आणि ह्या संज्ञेच्या एकाच अर्थासाठी एकच पारिभाषिक संज्ञा असणे सुसंगतीच्या दृष्टीने इष्ट असले, तरी एकाच मूळ इंग्रजी संज्ञेसाठी व त्या संज्ञेच्या एकाच अर्थासाठी अनेकदा निरनिराळे लेखक निरनिराळ्या  पर्यायी संज्ञा करतात व त्या वापरल्याही जातात.

(५) सुनिदर्शने : (इलेस्टरेशन्स). विश्वकोशातील विविध नोंदींचा ज्ञानबोधात्मक असा जो आशय मजकुराच्या रूपाने मांडला जात असतो, त्याला दृश्यात्मकतेची जोड मिळवून देणारा सर्जनशील घटक म्हणून सुनिदर्शनांचे वा सचित्रतेचे महत्त्व फार मोठे आहे. नोंदीचा मजकूर आणि तिच्याशी निगडित अशी सुनिदर्शने ही परस्परांना पूरक ठरत असतात किंबहुना मजकूर आणि सुनिदर्शने ही नोंदींची अविभाज्य अंगे होत. विश्वकोशात ती आवश्यकतेनुसार कधी नोंदींच्या मजकुराबरोबर, तर कधी स्वतंत्रपणे चित्रपत्रांच्या (आर्टप्लेट्स) स्वरूपात समाविष्ट केलेली असतात. निव्वळ मजकुराने भरलेल्या पृष्ठापेक्षा सचित्र पृष्ठ वाचकाच्या दृष्टीने नुसते उद्‌बोधकच ठरत नाही, तर त्यांच्या डोळ्यांनाही आनंददायक वाटते. त्यामुळे विश्वकोशातील सचित्रतेचा ह्या घटक कल्पकतेने वापरून प्रभावी करण्याचा विश्वकोशकारांचा प्रयत्न असतो.

विश्वकोशातील सुनिदर्शनांचे साधारणपणे तीन गट पाडता येतील : (१) कोष्टके वा तक्ते (२) रेखाचित्रे, चित्रपत्रे, छायाचित्रे (३) आकृत्या.

महत्त्वाची माहिती एका दृष्टिक्षेपात कळावी, ह्या कोष्टके वा तक्ते ह्यांचा हेतू असतो. कोष्टकांत निरनिराळे स्तंभ पाडून त्या स्तंभांतून माहिती तिच्या स्वरूपानुसार विभागलेली असते व तशी ती एकेका स्तंभाखाली देणे वाचकांच्या दृष्टीने फारच सोयीचे असते. उदा., भारतातील भात पिकवणाऱ्या प्रमुख राज्यांतील भाताचे क्षेत्र व उत्पादन अमुक एका वर्षात किती झाले, ही माहिती वा मानवाने केलेल्या अंतराळ उड्डाणांचे ऐतिह्यासिक तपशील. उदा., यानाचे नाव, संबंधित अंतराळवीरांचा देश, त्या अंतराळवीरांची नावे, त्यांच्या अंतराळ उड्डाणाची तारीख इ. काय आहेत हे कोष्टके वा तक्ते देऊन जितक्या सहजपणे स्पष्ट करता येईल तितके ते अनेक परिच्छेदांतून दिलेल्या माहितीतून करता येणार नाही. म्हणजे सहजसंदर्भदायिता हे कोष्टकांचे वा तक्त्यांचे वैशिष्ट्य ठरते.

चित्रे, छायाचित्रे ही अनेकदा मजकुरासोबतच दिली जातात. विविध प्रकारचे प्राणी, तऱ्हतऱ्हेच्या वनस्पती, प्रसिद्ध व्यक्ती, देवता, मूर्ती, नृत्यदृश्ये, निरनिराळ्याआकारांची भांडी, विख्यात वास्तू इत्यादींचे चित्रमय दर्शन विश्वकोशाच्या मजकुरातून घडते. ह्या चित्रमयतेची उपयुक्तता आणि विलोभनीयता काही उदाहरणांवरून स्पष्ट करता येईल. वनस्पतिविज्ञानातील ‘गुलाब’  ह्या नोंदीच्या सुनिदर्शनात विविध जातींचे, रंगांचे गुलाब कसे दिसतात हे चित्रांतून वा चित्रपत्रांतून दाखविल्यास त्या नोंदीच्या आकलनात मोलाची भर पडेलच परंतु त्या गुलाबांचे दर्शनही नेत्रसुखद ठरेल. चित्रकलेसारख्या नोंदीला देशीविदेशी चित्रकारांच्या उत्तमोत्तम रंगीत चित्रांच्या छायाचित्रांची जोड देऊन कलेतिह्यासातील वेगवेगळ्या संप्रदायांचे व शैलीविशेषांचे स्वरूप वाचकाला दाखविता येते.

कोष्टके, चित्रे ह्या  यांच्याप्रमाणेच आकृत्याही-विशेषत: विज्ञानविषयक नोंदीसाठी-विश्वकोशात अत्यावश्यक आहेत. मजकूर आणि सुनिदर्शने ही नोंदीची अविभाज्य अंगे होत, हे विज्ञान व तंत्रविद्याविषयक नोंदीची अधिक स्पष्टता करणाऱ्या आकृत्यांच्या बाबतींत विशेषत्वाने रत्ययास येते. उदा., पाणी खालून वर काढण्याचे एक यांत्रिक साधन,  ह्या दृष्टीने सामान्य माणूस ज्या ‘पंपा’कडे बघतो त्या पंपाचे आधुनिक यांत्रिक उद्योग व यांत्रिक अभियांत्रिकी ह्या ंच्याशी संबंधित अशा स्वरूपाचे भान ठेवून त्याची अधिक समावेशक व्याख्या आणि माहिती देण्यासाठी तयार केलेल्या विश्वकोशीय नोंदीतील आशय वेगवेगळ्या प्रकारच्या पंपांची अंतर्गत रचना दाखविणाऱ्या आकृत्यांनीच अधिक स्पष्ट होऊ शकतो. वैद्यकाच्या क्षेत्रातील अग्निपिंड, अधिवृक्क ग्रंथी, अवटु ग्रंथी, अश्रु ग्रंथी ह्या ंसंबंधीच्या विवरणालाही आकृत्या जो साक्षातपणा प्राप्त करून देतात, तो अभ्यासू वाचकाच्या आकलनाला साह्याय्यभूत ठरतो. ज्ञानविज्ञानांची बहुतेक क्षेत्रे अशी आहेत, की त्यांच्याशी संबंधित असे विषय अभ्यासकांपर्यंत नेमकेपणाने पोहोचविण्यासाठी विवेचन आणि सुनिदर्शने ह्या ंची अत्यंत स्वाभाविक, एकात्म मांडणी करावी लागते.

विश्वकोशातील नकाशेही आकृत्यांप्रमाणेच महत्त्वाचे आहेत. भौगोलिक आणि ऐतिह्यासिक माहितीला अनेकदा नकाशांची जोड देणे आवश्यक आणि अटळ असते. पृथ्वीवरील खंड, राष्ट्रे, राज्ये तसेच एकेका राज्यातील जिल्हे, सुभे वा तत्सम विभाग ह्या ंच्यावरील नोंदीत त्यांचे नकाशे देणे गरजेचे ठरते. एखाद्या प्राचीन साम्राज्याचा विस्तार दाखविण्यासाठी, त्याचप्रमाणे इतिह्यासातील एखाद्या प्रसिद्ध युद्धाची माहिती देतानाही नकाशा उपयुक्त ठरतो.

सुनिदर्शने ह्या विश्वकोशातील सर्वांत सर्जनशील कल्पकतेचा घटक असल्यामुळे प्रत्येक विश्वकोश तो कशा प्रकारे ह्याताळतो आणि दृश्यात्मकतेचे किती परिणामकारक आविष्कार घडवतो ह्या ंवर त्याचे वेगळेपण व वैशिष्ट्यपूर्णता अवलंबून असते.

(६) सूची : एखाद्या ग्रंथात ठिकठिकाणी विखुरलेले निरनिराळ्या विषयांचे, कमी-अधिक माहितीचे निर्देश त्या ग्रंथाच्या कोणकोणत्या पृष्ठांवर सापडतील, हे दर्शविणारी संकलित यादी म्हणजे सूची होय. ह्या सूचीत असे निर्देश अकारविल्हे दिलेले असतात. त्याचप्रमाणे प्रत्येक निर्देशासमोर तो जेथे सापडेल अशा पृष्ठांचे क्रमांक क्रमवार दिलेले असतात. ह्या सूचीच्या आधारे जिज्ञासू वाचक त्यांना हव्या असलेल्या विषयांवरील माहिती संबंधित पृष्ठे पाहून सहजपणे मिळवू शकतात. त्यासाठी संपूर्ण ग्रंथात त्यांना शोधाशोध करावी लागत नाही. उदा., वैदिक संस्कृतीवरील एखाद्या ग्रंथात ‘यज्ञ’ ह्या विषयावर नेमकी काय आणि किती माहिती आली आहे, हे पाहण्याची जिज्ञासा ज्या वाचकाला असेल, तो त्या ग्रंथाच्या सूचीत वर्णानुक्रमे आलेला ’यज्ञ’ ह्या निर्देश पाहून त्याच्यासमोर नोंदलेले पृष्ठांचे क्रमांक पाहील आणि त्या ग्रंथात यज्ञाविषयी आलेली माहिती मिळवील. अनेक छोट्या-मोठ्या ग्रंथांच्या अखेरीस वाचकांच्या सोयीसाठी अशी सूची दिलेली आढळते. ही निर्देशांची सूची असल्यामुळे हिला ‘निर्देश-सूची’ असेही म्हटेल जाते.


 विश्वकोशासारख्या ग्रंथात सूची असणे अत्यावश्यकच असते. अनेक विश्वकोश हे प्राय: बहुखंडी असून त्यांच्या एकेका खंडाची पृष्ठसंख्याही बहुधा विपुल असते. त्यांतून अनेक ज्ञानविषय, विविध संकल्पना, संज्ञा, व्यक्ती, स्थळे, घटना वस्तू इत्यादींबद्दलची माहिती कधी स्वतंत्र नोंदीच्या रूपाने, तर कधी निरनिराळ्या नोंदीत विवेचनाच्या ओघात येणाऱ्या निर्देशांबरोबर आलेली असते. माहिती देणारे हे सर्व निर्देश विश्वकोशाच्या कोणकोणत्या खंडांतील  कोणकोणत्या पृष्ठांवर आहेत हे स्पष्ट करणारी एक विस्तृत सूची विश्वकोशासाठी तयार करावी लागते. अनेकदा अशा सूचीसाठी एक स्वतंत्र सूचिखंडच विश्वकोशाच्या एकंदर योजनेत समाविष्ट केलेला असतो.

विश्वकोशात ज्या छोट्या-मोठ्या नोंदी आलेल्या असतात, त्या सर्वांचा अंतर्भाव सूचिखंडात केला जातो. पोकळ नोंदींचाही केलातो. हे नोंदशीर्षकांचे निर्देश सापेक्षत: मोठ्या टंकांत छापलेले असतात. नोंदशीर्षकांच्या निर्देशांपुढे ती-ती नोंद विश्वकोशाच्या कोणत्या खंडात व कोणत्या पृष्ठावर आलेली आहे हे दर्शविलेले असते. सूचिखंडात नोंदशीर्षकाशिवाय इतरही अनेकविध निर्देश अकारानुक्रमे दिलेले असतात. त्यापैकी काहींच्या-उदा., उपविषयांच्या-पोटात त्यांच्याशी निगडित असे अन्यत्र आलेले निर्देशही दिलेले असतात. हयांना ‘दुय्यम निर्देश’ म्हणता येईल आणि ज्यांच्या पोटात असे दुय्यम निर्देश अंतर्भूत करायचे असतात. त्यांना ‘मुख्य निर्देश’ म्हणता येईल. दुय्यम निर्देश एकाहून अधिक असल्यास ते मूख्य निर्देशाखाली वर्णानुक्रमे एकाखाली एक असे देण्यात येतात. एखादी नोंदही एखाद्या मुख्य निर्देशाच्या पोटातील दुय्यम निर्देश म्हणून घालण्याची आवश्यकता असू शकते. उदा., ‘ख्मेर संस्कृती’ आणि ‘अंकोरवात’ व ‘अंकोरथोम’ अशा तीन स्वतंत्र नोंदी विश्वकोशात असल्यास ‘ख्मेर संस्कृती’  ह्या निर्देशाच्या पोटात ख्मेर संस्कृतीशी निकटपणे संबंधित असलेल्या या अन्य दोन नोंदींचा निर्देश करावा लागेल. अनेकदा मुख्य निर्देश आणि त्याच्या पोटातील दुय्यम निर्देश ह्या ंची अदलाबदल केली जाते. उदा., ‘अंकोरवात’ व‘अंकोरथोम’  ह्या सूचीतील दोन मुख्य निर्देशांखाली ‘ख्मेर संस्कृती’  ह्या नोंदीचा निर्देश येऊ शकतो. ज्यांवर नोंद नाही, असे इतरही अनेक निर्देश-उदा., स्थळांचे, व्यक्तींचे इ.- विश्वकोशात असतात. तेही वर्णानुक्रमे सूचीत अंतर्भूत करावे लागतात.

सूचिखंडातले काही निर्देश नेमके कसले आहेत, कोणत्या विषयांचे आहेत हे अनेकदा सर्व वाचकांना समजत नाही. उदा., एखाद्या लॅटिन ग्रंथाचा निर्देश. वाचकांना येणाऱ्या अशा संभाव्य अडचणी लक्षात घेऊन विश्वकोशातल्या अशा सर्व निर्देशांपुढे कंसात संक्षिप्त स्पष्टीकरणात्मक माहिती द्यावी लागते.

सूचीतही ‘पह्या संदर्भ’ द्यावे लागतात. उदा., पोकळ नोंदीच्या पुढे, जेथे एका निर्देशाकडून दुसऱ्या निर्देशाकडे जावयाची वाचकांना सूचना केलेली असते. उदा., आदिग्रंथ : पह्या ग्रंथसाहिब. शिखांच्या ग्रंथसाहिब ह्या ग्रंथाला ‘आदिग्रंथ’ हे पर्यायी नाव असल्यामुळे काही वाचक ह्या ग्रंथाची माहिती ‘आदिग्रंथ’ हे शीर्षक मनात ठेवून पह्यायला जाण्याची शक्यता आहे. तथापि विश्वकोशात ती नोंद ‘ग्रंथसाहिब’  ह्या अधिक प्रचलित अशा नावाने घेतली असल्यास वाचकाला त्या निर्देशाकडे जाण्याची सूचना करावी लागते.

विश्वकोशाचा जास्तीत जास्त वाचकांना सूचीच्या आधारे होऊ शकतो. एखाद्या विषयावर -उदा., भारतावर विश्वकोशात विस्तृत नोंद असली, तरी ती नोंद म्हणजे त्या संपूर्ण विश्वकोशात भारतावर देण्यात आलेली संपूर्ण माहिती नव्हे. त्या विश्वकोशात आलेली भारतावरील एकंदर माहिती मिळवण्यासाठी वाचकांना त्या विश्वकोशाच्या सूचीत नमूद केलेल्या ‘भारत’  ह्या निर्देशाकडे जावे लागले. तेथे ‘भारत’  ह्या नोंदीचा मुख्य निर्देश असेलच परंतु त्याखेरीज भारताशी संबंधित असलेल्या आणि त्या विश्वकोशाच्या एकूण खंडांतून ठिकठिकाणी विखुरलेल्या माहितीच्या अनेक संदर्भांचेही खंडवार, पृष्ठवार निर्देशन केलेले आढळेल. त्या निर्देशनाच्या आधारे वाचकांना त्या विश्वकोशाच्या एकूण खंडांतून ठिकठिकाणी विखुरलेल्या भारताविषयक माहितीकडे जाता येईल.

एखाद्या विषयावर विश्वकोशात स्वतंत्र नोंद नसेल परंतु त्या विषयासंबंधीची माहिती त्या विषयाशी संबंधित अशा एक वा अनेक वेगळ्या नोंदींतून मिळू शकेल. उदा., ख्मेर प्रजासत्ताकात असलेल्या ‘अंकोरवात’  ह्या प्रसिद्ध स्थळाची नोंद एखाद्या विश्वकोशात नसेल पण ख्मेर प्रजासत्ताक अशी नोंद तेथे असेल आणि अंकोरवातविषयीची माहिती वाचकांना त्या नोंदीत यथास्थळी मिळू शकेल. अन्य काही ठिकाणीही ती असू शकेल. विश्वकोशीय सूचीत ‘अंकोरवात’ असा निर्देश असेल आणि त्या निर्देशाखाली ह्या स्थळासंबंधीची माहिती त्या विश्वकोशाच्या एकूण खंडात कोठे मिळू शकेल ह्याचे खंडवार, पृष्ठवार निर्देशन केलेले असेल. अनेक ऐतिह्यासिक व्यक्ती, अनेक स्थळे, अनेक पदार्थ ह्या ंस त्यांच्या अल्प महत्त्वामुळे स्वतंत्र लेखांचा मान मिळत नाही. अशा विषयांवर माहिती काय आहे हे जिज्ञासूंना सूचीच्या आधारे एकदम सापडेल, असे डॉ. केतकरह्यांनी सूचीचे स्वरूप सांगताना म्हटले आहे.

एखाद्या विश्वकोशात एखाद्या स्वतंत्र नोंदीच्या रूपाने वा अन्य प्रकारे एखाद्या विषयासंबंधीचे निर्देश किती आणि कशा प्रकारे आले आहेत, त्यांतून किती माहिती उपलब्ध होऊ शकते हे पाहून त्या विश्वकोशात त्या विषयाला एकंदर किती जागा मिळाली आहे आणि त्याची एकंदर मांडणी कितपत झाली आहे ह्याची वाचकाला कल्पना येऊ शकते.

डॉ. केतकरांनी मह्याराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या सूचिखंडाच्या (खंड २२वा) प्रस्तावनेत सुचीचा उपयोग दोन तीन तऱ्ह्यांनी होऊ शकेल, असे सांगून सूचीमुळे ‘भाषा विकासाचे अवलोकन’ होईल असे म्हटले आहे. विश्वकोशात वापरलेले पारिभाषिक शब्द वा संज्ञा सूचीमध्ये अंतर्भूत केल्या जातात. ह्यामुळे सूची पाहणाऱ्या जिज्ञासू वाचकांना नवनव्या पारिभाषिक संज्ञांच्या रूपाने झालेला भाषाविकास प्रत्ययास येतो. सूची तयार करण्याच्या प्रक्रियेत, सूचीच्या पोटात तयार झालेला ह्या पारिभाषिक संज्ञांचा एक कोशच होय. पारिभाषिक शब्दांव्यतिरिक्त अन्य अनेक शब्दांचे एकत्रित दर्शनही निरनिराळ्या निर्देशांच्या रूपाने वाचकांना घडू शकते आणि त्यातूनही भाषाविकासाचा एक प्रभावी आविष्कार घडू शकतो. सूची ही भाषाविकासाचा प्रत्यय जसा देते, तसाच ती ज्ञानविकासाचा, ज्ञानाच्या प्रगतीचा प्रत्ययही देते, असे डॉ. केतकरांनी म्हटले आहे. सूचीतील निर्देश हे निरनिराळे ज्ञानविषय, त्यांतील संकल्पना, त्यांच्याशी निगडित अशा विविध प्रणाली, घटना, व्यक्ती, संज्ञा इत्यादींचे असतात हे पाहता डॉ. केतकरांनी मांडलेल्या ह्या मुद्याचे महत्त्व लक्षात येऊ शकते. ज्यांच्याविषयी जाणून घेण्याची मन:पूर्वक इच्छा वाचकाला असते व ज्यांच्याविषयी नेमकेपणाने काही माहीत नसते, असे अनेक ज्ञानविषय वाचकांना सूचीत दिसतात आणि त्यांची ज्ञानजिज्ञासा जागृत करतात, असा सूचीचा आणखी एक महत्त्वाचा उपयोग दाखवून दिला जातो.

सूचीचा उपयोग कोशकारांनाही कसा होऊ शकतो, हे डॉ. केतकरांनी निदर्शनास आणले आहे : ‘ज्ञानकोशातील लेखांत जर परस्परविरूद्धता किंवा असंगति असेल तर ह्या सूचीमुळै तीहि लक्षांत येऊन त्या लेखविषयांवर विशेष विचार किंवा नवीन संशोधन याला प्रेरणा होईल’ असे त्यांनी म्हटले आहे. एखाद्या विषयासंबंधीचा, विश्वकोशातील निरनिराळ्या ठिकाणी विखुरलेला मजकूर सूची तयार करताना अवलोकनात येतो व त्या वेळी डॉ. केतकर म्हणतात, तशी विवेचनातील विधानांत परस्परविरूद्धता किंवा असंगी असल्यास ती सूची करणाऱ्यांच्या लक्षात येते व यथावकाश दुरूस्त करता येते.

सूची करण्यासाठी प्रशिक्षण व कौशल्य ह्या ंची गरज असते. ती शक्य तितक्या वस्तुनिष्ठपणे करावयाची असली, तरी ती करताना कोणते निर्देश सूचीत अंतर्भूत करण्याजोगे आहेत,  ह्याबाबत वैयक्तिक अभिरूची, सूची करणाऱ्याचा व्यक्तिगत दृष्टिकोण ह्यांचा काही प्रभावही सूचीवर पडू शकतो. [⟶ सूचि ].


विश्वकोशाची निर्मितिप्रक्रिया : विश्वकोशरचनेचा इतिह्यास सु. दोन हजार वर्षांचा आहे. ह्या दीर्घ कालखंडातील पहिल्या सु. १६००वर्षांच्या परंपरेत विश्वकोशांचे स्वरूप विविध  विषयांवरीललेखसंग्रह्यांसारखे (अँथॉलॉजी) होते. ज्ञानाच्या विविध शाखांमध्ये झालेल्या महत्त्वाच्या ग्रंथरचनेतून वेचक लेखन संकलित करून ते विश्वकोशात अंतर्भूत केले जात असे. संकलनाच्या ह्या कार्यात विश्वकोशकर्त्याला साह्याय्य करणाऱ्या अभ्यासू व्यक्ती आणि लेखनिकही असत. परंतु हळूहळू विश्वकोशाचे हे स्वरूप बदलले आणि आधुनिक विश्वकोशरचनेच्या विकासपर्वाला प्रारंभ झाला. पश्चिमी देशांतील ह्या पर्वाचा काळ सु. दोनशे वर्षांचा आहे तथापि ह्या दोन शतकांच्या कालखंडात आधुनिक पश्चिमी विश्वकोशांची परंपरा स्थिर होऊन तिचा सतत विकास होत राहिला.

 विश्वकोशनिर्मितीसाठी स्थापन केलेली एक सुसंघटित संस्था, तिला मार्गदर्शन करण्यासाठी ज्ञानविज्ञानांच्या विविध क्षेत्रांतील अधिकारी व्यक्तींचे आणि शिक्षणतज्ज्ञांचे एक सल्लागार मंडळ, प्रमुख संपादक वा व्यवस्थापकीय संपादक आणि त्यांच्या ह्याताखाली वेगवेगळ्या संपादकीय स्तरांवर काम करणारा सुविद्य संपादकवर्ग, कला आणि निर्मितिसंचालक व त्यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वकोशाची सुनिदर्शनात्मक बाजू सांभाळणारे चित्रकार, छायाचित्रकार, आरेखक, नकाशांसाठी मानचित्रकार इ. कर्मचारी तसेच ह्या सर्वांच्या उपयोगासाठी विविध प्रकारच्या कोशवाङ् मयाबरोबरच निरनिराळ्या विषयांवरील अद्ययावत व उत्तमोत्तम संदर्भग्रंथांनी सुसज्ज असे ग्रंथालय, विश्वकोशाच्या छपाईसाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध असणारे मुद्रणालय आणि विश्वकोशाच्या संपूर्ण यंत्रणेची प्रशासकीय बाजू सांभाळणारे प्रशासन ही आधुनिक विश्वकोशरचनेसाठी उभारल्या जाणाऱ्या संस्थात्मक संरचनेची वैशिष्ट्ये होत.

विश्वकोशरचना ह्यातात घेण्यापूर्वी आपण करणार असलेल्या विश्वकोशाची उद्दिष्टे काय आहेत, हे विश्वकोशकर्ते निश्चित करीत असतात. ती निश्चित करण्याच्या संदर्भात अनेक मूलभूत प्रश्‍नांचा विचार त्यांनी करून ठेवलेला असतो. उदा., आपण रचणार असलेल्या विश्वकोशाचा वाचकवर्ग कोण असणार आहे? त्याच्या अपेक्षा काय आहेत? आपला विश्वकोश ज्ञानाच्या कोणत्या क्षेत्रांशी निगडित असणार आहे? त्या दृष्टीने आपल्या विश्वकोशात कोणत्या विषयांचा अंतर्भाव आपण करणार आहोत आणि त्या विषयांची माहिती आपल्या विशिष्ट वाचकवर्गापर्यंत पोहचविण्यासाठी त्यांची मांडणी जास्तीतजास्त चांगल्या प्रकारे कशी करता येईल? आपला विश्वकोश किती खंडांचा असावा? एकंदर किती पृष्ठांचा असावा, प्रत्येक खंडात किती पृष्ठे असावीत, पृष्ठाचे आकारमान काय असावे? एकूण पृष्ठांत सुनिदर्शनांचे वा सचित्रतेचे प्रमाण काय असावे? कोणत्या प्रकारची सुनिदर्शने अंतर्भूत करावीत? वाचकांना हवी असलेली विशिष्ट माहिती सहजपणे मिळावी,  ह्यासाठी काय करता येईल इत्यादी. थोडक्यात, स्वीकृत कोशरचनेच्या अंतर्बाहय स्वरूपाच्या परिप्रेक्ष्याची परिपूर्ण कल्पना विश्वकोशकर्ते स्वत:समोर ठेवतात. ह्या कल्पनेतच त्या विश्वकोशाच्या कोशविशिष्ट मर्यादाही स्पष्ट होतात.

विश्वकोशाचा वाचकवर्ग : वर नमूद केल्याप्रमाणे आपल्या विश्वकोशाचा वाचकवर्ग कोण असणार आहे? ह्या प्रश्‍न विश्वकोशाची योजना आखताना उद्दिष्टांच्या दृष्टीने प्रथम विचारात घ्यावा लागतो. हे विश्वकोशरचनेच्या इतिह्यासात आरंभापासून घडत आलेले आहे. रोमन कॉन्सल केटो द सेन्सर (२३४-१४९-इ. स. पू.) ह्याने आपल्या मुलाला अनेक प्रकारची उपयुक्त माहिती देण्यासाठी पत्रे लिहिली. माहितीचे हे पत्रात्मक संकलन हे विश्वकोशरचनेचे एक आद्य रूप मानले जाते. केटोचा पुत्र ह्या त्याचा वाचक होता आणि त्याला जे ज्ञान द्यावयाचे ते व्यावह्यारिक दृष्टया उपयुक्त असले पाहिजे, ही रोमन दृष्टी त्याने ठेवली होती. मध्ययुगातबार्‌‌‌यॉलोमीअसअँग्लिकस(तेरावे शतक) ह्याने De proprietatibus rerum (पहिली मुद्रित प्रत सु. १४९५) ह्या आपला विश्वकोश सर्वसामान्यांसाठी रचला. एन्‌साय्‌क्लोपीडिआ ब्रिटानिकाने जिज्ञासू आणि बुद्धिमान (क्यूरिअस अँड इंटलिजंट) अशा सामान्यांचा वाचकवर्ग समोर ठेवला. विविध ज्ञानक्षेत्रांतील विशेषज्ञांचे जग आणि सर्वसामान्य वाचक ह्याच्यातील अंतर नाहीसे करण्यासाठी उभारलेला एक पूल, ह्या आपल्या विश्वकोशातील हजारो नोंदीमागील हेतू असल्याचे एन्साय्क्लोपीडिआ अमेरिकानाने नमूद केले आहे, तर द वर्ल्ड बुक एन्‌साय्‌क्लोपीडिआ ह्या विशेषत: प्राथमिक आणि माध्यमिक शाळांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या आणि संदर्भाच्या गरजा भागविण्यासाठी रचण्यात आला आहे. मह्याराष्ट्रीय ज्ञानकोश ह्या मह्याराष्ट्राचे बौद्धिक स्वातंत्र्य पन करण्यासाठी झालेला प्रयत्न होय, असे त्या ज्ञानकोशाचे संपादक डॉ. केतकर ह्या ंनी म्हटले आहे. ह्याचाच अर्थ, बौद्धिक स्वातंत्र्याची आकांक्षा असणारा वा ती जागृत करण्याच्या प्रयत्नांना प्रामाणिक प्रतिसाद देऊ शकणारा असा मह्याराष्ट्रीय वाचकवर्ग केतकरांच्या डोळ्यांसमोर होता. मराठी विश्वकोश ह्या‘सर्वसामान्य शिक्षितांसाठी व मह्याविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या किंवा त्या पातळीच्या वाचकांसाठी’ उपयुक्त संदर्भग्रंथ म्हणून केला जात आहे. तत्त्वज्ञानासारख्या एकाच विषयाला किंवा सामाजिक विज्ञानांसारख्या काही विषयगटांना वाहिलेले जे विश्वकोश असतात, त्यांचा वाचकवर्ग त्या विषयांमध्ये विशेष स्वारस्य असणारा असा असतो.


विश्वकोशाचे अंतरंग व बहिरंग हे त्या-त्या विश्वकोशाने नजरेसमोर ठेवलेला आपला वाचकवर्ग व त्याच्या अपेक्षा ह्या ंना पूरक व पोषक असे ठेवावे लागते. उदा., छोट्या वाचकांसाठी केलेल्या विश्वकोशाची प्रत-तिचे आकारमान व पृष्ठसंख्या-त्या वाचकांना सहज पाहता, ह्याताळता येईल, अशी असणे उचित होईल. त्यात अंतर्भूत केलेले विषय, नोंदीचे स्वरूप, एकूणच भाषाशैली, सुनिदर्शनांचे प्रमाण व स्वरूप ह्या ंतूनही आपले वाचक छोटी मुले आहेत,  ह्याचे भान जपावे लागते. त्यांची आकलनशक्ती, विविध विषयांत त्यांना असलेली कमीअधिक रूची, त्यांच्यात जिज्ञासाबुद्धी निर्माण करण्याची वा वाढवण्याची दृष्टी अशा अनेक बाबींचा विचार कोशकारांना करावा लागतो.

 विश्वकोशकर्त्यांना आपला वाचकवर्ग आधी निश्चित करून घ्यावा लागतो आणि त्या दृष्टीने आपली योजना आखावी लागते, हे खरे असले, तरी वेगवेगळ्या विश्वकोशांचे वाचकवर्ग ही एक पाणीबंद कप्प्यांसारखी वर्गव्यवस्था नाही. ज्ञानविज्ञानांच्या विविध क्षेत्रांतील त्या-त्या काळात जे उपलब्ध ज्ञान असेल, ते संकलित करून शक्य तितक्या सुबोधपणे, सुस्पष्टपणे जिज्ञासू वाचकांपर्यंत पोहचविणे हे विश्वकोशाचे उद्दिष्ट असते आणि जिज्ञासू वाचक एकाच वर्गात बंदिस्त राहतो, असे नाही. उदा., एखाद्या सर्वसंग्राहक विश्वकोशाच्या वाचकाला विविध विषयांवरील नोंदी वाचताना तत्त्वज्ञानासारख्या, भारतीय संस्कृतीसारख्या, समाजविज्ञानांसारख्या विषयांत स्वारस्य निर्माण होऊ शकते आणि तो खास त्या विषयांना वाहिलेल्या कोशांकडे आस्थेने वळू शकतो. खास लह्यान मुलांसाठी तयार केलेल्या विश्वकोशातील सोप्यात सोपा करून मांडलेला विषय, त्यातील विपुल चित्रमयता ह्या ंचे आकर्षण प्रौढांनाही असू शकते. त्याचप्रमाणे आपल्या ज्ञानविषयक गरजांसाठी आपल्या छोट्या विश्वकोशाचे खंड संदर्भ म्हणून पाहण्याची सवय आणि सराव झालेला बालवाचक यथावकाश आपल्यापेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तींसाठी असलेला कोशही पाहू लागतो वा पाहण्याची धडपड करू लागतो. विश्वकोश ह्या कोणत्याही वाचकवर्गासाठी करायचा असला, तरी मुळात कोणत्याहीप्रकारच्या विश्वकोशापासून, संदर्भग्रंथ म्हणून त्याचा उपयोग करण्यापासून दूर असलेल्यांची जिज्ञासा जागृत करणे आणि त्यांना विश्वकोशाकडे वळवणे ह्याही एक हेतू विश्वकोशकर्ते बाळगत असतात. विश्वकोशाची विश्वसनीयता आणि वाचनीयता हे गुण त्या विश्वकोशाचा वाचकवर्ग व त्याच्या जिज्ञासेचे क्षेत्र वाढवू शकतात. ही विश्वसनीयता एखाद्या विश्वकोशाला-उदा.,एन्‌साय्‌क्लोपीडिआ ब्रिटानिका, एन्‌साय्‌क्लोपीडिआ अमेरिकाना-लाभलेल्या दीर्घकालीन परंपरेमुळे जशी निर्माण होऊ शकते, त्याचप्रमाणे एखाद्या विश्वकोशाशी संपादक म्हणून निगडित असलेल्या व्यक्तींच्या विद्वत्तेच्या क्षेत्रातील लौकिकामुळेही होऊ शकते.

नोंदींचे संयोजन : प्रत्येक कोश ह्या अद्यायावत माहितीचे वस्तुनिष्ठ पद्धतीने संकलन करून ते साररूपाने विविध नोंदींच्या स्वरूपात उपलब्ध करून देत असतो. त्यामुळे विश्वकोशकर्ते आपल्या कोशाच्या निश्चित केलेल्या विशिष्ट स्वरूपाशी आणि उद्दिष्टांशी सुसंगती राखून आणि अद्ययावततेचे भान ठेवून त्यातील नोंदी कोणत्या असाव्यात आणि त्यातील प्रत्येक नोंदीची व्याप्ती किती असावी हे ठरवतात. प्रत्येक नोंदीची व्याप्ती तिच्या महत्त्वसापेक्षतेनुसार ठरत असली, तरी संपूर्ण कोशासाठी मुक्रर केलेल्या एकंदर पृष्ठसंख्येच्या मर्यादेचा विचार करूनच तिला द्यावयाची एकंदर जागा निश्चित करावी लागते.

विश्वकोशात कोणत्या नोंदी समाविष्ट कराव्यात ह्याबाबत जो विचार केला जातो त्यांत देशीयतेचा विचार विशेष महत्त्वाचा ठरतो. विश्वकोशकार ज्या देशसंस्कृतीत वावरत असतात, तिचा प्रभाव त्यांच्या विश्वकोशीय दृष्टीवर पडणे अपरिह्यार्य असते. ह्या संदर्भात ज्ञानकोशकार केतकरांनी ‘मह्याराष्ट्रीय ज्ञानकोशाची शेकडा ३५पृष्ठे भारतीय संस्कृतीच्या स्पष्टीकरणासाठी दिली आहेत, आणि केवळ शेकडा १५  पृष्ठे बाह्य संस्कृतीच्या उद्‌बोधनासाठी दिली आहेत’, असे आपल्या विश्वकोशाबाबत केलेले निवेदन लक्षणीय आहे. डॉ. केतकरांची अशी भूमिका होती, की ब्रिटानिकासारख्या ज्ञानकोशातली बरीचशी माहिती आपल्याला अनावश्यक आहे. विश्वकोशात ‘आपल्या राष्ट्रातील लोकांच्या अपेक्षेप्रमाणे मजकूर द्यावा लागतो. जो भाग आपणास अनावश्यक आहे तो ब्रिटानिकात घेतला नसता तर ब्रिटानिका ह्या ग्रंथ इंग्रज राष्ट्रास त्याज्य झाला असता’. त्यांनी असेही म्हटले आहे, की ‘परक्या देशांची आपणास केवळ स्थूल माहिती हवी असते तथापि आपल्या देशाची आपणास सूक्ष्म माहिती पाहिजे असते… सामान्य जनता व आपल्या देशासंबंधाने संशांधन करणारा वर्ग यांच्या ज्ञानात जे आज जमीन अस्मानाचे अंतर आहे, ते काढून टाकावयाचा प्रयत्न केला पाहिजे. मह्याराष्ट्रीय जनतेची ही मोठी बौद्धिक गरज आहे आणि ज्ञानकोशकारांनी ती लक्षात घेतलीच पाहिजे’ मात्र ‘ शास्त्रे, धंदे, कला या गोष्टी सर्वसामान्य आहेत’ हेही डॉ. केतकरांनी स्पष्ट केले आहे.

ह्या संदर्भात मराठी विश्वकोशाची भूमिकाही नमूद करण्यासारखी आहे. ती अशी : ह्या मराठी विश्वकोश असल्यामुळे त्यात मराठी भाषासाहित्याची आणि मह्याराष्ट्राची अन्य प्रकारची माहिती अधिक तपशीलवार दिली आहे. त्यानंतर भारताच्या माहितीस प्राधान्य दिले आहे. इतर देशांची माहिती तुलनेने अधिक सामान्य स्वरूपात दिलेली आहे. सामाजिक शास्त्रे, कला, विज्ञान व तंत्र ह्या ंच्या संदर्भात मात्र ज्ञानाच्या दृष्टीने अधिक महत्त्व ज्या ज्या विषयांना आहे, त्यांची माहिती शक्यतो भरपूर दिली आहे, कारण ह्याबाबतीत प्रादेशिकतेचा प्रश्न उद्‌भवतच नाही. उदा., विज्ञान व तंत्रविद्या ह्या प्राधान्याने पश्चिमी असल्याने तेथे मह्याराष्ट्रीय व अमह्याराष्ट्रीय किंवा भारतीय व अभारतीय अशा प्रकारचे तारतम्य विचारात घेणे योग्य ठरत नाही.

स. मा. गर्गेसंपादित भारतीय समाजविज्ञान कोशातही भारताची परिस्थिती आणि प्रगती, भारताच्या समस्या आणि संकल्प ह्या ंच्यासंबंधीचे संदर्भ अधिक संख्येने आणि विस्ताराने दिले जावेत, अशी दृष्टी ठेवली आहे. इंग्रजीतील समाजविज्ञानविषयक संदर्भसाहित्य आशयसंपन्न आणि अधिक उपयुक्त असले, तरी त्यांच्या विवेचनाचा मुख्य बिंदू यूरोप, अमेरिका ह्या असतो आणि त्यामुळे भारतातील अभ्यासकांना आवश्यक वाटणारी माहिती त्यांत अनेकदा दिलेली नसते वा तिचा संकोच केलेला असतो हेही ह्या कोशात नमूद केले आहे.

विश्वकोशातील नोंदी निश्चित करताना आणखी एका प्रश्‍नाचा विचार केला जातो : एखादा महत्त्वाचा विषय त्याच्या सर्व अंगोपांगांसह एकाच दीर्घ नोंदीत मांडावयाचा किंवा त्या विषयाचे त्याच्या उपविषयांनुसार भाग पाडून त्या भागांवरील स्वतंत्र नोंदी विश्वकोशात वर्णानुक्रमे द्यावयाच्या? विषयाचे भाग पाडल्याने एका विषयवस्तूच्या एकेका भागाकडे वाचकांचे लक्ष वेधता येते आणि वाचकालाही अशा एकेका भागाची नेमकी माहिती मिळवता येते. शिवाय ज्या वाचकांना त्या विषयाचे संपूर्ण चित्र नजरेसमोर येणे आवश्यक वाटत असेल, त्यांना पूरक संदर्भांच्या व्यवस्थेतून त्यांची ही अपेक्षा पूर्ण करून घेता येते. ह्या विभाजनवादी दृष्टिकोण एकोणिसाव्या शतकापासून विश्वकोशनिर्मितीत अधिक प्रभावी ठरू लागला आहे. तथापि एका संपूर्ण विषयाचे असे विभाजन, त्याचे एक पूर्ण विषयवस्तू म्हणून आकलन होण्याच्या दृष्टीने प्रतिकूल ठरते तसेच त्या विषयाच्या वेगवेगळ्या भागांच्या लेखनात मूलभूत स्वरूपाच्या माहितीची पुनरावृत्ती अटळपणे करावी लागते, असे आक्षेप ह्या विभाजनवादी दृष्टिकोणावर घेतले गेले आहेत.

विश्वकोशात जिवंत व्यक्तींची चरित्रे अंतर्भूत करू नयेत, असा संकेत बराच काळ रूढ होता. ज्या व्यक्ती हयात असतात, त्यांचे कर्तृत्व पुढेही घडणार असते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूपूर्वीच त्यांच्यावरील नोंद विश्वकोशात घेतल्याने त्या नोंदीत एक प्रकारचा अपुरेपणा येतो, तसेच त्या व्यक्तींच्या जिवंतपणी त्या व्यक्तींचा समाजात असलेला प्रभाव त्यांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्याच्या आड येऊ शकतो, असे काही विचार ह्या संदर्भात प्रकट केले जातात. ह्यातून एक मार्ग म्हणजे हयात व्यक्तींच्या संदर्भात वयाची एक मर्यादा ठरवून घेणे. उदा., अमुक एका साली जन्मलेल्या व अमुक एका सालापर्यंत हयात असलेल्या व्यक्तींची चरित्रे न घेणे.


विश्वकोशीय लेखन : आधुनिक विश्वकोशाचे पर्व सुरू होण्यापूर्वी विश्वकोशकारांचे काम मुख्यत: निरनिराळ्या विषयांवरील दर्जेदार ज्ञानग्रंथांतील आवश्यक ते लेख निवडून त्यांचा संग्रह करण्याचे होते. तथापि आधुनिक विश्वकोशकार कोशगत नोंदी त्या-त्या विषयाचा विशेष अभ्यास केलेल्या व्यक्तींकडून स्वतंत्रपणे लिहून घेतात. लेखकांनी त्यांच्याकडे लिह्यावयास दिलेल्या नोंदीतील मजकूर स्वत:काही नवे संशोधन करून लिह्यावा, अशी अपेक्षा नसते कारण कोणत्याही विषयावर नवे संशोधन करून ते विश्वकोशातून उपलब्ध करून देणे, हे विश्वकोशाचे उद्दिष्ट नसते. कोशात अंतर्भूत असलेल्या विषयांवरील जे ज्ञान उपलब्ध असेल, ते संकलित करून वस्तुनिष्ठ आणि स्थूल परिचयाच्या स्वरूपात शक्य तितक्या सुबोधपणे जिज्ञासू वाचकांपर्यंत पोहोचविणे हे विश्वकोशाचे कार्य होय. मात्र ह्यात संबंधित विषयांवर आधीच झालेल्या संशोधनाचे निष्कर्ष सांगता येतील, एकेका विषयाशी निगडित अशा वादग्रस्त मुद्यांबाबतचे निरनिराळे दृष्टिकोन वा बाजू काय आहेत, ह्यांचेही विवेचन करता येईल. परंतु विश्वकोश जसा नवे संशोधन करीत नाही, त्याचप्रमाणे ज्ञानविषयांवरील वादग्रस्त मुद्यांवर आपला निर्णय देण्याची भूमिका तो घेत नाही.

विश्वकोशातील लेखन निरनिराळ्या विषयांतील तज्ज्ञ व्यक्तींकडून लिहून घेण्याची विश्वकोशकारांची दृष्टी असते. परंतु ज्यांचे वर्णनकेवळ ‘तज्ज्ञ’ अशा विशेषणाने होऊ शकणार नाही अशा व्यक्तीनीही विश्वकोशासाठी लेखन केल्याची उदाहरणे सापडतात. उदा., जॉन हॅरिसच्या लेक्सिकॉन टेक्निकम (१७०४, इं. शी. टेक्निकल लेक्सिकॉन) ह्या कोशासाठी सर आयझॅक न्यूटन ह्या ंच्यासारख्या अलौकिक प्रतिभेच्या वैज्ञानिकांनी साह्याय्य केले होते. ⇨फँसिझम ह्या राजकीय विचारप्रणालीचा प्रवर्तक आणि इटलीचा एके काळचा हुकूमशह्या⇨बेनीतो मुसोलिनी ह्याने Enciclopedia italiana  ह्या इटालियन विश्वकोशातील फॅसिझमवरील नोंद स्वत:च लिहिली होती. रूसो, व्हॉल्तेअर, लेनिन, सर विल्यम हर्शेल ह्या ंनीही विश्वकोशीय लेखन केलेले आहे. परंतु अशा व्यक्ती विश्वकोशीय लेखनासाठी उपलब्ध होणे, हे नेहमीच घडत नाही. इतिह्यासाचार्य वि. का. राजवाडे आणि लोकमान्य टिळक ह्या ंनी मह्याराष्ट्रीय ज्ञानकोशासाठी लिह्यावे म्हणून डॉ. केतकरांनी प्रयत्न केले होते, पण ते विफल झाले. ‘वेदांतर्गत सूक्तांचा अनुक्रम’  ह्या विषयावर लेख लिहून देण्याचे आश्वासनटिळकांनी त्यांना दिले होते, पण हे आश्वासन टिळक पूर्ण करू शकले नाहीत.

 

विशिष्ट विषयांचे तज्ज्ञ हेही विश्वकोशातील लेखनासाठी उपलब्ध होणे अनेकदा कठीण असते. लेखन करण्याकडे कल नसणे, कल असला तर आपल्या क्षेत्रातील कामातील एरव्हीचाच व्याप बराच असल्यामुळे विश्वकोशीय लेखनासाठी सवड नसणे, सवड असली तरी आपला वेळ संकलनात्मक व स्थूल परिचयात्मक अशा विश्वकोशीय लेखनासाठी देण्यापेक्षा स्वत:च्या अभ्यासक्षेत्रातच सर्जनशील, नवीन संशोधनात्मक लेखन करण्याचीच इच्छा असणे , ह्यांसारखी अनेक कारणे असे होण्यामागे असू शकतात. परंतु विश्वकोशीय नोंदींचे संकलनात्मक व स्थूल परिचयात्मक स्वरूप लक्षात घेता अत्यंत तांत्रिक स्वरूपाच्या नोंदी सोडल्यास अनेक विश्वकोशीय नोंदी काटेकोरपणे तज्ज्ञतेच्या परिघाबाहेरील पण अभ्यासू. संकलनाची आणि एकेका नोंदीच्या रचनाबंधाची नेमकी दृष्टी असलेल्या व्यक्ती लिहू शकतात, असे दिसून येते. निरनिराळ्या विषयांच्या अध्यापक-प्राध्यापकांचा अशा लेखनासाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ शकतो.

विश्वकोशासाठी लेखन करणाऱ्या लेखकांना नोंदी लिह्यावयास देताना त्यांतील प्रत्येक नोंदीचे स्वरूप , नोंदविषयाची व्याप्ती व तिच्यासाठी मुक्रर केलेली पृष्ठसंख्या, तिच्यात ज्यांचे विवेचन यायला हवे असे मुद्दे, त्यांच्या संक्षेप-विस्ताराबाबतच्या अपेक्षा ह्यांबाबत कळविले जाते. ह्या आराखड्यानुसार लेखकांनी नोंदलेखन करावे, अशी अपेक्षा असते.

लेखकांकडून लिहून आलेल्या नोंदी, त्या-त्या विषयातील तज्ज्ञांकडून वा ज्येष्ठ अभ्यासकांकडून समीक्षून घेतल्या जातात. नोंदीबाबतच्या विश्वकोशीय अपेक्षा जशा लेखकाला, तशाच त्या समीक्षकालाही कळवल्या जातात. नोंद विश्वकोशीय अपेक्षांनुसार परिपूर्ण व्ह्यावी,  ह्या दृष्टीने समीक्षक आवश्यक तर काही सूचना करतात, कधी कधी लेख स्वत:ही संस्कारून देतात. समीक्षकांनी निव्वळ सूचना दिलेल्या असल्यास त्यांनुसार नोंद संबंधित लेखकांकडून योग्य प्रकारे संस्कारून घेतली जाते.

विश्वकोशाची संपादनप्रक्रिया : आपल्या कोशाच्या स्वरूपाचे आणि उद्दिष्टांचे भान ठेवून त्यात अंतर्भूत करावयाच्या सर्व नोंदींची अकारविल्हे यादी संपादक तयार करतात. त्यानंतर ह्या नोंदी त्या-त्या विषयांच्या तज्ज्ञांकडे वा साक्षेपी अभ्यासकांकडे लिहिण्यासाठी पाठवितात. एकेकानोंदीचे स्वरूप ध्यानात घेऊन लेखकांकडे पाठवावयाचे आराखडेसंपादकांना तयार करावे लागतात. ह्या आणि परिस्थितीनुसार नोंदीशी निगडित अशा अन्य अनेक संदर्भांत लेखक-समीक्षकांशी करावयाचा महत्त्वपूर्ण पत्रव्यवह्यार संपादकांना करावा लागतो. नोंदींचीसुनिदर्शने तयार करण्यासाठी कला विभाग असला, तरी एकेका नोंदीचे सुनिदर्शनात्मक स्वरूप् कसे असावे,  ह्याचा विचार करून चित्राकृत्या, छायाचित्रे, कोष्टके, नकाशे इ. आवश्यक ती सामग्री संपादक निवडतात, तसेच कला विभागाशी चर्चा करून तिचे प्रभावी आणि उद्‌बोधक सादरीकरण कसे करता येईल हेही ठरवितात. तज्ज्ञांकडून वा साक्षेपी अभ्यासकांकडून नोंदी लिहून/समीक्षून/संस्कारून घेतल्या तरी त्यांवर संपादकीय संस्कार होणे आवश्यक असते. नोंदीतील शुद्धलेखन पह्याणे, मजकुरात उपशीर्षके/उपउपशीर्षकेदेणे, यथास्थळी बाणांकन वा तत्सम चिन्हे दाखविणे, तसेच अन्य प्रकारचे ‘पह्या संदर्भ’ देणे, नोंदींमध्ये वापरल्या जाणाऱ्या संज्ञांमध्ये सुसंगती राखणे, नोंदींच्या खाली दिलेल्या संदर्भग्रंथांची मांडणी विश्वकोशाने ठरविलेल्या पद्धतीने करणे, मुद्रणालयाला आवश्यक त्या सूचना देण्यासाठी (उदा., कोणता मजकूर कोणत्या टंकात छापावयाचा ह्यासंबंधी) नोंदींच्या मुद्रणप्रतींत योग्य त्या खुणा करणे, अनेकदा नोंदींची मुद्रिते तपासणे, सूची तयार करणे अशी अनेक प्रकारची कामे संपादकांना करावी लागतात.

विश्वकोशासाठी लेखक-समीक्षक मिळविण्यातल्या अडचणी वर नमूद केलेल्या आहेत. अशा अडचणी निर्माण झाल्यास अनेकदा विश्वकोशातील संपादकांना नोंदलेखनाचे, नोंदींच्या समीक्षणाचे कामही करावे लागते. विश्वकोशात संपादकांनी लिहिलेल्या नोंदींचे प्रमाण अनेकदा लक्षणीय असते. नोंदींच्या संक्षेप-विस्ताराचे काम अनेकदा संपादक करीत असतात. उदा., प्रत्येक विश्वकोशीय नोंदीसाठी ठरावीक पृष्ठसंख्या मुक्रर केलेली असली, तरी कधीकधी आपल्या विषयासंबंधी खूपच माहिती देण्याच्या उद्देशातून लेखक अपेक्षेपेक्षा अधिक लेखन करतात, तर कधी नोंद अत्यंत त्रोटक स्वरूपात ह्याती येते. ह्यातून संपादकांना आवश्यक तो संक्षेप-विस्तार लेखकांशी संपर्क साधून करून घ्यावा लागतो वा शक्य असल्यास स्वत: करावा लागतो.

नेमकी व सारभूत माहिती नेमकया शब्दांतून काटेकोरपणे देणे आणि तसे करतानाच नोंदीच्या वाचनीयतेला धक्का लागणार नाही ह्याची काळजी घेणे ह्या दोन गोष्टींचे भान विश्वकोशीय नोंदींच्या भाषाशैलीतून प्रत्ययास येणे आवश्यक असते. तसे जिथे होत नाही, तिथे मूळ नोंदीची शैली संपादक शक्य तितकी संस्कारून घेतात. संपादित नोंदींचे अंतिम रूप सामान्यत: संबंधित लेखकांना दाखवून त्यास त्यांची मान्यता घेतली जाते, त्यांच्या काही सूचना असल्यास त्या विचारात घेतल्या जातात आणि त्यानंतरच नोंद मुद्रणालयाकडे जाते.

नोंदींचे अंतिम रूप घडविण्यामध्ये संपादकांना पार पाडावी लागणारी भूमिका, करावे लागणारे लेखन ह्यांचा विचार करता आपण करत असलेल्या कोशाच्या स्वरूपाची, उद्दिष्टांची आणि विषयपरिसराची नेमकी जाण, पुरेशी बहुश्रुतता आणि भाषा वापरण्याची क्षमता विश्वकोशाच्या कोणत्याही संपादकाकडे असणे अत्यावश्यक आहे.


विश्वकोशाचे अद्ययावतीकरण : आपल्या कोशातील माहिती जास्तीत जास्त अद्ययावत असावी,  ह्याबद्दल कोशकार प्रयत्न करीत असतात. तथापि कोशनिर्मितीची एकंदर प्रक्रिया आणि तिच्यासाठी लागणारा कालावधी ह्यांचा विचार करता ह्या अद्ययावततेला काही मर्यादा अपरिह्यार्यपणे पडतात. उदा., कोशाचा एक एक खंड प्रसिद्ध करीत सर्व खंड पूर्ण करावयाचे, अशी कोशकर्त्यांची दृष्टी असल्यास अखेरचा खंड प्रसिद्ध होईतो पहिले खंड अद्ययावत राहत नाहीत. ह्यासाठीच विश्वकोशकर्ते अद्ययावततेची काही एक मर्यादा स्वत:वर घालून घेतात आणि ती वाचकांना स्पष्ट केली जाते. जो खंड ज्या वर्षी छापून प्रसिद्ध होतो, त्यातील माहिती सामान्यत: अमुक इतक्या वर्षांच्या अगोदरची आहे, असे वा अशा प्रकारचे निवेदन कधीकधी कोशाच्या संपादकांना कोशारंभीच करावे लागते. कधीकधी कोशाची पहिली आवृत्ती प्रसिद्धझाल्यानंतर मधे काही काळ जातो, पुन्ह्या ते कोशाचे काम ह्याती घेतले जाते आणि ह्या दरम्यानच्या काळातील माहिती कोशात आणण्याची आवश्यकता निर्माण होते. अशा शक्यता विचारात घेऊन जास्तीत जास्त अद्ययावतता राखण्यासाठी कोशकर्त्यांना वार्षिके, सुधारित आवृत्या, पुरवण्या इ. काढाव्या लागतात. वार्षिकांत त्या-त्या वर्षी ज्ञानविज्ञानांच्या विविध क्षेत्रांत घडलेल्या महत्त्वपूर्ण घडामोडी अंतर्भूत केलेल्या असतात. पुरवण्यांचा हेतूही अधिक माहिती देऊन अद्ययावतपणा राखण्याचा असतो. विश्वकोशाच्या सुधारित आवृत्तीत प्रत्येक नोंदीत नवीन माहिती काय घालता येईल, हे पाहून आवश्यक तिथे ती घालता येते, काही नव्या नोंदी अंतर्भूत करता येतात. आपल्या कोशातून अद्ययावतता प्रत्ययास यावी ह्यासाठीच हे प्रयत्न असतात. तथापि परिपूर्ण अद्ययावतता आणणे अवघड असते.

 विश्वकोश आणि नवे तंत्रज्ञान : विश्वकोशनिर्मितीसाठी नव्या तंत्रज्ञानाचा-विशेषत: संगणकाचा-चांगला वापर होऊ शकतो आणि तसा तो काही विश्वकोशनिर्मितिसंस्था करूनही घेत असतात. विश्वकोशात अंतर्भूत करण्याच्या दृष्टीने ध्वनी, चित्रे, मजकूर अशा कोणत्याही स्वरूपातील आवश्यक ती माहिती संगणकात प्रचंड प्रमाणावर साठविता येते, तसेच त्या माहितीतून हवी ती माहिती हव्या त्या वेळी नेमकेपणाने उपलब्ध करून घेता येते. संगणकात साठविलेल्या माहितीवर संगणकीय तंत्रज्ञानाच्या साह्याय्याने, आपणास पाहिजे ते संस्कार करून घेता येतात. विश्वकोशातील पूरक संदर्भांची व्यवस्था, तसेच विश्वकोशाला जोडावयाची सूचीही संगणकाच्या आधाराने तयार करता येते. अक्षरांची जुळणी, विश्वकोशीय पृष्ठाची रचना, मजकुरातील शुद्धलेखन नियमांनुसार झाले आहे किंवा नाही ह्या ंची तपासणी संगणक करू शकतो व ह्या कामांत आवश्यक त्या सुधारणा घडवून आणू शकतो. ही सर्व कामे संगणकावर अत्यंत वेगाने होत असल्यामुळे वेळही वाचतो. विश्वकोशाची नवी, सुधारित आवृत्ती काढण्यासाठीही संगणक अधिक उपयोगी पडतो.

माहितीतला एकही तपशील जाऊ न देता ती संगणकीय तंत्राने अत्यंत थोड्या जागेत बसविता येते. त्यामुळे विस्तृत माहिती अंतर्भूत असलेल्या विश्वकोशाचा अनेक खंडी संचही एखाद्या तबकडीमध्ये सहज साठविता येतो. ह्या वैशिष्ट्यामुळेच अशा तबकडीला इंग्रजीत ‘कंपॅक्ट डिस्क’ (सीडी) अशी संज्ञा आहे. अशा तबकडीत साठविलेल्या विश्वकोशातील हवा तो मजकूर वाचकाला मुद्रित प्रतीच्या स्वरूपातही मिळू शकतो. तबकडीत साठवलेले विश्वकोश वापरायला सुटसुटीत असून त्यांना जागाही अर्थातच कमी लागते. शिवाय पुस्तकाच्या स्वरूपातील कोशांसाठी कागद मोठ्या प्रमाणावर वापरावा लागतो. अशा तबकडीवरील विश्वकोशात नोंदीतील मजकुराला दृश्यध्वनिमाध्यमांची जोड देऊन ध्वनी व चलत्‌चित्रे ह्यांचाहीअनुभव घेता येतो. उदा., बालगंधर्वांवरील नोंदीत त्यांच्याबद्दलच्या मजकुराबरोबर त्यांच्या गाण्याचा काही भाग ऐकण्याची व्यवस्था होऊ शकते. तसेच त्यांच्या स्त्रीभूमिकेतील एखादे रूपही पाहता येते. त्याचप्रमाणे वाघावरील नोंदीत वाघाची काही ह्यालचाल-उदा., झेप-दाखवता येते. डरकाळीही ऐकता येते. अशा रीतीने अनेक माध्यमे वापरल्यामुळे ह्या तंत्राला ‘बहुमाध्यम तंत्र’ (मल्टिमीडिआ) असे म्हटले जाते. मह्याराष्ट्रराज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने ह्या तंत्राने-तसेच पुस्तक रूपानेही-एका ‘कुमारकोशा’चा परिचय खंड काढण्याची योजना आखली आहे.

विश्वकोशनिर्मितीसाठी आवश्यक असलेले संदर्भ अगदी दूरच्या देशांतूनही त्वरित उपलब्ध करून घेण्यासाठी उच्च संगणकीय तंत्रज्ञानावर आधारलेल्या मह्याजालकाचा (इंटरनेट) उपयोग करून घेता येतो.


पाश्चात्य विश्वकोशरचनेचा इतिह्यास : विश्वकोशरचनेचा इतिह्यास २०००हून अधिक वर्षांचा आहे. विख्यात ग्रीक तत्त्वज्ञ ⇨ प्लेटो (इ. स. पू. सु. ४२८-सु. ३४८) ह्या चा भाचा आणि प्लेटोच्या पश्‍चात त्याच्या ⇨ अकादमीचा प्रमुख झालेला स्प्यूसिपस (४००-३३९इ. स. पू.) ह्याने प्रकृतिविज्ञान, तत्त्वज्ञान इ. विषयांवरील प्लेटोचे विचार ग्रंथरूपाने संगृहीत केले होते. त्याचे उपलब्ध अवशेष ह्या विश्वकोशीय लेखनाचा सर्वांत प्राचीन नमुना मानला जातो. तथापि तर्कशास्त्र, भौतिकी, जीवशास्त्र, मानसशास्त्र, तत्त्वभीमांसा, नीतिशास्त्र, राज्यशास्त्र, काव्यशास्त्र अशा विविध विषयांवर ग्रंथनिर्मिती करणारा थोर ग्रीक तत्त्वज्ञ ⇨ ॲरिस्टॉटल (३८४-३२२इ. स. पू) ह्या ला विश्वकोशाचे जनकत्व द्यावे, असे अनेकांचे मत आहे. माणसाला अधिक चांगला आणि चांगल्या प्रकारे विचार करता यावा म्हणून सर्व प्रकारचे ज्ञान मिळविणे जरूरीचे आहे, असा ग्रीक दृष्टिकोण होता. रोमन लोक हे व्यावह्यारिक होते आणि ज्ञानाकडे पाहण्याची त्यांची दृष्टीही मुख्यत: व्यावह्यारिक होते आणि ज्ञानाकडे पाहण्याची त्यांची दृष्टीही मुख्यत: व्यावह्यारिक होती. आपल्या जीवनातील कामे कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी सर्व प्रकारचे उपयुक्त ज्ञान माणसाने प्राप्त करून घेणे इष्ट आहे, अशी त्यांची धारणा होती. रोमन कॉन्सल केटोद सेन्सर ह्याने आपल्या मुलाला जी पत्रे लिहिली ती अशाच दृष्टिकोणातून. ही पत्रे म्हणजे अनेक प्रकारच्या उपयुक्त माहितीचे पत्रात्मक संकलन होय. ऍडव्ह्याइस टू हिज सन’ (इं. शी.) ह्या नावाने ही पत्रे (सु. १८३ इ. स. पू.) प्रसिद्ध आहेत आणि एक प्रकारची विश्वकोशीय दृष्टी त्यांतून प्रत्ययास येते. सर्व ज्ञानशाखांतील उपलब्ध माहितीचे सारांशरूपाने संकलन, अशा निश्‍चित दृष्टीने विश्वकोशीय स्वरूपाची ग्रंथरचना करण्याचे श्रेय रोमनांना दिले जाते. अशा ग्रंथरचनेत रोमन विद्वान⇨ मार्कंस टेरेन्शस व्हॅरो (११६-२७इ. स. पू.) ह्याच्या Disciplinarum libri IX (इं. शी. नाइन बुक्स ऑफ डिसिप्लिन्स) ह्या ग्रंथाचा समावेश होतो. व्याकरण, तर्कशास्त्र, वक्तृत्वशास्त्र, भूमिती, अंकगणित, ज्योतिष, संगीत, वैद्यक आणि वास्तुकला अशा नऊ विषयांची माहिती एकेका खंडात एक अशा पद्धतीने त्याने ह्यात दिली. ⇨ थोरला प्लिनी (इ. स. २३/२४-७९) ह्याने रचिलेल्या (Historia Naturalis (इं. शी. नॅचरल हिस्टरी) ह्या ३७खंडांच्या विश्वकोशात गणिताच्या आणि भौतिकीच्या दृष्टीने केलेले विश्ववर्णन, भूगोल, मानवजातिवर्णन, मानवी शरीर, प्राणिशास्त्र, वनस्पतिशास्त्र, कृषी, वैद्यक, खनिजविज्ञान ह्या ंसारख्या विषयांची माहिती दिलेली आहे. रोमनांचा व्यावह्यारिक दृष्टिकोण येथेही दिसतो. ह्या ग्रंथात काही चुका असल्या, तरी विश्वकोशाच्या इतिह्यासातील त्याचे महत्त्व मोठे आहे. ह्या ग्रंथ उभा करण्यासाठी विविध ग्रंथकारांच्या सु.२,०००ग्रंथांचा आधार त्याने घेतला होता आणि त्यांच्याबद्दलची कृतज्ञता त्याने आपल्या ह्या मह्याग्रंथाच्या प्रस्तावनेत व्यक्त केली आहे. प्लिनीने वा त्याच्या आधीच्या विश्वकोशकारांनी धर्म ह्या विषयाकडे फारसे लक्ष पुरविलेले दिसत नाही. रोमन मुत्सद्दी आणि लेखक फ्लेविअस मॅग्नस ऑरीलिअस कॅसिओडोरस (सु. ४९० -सु. ५८५) ह्याने Institutiones…. (दोन खंड, इं. शी. इन्स्टिट्यूट्स ऑफ डिव्ह्याइन अँड सेक्यूलर लिटरेचर) ह्या आपल्या ग्रंथाचा पहिला भाग ह्या विशेषत: ख्रिस्ती संन्याशांच्या मार्गदर्शनाकरिता लिहिलेला असला, तरी दुसऱ्या भागात व्याकरण, तर्कशास्त्र, वक्तृत्वशास्त्र, भूमिती, अंकगणित, खगोलशास्त्र आणि संगीत ह्या‘उदार कला’ (लिबरल आर्ट्स) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विषयांचा थोडक्यात परामर्श घेतला. सेव्हिलचा आर्चबिशप सेंट इझडोर (सु. ५६०-६३६) ह्याने Etymologiarum libri xx (इं. शी. व्हॉल्यूम्स ऑफ एटिमॉलॉजीज) ह्या  विश्वकोशात बऱ्याच विषयांशी माहिती दिली होती. ह्या विश्वकोशात त्याने अकारविल्हे वर्णक्रम असलेला एक शब्दकोशही अंतर्भूतकेला होता आणि ह्याच्या काही प्रतींत चित्रेही देण्यात आली होती. सुनिदर्शनात्मक स्वरूपाची मांडणी करणारा ह्या पहिला विश्वकोश म्हणता येईल. कॅसिओडोरस आणि सेंट इझडोर ह्या ंच्या विश्वकोशांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे धार्मिक आणि लौकिक (वा धर्मनिरपेक्ष) अशा क्षेत्रांचा त्यांनी केलेला विचार. धार्मिक आणि लौकिक ह्या ंत कॅसिओडोरसने स्पष्टपणे भेद केला होता आणि धर्मनिरपेक्ष स्वरूपाचे ज्ञान ह्या खऱ्याखुऱ्या ख्रिस्ती शिक्षणाचा पाया होय, अशी धारणा सेंट इझडोरने व्यक्त केली होती.सेंट इझडोरच्या विश्वकोशाची लोकप्रियता अनेक शतके टिकून होती. अनेक यूरोपीय भाषांत त्याचे अनुवादही झाले.

अनेक विश्वकोश उदार राजाश्रयामुळे निर्माण होऊ शकले. बायझंटिनचा सम्राट सातवा कॉन्स्टंटीन पॉर्फिरोजेनिटस (९०५-९५९) ह्या विद्याकलांचा चाहता होता. इतिह्यास, न्यायशास्त्र, कृषी, वैद्यक अशा विविध विषयांवरील विश्वकोशरचनेला त्याने उत्तेजन दिले. त्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी व्यासंगी ग्रीक-लॅटिन ग्रंथकारांच्या ग्रंथांतील वेचक, उपयुक्त मजकूर त्याने संकलित केला होता. त्याच्या ह्या दृष्टीमुळे बरेचसे प्राचीन लेखन जपले गेले.

अनेक आधुनिक विश्वकोशांतील नोंदींची मांडणी अकारविल्हे केलेली दिसते. तथापि प्रारंभी तशी मांडणी केली जात नसे. प्रत्येक विश्वकोशकार त्याच्या विशिष्ट दृष्टीनुसार मानवी ज्ञानाचे वर्गीकरण करून त्यातील क्रमव्यवस्था ठरवीत असे. त्यानंतर ज्ञानाच्या निरनिराळ्या शाखांमध्ये झालेली महत्त्वाची ग्रंथरचना पाहून तीतून त्या-त्या ज्ञानशाखेशी संबंधित असे वेचक लेखन संकलित करीत असे आणि मग हे संकलित लेखन ठरविलेल्या क्रमव्यवस्थेनुसार विश्वकोशात अंतर्भूत केले जाई. त्यामुळे आधुनिकपूर्व अशा सु.१६००वर्षांच्या परंपरेत विश्वकोशांचे स्वरूप विविध विषयांवरील लेखसंग्रह्यांसारखे होते. प्राचीन ग्रीक-रोमनांना अकारविल्हे रचना माहीत होती परंतु ग्रीकांनी तिचा उपयोग केला नाही रोमनांनाही तशा रचनेकडे जवळपास दुर्लक्षच केले. ह्या पार्श्‍वभूमीवर, दह्याव्या शतकाच्या अखेरीस तयार झालेला Suda किंवा Suidas ह्या ग्रीक भाषेतील विश्वकोश उल्लेखनीय ठरतो कारण त्यातील लेखांची रचना अकारविल्हे करण्यात आली होती. मात्र ह्या प्रकारच्या रचनेचा प्रभाव Suidas नंतरच्या विश्वकोशांवर पडल्याचे दिसत नाही. ग्रीक साहित्य आणि इतिह्यास ह्या ंवरील अनेक मोलाचे लेख ह्या विश्वकोशात अंतर्भूत आहेत. त्या लेखांसाठी मात्र Suidas ह्या अनेक शतके महत्त्वपूर्ण ठरला.

ख्रिस्ती जोगिणींच्या एका मठाची प्रमुख अबेस हेर्रड (मृ.११९५) ही जगातली बहुधा पहिली महिला विश्वकोशकार असावी. तिच्या मठातील जोगिणींसाठी तिने Hortus deliciarum ह्या नैतिक शिकवणीवरील विश्वकोश तयार केला होता. सुशोभित हस्तलिखितांचे स्वरूप असलेल्या ह्या विश्वकोशात सह्याशेहून अधिक चित्रे होती. फ्रॅन्सिस्कन पंथाचा एक इंग्रज कोशकार फ्रायर बार्‌थॉलमीअस अँग्लिकस (तेरावे शतक) ह्याने सेंट इझडोर आणि थोरला प्लिनी ह्या ंचे विश्वकोश आधारार्थ घेऊन सर्वसामान्यांसाठी रचिलेल्या De proprietatibus rerum (इं. शी. ऑन कॅरॅक्टरिस्टिक्स ऑफ थिंग्ज) ह्या विश्वकोशाला फार मोठी लोकप्रियता प्राप्त झाली होती. तथापि व्हिन्सेंट ऑफ बोव्हे (सु. ११९०-१२६४) ह्या फ्रेंच विद्वानाने रचिलेला Specuhum majus (1244, इं. शी. बिगर मिरर) ह्या८०खंडांचा विश्वकोश अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत एक मह्याकोश म्हणून मान्यता पावला होता. ह्या विश्वकोशात ज्ञानाचे तीन विभाग पाडलेले दिसतात : (1) Naturale, (2) Doctrinale आणि (3) Historiale, पहिल्या विभागात ईश्‍वर आणि मनुष्य, सृष्टीची उत्पत्ती आणि प्रकृतिविज्ञान हे विषय येतात. ह्यासाठी लॅटिनबरोबरच ग्रीक, अरबी आणिहिब्रू ह्या भाषांतील लेखनाचाही आधार व्हिन्सेंटने घेतलेला आहे. दुसऱ्या विभागात अनेक व्यावह्यारिक विषय ह्याताळलेले आहेत. प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञान आणि ख्रिस्ती धर्मश्रद्धेत अंतर्भूत असलेले सिद्धांत ह्यांचा समन्वय साधून त्याचे व्यवस्थित विवरण करू पाहणाऱ्या स्कोलॅस्टिक तत्त्वज्ञानाचाही परामर्श ह्या विभागात आढळतो. तिसऱ्या विभागात पहिल्या दोन विभागांचा सारांश आणि सुष्टीच्या उत्पत्तीपासून सेंट लूइसच्या काही काळापर्यंतचा (१२५० पर्यंत) इतिह्यास दिलेला आहे. ह्या मह्याग्रंथाचा चौथा भागMorale ह्या व्हिन्सेंटच्या मृत्यूनंतर त्या ग्रंथात अंतर्भूत करण्यात आला. त्यात स्कोलॅस्टिक तत्त्वज्ञानाच्या एका प्रभावी पंथाचा अध्वर्यू ⇨ सेंट टॉमस अकाय्‌नस (तेरावे शतक) ह्याच्या तत्त्वविचारावर मुख्य भर देण्यात आला आहे. व्हिन्सेंट ऑफ बोव्हेचा ह्या विश्वकोश फ्रेंच, स्पॅनिश, जर्मन, डच अशा अनेक भाषांत अनुवादिला गेला आणि १८६३-79 ह्या कालखंडात त्याची पुनर्मुद्रणेही झाली.


ग्रंथ मुद्रित स्वरूपात उपलब्ध होऊ लागण्यापूर्वी पश्चिमी यूरोपीय विश्वकोश हे लॅटिन भाषेत रचिले जात असत. तसे करणे इष्ट वाटत होते,  ह्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे यूरोपातील विद्वत्तापूर्ण लेखनाची ती प्रमाणभाषा होती. निरनिराळ्या युरोपीय समाजांतील विद्वानांचे ते समान भाषामाध्यम होते. त्यामुळे माहितीची देवाणघेवाणही चांगली होत असे. तथापि त्यामुळे अनेक सामान्य लोक ज्ञानग्रंथांच्या वाचनाला आणि त्यांतील उपयुक्त माहितीला वंचित होत असत. हे टाळण्यासाठी लॅटिन ग्रंथांचे विविध देशी भाषांत अनुवाद होणे आवश्यक होते. तसे ते झालेही. उपर्युक्त बार्‌थॉलमीअस अँग्लिकसच्या De proprietatibus rerum चा इंग्रजी अनुवाद झाला आहे. व्हिन्सेंट ऑफ बोव्हेच्या विश्वकोशाचेही फ्रेंच, स्पॅनिश इ. भाषांत अनुवाद झाल्याचा निर्देश वर आलाच आहे. परंतु विख्यात इटालियन कवी आलिग्येअरी दान्ते ह्याचा गुरू ब्रूनेत्तो लातींनी (सु. १२२०-१२९५) ह्याने आपला विश्वकोश Li livres dou tresor (इं. शी. ट्रेझर बुक्स) लॅटिनऐवजी फ्रेंच भाषेत रचला. ह्या विश्वकोश इटलीतील सुशिक्षित मध्यमवर्गीयांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने त्या वर्गात प्रचलित असलेली फ्रेंच भाषा त्याला सोयीची वाटली. त्याच्या विश्वकोशाची रचना त्याने व्हिन्सेंट ऑफ ब्रोव्हेच्या विश्वकोशाच्या धर्तीवरच केलेली होती. तथापि माहिती थोडक्यात, नेमकेपणाने देण्याचे त्याचे धोरण होते,  ह्या विश्वकोशाला चांगला प्रतिसाद मिळाला. लॅटिनऐवजी फ्रेंच भाषेचा त्याने विश्वकोशासाठी केलेला वापर परंपरेला सोडून असल्यामुळेही विश्वकोशाच्या ऐतिह्यासिक परंपरेत ह्या विश्वकोश एक महत्त्वाचा क्रांतिकारक टप्पा ठरतो. Compendium philosophiae (सु.११३०) ह्या विश्वकोश कोणी रचला हे अज्ञात आहे मात्र तो रचणाऱ्याने ठेवलेली चिकित्सक दृष्टी लक्षणीय आहे. माहिती देताना निराधार समजुतींना येथे स्थान दिलेले नाही आणि त्या काळातील वैज्ञानिक शोधांचा परामर्श घेतलेला आहे. पहिला इंग्रज मुद्रक ⇨ विल्यम कॅक्स्टन (सु. १४२२-१४९१) ह्याने आपला मिरर ऑफ द वर्ल्ड (१४८१) ह्या विश्वकोश इंग्रजीत रचला.सुनिदर्शने असलेले हे पहिले इंग्रजी पुस्तक.

 मुद्रित ग्रंथ अस्तित्वात येण्यापूर्वी शब्दकोशांचीही निर्मिती सुरू होती. शब्दकोश आणि विश्वकोश तयार होत असताना, दह्याव्या-अकराव्या शतकाच्या सुमारास विश्वकोशात्मक शब्दकोश (एन्साय्‌क्लोपीडिक डिक्शनरी) ह्या विश्वकोशाचा एक नवा प्रकार उदयाला येऊ लागला. माहितीची अकारविल्हे मांडणी करणारा उपर्युक्त Suidas ह्या विश्वकोश अशा प्रकारच्या विश्वकोशाचे एक उदाहरण म्हणता येईल. विश्वकोशात्मक शब्दकोशात विश्वकोश आणि शब्दकोश ह्या दोन्ही कोशप्रकारांची काही वैशिष्ट्ये आढळतात. त्यात एखादा शब्द जसा  चटकन पाहता येतो, तसा विशिष्ट विषयातील हवा तो संदर्भही पाहता येतो,  ह्या प्रकारातल्या विश्वकोशातील बहुतेक नोंदी तुलनेने छोट्या, कधीकधी पाच-सह्या ओळींच्याही असू शकताता आणि त्यांची रचना अकारविल्हे करण्यात आलेली असते. ही अकारविल्हे रचना हे खास शब्दकोशीय तंत्र होय. सोळाव्या शतकात फ्रान्समध्ये मुद्रणाच्या आणि पुस्तकबांधणीच्या व्यवसायात असलेल्या एत्येन नावाच्या कुटुंबातील व्यक्तींनी अशा प्रकारच्या विश्वकोशाला चालना दिली. शार्ल एत्येनची (१५०४-६४) Dictionarium historicum geographicum et poeticum (१५५३, इं.शी. हिस्टॉरिकल, जॉग्रफिकल अँड पोएटिक डिक्शनरी) ह्या संदर्भात उल्लेखनीय आहे. सतराव्या-अठराव्या शतकांतील अशा कोशांची निर्मिती लक्षणीय आहे.उपर्युक्त Suidas ह्या अकारविल्हे रचलेला पहिला विश्वकोश दह्याव्या शतकाच्या अखेरीस निर्माण झाला, तरी त्याचे अनुकरण लगेच होऊ शकले नाही. मानवी ज्ञानाच्या वर्गीकरणावर आणि क्रमव्यवस्थेवर विश्वकोशांची मांडणी करण्याची पध्दत चालूच होती. इंग्रज मुत्सदी आणि तत्ववेत्ता ⇨ फ्रान्सिस वेकन (१५६१-१६२६) ह्याने सर्व मानवी ज्ञानाची योग्य पायावर पुनर्रचना करण्यासाठी Instauration Magna (१६२०, इं.शी. द ग्रेट इन्स्टॉरेशन) ह्या ग्रंथ लिह्यावयास घेतला होता. तो अपूर्ण राहिला. या ग्रंथात बेकनने ज्ञानाचे तीन मुख्य विभाग पाडले होतेः (१) बाह्य निसर्ग, (२) मानव आणि (३) निसर्गावर मानव करीत असलेल्या क्रिया. बेकनचा विचार शास्त्रीय दृष्टिकोणातून एक विश्वकोशच उभा करण्याचा होता, असे दिसते. हे ज्ञानाचे वर्गीकरण म्हणजे विश्वकोशाच्या परंपरेला त्याने दिलेले मोठे योगदान होय. बेकनप्रणीत ‘बाह्य निसर्ग’  ह्या विभागात खगोलशास्त्र, वातावरणविज्ञान, भूगोल, खनिजांच्या विविध जाती, वनस्पती, प्राणी ह्या ंसारखे विषय अंतर्भूत होते. ‘मानव’  ह्या दुसऱ्या विभागात शारीर, शरीरक्रियाविज्ञान, सत्ता (पॉवर) असे काही विषय अंतर्भूत होते आणि ‘निसर्गावर मानव करीत असलेल्या क्रिया’  ह्या विभागात वैद्यक, रसायनशास्त्र, दृश्य कला, इंद्रिये, भावना, बौध्दिक शक्ती, वास्तुकला, व हतूक, मुद्रण, नौकानयन, अंकगणित इ. अनेक विषय होते. ⇨ दनी दीद्रो (१७१३-८४) ह्या थोर फ्रेंच विश्वकोशकाराला बेकनचे मानवी ज्ञानाचे वर्गीकरण मोठे प्रेरक ठरले दीद्रोने बेकनबाबत वाटणारी आपली कृतज्ञताही व्यक्त केली आहे.

विश्वकोशाच्या इतिह्यासातील पहिल्या सु.१,६०० वर्षातले विश्वकोश हे समान भाषिक व शैक्षणिक पाश्वभूमी आणि अभिरुची असलेल्या विशिष्ट वेचक वाचकांसाठी होते.

सतराव्या शतकाच्या पहिल्या तीस वर्षात प्रसिध्द झालेले लॅटिन भाषेतले दोन विश्वकोश निर्देशनीय आहेतः (१) पेटिनाचा बिशप अंतोनिओ झारा ह्याचा Anatomia Ingeniorum et Scientiarum (१६१४, इं.शी. अनॅटमी ऑफ आर्ट्‌सअँड सायन्सिस) आणि (२) योह्यान ह्याइन्रिख अल्‌स्टेड ह्याचा Encyclopaedia (१६३०). झाराच्या विश्वकोशात एक सूचीही होती. हे दोन्ही विश्वकोश मानवी ज्ञानाच्या वर्गीकरणाची दृष्टी ठेवून पध्दतशीरपणे तयार करण्यात आले होते. अल्‌स्टेडच्या विश्वकोशानंतर विविध यूरोपीय देशभाषांमध्ये विश्वकोश रचण्यात आले.

१६७४ साली प्रसिध्द झालेला ल्वी मोरेरी ह्याचा Grand Dictionnaire historique (इं. शी. ग्रॅंड हिस्टॉरिकल डिक्शनरी) ह्या ग्रंथ म्हणजे वर निर्देशिलेल्या ‘विश्वकोशात्मक शब्दकोश’  ह्या प्रकारातील एक विश्वकोश होय. मोरेरीचा भर ऐतिह्यासिक, चरित्रात्मक आणि भौगोलिक माहितीवर विशेष होता. रोमन कॅथलिक चर्चची धोरणे व शिकवण ह्या ंचे समर्थन करणे ह्या हेतूही त्यामागे होता. ह्या विश्वकोशाला फार चांगला प्रेतिसाद मिळाला. १६९१ पर्यंत त्याच्या सह्या आवृत्त्या निघाल्या. इंग्रजी, जर्मन, स्पॅनिश, इटालियन भाषांत त्याचे अनुवाद झाले. आंत्वान फ्यूर्तेर ह्याचा Dicrionnaire universel des arts et sciences (१६९०) आणि तोमा कोर्नेय ह्याचा Le Dictionnaire des arts et des sciences (१६९४) हेही विश्वकोशात्मक शब्दकोशच होत.त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानावरही भर दिला ही बाब विशेष होय. विश्वकोशीय परंपरेने आधुनिक संस्कृतीच्या दिशेने टाकलेले हे पाऊल होते आणि लोकांना विज्ञान-तंत्रज्ञानात निमाण झालेल्या स्वारस्याचेही ते द्योतक होते.

फ्रेंच विव्दान प्येर बेल ह्याला त्याच्या Dictionnaire historique et critique (१६९७) ह्या विश्वकोशाच्या रचनेची प्रेरणा मोरेरीच्या विश्वकोशामुळे मिळाली, असे म्हटले जाते. मोरेरीच्या विश्वकोषात दिलेल्या माहितीचे अद्ययावतीकरण हे बेलकृत विश्वकोशाचे एक वैशिष्ट्य असले, तरी विव्दत्ताप्रचुर अशा अनेक तळटीपा, सनातनी कल्पनांना विरोध, संशयवाद व पावित्र्यविडंबन ह्या ंच्या विलक्षण मिश्रणाने भरलेली त्याची भाष्ये हे त्याच्या विश्वकोशाचे आणखी एक वेगळेपण होते.


१७०४ साली लेक्सिकॉन टेक्निकम ह्या जॉन हॅरिस ह्याचा इंग्रजी विश्वकोश प्रसिध्द झाला. आधुनिक विश्वकोशाची लक्षणीय वैशिष्ट्ये ह्या विश्वकोशात होती. उदा., सुस्पष्ट विवेचन, त्याच्या जोडीला कोरीव सुनिदर्शनात्मक चित्रपटे (प्लेट्स) आणि महत्वाच्या लेखांखाली संदर्भग्रंथांची सूची. ह्या विश्वकोशाच्या नावाप्रमाणेच त्याच वैज्ञानिक आणि तांत्रिक विषयांवर विशेष भर देण्यात आला होता. तथापि आधुनिक विश्वकोशाचा जनक ही पदवी इंग्रज विश्वकोशकार ईफ्रेअम चेंबर्स (सु.१६८०-१७४०) ह्यास दिली जाते. त्याच्या सायक्लोपीडिआ : ॲन यूनिव्हर्सल डिक्शनरी ऑफ आर्ट्‌सअँड सायन्सिस (१७२८) ह्या विश्वकोशात वाचकांच्या सोयीसाठी केलेली पूरक संदर्भांची व्यवस्था प्रशंसनीय होती. मानव्यविद्या आणि विविध तंत्रविज्ञाने ह्यांचा उत्तम प्रकारे परामर्श घेण्याची त्याची दृष्टी होती. चेंबर्सच्या ह्या विश्वकोशाचा स्थूल मानाने फ्रेंच अनुवाद करावा, अशी फ्रेंच विश्वकोशकार दनी दीद्रोची मूळ कल्पना होती. तथापि दीद्रोने अधिक व्यापक पायावर, तसेच फ्रान्सिस बेकनप्रणीत मानवी ज्ञानाच्या वर्गीकरणाच्या धर्तीवर आपला विश्वकोश लांसिक्‌लोपेदी (१७५१-७२) उभा केला. त्यामागे त्याची एक व्यक्तीगत मानवतावादी दृष्टीही होती. ह्या विश्वकोशामुळे समकालीन ज्ञानविज्ञानाचा प्रेरक परिचय सुशिक्षिताना एक वेगळी दृष्टी देईल आणि समाजातील गतानुगतिकत्व नाहीसे होऊन एक नवा समाज निर्माण होण्याचा मार्ग खुला होईल, अशी दीद्रो ह्याची धारणा होती. लोकशाहीवादी मूल्यांचा पुरस्कार हे दीद्रोच्या विश्वकोशाचे आणखी एक वैशिष्ट्य होते. मानव आणि जग ह्या ंसंबंधीच्या दृष्टिकोणात अठराव्या शतकाच्या उत्तराधीत जी उलथापालथ घडून आली, तिचे प्रत्यंतर ह्या विश्वकोशातून येते. तत्कालीन चर्च आणि राज्यकर्ते ह्या ंना ह्या विश्वकोश अडचणीचा वाटल्यामुळे त्यावर बंदीही आली होती. ह्या विश्वकोशाच्या उभारणीत आलांबेअर ह्या दीद्रो ह्याचा प्रमुख सहकारी होता. विख्यात फ्रेंच विचारवंत ⇨ व्हॉल्वेअर (१६९४-१७७८) ह्याने ह्या विश्वकोशाला उद्देशून ‘विशाल’ (व्ह्यास्ट) आणि ‘अमर’ अशी विशेषणे वापरली होती. तथापि ‘उपलब्ध ज्ञानविज्ञानांतील विषयोपविषयांवरील सर्व संभाव्य नोंदीची मांडणी’ असे ह्या विश्वकोशाचे स्वरुप न राहता त्यात तत्का लीन वादग्रस्त प्रश्नांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले, अशी टीकाही ह्या विश्वकोशावर झालेली आहे.

 अँडू्बेल (१७२६-१८०९), कॉलिन मॅक्‌फार्कर (सु.१७४५-९३) आणि विल्यम स्मेली (१७४०-९५) ह्या तीन स्कॉटिश व्यक्तींनी ‘सोसायटी ऑफ जंटलमेन इन स्कॉटलंड’  ह्या संस्थेच्या विद्यमानेजगद्‌विख्यात एन्‌साय्‌‌क्लोपीडिया बिटानिकाची पहिली आवृत्ती (एकूण ३ खंड, १७६८-७१) ह्या कालखंडात काढली. सुमारे ४५ मुख्य विषयांवरील नोंदी, शिवाय ३० दीर्घ लेख ह्या आवृत्तीसाठी आयोजिलेले होते. काही प्रमुख नोंदी-विशेषतः वैद्यकावरील-प्रत्येकी शंभरांहून अधिक पृष्ठांच्या होत्या. काही गौण विषयांवर छोट्याछोट्या नोंदीही ह्या विश्वकोशात होत्या. ह्या विश्वकोशाची मां।डणी अकारविल्हे करण्यात आली होती. ब्रिटानिकाच्या पहिल्यावहिल्या आवृत्तीत पहिलेवहिलेपणामुळे काही दोष राहिले होते. तथापि त्यानंतरच्या आवृत्यांतून आवश्यक त्या सुधारणा करण्यात आल्या. त्रिटानिकाची १५ वी आवृत्ती १९७४ मध्ये प्रसिध्द झाली. एक संदर्भग्रंथ ह्या भूमिकेपासून दूर न जाता विश्वकोशाची शिक्षणाच्या क्षेत्रातील भूमिका अधिक व्यापक करण्याची दृष्टी ह्या आवृत्तीमागे होती. ह्या आवृत्तीतील ३२ खंडांचे तीन विभाग करण्यात आलेले आहेत : ‘प्रोपीडिआ’ किंवा ‘आउटलाइन ऑफ नॉलेज’ (ज्ञानाची रुपरेषा) १ खंड ‘मायक्रोपीडिया’ किंवा ‘रेडी रेफरन्स’ (त्वरित संदर्भ) हे १ ते १२ पर्यंतचे खंड आणि ‘मॅक्रोपीडिया’ अथवा ‘नॉलेज इन डेप्थ’ (बृहद ज्ञानकोश किंवा व्यापक व सखोल ज्ञान) हे १३ ते २९ पर्यंतचे खंड शिवाय सूचीने दोन खंड (A – k L – Z).  ह्या व्यवस्थेमागील भूमिका ज्ञानवर्तुळाच्या व्यापक संकल्पनेवर आधारलेली आहे. ज्ञानवर्तुळातील विशिष्ट ज्ञानविषयांवरील लह्यानलह्यान माहितीपूर्ण नोंदी, तसेच सर्वसाधारण विषयांवरील दीर्घ लेख ह्या ंचे संयोजन आणि लेखन अशा प्रकारे व्ह्यावे, की त्यातून अनेक ज्ञानविषयांचा परस्परांशी, तसेच एकूणच ज्ञानाशी असलेला संबंध प्रत्ययास यावा, अशी दृष्टी ही आवृत्ती तयार करताना ठेवलेली आहे.


अठराव्या शतकाच्या आरंभी जर्मनीत विश्वकोशाचा एक वैशिष्टयपूर्ण प्रकार उदयाला आला. त्या देशात झपाटयाने वाढणाऱ्या मध्यमवर्गातील लोकांना समाजातील वरिष्ठ वर्तुळात वावरता येण्याच्या दृष्टीने पुरेशी सांस्कृतिक पार्श्वभूमी निर्माण करुन द्यावी, ह्याह्या प्रकारच्या विश्वकोशांचा उद्देश होता. ‘Konversations Lexikon’  ह्या नावाने ह्या प्रकार ओळखला जाई. ह्या प्रकारातला पहिला जर्मन विश्वकोश ड्यूबनर ह्या नावाने ओळखला जातो. १७०४ साली ह्या प्रसिध्द झाला. ह्या विश्वकोशाच्या प्रस्तावनेचा ह्यूबनर ह्या लेखक होय. ह्याच प्रकारातील फ्रीड्रिख अनाल्ट ब्रोखह्याउस ह्याचा Konversations-Lexikon (१७९६-१८११) ह्या विश्वकोश विशेष महत्वपूर्ण ठरला. बंदिस्त रचनेत बसविलेल्या छोट्या परंतु माहितीपूर्ण अशा नोंदी, विस्तृत समावेशक दृष्टिकोण, अचूकपणा आणि अद्ययावतपणाचे भान ही ह्या विश्वकोशाची काही लक्षणीय वैशिष्ट्ये होत. ह्या विश्वकोशाने विश्वकोशरचनेचा एक आदर्श पश्चिमी विश्वकोशांच्या जगात निर्माण केला.

योह्यान ह्याइन्रिख झेडलर ह्याचा Grosses – Vollstandiges Universal – Lexikon (६४ खंड, १७३२-५०. इं.शी.द ग्रेट कॉप्रिहेन्सिव्ह यूनिव्हर्सल लेक्सीकॉन) ह्या जुन्या परंपरेतला परंतु माहितीचा अचूकपणा, चरित्रात्मक तपशील आणि उत्तम संदर्भग्रंथांचे निर्देश ही त्याची वैशिट्ये महत्वाची आहेत.

एकोणिसाव्या शतकातील विशेष उल्लेखनीय इंग्रजी विश्वकोशांत द एन्साय् ‌क्लोपीडिआ अमेरिकाना (पहिली आवृत्ती, १३ खंड, १८२९-१८३३), अब्राहम रीस ह्याचा द न्यू साय्‌क्लोपीडिआ (१८०२-२०), तसेच रॉबर्ट आणि विल्यम चेंबर्स ह्या ंनी प्रकाशित केलेला चेंबर्स एन्साय्‌क्लोपीडिआ (१८५९-६८) ह्यांचा समावेश होतो. रीस ह्याचा द न्यू साय्‌क्लोपीडिआ माहितीपूर्ण तर होताच परंतु त्यात सुनिदर्शनात्मक सामग्री उत्तम प्रकारे वापरलेली होती. जर्मनीतून परागंदा अवस्थेत अमेरिकेस आलेला फ्रान्सिस लीबर (१७९८-१८७२) ह्याने द एन्साय्‌क्लोपीडिआ अमेरिकाना (पहिली आवृत्ती) संपादिला. लीबरने उपर्युक्त ब्रोखह्याउसच्या Konversations-Lexikon च्या सातव्या आवृत्तीचा अमेरिकानासाठी आधार घेतला होता आणि त्यातील काही भाग अनुवादून वापरलाही होता. त्यानंतर अमेरिकानाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. चेंबर्स एन्साय्‌क्लोपीडिआसमोर Konversations – Lexdikon चा आदर्श होता.

प्येर ला-यूस (१८१७-७५) ह्या फ्रेंच कोशकाराचा Grand Dictionnaire universel du xix ‘siecle francais (१७ खंड, १८६५-९०) ह्या विश्वकोशही प्रभावी ठरला. मजकुराची वाचनीयता, मांडणीतील नेमकेपणा ही या कोशाची काही वैशिष्ट्ये. साहित्य, इतिह्यास, संगीत ह्या विषयांवर तसेच चरित्रात्मक नोंदी आणि ग्रंथनोंदी ह्या ंवर त्याचा भर होता. त्यानंतरही लाऱ्यूस ह्याने काही कोशरचना केल्या.

एकोणिसाव्या शतकात अन्य यूरोपीय देशांत झालेले काही विश्वकोश असे : पोलंड : Encyklopedia Powszechna (१८५८-६८), हंगेरी : Egyetemes Magyar encyclopaedia (१८६१-७६ इं.शी. यूनिव्हर्सल हंगेरिअन एन्साय्‌क्लोपीडिआ), रशिया : Spravochny entsiklopedichesky slover (१८४७-५५, इं.शी. एन्साय्‌क्लोपीडिक रेफरन्स डिक्शनरी), ‘ग्रॅनट रशियन बिब्‌लिऑग्रॅ फिकल इन्स्टिट्यूट’ ने तयार केलेला आणि ‘ग्रॅनट’  ह्या नावाने ओळखला जाणारा Entsiklopedichesky slovar (१८९५, इं.शी. एन्साय्‌क्लोपीडिक डिक्शनरी), डेन्मार्क : Allers (१८९२-९९), Hangerups (१८९२-१९००), Salmonsens (१८९३-१९११).

विसाव्या शतकाच्या आरंभी अमेरिकेत न्यू इंटरनॅशनल एन्साय्‌क्लो आची पहिली आवृत्ती प्रसिध्द झाली (१७ खंड, १९०२-०४). पुढे कोलिअर्स एन्साय्‌क्लोपीडिआ (२० खंड, १९५०-५१) याचीही पहिली आवृत्ती प्रकाशित करण्यात आली. विसाव्या शतकातील अन्य काही अमेरिकन विश्वकोशांत अकॅडमिक अमेरिकन एन्साय्‌क्लोपीडिआ (२१ खंड, १९८०) चा अंतर्भात होतो. ह्या विद्यार्थ्यांसाठी काढलेला होता. ब्रोखह्याउसची रशियन आवृत्ती १८९० ते १९०६ ह्या कालखंडात प्रसिध्द झाली. सेंट पीटर्झवर्गमध्ये ब्रोखह्याउसचे कार्यालय होते. Bolshaya Sovetskaya entsiklopedya (६५ खंड, १९२६-४७, इं.शी. ग्रेट सोव्हिएट एन्साय्‌क्लोपीडिआ) ह्या आणखी एक उल्लेखनीय रशियन विश्वकोश. त्याच्या दुसऱ्या आवृत्तीवर (१९४९-५८) मार्क्र्स आणि लेनिन ह्या ंच्या विचारांचा प्रभाव होता तथापि अराजकीय विषयांची ह्याताळणी बरीचशी वस्तुनिष्ठ होती. ह्या विश्वकोशासाठी सु.८००० तज्ज्ञांचे सहकार्य लाभले होते. त्याचा एक संपूर्ण खंड ‘सोव्हिएट युनियन’  ह्या विषयाला वाहिलेला होता. ह्याची तिसरी आवृत्ती (संच ३० खंडांचा) १९७०-७८ ह्या कालखंडात प्रसिध्द झाली. मॅक्‌मिलन कंपनीनेह्या संचाचे इंग्रजी भाषांतर प्रसिध्द केले आहे (१९७३-८२). ‘Espasa’ ह्या त्याच्या प्रकाशकाच्या नावाने ओळखला जाणारा Enciclopedia universal ilustrada europeo-americana (१९०५-७०) ह्या स्पॅनिश विश्वकोश असून त्याचे ७० खंड व १० पुरवणी खंड आहेत. ह्या विश्वकोशाचाही एक संपूर्ण खंड ‘स्पेन’  ह्या विषयाला वाहिलेला आहे. Enciclopedia labor (१९५५-६०) ह्या नऊ खंडांचा स्पॅनिश भाषेतील विश्वकोश. ह्याचा प्रत्येक खंड एका महत्वाच्या ज्ञानक्षेत्राला वाहिलेला आहे. स्पॅनिश भाषिकांच्या जगावर ह्या कोशाच्या कर्त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केलेले दिसते.

Encielopedia Italiana (३६ खंड, १९२९-३६) ह्या उत्कृष्ट इटालियन संदर्भग्रंथ त्यातील माहितीपूर्ण, व्यासंगपूर्ण तसेच उत्तम सुनिदर्शने ह्या ंसाठी ख्याती पावला. फॅसिस्ट विचारसरणीचे समर्थन करण्याची वृत्ती ह्या विश्वकोशातून व्यक्त झाली असली, तरी एकंदरीने वस्तुनिष्ठतेचे तत्व ह्या विश्वकोशाने सांभाळलेले दिसते. ह्या विश्वकोशासाठी लेखन करणाऱ्यांमध्ये इटलीचा हुकूमशह्या बेनितो मुसोलिनी (१८८३-१९४५) ह्याचा समावेश होता.

फ्रान्समध्ये विसाव्या शतकात रचिल्या गेलेल्या विश्वकोशांत Encyclopedie francasie (१९३५-६६) ह्या विशेष उल्लेखनीय होय. ह्याचे एकवीस खंड असून ख्यातनाम विव्दानांनी लिहिलेले लेख पहिल्या वीस खंडांत संकलित केलेले आहेत. मानवी ज्ञानाचे वीस वर्ग करुन एकेक खंड एकेका ज्ञानक्षेत्राला वाहिलेला आहे. उदा., ‘माणसाची मानसिक साधने’ ह्या पहिल्या खंडाचा विषय. त्यात तर्कशास्त्र, भाषा, गणित ह्या ंसारख्या विषयांवरील लेख आहेत. खंड आठवा ‘मनाचा अभ्यास’  ह्या विषयासाठी आहे, तर चौदाव्या खंडात माणसाच्या दैनंदिन जीवनासंबंधीचे लेख आहेत. ‘धर्म आणि तत्वज्ञान’ ह्या एकोणिसाव्या खंडातील विषय असून ‘जगाचा विकास’ ह्या विषय विसाव्या खंडात ह्याताळलेला आहे. त्यात इतिह्यास, उत्क्रांती ह्या ंसारख्या विषयांवर लेख आहेत. एकविसावा खंड सूचीचा आहे. त्या-त्या विषयातील समकालीन प्रश्नांचा विचार ह्या विश्वकोशातील लेखांतून केलेला आढळतो आणि हे त्याचे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणता येईल.

क्लॉद ग्रेगरी ह्याने संपादिलेल्या Encyclopaedia Universalis (१९६८-७५) मध्ये महत्वाच्या विषयांवरील विस्तृत लेखांवर भर दिलेला आढळतो. आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानावरही विशेष लक्ष केंद्रित केलेले दिसते. चित्रे, आकृत्या इ. सुनिदर्शनात्मक सामग्रीही ह्या लेखांसाठी योग्य प्रकारे वापरण्यात आली आहे.

चेकोस्लोव्ह्याकिया, बल्गेरिया, डेन्मार्क, फिनलंड, ग्रीस, हंगेरी, द.नेदरर्लंड्स अशा अनेक यूरोपीय देशांमध्येही विसाव्या शतकात लक्षणीय विश्वकोशरचना झाली आहे.


विशिष्ट विषयांना वा ज्ञानशाखांना वाहिलेले विश्वकोश : काही विश्वकोश विशिष्ट विषयांना अथवा ज्ञानक्षेत्रांना वाहिलेले असतात. विश्वकोशनिर्मितीच्या पहिल्या १,६०० वर्षाच्या कालखंडात कोशरचनाकार ज्ञानविषयांची मांडणी करताना आपल्या व्यक्तीगत दृष्टिकोणानुसार मानवी ज्ञानाचे वर्गीकरण करुन त्याची क्रमव्यवस्था ठरवीत असत. त्यानंतर त्या-त्या ज्ञानक्षेत्राची माहिती यथास्थळी देत असत. या प्रकारचे ज्ञानक्षेत्रविशिष्ट कोशसंपादन म्हणजे विशेष विषयांना वाहिलेल्या पहिला विश्वकोश, असे ज्याचे वर्णन करता येईल असा Speculum Universale (इ.शी. यूनिव्हर्सल मिरर) ह्या विश्वकोश बाराव्या शतकातला असून तो रायूल आर्देत ह्या फ्रेंच धर्मोपदेशकाने रचिलेला आहे. ख्रिस्ती धर्माचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोण स्पष्ट करण्याच्या दृष्टीने त्याने ख्रिस्त, पापमुक्ती, लौकिक जीवन आणि संन्यस्त जीवन, प्रार्थना, नीतिशास्त्र इ. विषयांपुरताच आपला ह्या विश्वकोश मर्यादित ठेवला आहे. तथापि हे उदाहरण तसे अपवादात्मक. विशिष्ट विषयांना वाहिलेल्या विश्वकोशरचनेची प्रथा खऱ्या अर्थाने अठराव्या शतकापासून सुरु झालेली दिसते. उदा., विल्यम निकल्सन ह्याने तयार केलेली डिक्शनरी ऑफ केमिस्ट्री (१७९५). अशा विश्वकोशांची आवश्यकता भासण्याची कारणे मुख्यतः दोन दिसताः (१) ज्ञानाच्या सतत रुंदावणाऱ्या कक्षांमुळे एकेका विशिष्ट ज्ञानक्षेत्राला वाहिलेले विश्वकोश तयार केल्यास सर्वसाधारण विश्वकोशांच्या तुलनेत संबंधित ज्ञानक्षेत्र व त्याच्याशी निगडित असे विषय ह्या ंना अधिक वाव देता येईल, ही धारणा. (२) विविध ज्ञानक्षेत्रांचा आणि त्यांतील शाखोपशाखांचा स्वतंत्रपणे झालेला विकास आणि त्यातून निर्माण झालेली विशेषीकरणाची निकड. एखाद्या विषयावरील सर्वसाधारण विश्वकोशातील नोंद आणि तो विषय ज्या ज्ञानशाखेशी निगडित असेल, त्या ज्ञानशाखेला वाहिलेल्या विश्वकोशातील नोंद ह्या ंची पृष्ठसंख्या, मांडणी इ. दृष्टींनी तुलना केल्यास हे दिसून येईल. विशिष्ट विषयांना वाहिलेल्या आधुनिक विश्वकोशांची संख्या बरीच आहे. तथापि त्यांचा परामर्श काही वेचक उदाहरणांसह घेतला आहे.

तत्वज्ञानाच्या क्षेत्रात विख्यात जर्मन तत्वज्ञ ⇨ हेगेल (१७७०-१८३१) ह्याचा ‘एन्साय्‌क्लोपीडिआ ऑफ फिलॉसॉफिकल नॉलेज’ (१८१७, इं.शी.) ह्या एक महत्वपूर्ण विश्वकोश होय. त्यात हेगेलने आपले तत्वज्ञान ‘तर्कशास्त्र’, ‘निसर्ग’ आणि ‘मन’ अशा तीन भागांमध्ये सारांशाने मांडले आहे. अलीकडच्या काळात पॉल एडवर्ड्स ह्याचा द एन्साय्‌क्लोपीडिआ ऑफ फिलॉसफी (८ खंड, १९६७) ह्या विश्वकोश तत्वज्ञानीय विश्वकोशांच्या क्षेत्रातील एक भरीव कामगिरी म्हणून मान्यता पावला आहे.

जेम्स हेस्टिग्जसंपादित एन्साय्‌क्लोपीडिआ ऑफ रिलिजन अँड एथिक्स (१३ खंड, १९०८-१९२६) ह्या धर्म आणि नीतिशास्त्र ह्या विषयांच्या क्षेत्रांतील एक मान्यवर आणि अतिशय उपयुक्त असा संदर्भग्रंथ होय. ह्या विश्वकोशात जगातील सर्व धर्म आणि महत्वाच्या नैतिक प्रणाली ह्या ंची माहिती देण्यात आली आहे. मिर्सिआ एलिएड-संपादित द एन्साय्‌क्लोपीडिआ ऑफ रिलिजन (१६ खंड, १९८७) ह्या‘धर्म’  ह्या विषयाला वाहिलेला अलीकडचा एक महत्वपूर्ण कोश. पुराणाश्मकालापासून आजवरच्या जगातील धर्मेतिह्यासात ज्यांनी काही भूमिका बजावली आहे. अशा महत्वाच्या कल्पना, श्रध्दा, विधी, मिथ्यकथा, प्रतीके, व्यक्ती ह्या ंच्यावरील लेखांची व्यवस्थित मांडणी करण्याच्या उद्देशाने ह्या कोशाची रचना झालेली आहे. एकेका धर्माला वाहिलेले विश्वकोशही आहेत. उदा., बेंजामिन वॉकर ह्याचा हिंदू वर्ल्ड (२ खंड, १९६८), टॉम्स पॅट्रिक ह्यूजीसचा डिक्शनरी ऑफ इस्लाम (१९७७), तसेच द एनसाय्‌क्लोपीडिआ ऑफ इस्लाम (१९६०-  ), ए डिक्शनरी ऑफ द गॉस्पेल्स (१९०६-०८), न्यू कॅथलिक एन्साय्‌‌क्लोपीडिआ (१९६७) इत्यादी.

 

सामाजिक शास्त्रांच्या क्षेत्रात द स्टेट्स्‌मन्स यीअर बुक (आरंभ १८६४), व्हिटकर्स ऑल्मनॅक (आरंभ १८६८) आणि वर्ल्ड ऑल्मनॅक (आरंभ १९६८) हे आरंभीचे काही कोश आहेत. तसेच इंग्रज बॅंकर व अर्थतज्ज्ञ सर रॉबट पालग्रेव्हची डीक्शनरी ऑफ पोलिटिकल इकॉनॉमी (१८९४) उल्लेखनीय आहे. एन्साय्‌क्लोपीडिआ ऑफ द सोशल सायन्सिस (१९३०-३५), डेव्हिड एल्. सिल्स संपादित इंटरनॅशनलएन्साय्‌क्लोपीडिआ ऑफ द सोशल सायन्सिस (१७ खंड, १९६८), ॲडम व जेसिका क्यूपरसंपादित द सोशल सायन्स एन्साय्‌क्लोपीडिआ (१९९६), एडगर एफ्. बोरगाटा संपादित एन्साय्‌क्लोपीडिआ ऑफ सोशिऑलॉजी (४ खंड, १९९२) हे विश्वकोशही महत्वाचे आहेत.

इ.सी.ब्य्रूअर ह्याची डिक्शनरी ऑफ फ्रेझ अँड फेबल (१८७०) आणि रीडर्स हॅंडबुक (१८७९), कासल्य एन्साय्‌क्लोपीडिआ ऑफ लिटरेचर (२ खंड, १९५३) हे वाङ्‌मयविषयक विश्वकोश होत. ह्या ंखेरीज ऑक्सफर्ड यूनिव्हर्सिटी प्रेसने ‘ऑक्सफर्ड कंपॅनिअन टू’ अशा शब्दांनी सुरु होणाऱ्या शीर्षकांचे इंग्रजी, अमेरिकन व फ्रेंच ह्या भाषांतील साहित्यविषयक कोश-उदा., ऑक्सफर्ड कंपॅनिअन टूइंग्लिशलिटरेचर (१९३२)-प्रसिध्द केले आहेत (अमेरिकन साहित्य १९४१ फ्रेंच साहित्य १९५९). जेफ्री ग्रिगसनसंपादित द कन्साइस एन्साय्‌क्लोपीडिआ ऑफ मॉडर्न वर्ल्ड लिटरेचर (१९६३), जे.ए. कडनसंपादित ए डिक्शनरी ऑफ लिटररी टर्म्‌स (१९७६) ही वाङ्‌मयविषयक कोशांची अन्य काही उदाहरणे.

कलेच्या क्षेत्रात एन्साय्‌क्लोपीडिआ ऑफ वर्ल्ड आट (१५ खंड, १९५९-१९६८) ह्या एक मह्याकोश होय. व्यापक अर्थाने ज्यांना प्रतिरुपण कला (रेप्रिझेंटेशनल आर्ट्स) म्हणता येईल अशा चित्रकला, शिल्पकला, वास्तुकला ह्या ंसारख्या कला त्याचप्रमाणे घाटाच्या व सजावटीच्या दृष्टिकोणातून कलात्मक मूल्यमापनाच्या कक्षेत येणाऱ्या सर्व प्रकारच्या मनुष्यनिर्मित वस्तू ह्यांचा संदर्भ कोशकारांनी नजरेसमोर ठेवलेला आहे. स्थळ, काळ आणि सांस्कृतिक परिसर ह्या ंच्या बाबतींतल्या कोणत्याही मर्यादा त्यांनी स्वतःवर घालून घेतलेल्या नाहीत. मनुष्याच्या कलात्मक निर्मितिशीलतेचा प्रचंड वारसा इतिह्यासाच्या अंगाने पाहण्याची अभ्यासू दृष्टी कोशकारांनी बाळगली आहे. ह्या कोशातील व्याप्तिलेख ‘ऐतिह्यासिक’, ‘संकल्पनात्मक’ आणि ‘भौगोलिक’ अशा तीन प्रकारांत विभागलेले आहेत.

कलाविषयक आणखी काही कोश असेः रुन्स व श्रिकेलसंपादित एन्साय्‌क्लोपीडिआ ऑफ द आर्ट्‌‌‌स (एक खंडी, १९४६), हर्बर्ट रीडसंपादित एन्साय्क्लोपीडिआ ऑफ द आर्ट्स (एक खंडी, १९६६).

‘द आर्किटेक्चरल पब्लिकेशन सोसायटी’  ह्या संस्थेने १८५२ पासून डिक्शनरी ऑफ आर्किटेक्चर ह्या वास्तुकलाविषयक विश्वकोशाचे काम सुरु केले व ते पूर्ण व्ह्यायला चार दशकांचा अवधी लागला. मार्टिन एस्. ब्रिग्जचा एव्हरीमन्स कन्साइस एन्साय्‌क्लोपीडिआ ऑफ आर्किटेक्चर (१९५९) आणि गेर्ड हॅट्जेसंपादित  ऑफ मॉडर्न आर्किटेक्चर (१९६३) हेही वास्तुकलाविषयक उल्लेखनीय विश्वकोश होत.

संगीतविषयक विश्वकोशही आहेत. जर्मन संगीतकार योह्यान गोटफ्रीट व्ह्याल्टर ह्याचा Musikalisches Laxikon (१७३२, इं.शी. म्यूझिकल लेक्सीकॉन) ह्या विश्वकोश प्रसिध्द झाल्यानंतर आणखीही काही विश्वकोश प्रसिध्द झाले. त्यांपैकी काही इंग्रजी विश्वकोश असेः सर जॉर्ज गोव्हची डिक्शनरी ऑफ म्यूझिक अँड म्यूझिशिअन्स (१८७९-८९), बॉल्टर विल्सन कॉबेटचा साय्‌क्लोपीडिक सर्व्हे ऑफ चेंबर म्यूझिक (१९२९-३०), के. बी. सॅंडवेडसंपादित द वर्ल्ड ऑफ म्यूझिक (४ खंड, सुधारित व विस्तारित अमेरिकन आवृ.१९६३). ॲनातोल छुजॉय व पी. डब्ल्यू. मॅचेंस्टर यांनी संपादिलेला द डान्स एन्साय्‌क्लोपीडिआ (सुधारित  व विस्तारित आवृ.१९६७) ह्या महत्वाचा नृत्यकलाकोश होय.

अठराव्या शतकाच्या अखेरीपासून विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत रसायनशास्त्राला वाहिलेले अनेक विश्वकोश तयार होत राहिले. उदा., डिक्शनरी ऑफ केमिस्ट्री (१७९५) द एन्साय्‌क्लोपीडिआ ऑफ डिक्शनरी ऑफ केमिस्ट्री (१७९५) द एन्साय्क्लोपीडिआ ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (१९४७-५६). त्या तुलनेत भौतिकीच्या विश्वकोशांची संख्या बरीच कमी आहे. १९२२-२३ मध्ये सर रिचर्ड ग्लेझब्रुकची डिक्शनरी ऑफ अप्लाइड फिजिक्स प्रसिध्द झाली. जेम्स थ्यूलिसने संपादिलेली एन्साय्‌क्लोपीडिक डिक्शनरी ऑफ फिजिक्स (१९६१-६४) हीदेखील उल्लेखनीय.

वैद्यकीय क्षेत्रात ब्रिटिश एन्साय्‌क्लोपीडिआ ऑफ मेडिकल प्रॅक्टीस (१९३६-३९) आणि द एन्साय्‌क्लोपीडिआ ऑफ जनरल प्रॅक्टीस (१९६३) ह्यांचा निर्देश करता येईल. बेंजामिन एम्. मिलरसंपादित द मॉडर्न मेडिकल एन्साय्‌क्लोपीडिआ (१९६५) ह्या कोश आरोग्यविषयीच्या विविध प्रश्नांच्या संदर्भात कौटुंबिक मार्गदर्शनाची भूमिका घेऊन तयार करण्यात आला आहे.

मॅग्रॉ-हिल एन्साय्‌क्लोपीडिआ ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (१९६०) आणि एन्साय्‌क्लोपीडिआ ऑफ लायब्ररी अँड इन्‌फ र्मेशन सायन्स (१९६८-  ) हे विश्वकोशही उल्लेखनीय आहेत.

चरित्रकोशः अठराव्या शतकाच्या मध्यावर चरित्रकोश तयार होऊ लागले. Allgemeines Gelehrten Lexicon (इं.शी. जनरल स्कॉलर्ली लक्सिकॉन) ह्या क्रिस्त्यान गोटलीप जोशरचा चरित्रकोश १७५०-५१ मध्ये प्रेसिध्द झाला. त्यानंतरचे काही उल्लेखनीय चरित्रकोश असेः झोझेफ फ्रांस्वा मीशोचा Biographie Universelle (१८११-२८), जे सी. एच्. होफरचा Nouvelle Biographie generale (१८५२-६६, इं.शी. न्यू जनरल बायॉग्रफी), द मॅग्रॉहिल एन्साय्‌क्लोपीडिआ ऑफ वर्ल्ड बायॉग्रफी (१२ खंड, १९७३). वैज्ञानिकांच्या चरित्रकोशांत मॅग्रॉ-हिल मॉडर्न मेन ऑफ सायन्स (२ खंड, १९६६ १९६८), डिक्शनरी ऑफ सायंटिफिक बायॉग्रफी (१९८१), द बायॉग्रॅफिकल एन्साय्‌क्लोपीडिआ ऑफ सायंटिस्ट्स (१९८१).


बालविश्वकोशः वेगवेगळ्या वयोगटांतील मुलांसाठी ही विश्वकोशनिर्मिती केली जाते. अशा प्रकारचा पहिला प्रयत्न सतराव्या शतकात योह्यान क्रिस्टोफ वागेनसेल ह्याने Pera Liborum Juvenilium (१६९५ इं.शी. कलेक्शन ऑफ जूव्हिनाइल बुक्स) ह्या विश्वकोशाच्या रुपाने केला. जॉन न्यूबरी ह्याचा सर्कल ऑफ द सायन्सिस ह्या बालविश्वकोश १७४५ मध्ये प्रसिध्द झाला. तथापि आर्थर मी (१८७५-१९४३) ह्या इंग्रज लेखकाने संपादिलेल्या चिल्ड्रन्स एन्साय्‌‌क्लोपीडिआ (१९०८) ह्या विश्वकोशाला मोठी लोकप्रियता प्राप्त झाली. अमेरिकेत ह्याच विश्वकोश बुक ऑफ नॉलेज ह्या नावाने १९१० साली प्रसिध्द झाला. वेधक शैलीत लिहिलेल्या आणि जोडीला भरपूर सुनिदर्शने असलेल्या नोंदी त्यात होत्या. मी ह्याने आय् सी ऑल (१९२८-३०) ह्या जवळपास पूर्ण चित्रमय असा विश्वकोशही मुलांसाठी काढला. हजारो छोटी छोटी चित्रे आणि प्रत्येक चित्राला अगदी थोड्याशा शब्दांची पुस्ती, असे ह्या विश्वकोशाचे स्वरुप होते. १९१७ साली द वर्ल्ड बुक एन्साय्‌क्लोपीडिआ ह्या विश्वकोश प्रसिध्द झाला. ८ खंडात प्रसिध्द झालेल्या ह्या पहिल्या आवृत्तीपासूनच ह्या विश्वकोशाला यश मिळत गेले त्याच्या विस्तारित आवृत्या निघत गेल्या. १९७१ पर्यंत त्याच्या एकूण खंडांची संख्या २२ पर्यंत गेली. १९६१ साली ह्या विश्वकोशांची ब्रेल लिपीतली १४५ खंडांची आवृत्ती काढण्यात आली. अशी आवृत्ती निघालेला ह्या पहिला विश्वकोश. १९८० मध्ये विश्वकोशाची जगातील पहिली ध्वनिमुद्रित आवृत्ती काढण्याचे श्रेय ह्या विश्वकोशाने मिळवले. ध्वनिफितींच्या स्वरुपातल्या ह्या विश्वकोशाबरोबर एक खास रेकॉर्ड प्लेअर आणि ब्रेल लिपीतली सूची देण्यात आली. १९३४ मध्ये ब्रिटानिका ज्यूनिअर प्रसिध्द झाला. १९६३ साली त्यालाच ब्रिटानिका ज्यूनिअर एन्साय्‌क्लोपीडिआ (१५ खंड) असे नवे नाव देण्यात आले. १९६० साली चिल्ड्रन्स ब्रिटानिकाचीही १२ खंडांची पहिली आवृत्ती निघाली. १९७३ पर्यंत तिच्या खंडांची संख्या २० पर्यंत गेली.

‘एन्साय्‌क्लोपीडिआ ब्रिटानिका इन्कॉर्पोरेटेड’  ह्या संस्थेने यंग चिल्ड्रन्स एन्साय्‌क्लोपीडिआ नावाचा एक विश्वकोश नुकतेच वाचावयास शिकलेल्या मुलांसाठी काढला (१९७१). १६ खंडांच्या ह्या विश्वकोशात माहिती ही मुख्यतः रंगीत चित्रांच्याव्दारे दिली असून शब्दांच्या साह्याय्याने दिलेली माहिती अगदी थोडी आहे. जपानी आणि कोरियन भाषांत ह्या ंचे अनुवाद झाले आहेत.

फ्रॅंक ई. कॉम्पटन हयांने १९२२ साली लह्यान मुलांसाठी कॉम्प्टन्स पिक्चर्डएन्साय्‌क्लोपीडिआ काढला होता. त्यात सतत आवश्यकत्या सुधारणा करण्याचे धोरण ठेवले गेले. त्यासाठी शिक्षण आणि ग्रंथपालन ह्या क्षेत्रांतील अनुभवी सल्लागारांशी संपर्क ठेवून त्यांचे सहकार्य मिळविले गेले. तसेच नामवंत लेखकांकडून लेखन मिळविण्यात आले.

कुलकर्णी, अ.र.

पौर्वात्य देशांतील कोशरचनेचा इतिह्यासः चीनः चीनमधील कोशपरंपरा सु. दोन हजार वर्षाची आहे. निरनिराळ्या विव्दानांनी संकलित केलेले हे विश्वकोश शतकानुशतके, वेळोवेळी केलेल्या आवश्यक त्या सुधारणांसकट टिकून राहिले. ह्या विश्वकोशांचे स्वरुपही विविध विषयांवरील महत्वाचे लेखन जमवून त्यांचा केलेला संग्रह- अँथॉलॉजी असे आहे. मानवी ज्ञानाच्या वर्गीकरणानुसार लेखांची मांडणी केली जाई. ‘एंपरर्स मिरर’ (इं.शी) ह्या आपणास ज्ञात असलेला सर्वांत प्राचीन चिनी विश्वकोश इ.स.सु.२२०मधला आहे. मात्र तो त्रुटित स्वरुपातही उपलब्ध नाही. त्यानंतरचे काही चिनी विश्वकोश इंग्रजी शीर्षकार्थांनी पुढे दिले आहेतः ‘स्ट्रिंग्‌ड पर्ल्‌सऑफ लिटरेचर’ (सु.६००), ‘अँथॅलॉजी ऑफ आर्ट अँड लिटरेचर’, (सु.६२०), ‘एंट्री इंटू लर्निंग’ (सु.७००), ‘कॉंप्रिहेन्सिव्ह स्टूच्यूट्स’ (सु.८०१). ह्या ंपैकी तू यू संपादित ‘कॉप्रिहेन्सिव्ह स्टॅच्यूट्स’ या कोशाला १२७३ साली ‘जनरल स्टडी ऑफ द लिटररी रिमेन्स’  ह्या नावाने पुरवणी जोडण्यात आली. ह्या पुरवणीला पुन्ह्या सतराव्या-अठराव्या आणि विसाव्या शतकांत पुरवण्या जोडण्यात आल्या. ‘कॉंप्रिहेन्सिव्ह स्टॅच्यूट्स’ मध्ये ज्ञानाचे नऊ विभाग करण्यात आले होते. त्यांत अर्थशास्त्र, परीक्षा आणि पदव्या, सरकार, धार्मिक-सांस्कृतिक विधी व समारंभ, संगीत, लष्कर, कायदा, राजकीय भूगोल, राष्ट्राची संरक्षणव्यवस्था असे ज्ञानाचे नऊ विभाग आले होते. पंधराव्या शतकाच्या आरंभी ‘ग्रेट हॅंडबुक’ (इं.शी.) ह्या विश्वकोश तयार झाला. त्यात बावीस हजारांहून अधिक प्रकरणे होती. मात्र ह्याचा उपलब्ध भाग फारच थेडा आहे. तो १९६३ साली प्रसिध्द करण्यात आला. ‘सी ऑफ जेड’ (तेरावे शतक, इं.शीं.) ह्याही एक महत्वाचा चिनी विश्वकोश होय. १७३८ मध्ये त्याचे पुनर्मुद्रण २४० खंडांत करण्यात आले. अठराव्या शतकातील चिनी विश्वकोशांत ‘कलेक्शन ऑफ पिक्चर्स अँड रायटिंग्ज’ (इं.शी.) ह्या चेन मेंग ली ह्याने संपादिलेला एक महत्वपूर्ण विश्वकोश प्रसिध्द झाला (१७२६). साडेसात लाखांहून अधिक पृष्ठांच्या ह्या विश्वकोशातून चीनच्या समृध्द सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडते. प्रशासाकीय सेवेत (सिव्हिल सर्व्हिस) प्रवेश करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने उपयोगी पडेल असे ज्ञान मुख्यतः देण्याचा हेतू चिनी कोशरचनेमागे अनेकदा दिसून येतो. ऐतिह्यासिक दृष्ट्या अशा विश्वकोशांचा उपयोग तत्कालीन प्रशासनाच्या आणि न्यायाच्या संकल्पना समजून घेण्यासाठी होतो.

‘ग्रेटर एन्साय्‌क्लोपीडिआ ऑफ चायना पब्लिशिंग ह्याउस’ आणि ‘एन्साय्‌क्लोपीडिआ ब्रिटानिका इन्‌कॉर्‌पोरेटेड’  ह्या दोन संस्थांमध्ये एक करार होउन (१९८०) त्यानुसार एन्साय्‌क्लोपीडिआ ब्रिटानिकाच्या पंधराव्या आवृत्तीतील ‘मायक्रोपीडिआ’ चे चिनी भाषांतर चिनी वाचकांसाठी करण्याचे ठरले. आठ खंडांचा ह्या प्रकल्प १९८४-८५ मध्ये साकारला.

जपानः एडो किंवा तोकुगावा कालखंडात (१६०३-१८६७) एक विश्वकोश प्रसिध्द झाला. त्यात महत्वाच्या जपानी आणि चिनी ग्रंथांतील काही भाग अंतर्भूत केले होते. जपानी विश्वकोशांमध्ये विशेष निर्देशनीय असा दह्या खंडांचा ‘ग्रेट जॅपनीज एन्साय्‌क्सोपीडिआ’ (इ.सी.) १९०८-१९ ह्या कालखंडात प्रसिध्द झाला. त्यात मुख्यतः वैज्ञानिक विषयांवरील ग्रंथांचे संकलन केलेले होते. Buritanika Kokusai Dai Hyakka Jiten ह्या विश्वकोश ब्रिटानिका इंटरनॅशनल एन्साय्‌क्लोपीडिआ म्हणूनही ओळखला जातो. ह्याचेअठ्ठावीस खंड असून ते १९७२ ते १९७५ ह्या कालखंडात प्रसिध्द झाले. ह्या विश्वकोशाच्या निर्मितीसाठी ‘टोकीयो ब्रॉडक्रास्टिंग सिस्टिम’ आणि ‘एन्साय्‌क्लोपीडिआ ब्रिटानिका इन्‌कॉर्‌पोरेटेड’  ह्या दोन संस्था ‘टीबीएस् ब्रिटानिका कंपनी’  ह्या नावाने एकत्र आल्या होत्या.


अरबी विश्वकोशः पौर्वात्य देशांत विश्वकोश रचण्याचे जे उपक्रम झाले, त्यांमध्ये अरबी विश्वकोशांना विशेष महत्वाचे स्थान आहे. अरबी भाषेत निर्माण झालेल्या प्रारंभीच्या विश्वकोशांचे स्थूल मानाने दोन गटांमध्ये वर्गीकरण करता येईलः एक, जे लोक ज्ञानजिज्ञासू होते आणि आपला सांस्कृतिक वारसा काटेकोरपणाने जाणून त्याचा उपयोग करु इच्छित होते, अशा लोकांसाठी तयार झालेले विश्वकोश आणि दुसरा, झपाट्याने वाढतजाणाऱ्या प्रशासकीय क्षेत्रांतील नोकरदारांसाठी तयार झालेले विश्वकोश. अरबांच्या सत्तेचा जेव्ह्या भूमध्य प्रदेशात विस्तार होत होता, तेव्ह्या दुसऱ्या गटातील विश्वकोशांची विशेष निर्मिती झाली. खऱ्या अर्थाने ज्याला विश्वकोश म्हणता येईल, असा पहिला अरबी विश्वकोश इब्न कुतैबह (८२८-८८९) याने तयार केला. इब्न कुतैबह ह्या शिक्षक व भाषाशास्त्रज्ञ होता. त्याच्या ‘द बेस्ट ट्रॅडिशन्स’ (इं.शी.) या विश्वकोशाने पुढे निर्माण झालेल्या अनेक विश्वकोशांना उदाहरण घालून दिले. या विश्वकोशाचे दह्या भाग असून त्यांची मांडणी पुढीलप्रमाणे होतीः सत्ता, युध्द, घरंदाजपणा, चारित्र्य, विद्या व वक्तृत्व, संन्यास, मैत्री, प्रार्थना, अन्न, स्त्रिया. कॉर्दोव्ह्याचा इब्न अब्द रब्बिह याने कुतैबहच्या विश्वकोशामध्ये सुधारणा केली आणि त्यात महत्वाच्या समकालीन विषयांचा अधिक समावेश करुन ‘द जूइल्ड नेकलेस’ (इं.शी.) ह्या विश्वकोश तयार केला.

‘की टू द सायन्यिस’ (इं.शी.) ह्या विश्वकोश ९७५-९९७ या काळात तयार झाला. ह्या विश्वकोशाची विभागणी दोन भागांत केली होतीः एक, देशी विद्या (न्यायशास्त्र, स्कोलॅस्टिक तत्वज्ञान, व्याकरण, सचिवाची कर्तव्ये, छंदःशास्त्र, काव्य, इतिह्यास) आणि दोन, विदेशी विद्या (तत्वज्ञान, तर्कशास्त्र, वैद्यक, अंकगणित, भूमिती, खगोलशास्त्र, संगीत, यंत्रविद्या, रसायन). बसरा येथे दह्याव्या शतकात स्थापन झालेल्या ⇨इख्वान अस्-सफा या धार्मिक विचारवंतांच्या संघटनेने रसाइल इख्वान अस्-सफा ह्या उल्लेखनीय विश्वकोश प्रकाशित केला. त्यामध्ये पाच लेखकांनी लिहिलेल्या ५२ (काहींच्या मते ५१) प्रकरणांचा समावेश होतो. त्या काळातील त्यांच्या सामाजिक जीवनात व परिसरात उपलब्ध असलेल्या सर्व ज्ञानविषयांचा त्यामध्ये अंतर्भाव होता. या विश्वकोशात गणित, भूगोल, संगीत, तर्कशास्त्र, नीतिशास्त्र, भौतिकशास्त्र, तत्वमीमांसा, धर्म ज्योतिष आणि जादूविद्या इ. विषयांचा समावेश होता. या विश्वकोशाचे इंग्रजी भाषांतर १८५९ मध्ये झाले.

ईजिप्शियन इतिह्यासकार अन्-नुवारी (१२७२-१३३२) याने मामलुक कालखंडात एक उत्तर विश्वकोश तयार केला. ‘द एम ऑफ द इन्टलिजन्ट इन द आर्ट ऑफ लेटर्स’ (इं.शी.) हे त्याचे नांव. तो जवळजवळ ९,००० पृष्ठांचा आहे. त्यामध्ये भूगोल, ज्योतिषशास्त्र, वातावरणविज्ञान, कालगणना, भूविज्ञान, शारीरविज्ञान, लोकविद्या, वर्तणूक, राज्यशास्त्र, प्राणिविज्ञान, वनस्पतिविज्ञान, इतिह्यास इ. विषय होते. १९२३ मध्ये याची संपूर्ण आवृत्ती प्रसारित झाली. अल्-उमारी (१३०१-४८) याच्या ‘साइट-सींइग जर्नीज’ (इं.शी.) या विश्वकोशात मुख्यतः इतिह्यास, भूगोल आणि काव्या यांच्यावर भर होता. अल्-कुलकशंदी (मृ.१४१८) याने सुब्‌हअल् अशा (Subh-alasha) नावाचा सुरचित असा विश्वकोश सिध्द केला. त्यात भूगोल, राजकीय इतिह्यास, प्रकृतिविज्ञान, प्राणिविज्ञान इ. विषयांचा समावेशहोता. इव्शाय्‌ही (पंधरावे शतक) यानेही ‘ स्पिरिच्युअल डिस्कव्हरीज’ (इं. शी.) नावाचा विश्वकोश केला. त्यात इस्लाम धर्म, संगीत, आह्यारविद्या, वैद्यकशास्त्र ह्या ंसारख्या विषयांचा समावेश होता.

पर्शियन वकील अद्-दीवाणी (१४२७-१५०१) यानेही एक विश्वकोश तयार केला. त्यात तपशीलवार प्रश्‍नोततरे आणि विविध तंत्र-विद्याविषयक नवसंशोधन होते. लेवाननमध्ये बुतरुस अल्-बुस्तानी आणि त्याचे पुत्र यांनी दाइरात अल् मा आरिफ (Dairal al-ma’arif) (१८७६-१९००) ह्या एक उल्लेखनीय विश्वकोश रचला. १९५५ मध्ये अल्बर्ट रिह्यानी याने अल्-मॉसुअत अल् अरेबिया (al Mawsusal al-arabiyah) ह्या एक खंडी विश्वकोश प्रसिध्द केला.

ब्रह्मी, हिब्रू, सिंहली अशा भाषांतही विश्वकोश रचना झालेली आहे.

चुनेकर, सु. रा.

भारतीय भाषांतील कोशरचना : ओडिया : ओडिया (उडिया) भाषेतील विश्वकोशरचना प्रारंभ बऱ्याच उशिरा म्हणजे विसाव्या शतकाच्या तिसऱ्या-चौथ्या दशकांत झाला. लाला माधव लाल ह्यांचा विविधसंग्रह, भावाग्राही मोहपात्र, लाला नागेंद्रकुमार  रॉय आणि अक्षयकुमार चक्रवर्ती ह्यांचे अनुक्रमे रत्नकोश, विविध-रत्नसंग्रह आणि विविधसारसंग्रह हे कोश आरंभीचे प्रयत्न म्हणून उल्लेखनीय आहेत. त्यांत लाला नागेंद्रकुमार रॉय ह्यांचा विविधरत्न संग्रह अधिक पध्दतशीरपणे रचलेला दिसतो. १९४० साली बालकृष्ण कार ह्यांनी शिशुसांखली (Shishusankhali) ह्या कोश लह्यान मुलांसाठी तयार करण्याचे ठरविले आणि त्याचे माहितीपूर्ण असे तीन खंडही प्रसिध्द झाले. त्याला लह्यान मुलांचा आणि सर्वसाधारण वाचकांचाही उत्तम प्रतिसाद मिळाला. तथापि त्यानंतर हे काम तेथेच थांबले. ⇨ मायाधर मानसिंह (१९०५-१९७३) ह्यांनी शास्त्रीय पध्दतीने अनेक खंडाचा ओडिया विश्वकोश तयार करण्याचा प्रयत्न केला. उत्कल विद्यापीठाच्या विद्यमाने त्यांनी हे काम ह्याती घेतले (१९५६-६६) पण ते योजनेनुसार तडीस गेले नाही. फक्त चार खंडाचा संक्षिप्त ओडिया विश्वकोश तयार झाला. विनोद कानूंगो ह्यांनी ज्ञानमंडल ह्या ७५ खंडांच्या विश्वकोशाची योजना आखली व १९५४ मध्ये काम सुरु करुन ते चालविले आहे. १९६० मध्ये त्याचा पहिला खंड प्रसिध्द झाला आणि पुढे आणखी ३५ खंड प्रसिध्द झाले. पुरेशी माहिती, सुबोध भाषा आणि सुयोग्य सुनिदर्शने ही ज्ञानमंडलाची वैशिष्ट्ये होत. आर्. के. नंदा. ह्यांनी रचिलेला विश्वपरिचय (१९६२) ह्या ओडिया भाषेतील उत्कृष्ट एक खंडीय विश्वकोश होय. ह्या भाषेत एखाद्या विशेषज्ञानक्षेत्राला वाहिलेलेविश्वकोश निर्माण करण्याचे प्रयत्न फारसे दिसत नाहीत.


कन्नड : कन्नड भाषेतील विश्वकोशनिर्मितीची परंपरा अकराव्या शतकापर्यंत मागे नेता येते. १०२५मध्ये दुसरा चावुंडराय ह्या विद्या-व्यासंगी राजाने लोकोपकार ह्या विश्वकोशीय स्वरुपाचा ग्रंथ काव्याच्या माध्यमातून लिहिला. ह्या ग्रंथात बारा प्रकरणे असून, ह्यांत पंचांग पाहून भविष्य वर्तवणे, वास्तुकला, तलाव बांधणे, झाडांचे रोग आणि त्यांवरील उपाय, पाकशास्त्र, वैद्यक इ. विषय अंतर्भूत आहेत. शिरी-भूवलय नावाचा एक प्राचीन ग्रंथ पंडित यल्लप्पा शास्त्री ह्या ंनी दोन भागांत अंशत: प्रसिध्द केला (१९५३, १९५५). शास्त्री ह्या ंना मिळालेले मूळ दुर्मीळ हस्तलिखित संख्यांवर आधारलेल्या एका गूढ संकेतव्यवस्थेत बंदिस्त होते. अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर ह्या ग्रंथाच्या संहितेचा काही भाग उलगडून प्रसिध्द करणे शक्य झाले. काही विद्वानांच्या मते ह्या ग्रंथ नवव्या शतकातला आहे, तर काही त्याचा काळ पंधराव्या शतकाच्या आधीचा नसावा, अशा मताचे आहेत. एखाद्या संगणकीकृत विश्वकोशासारखे ह्याचे स्वरुप आहे, असे म्हणतात.ह्या ग्रंथाची संपूर्ण संहिता जेव्ह्या उलगडली जाईल, तेव्ह्या त्याची प्रमुख वैशिष्ट्ये स्पष्ट होऊ शकतील.

वीरशैव कवी ⇨ निजगुणशिवयोगी (सु. १५००) ह्याच्या ⇨ विवेकचिंतामणि ह्या विश्वकोशाची दह्या प्रकरणे असून त्यांची मांडणी विषयावर केलेल्या वर्गीकरणानुसार करण्यात आली आहे आणि एकेका विषयाखाली त्याच्याशी संबंधित अशा विषयांची माहिती दिली आहे.

आधुनिक कन्नड विश्वकोशरचनेच्या संदर्भात कन्नड कादंबरीकार, नाटककार आणि निबंधकार⇨ कोट शिवराम कारंत (१९०२-१९९८) ह्यांचे नाव उल्लेखनीय आहे. कन्नड भाषेतील पहिला सर्व-संग्राहक कोश बालप्रपंच त्यांनी सर्वस्वी स्वत: तयार केला (३ खंड, १९३७). ह्या लह्यान मुलांसाठी आहे. पुढे विशेषत: उच्च माध्यमिक शाळांतील विद्यार्थी आणि सर्वसाधारण वाचकवर्ग डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी विज्ञानप्रपंच ( ५ भाग) ह्या विज्ञानकोश रचला. विश्व, पुथ्वी, उत्क्रांती, जीवविज्ञान, वनस्पतिविज्ञान, प्राणिविज्ञान, वस्तू आणि चैतन्य (उर्जा), अभियांत्रिकी इ. विषयांची माहिती त्यात दिली आहे.

कोट शिवराम कारंत ह्यांच्या बालप्रपंचानंतर ज्ञानगंगोत्री ह्या एक सात खंडाचा विश्वकोश कुमारांसाठी काढण्यास आला. त्याचे सह्या खंड १९७०ते १९७३पर्यंत पूर्ण झाले. विषयवार केलेल्या पहिल्या सह्या खंडात अनुक्रमे मानवाची कथा, सजीवांचे जग, भौतिक जग, यंत्रांचे जग, कला व साहित्य आणि क्रीडा व मनोरंजन हे विषय आहेत. ‘भारताची कथा’ (म.शी.) ह्या सातव्या खंडात भारताचा सांस्कृतिक इतिह्यास दिला आहे. म्हैसूर विद्यापीठातील ‘इन्स्टिट्यूट ऑफ कन्नड स्टडीज’ च्या विद्यमाने एन्साय्‌क्लोय्क्लोपीडिया ब्रिटानिकाच्या धर्तीवर एक विश्वकोश -द म्हैसूर यूनिव्हर्सिटी  कन्नड एन्साय्‌क्लोपीडिया (१४खंड)-१९७०साली ह्याती घेण्यात आला. सर्वसाधारण सुशिक्षितांप्रमाणे विद्वानांचा वाचकवर्गही तो रचताना डोळ्यांसमोर ठेवण्यात आला आहे. ह्या विश्वकोशाचे दह्या खंड प्रसिध्द झालेले आहेत. कन्नड साहित्य परिषदेतर्फे कर्नाटकातील लोकविद्या ह्या विषयावरील एक कोश १९८१साली पूर्ण करण्यात आला.

 

कोकणी : गोवा विद्यापीठातर्फे सर्वसंग्राहक कोंकणी विश्वकोशाची योजना ह्याती घेण्यातआलेली असून त्यासाठी स्वतंत्र विभागाची स्थापना करण्यात आली आहे. ह्या विश्वकोशाचे संकल्पित खंड तीन असून त्यात गोवा व कोकण ह्यांच्याशी संबंधित विषयांवर विशेष भर दिला आहे. त्याचा पहिला खंड प्रसिध्द झाला आहे (१९९२). त्याचे प्रमुख संपादक मनोहरराय सरदेसाय हे असून उर्वरित दोन खंडाचे प्रमुख संपादक तानाजी हळर्णकर हे आहेत.

‘गोवा कोंकणी अकादेमी’ तर्फे कार्यान्वित होत असलेला कोकणी शब्दसागर (संपादक पांडुरंग भांगी आणि एस्. एस्. नाडकर्णी) ह्या विश्वकोशात्मक शब्दकोशाचा एक वैशिष्ट्यपूर्ण नमुना होय. ह्याचाही पहिला खंड प्रसिध्द झालेला असून दुसरा खंड छापला जात आहे. ह्या कोशात वापरण्यात आलेली पध्दत अशी: दिलेल्या प्रत्येक शब्दाचा उच्चार, सामान्यरुप, बहुवचन, बहुवचनी सामान्यरुप, व्युत्पती, शब्द-जाती, लिंग ही सर्व व्याकरणविषयक अंगे द्यावयची. नंतर त्या शब्दाच्या विविध अर्थछटा देऊन त्यांची उदाहरणे नव्या-जुन्या कोकणी साहित्य-कृतींतून द्यावयाची. ही अवतरणे अनेकदा छोट्या उताऱ्यांसारखी झालेली आहेत. ह्या अवतरणांनंतर त्या शब्दाशी निगडित असलेले वाक्‌प्रचार वा म्हणी देण्यात येतात. त्यांच्याशी एखादी लोककथा निगडित असल्यास तीही दिली जाते. भारतीय संस्कृती, मानवी ज्ञानाची विविध क्षेत्रे ह्यांच्याशी संबंधित असलेले अनेक शब्द ह्या कोशात अंतर्भूत असून त्यांच्याशी संबंधित अशा ज्ञानक्षेत्रातील माहितीही ‘विशेष’ असा निर्देश करुन दिली आहे आणि ह्याह्या कोशाचामहत्वाचा भाग आहे. गोमंतकीय जीवनात विशिष्ट अर्थाने वापरले जाणारे शब्द जेथे आले आहेत, तेथे त्यांचे विशिष्ट अर्थ आणि ते प्राप्त होण्यामागील परिस्थिती सविस्तरपणे नमूद केली आहे.

गुजराती : माणेकजी एदलजी वाच्छा आणि अर्देशन फ्रामजी सोलन ह्यांचा सर्वविद्या ह्या गुजराती भाषेतील पहिला विश्वकोश मात्र त्यांच्या संकल्पित चार खंडांपैकी फक्त पहिला खंडच प्रसिध्द होऊ शकला. रतनजी सेटना ह्यांचा ज्ञानचक (९खंड) ह्या त्यानंतरचा विश्वकोश. त्याला मोठी लोकप्रियता प्राप्त झाली. मह्याराष्ट्रीय ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर ह्यांची गुजराती भाषेतील विश्वकोश करण्याची इच्छा होती. त्याचे २०विभाग वा खंड त्यांनी संकल्पिले होते. तथापि दोन खंड प्रसिध्द झाल्यानंतर (पहिला १९२९दुसरा १९३५ते १९३७  ह्या दरम्यान केव्ह्यातरी) आर्थिक अडचणींमुळे त्यांना ह्या प्रकल्प सोडून द्यावा लागला. १९४१-४२मध्ये दत्तात्रय चिंतामणकरंदीकर-मुजुमदार ह्यांनी गुजरातीत व्यायामकोश प्रसिध्द केला. सरदार पटेल विद्यापीठातर्फे कार्यान्वित झालेल्या ज्ञानगंगोत्री  ह्या विश्वकोशाचे खंड (संकल्पित खंड ३०) १९६७पासून प्रसिध्द होऊ लागले. गुजरात विद्यापीठाने ह्याती घेतलेल्या विज्ञान व तंत्रविद्याविषयक विश्वकोशाचा आयुर्विज्ञान ह्या पहिला खंड १९७७मध्ये प्रसिध्द झाला. ‘गुजरात विश्वकोश ट्रस्ट’ चा गुजराती विश्वकोश व ‘गुजरात साहित्य परिषदे’ चा गुजराती साहित्यकोश असे अन्य काही प्रकल्प आहेत.

तमिळ : अकारविल्हे रचण्यात येणाऱ्या सर्वसंग्राहक विश्वकोशाची कल्पना तमिळांना होती आणि साधारणपणे इ. स. च्या सातव्या शतकापासून असे काही पद्यमय विश्वकोशही तयार केले गेले. ह्या विश्वकोशांना ‘निघंटु’ अशी संज्ञा होती. सातव्या शतकातला आदि दिवाकरम्वा सेंदन दिवाकरम् ( १२खंड ९,५००नोंदी), पंधराव्या शतकातला कैलास निघंटु चूडामणि ही अशा काही विश्वकोशांची उदाहरणे होत.

तमिळमधील आधुनिक विश्वकोशांच्या रचनेचा आरंभ एकोणिसाव्या शतकाच्या अखेरी-अखेरीस झाला, असे म्हणता येईल. ए. सिंगारवेलू मुदलियार ह्यांच्या अभिघानचिंतामणीचे काम १८९९साली सुरु झाले. मानव्यविद्या आणि विज्ञान ह्या दोन्ही ज्ञानक्षेत्रांतील विविध विषयांची माहिती त्यांच्या ह्या विश्वकोशात होती. तमिळांच्या सांस्कृतिक माहितीवर -उदा., तमिळ मह्याकाव्ये, पुराण कथा, चालीरीती इ.- आधारित एक ह्याती पूर्ण केलेला ह्या प्रकल्प होता. त्यात सर्व विषयांचा परामर्श नव्हता पण त्यांना जी जी माहिती त्यांच्या विश्वकोशात अंतर्भूत करणे शक्य होते, ती त्यांनी केली होती. ए. सिंगारवेलू मुदलियार १९३१मध्ये निधन पावले, तेव्ह्या त्यांच्या ह्या विश्वकोशाच्या सुधारित दुसऱ्या आवृत्तीचे मुद्रण अंशत: पुर्ण झाले होते. अपूर्ण राहिलेले काम त्यांच्या पुत्राने पूर्ण केले. १९१०च्या सुमारास विज्ञान – कलैक्कलंजियम् (Vijnana-Kalaikkalanjiym) ह्या एक लह्यानसा विश्वकोश प्रसिध्द झाला. १५ऑगस्ट १९४७रोजी स्थापन झालेल्या ‘तमिळ अकादमी’ने एन्साय्‌क्लोपीडिया विटानिकाच्या धर्तीवर एक सर्वसंग्राहक स्वरुपाचा विश्वकोश तयार करण्याची योजना आखून ती पूर्ण केला. एम्. पी. पेरायस्वामी थूरन हे त्याचे प्रमुख संपादक. त्यांच्या संकल्पित दह्या खंडापैकी पहिले नऊ खंड १९५४ते १९६०  ह्या कालखंडात प्रसिध्द करण्यात झाले. १९६८मध्ये ह्या विश्वकोशाची एक पुरवणी ‘दह्यावा खंड’ म्हणून प्रसिध्द करण्यात आली. ह्या विश्वकोशानंतर थूरन ह्यांनी विपुल सुनिदर्शनांनी भरलेला कुलदैकल-कलैक्कलंजियम् (Kulandaikal-Kalaikkalanjiym १९६८-७६) ह्या विश्वकोश मुलांसाठी तयार केला. ह्याही दह्या खंडांचा आहे.

अब्दुल रहीम ह्यांनी संपादिलेला इस्लामीया कलैक्कलजियम् (Islamia Kalaikkalanjiym ३खंड, १९७६-७९) ह्या इस्लाम धर्मविषयक विश्वकोश असून त्यात सुनिदर्शने नाहीत माहिती मात्र विपुल आहे.

तेलुगू : आंध्रमध्ये १९१०च्या सुमारास के. व्ही. लक्ष्मणराव ह्यांनी आंध्रविज्ञानसर्वस्वम् ह्या तेलुगू विश्वकोशाची योजना ह्याती घेतली. लक्ष्मणराव ह्यांचा ह्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा प्रभाव ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर ह्यांच्यावर पडला आणि मह्याराष्ट्रीय ज्ञानकोश निर्माण करण्याची ईर्षा त्यांच्या मनात उत्पन्न झाली. ह्या तेलुगू विश्वकोशाचा प्रकल्प पूर्ण मात्र झाला नाही. पहिले तीन खंड पूर्ण झाल्यानंतर चौथ्या खंडाचे काम चालू असतानाच लक्ष्मनराव ह्यांचे निधन झाले (१९२३). आर्थिक अडचणी असताना ते काम करीत होते त्यामुळे त्यांच्या ह्या विश्वकोशाची सुनिदर्शनात्मक बाजूही काहीशी दुबळी राहिली. लक्ष्मणरावांनंतर के. नागेश्वरराव ह्यांनी ह्या प्रकल्प ह्याती घेतला. लक्ष्मणरावांच्या पहिल्या तीन खंडांची दुसरी, सुधारित आणि परिवर्धित आवृती त्यांनी काढली. त्यानंतर त्यांच्या निधनामुळे ह्या प्रकल्प अपूर्णावस्थेतच राहिला.

कंदुकूरिप्रसाद भूपलुडू ह्यांनी एकट्यांने१९४०च्या सुमारास संपादून प्रसिध्द केलेला आंध्रविज्ञानमु (७खंड) ह्या तेलुगू भाषेतला, पूर्ण झालेला, पहिला विश्वकोश-प्रकल्प. नांदी आणि त्यांची मांडणी ह्यांवर व्यक्तिगत दृष्टिकोणाचा प्रभाव असल्यामुळे त्याला काही मर्यादा पडल्या आहेत तथापि त्याची उपयुक्तता मान्य केली जाते.

‘तेलुगू भाषा समिती’ने (स्थापना १९५०) विज्ञानसर्वस्वमु ह्या विषयवार रचनेचा विश्वकोश करण्याचे काम ह्याती घेतले. त्यात अन्य विषयांबरोबर तेलुगू संस्कृती ह्याही विषय अंतर्भूत असून त्याच्यासाठी दोन खंड देण्यात आले आहेत (खंड ३व ४ १९५९ १९६२). प्रत्यक्ष मजकुराचे पंधरा खंड असून शेवटचा सोळावा खंड नकाशाचा आणि सूचीचा आहे. या विश्वकोशाचे चौदा खंड प्रसिध्द झाले आहेत (१९५४-८७). अन्य सुनिदर्शनात्म्क सामग्रीबरोबर प्रत्येक खंडात काही चित्रपत्रेही आहेत. तसेच सूची, संदर्भग्रंथ, पारिभाषिक संज्ञा प्रत्येक खंडाच्या अखेरीस देण्यात आल्या आहेत (तेलुगू-इंग्रजी इंग्रजी-तेलुगू).


पंजाबी : भाई कहनसिंग नामा ( १९६१-१९३८) ह्यांचा गुरुशब्द-रत्नाकर मह्यानकोश (४खंड ) ह्या पंजाबी भाषेतील पहिला कोश शीख धर्माशी संबंधित अशा साहित्याला तो वाहिलेला आहे. ह्याची रचना अकारविल्हे असून, धर्माचा वौलनिक अभ्यास करु इच्छिणाऱ्यांना एक मौल्यवान संदर्भग्रंथ म्हणून तो उपयुक्त ठरला आहे. व्यापक समावेशकता, अचूकपणा ही ह्या कोशाची काही लक्षणीय वैशिष्ट्ये. नकाशे, चित्रे, उद्‌धृत ह्यांचा भरपूर वापर ह्या कोशात करण्यात आला आहे. १९३०मध्ये प्रसिध्द झालेल्या ह्या कोशाची परिवर्धित आवृती १९६०साली निघाली. १९७४मध्ये त्याचे पुनमुद्रण करण्यात आले. ‘वंजारा वेदी’  ह्या नावाने ओळखले जाणारे कवी आणि लोकविद्येचे अभ्यासक सोहिंदर सिंग ह्यांनी पंजाबी लोकविद्येचा कोश (पंजाबी लोकधारा विश्वकोश) ह्याती घेतला. त्याचे पहिले ४खंड १९७८ते १९८१  ह्या कालखंडात बाहेर पडले आहेत. पंजाबच्या संपन्न आणि वैविध्यपूर्ण लोकविद्यांची विविध अंगे सादर करण्यात ह्या कोश यशस्वी झाला आहे. पंजाबच्या भाषा विभागाने पंजाबी विश्वकोशाची योजना १९६०च्या सुमारास ह्याती घेतली. एन्साय्‌क्लोपीडिया ब्रिटानिकाच्या धर्तीवर ती साकार केली जात आहे.

बंगाली : बंगालीतील पहिला विश्वकोश रचण्याचा प्रयत्न फेलिक्स कॅरी (१७८६-१८२२) ह्याने केला. अर्वाचीन बंगाली व मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारा पहिला इंग्रज पंडित, कोशकार, व्याकरणकार आणि भाषांतरकार ⇨ विल्यम कॅरी (१७६१-१८३४) ह्याचा फेलिक्स ह्या पुत्र. विद्याह्यारावलि (Vidyaharabali) हे त्याच्या संकल्पित विश्वकोशाचे नाव. दरमह्या४८पृष्ठांचा मजकूर द्यावयाचा, अशा पध्दतीने विद्याह्यारावलीचा ६३८पृष्ठांचा पहिला भाग ‘व्यवच्छेदविद्या’ ( हे फेलिक्सने शारीर-अनॅटमी-ह्या विषयाला दिलेले नाव) ऑक्टोबर १८१९ते नोव्हेंबर १८२०  ह्या कालावधीत प्रसिध्द झाला. ह्या पहिल्या भागातील ४९पृष्ठे बंगालीतील वैज्ञानिक संज्ञाच्या सुचीसाठी देण्यात आलेली आहेत. एकोणिसाव्या शतकाच्या आरंभीची बंगाली गद्याची स्थिती वैज्ञानिक आशय मांडण्यासारखी नव्हती,  ह्या वस्तुस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही सूची महत्वाची ठरते. विद्याह्यारावलीच्या दुसऱ्या भागाचे नाव ‘स्मृतिशास्त्र’ असे होते आणि न्यायशास्त्र ह्या त्याचा विषय होता परंतु ह्या भाग अपूर्णच राहिला.

मह्याराजा कालीकृष्ण देवबह्याद्‌दूर (१८०८-७४) ह्यांचा संक्षिप्त सद्विद्यावलि (१८३३) ह्या लह्यानसा विश्वकोश म्हणजे बंगालीतील विश्वकोशरचनेचा दुसरा प्रयत्न. विविध विषयांवरील माहिती त्यात थोडक्यात दिली आहे. १८४६मध्ये कृष्णमोहन बॅनर्जी (१८१३-१८८५) ह्यांनी विद्याकल्पद्रुम ह्या विश्वकोश तयार केला. भूमिती, भूगोल, इतिह्यास, नीतितत्वे, मनोविकास इ. विषयांचा परामर्श त्यात घेतलेला आहे. भारतकोश (३खंड-१८८२, १८८६, १८९२) ह्या अकारविल्हे रचना असलेला बंगालीतील पहिला विश्वकोश. राजकृष्ण रे (१८४९-१८९४) आणि शरचंद्र देव हे त्याचे संपादक होते. तथापि ह्या विश्वकोशाला वाचकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. रंगलाल मुखोपाध्याय आणि वैलोक्यनाथ मुखोपाध्याय (१८४७-१९१९) ह्या  दोन भावांनी विश्वकोश ह्याच नावाच्या एका विश्वकोशाचा प्रकल्प ह्याती घेतला. त्याचे २२खंड आहेत. १८८७साली त्यांनी ह्या विश्वकोशाचा पहिला खंड संपादून प्रसिध्द केला. त्यानंतरच्या खंडांचे संपादन नागेंद्रनथ बसू (१८६६-१९३८) ह्यांनी केले. बंगाली भाषिकांत अतिशय लोकप्रिय असलेला ह्या विश्वकोश १९११साली पूर्ण झाला. ह्या विश्वकोशास अनेक नामवंत बंगाली विद्वानांचे सहकार्य लाभले. ह्या विश्वकोशाचे हिंदी रुपांतरही झाले आहे. अमूल्यचरण विद्याभूषण (१८७९-१९४०) ह्यांनी शिक्षण ह्या विषयाला वाहिलेला शिक्षाकोश १९०७पासून प्रसिध्द करण्यास आरंभ केला होता. १९३४साली बंगीय मह्याकोशाची २२खंडी योजना त्यांनी ह्याती घेतली. अर्थशास्त्र, इतिह्यास, धर्म, तत्वज्ञान, मानवशास्त्र, पुरातत्वविद्या, व्यापार, भाषाशास्त्र, साहित्य, वैद्यक, विविध निसर्गविज्ञाने इ. विषय त्यांत अंतर्भूत होते. बंगाल आणि भारत ह्यांच्यासंबंधी माहिती देण्यावर त्यांचा विशेष भर होता. मात्र अमूल्यचरण ह्या विश्वकोशाचे केवळ दोन खंड प्रसिध्द करु शकले. त्यांच्या मृत्यूमुळे ह्या प्रकल्प अपूर्ण राहिला.


जोगेंद्रनाथगुप्ता (१८८२-१९६५) ह्यांनी १९३३पासून शिशुभारती ह्या लह्यान मुलांचा विश्वकोश प्रसिध्द करण्यास आरंभ केला. ह्याचे दह्या खंड आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात भारताच्या स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित अशा विषयांची माहिती देणारा शिशुभारतीचा अकरावा खंड काढण्यात आला.

‘बंगीय साहित्य परिषदे’ ने १९५९पासून पाच खंडाच्या भारतकोशाचे काम सुरू केले. त्यात जगातील विविध देश आणि त्यांची संस्कृती ह्यांची-विशेषत: भारताची-माहिती देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्याचप्रमाणे सर्वसामान्य सुशिक्षित बंगाली माणसाच्या कुतूहलाच्या विविध विषयांचाही परामर्श घेण्याचा हेतू होता. क्षितींद्रनारायण भट्टाचार्य आणि पूरणचंद्र चक्रवर्ती ह्यांच्या छोटादेर विश्वकोश (Chhotader Vishwakosh)  ह्या पाच खंडाच्या बालविश्वकोशाचे प्रकाशन १९६७पासून सुरू झाले. सुधांशु-शंखर भट्टाचार्य आणिनानीगोपाल ऐक (Aich)  ह्यांच्या आधुनिक विश्वकोशाचे (संकल्पित खंड २५) ४खंड १९७८पासून प्रसिध्द झाले आहेत.

मलयाळम् :१९३६साली आर्. ईश्वर पिळ्‌ळै (१८५४-१९४०) ह्यांनी समस्त विज्ञानग्रंथावलि ह्या आपल्या विश्वकोशाचा पहिला खंड प्रसिध्द केला. ह्या विश्वकोशाची रचना अकारविल्हे करण्यात आलेली होती. ही योजना दह्या खंडाची होती. पण एका खंडानंतर हे काम थांबले. मॅथ्यू एम्. कुझिवेली ह्यांचा विज्ञानम् मलयाळम् (८ खंड, १९५७-७३) ह्या मात्र मलयाळम् भाषेतील विश्वकोशाचा पूर्ण झालेला पहिला प्रकल्प म्हणता येईल. त्यात विश्व, पृथ्वी, ऊर्जा असे ज्ञानविज्ञानाचे विविध भाग करून त्यांच्यासंबंधीची माहिती दिली आहे. मलयाळम् डेस्क एन्साय्‌क्लोपीडिआ ब्रिटानिकाच्या धर्तीवर तयार करण्यात आलेला मलयाळम् विश्वकोश होय. ह्याचे दह्या खंड १९७०-७२  ह्या कालखंडात प्रसिध्द झाले. 

‘इ स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ एन्साय्‌क्लोपीडिआ पब्लिकेशन्स’  ह्या केरळ शासनाने निर्मिलेल्या स्वायत्त संस्थेने सर्वविज्ञानकोशम् ह्या विश्वकोशाचे कार्य ह्याती घेतले आहे. वीस खंडांच्या ह्या संकल्पित विश्वकोशाच्या प्रमुख संपादक पदाची धुरा के. एम्. जॉर्ज ह्यांनी १९६९साली घेतली. १९७५साली वेल्लायनी अर्जुनन् हे ह्या विश्वकोशाचे प्रमुख संपादक झाले. मानवी ज्ञानाचे ४४वर्गामध्ये वर्गीकरण करून तत्संबंधित सु. ३५,०००माहितीपूर्ण नोंदी ह्या विश्वकोशात यावयाच्या आहेत. भारत आणि केरळ ह्यांच्या संबंधीच्या माहितीला विशेष स्थान देण्यात आले आहे. १९७२मध्ये ह्या विश्वकोशाचा पहिला खंड प्रसिध्द झाला. त्यानंतर पुंढील सह्या खंड प्रकाशित झाले. ह्या विश्वकोशाला उत्तम संदर्भग्रंथ म्हणून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.

संस्कृत : ज्याला आधुनिक अर्थाने ‘विश्वकोश’ म्हणता येईल, अशा प्रकारची संस्कृतातील ग्रंथरचना भारतात इंग्रजांची राजवट येण्यापूर्वीच्या काळात दिसत नाही. तथापि भारतातील सर्वांत प्राचीन अशा वैदिक साहित्यातून तसेच अन्य संस्कृत साहित्यातून मिळणाऱ्या विविध विषयांवरील माहितीचा विचार केला, तर एका अर्थाने ह्या साहित्याला एक ज्ञानकोशीय अंगही होते. एवढे म्हणता येणे शक्य आहे. ‘वेद’ ह्या शब्दाचाच मूळ अर्थ ‘ज्ञान’ किंवा ‘विद्या’ असा आहे. ह्या व्यापक अर्थाने वेदकाळातल्या विद्या ‘वेद’ म्हणून ओळखल्या जात असत. उदा., आयुर्वेद, इतिह्यासवेद, गांधर्ववेद इत्यादी. ह्या व्यापक अर्थ कालांतराने नाहीसा होऊन ॠग्वेद, यजुर्वेदादी चार वेदांपुरता तो मर्यादित झाला. वेदांच्या बौध्दिक चिंतनातून वैदिकांनी बौध्दिक ज्ञानाचा पाया घातला आणि त्यातून शिक्षा, निरूत्क, व्याकरण इ. वेदांगे निर्माण झाली. वैदिकांच्या ज्ञानशाखांचा विस्तार होऊ लागल्यावर ज्ञानाच्या विविध विषयांत वैयाकरण, नैरूक्त असे तज्ज्ञ निर्माण होऊ लागले. नाट्यशास्त्र, काव्यशास्त्र, वास्तुशास्त्र, अर्थशास्त्र अशा विद्याही उदयास आल्या. अशा विद्यांवरील प्राचीन संस्कृत ग्रंथ- उदा., भरताचे ⇨नाट्यशास्त्र (ह्याचा काही भाग इ. स. पू. सह्याव्या शतकाइतका प्राचीन असण्याचा संभव आहे)-हे त्या त्या विषयाच्या ज्ञानक्षेत्रला वाहिलेले प्राचीन विश्वकोश म्हणता येतील. ⇨ वराहमिहिराच्या (सह्यावे शतक) बृहत्‌संहितेत फलज्योतिषाबरोबरच अन्य माहितीही विपुल आहे.

संस्कृतातील काही पुराणे व उपपुराणे विश्वकोशात्मक वाटावीत अशी आहेत. राजधर्म, व्याकरण, छंद:शास्त्र, काव्यशास्त्र, वृक्षायुर्वेद, शिल्पशास्त्र, नृत्य, संगीत, वास्तुशास्त्र, गणित इ. अनेक विषयांची चर्चा ह्यांत आढळते.

सोमेश्वरदेवाचा (बारावे शतक) मानसोल्लास किंवा अमिलापितार्थ-चिंतामणी ह्यांचा निर्देश स्वत: सोमेश्वरदेवानेच ‘जगदाचार्यपुस्तक’असा केला आहे. जगाला ज्ञान देण्यासाठी आचार्यवृत्तीने लिहिलेले पुस्तक असा त्याचा अर्थ दिसतो. ह्या ग्रंथात देवता, राज्यव्यवस्था, क्रीडा, संगीत, ललित कला अशा अनेक विषयांचा परामर्श घण्यात आला आहे.

मह्याराष्ट्रातील धर्मसुधारणावादी थोर संस्कृत पंडित स्वामी ⇨ केवलानंदसररस्वती (पंडित नारायणशास्त्री मराठे) ह्यांनी मीमांसाकोश (७ खंड, १९५२-६६) संपादिला असून तो वाई येथील प्राज्ञपाठशाळामंडळाने प्रकाशित केला आहे. प्राज्ञपाठशाळामंडळातर्फे धर्मंकोशाचेही काम वाई येथे चालू आहे. हिंदू धर्म ह्या परिवर्तशील असून धर्मपरिवर्तनाच्या विचारसरणीस पोषक असे हिंदू धर्मशास्त्रचे स्वरूप मांडले पाहिजे, अशी भूमिका घेऊन पं. नारायणशास्त्री मराठे ह्यांनी १९२५ साली धर्मकोशाच्या कामास आरंभ केला. १९३१ साली पं. नारायणशास्त्री मराठे ह्यांनी संन्यास घेतल्यानंतर त्यांचे शिष्य लक्ष्मणशास्त्री जोशी ह्यांनी ह्या कोशाचे काम पुढे नेले आणि त्यासाठी ‘धर्मकोशमंडळ’ ही संस्था स्थापन केली (१९३४). ह्या धर्मकोशाची संकल्पित कांडे एकूण ११ असून त्यांची नावे अशी : (१) व्यवह्यारकाण्ड, (२) उपनिषत्काण्ड, (३) संस्कारकाण्ड, (४) राजनीतिकाण्ड, (५) वर्णाश्रमधर्मकाण्ड, (६) शुध्दिश्राध्दकाण्ड, (७) प्रायश्चित्तकाण्ड,(८) शांतिकाण्ड,(९) पुराणागमधर्मकाण्ड, (१०) समयकाण्ड आणि (११) मोक्षकाण्ड. ह्यांपैकी पहिली चार काण्डे आणि वर्णाश्रमधर्म ह्या पाचव्या काण्डाचा पहिला भाग १९३७ ते १९८८ ह्या कालखंडात प्रसिध्द झाला आहे.

हिंदी : बंगाली भाषेत विश्वकोश ह्या नावाचाच, बावीस खंडी विश्वकोश १९११मध्ये पूर्ण केल्यानंतर त्या विश्वकोशाचे संपादक नागेंद्रनाथ बसू ह्यांनी आपल्या बंगाली विश्वकोशाच्या धर्तीवर हिंदी भाषेत विश्वकोशरचना करण्याचे काम काही हिंदी भाषिक विद्वानांच्या मदतीने  ह्याती घेऊन ते तडीस नेले. हिंदी भाषेतला ह्या पहिला विश्वकोश.

हिंदी विश्वकोशनिर्मितीच्या ह्या पहिल्यावहिल्या प्रयत्नात काही त्रुटी होत्या. हिंदी भाषिकांच्या द्दष्टीने आवश्यक अशा काही नोंदी या विश्वकोशात नव्हत्या केवळ इंग्रजी शिक्षण घेतलेल्या वाचकांच्या द्दष्टीनेच काही नोंदी त्यात अंतर्भूत केलेल्या होत्या. इंग्रजी विश्वकोशांचा आदर्श समोर ठेवल्याने असे झाले असावे. १९८६मध्ये ह्या विश्वकोशाची एक सुधारित आवृती काढण्यात आली.

 

ह्याराष्ट्रीय ज्ञानकोशकार डॉ. केतकर ह्यांनी हिंदी ज्ञानकोशाचे काम ह्याती घेऊन त्याचा एक खंड १९३५पर्यंत प्रसिध्द केला. वाराणसी येथील नागरीप्रचारिणी सभेने १९५७मध्ये हिंदी विश्वकोशाचे काम सुरू केले. ह्या विश्वकोशापुढे एन्साय्‌क्लो पीडिआ त्रिटानिकाचा आदर्श होता. धीरेंद्र वर्मा हे ह्या विश्वकोशाचे प्रमुख संपादक. बारा खंडाच्या ह्या विश्वकोशाचा पहिला खंड १९६०मध्ये, तर बारावा खंड १९७०मध्ये प्रकाशित झाला. पहिल्या खंडाची नवीन संशोधित व परिवर्धित आवृत्ती १९७३मध्ये प्रसिध्द झाली.

हिंदी भाषेतील अन्य विश्वकोशात धीरेंद्र वर्मा आणि ब्रजेश्‍वर वर्मा संपादित हिंदी साहित्यकोश (२खंड, १९६४) तसेच कृष्ण्वल्लभ द्विवेदीसंपादित हिंदी विश्वभारती (१०खंड, १९७७), नगेंद्र- संपादित भारतीय साहित्यकोश ह्यांचा समावेश होतो. बिह्यार हिंदी ग्रंथ अकादमीने १९७३साली प्रसिध्द केलेला भारतीय साहित्यशास्त्रकोशही उल्लेखनीय आहे. हिंदी साहित्यकोशाच्या पहिल्या खंडात साहित्याशी निगडित अशा संकल्पना, वाङ्‌मयीन चळवळी ह्यांची माहिती देण्यात आली आहे, तर दुसरा खंड ह्या हिंदी साहित्याला वाहिलेला आहे. हिंदी विश्वभारतीय विज्ञान आणि मानव्यविद्या ह्यांच्याशी संबंधित नोंदी आहेत.

कुलकर्णी  अ. र.


 मराठी विश्वकोश परंपरा : विश्वकोशनिर्मितीची परंपरा मराठीत अव्वल इंग्रजीच्या काळापासून रूजत होती. ज्ञानसंपादन व ज्ञानप्रसार ही एकोणिसाव्या शतकातील साहित्यनिर्मितीमागील एक महत्वाची प्रेरणा होती, हे ह्याचे एक कारण होय. इंग्रजीतील ‘एन्साय्‌क्लोपीडिआ’ सारखा ग्रंथ मराठीत झाल्याखेरीज तिला पूर्णता येणार नाही, अशा आशयाचे विचार अव्वल इंग्रजी कालखंडातील एक प्रसिध्द लेखक ⇨ गोविंद नारायण माडगावकर (१८१५-६५) ह्यांनी १८५६ साली मुंबईत भरलेल्या ‘मराठी ज्ञानप्रसारक सभे’ च्या एका बैठकीत काढले होते. ⇨ कृष्णशास्त्री चिपळूणकर (१८२४-७८) ह्यांनी तयार केलेला अनेकविद्या-मूलतत्व-संग्रह १८६१साली प्रसिध्द झाला. त्यात ‘यंत्रशास्त्र, रसायनशास्त्र, दर्शनानुशासन, ज्योतिष, प्राणिधर्मविषयकशास्त्र, शारीरक’ इ. विषयांतील ‘मुख्य मुख्य गोष्टींचे संक्षेपाने व सोप्या रीतीने वर्णन केले आहे.’ शास्त्रीय विषय मराठीत मांडता येऊ शकतात, हेही ह्या ग्रंथाच्या रूपाने कृष्णशास्त्री ह्यांनी दाखवून दिले. तथापि शास्त्रीय विषयांचे मराठीत विवेचन करताना संस्कृत शब्दांचा आधार अटळपणे घ्यावा लागला, हेही कृष्णशास्त्रांनी स्पष्ट केले आहे.१९०६ व १९०८ साली पुणे येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनांत मराठीतील विश्वकोशनिर्मितीच्या विषयाची चर्चा झाली आणि त्यावेळी ‘‘एन्साय्‌क्लोपीडिआ’ ह्या इंग्रजी शब्दाला समानार्थक म्हणून ‘विश्वकोश’ ही संज्ञा वापरली गेली. मराठीत ‘विश्वकोश’ तयार झाला पाहिजे, अशी अपेक्षाही ⇨ विष्णु गोविंद विजापूरकर (१८६३-१९२६) व इतर काहींनी व्यत्क केली होती. १८६८ च्या एप्रिलमध्ये बडोद्याचे रावजी केशव सांबारे ह्यांनी विद्याकल्पतरू नावाचे एक मासिक सुरू केले. त्यात ‘नाना प्रकारच्या विद्या, कला, कौशल्य, युक्ती व तत्संबंधी मोठमोठे कारखाने , तशीच कित्येक प्रकारची हुन्नरे, औषधे व त्यांची क्रिया व गृहसंबंधी सर्व व्यवस्था ह्यांचा विचार करून प्रत्येक वस्तूचे अनुभवसिद्ध, निरूपण’ करण्याचा त्यांचा उद्देश होता. ह्या मासिकाला ‘मराठी सायक्लोपीडिआ’ असा इंग्रजी मथळाही असे. मार्च १८७१ पर्यंत ह्या मासिकाचे जे अंक निघाले, त्यात अक्षरानुक्रमे ‘उन्माद’ ह्या विषयापर्यंत ५७६ पानांचा मजकूर अंतर्भूत होता. १८७८ च्या सप्टेंबर रत्नागिरी येथील जनार्दन हरी आठल्ये ह्यांनी विद्यामाला हे मासिक काढले. ह्या मासिकाचा उद्देशही शब्दश: विद्याकल्पतरूसारखाच होता. फक्त ‘विचार करून …’ च्या पुढे ‘प्रत्येक वस्तूचे अन्योन्य पार्श्वस्थित स्पष्ट निरूपण’ असे शब्द होते. ह्या मासिकाला ‘ऑर मराठी सायक्लोपीडिआ’ असा इंग्रजी पर्यायी मथळाही दिलेला होता. ह्या उपक्रम सप्टेंबर १८७९ पर्यंत टिकला आणि अक्षरानुक्रमे ‘अनुराधा’ पर्यंतचा मजकूर ह्या मासिकाच्या अंकांत समाविष्ट झाला. ह्या नियतकालिकाला ‘ए मन्थली पँफ्लेट’ असेही नाव दिलेले आहे. दत्तात्रय गोविंद सडेकर (?-मृ. १९४१) ह्यांनी प्रसंग रत्नावली किंवा बुद्धिवैभव (१८९६) ह्या नावाचा एक छोटासा ज्ञानकोश तयार केला होता. त्यात ‘वैद्यक, ज्योतिष, शब्द, वाङ्‌मय, कविता’ इ. विषय अंतर्भूत होते. ‘शास्त्रे, विद्या, कला, कौशल्ये इ. सर्व विषयांचे संक्षेपत: प्रश्‍नोत्तररूपाने वर्णन’ करणारा सारसंग्रह नावाचा एक ग्रंथही १८३१ साली प्रसिध्द झाला होता. बाळकृष्ण बापू आचार्य ह्यांनी मोरो विनायक शिंगणे ह्यांच्या साह्याय्याने माझे प्रिय पुस्तक अथवा व्यवह्यारदर्पण (१८९३) ह्या व्यवह्यारपयोगी असा ‘छोटा ज्ञानकोश’ तयार केला होता. विश्वकोशाची कल्पना मराठीत हळूहळू कशी रूजत चालली होती, हे ह्या प्रयत्नांवरून दिसून येईल. तथापि मराठीतील विश्वकोशरचनेला खऱ्या अर्थाने पायाभूत म्हणता येईल, अशी विश्वकोशनिर्मिती करण्याचा महत्वपूर्ण प्रयत्न केला श्रीधर व्यंकटेश केतकर ह्यांनी. १८९७ च्या सुमारास एन्साय्‌क्लोपीडिया त्रिटानिका त्यांच्या पाहण्यात आला आणि अशा प्रकारचा ग्रंथ मराठीत असला पाहिजे, असे त्यांना वाटले. पुढे अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठात त्यांना अनेक विश्वकोश संदर्भासाठी वापरावे लागले. आंध्रमध्ये तेलुगू विश्वकोशाचे काम सुरू करणारे डॉ. अव्यन्त लक्ष्मीपती ह्यांच्याशी त्यांचा परिचय १९१४ साली झाला. आंध्रविज्ञानसर्वस्वम्‌चे संपादक के. व्ही. लक्ष्मणराव हे असले, तरी सर्व व्यवस्था डॉ. लक्ष्मीपती पाहत असल्यामुळे त्यांच्यामार्फत आंध्रविज्ञानसर्वस्वम्‌ची माहिती केतकरांना जवळून समजली. ह्या सर्व घटनांच्या प्रभावातून केतकरांनी मह्याराष्ट्रीय ज्ञानकोशाचा आरंभ केला. विश्वकोशासाठी त्यांनी ‘ज्ञानकोश’ ह्या शब्द वापरला. केतकरांच्या ह्या ज्ञानकोशाचे एकूण २३ खंड असून त्यांतील पहिले एक ते पाच हे खंड वा विभाग ‘प्रस्तावना खंड’ आहेत. ते असे : (१) हिंदुस्थान आणि जग, (२) वेदविद्या, (३) बुद्धपूर्व जग, (४) बुद्धोत्तर जग, (५) विज्ञानेतिह्यास. नंतरचे ६ ते २१ हे सोळा खंड ‘शरीरखंड’ आहेत. २२ वा खंड ह्या सूचीचा असून, २३ वा खंड ह्या ‘हिंदुस्थान खंड’ आहे. ज्ञानकोशाच्या शरीरखंडाची रचना अकारविल्हे करण्यात आलेली आहे. ज्ञानकोशाचा पहिला खंड (हिंदुस्थान आणि जग) ह्या १९२० साली, तर २३ वा ‘हिंदुस्थान खंड’ ह्या १९२७ साली प्रसिध्द झालेला आहे. त्याचा २२ वा सूचिखंड मात्र १९२९ साली प्रसिध्द झालेला आहे.

डॉ. केतकर ह्यांची अशी धारणा होती, की मह्याराष्ट्रीय ज्ञानकोश ह्या केवळ ज्ञानसंग्रहच नव्हे, तर मह्याराष्ट्राच्या भाषिक, सांस्कृतिक, आर्थिक व राजकीय उत्थापनाचे हे एक प्रधान साधन आहे. मराठी माणसांना बहुश्रुत करावे, त्यांच्या ज्ञानाची कक्षा विस्तारावी, त्यांच्या विचारांचे क्षेत्र अधिक व्यापक व्ह्यावे आणि जगातील प्रगत लोकांच्या बरोबरीने त्यांना बसता यावे, ही डॉ. केतकरांची ज्ञानकोशरचनेमागील आकांक्षा होती. मात्र अशा ज्ञानकोशाचे काम यूरोपीय ज्ञानकोशांचे केवळ भाषांतर करून भागणार नाही, तर मह्याराष्ट्रीय वाचकांच्या गरजा लक्षात घऊन आणि मह्याराष्ट्रीय द्दष्टी ठेवून तो झाला पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती.

विश्वकोशाची रचना पूर्णत: वस्तुनिष्ठ पद्धतीनेकेली जाणे आवश्यक मानले जात असले, तरी डॉ. केतकरांच्या व्यक्तिमत्वाचा, त्यांच्या विचारांचा, मतांचा प्रभाव त्यांच्या ज्ञानकोशावर दिसून येतो. त्यांचेस्वत:चे संशोधनही त्यांनी ज्ञानकोशात मांडले आहे. केतकरांच्या ज्ञानकोशातील पहिले पाच (प्रस्तावना) खंड ह्या दृष्टीने पाहण्यासारखे आहेत. ‘हिंदुस्थान आणि जग’  ह्या पहिल्या खंडात केतकरांनी आपल्या जुन्या ग्रंथांच्या आणि लेखांच्या जोडीने स्वत: केलेल्या नव्या संकलनांची भर घातली. एकीकडे भारतीय जनतेचे स्वत्व दाखवीत असतानाच जग घडविणाऱ्या शक्तींचा तिला परिचय करून द्यावा आणि हे संदर्भ मनात वागवून तिला आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, अशी त्यांची भूमिका होती. ‘वेदविद्या’ आणि ‘बुद्धपूर्व जग’  ह्या अनुक्रमे दुसऱ्या-तिसऱ्या खंडातही केतकरांनी आपले स्वत:चे संशांधन मोठ्या प्रमाणावर अंतर्भूत केले आहे. ‘बुद्धोत्तर जग’ आणि ‘विज्ञानेतिह्यास’  ह्यांना वाहिलेले ज्ञानकोशाचे प्रस्तावना खंड (अनुक्रमे चौथा व पाचवा) तिसऱ्या खंडाच्या आधी, म्हणजे १९२३साली प्रसिध्द झाले होते. ह्या दोन्ही खंडात केलेल्या माहितीच्या संकलनातून बुद्धापासून पुढे इंग्रजी सत्तेच्या आरंभापर्यंतचा व्यापक इतिह्यास वाचकांसमोर केतकरांनी उभा  केला आहे. विज्ञानेतिह्यासात ज्योतिषशास्त्र, भारतीय व पाश्चात्य वैद्यक, रसायनशास्त्र, पदार्थविज्ञान, गणित, भूशास्त्रे इ. शास्त्रांचा इतिह्यास दिला आहे. ‘वेदविद्या व तदुत्तरशास्त्रे’ -उदा., छंद, संगीत, भाषाशास्त्रे, निरूक्त, व्याकरण, मीमांसा-ह्यांचाही परामर्श घेतला आहे. डॉ. केतकरांच्या ज्ञानकोशास चित्रे, नकाशे इत्यादींची सुनिदर्शनात्मक बाजू आहे परंतु बहुधा पुरेशा आर्थिक बळाच्या अभावी सुनिदर्शनाचेप्रमाण कमी आहे.

ज्ञानकोशाचे इतर प्रादेशिक भाषांतूनही भाषांतर करण्याचा केतकरांनी प्रयत्न केला. गुजरातीत त्याचे दोन भाषांतरित भाग प्रकाशित झाले (१९२९ १९३५-३७च्या दरम्यान). परंतु आर्थिक व अन्य अडचणींमुळे हे काम त्यांना सोडून द्यावे लागले. हिंदी ज्ञानकोशाचा एक भाग प्रकाशित झाला (१९३५). तमिळ, कन्नड भाषांतही ज्ञानकोश तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न होता पण त्याला यश आले नाही. ज्ञानकोशाच्या पहिल्या पाच प्रस्तावना खंडांचे यथामूल पुनर्मुद्रण करण्याची योजना मुंबईच्या डॉ. केतकर स्मृतिमंडळाने आखली आहे. त्यानुसार ‘हिंदुस्थान आणि जग’ या पहिल्या खंडाचे पुनर्मुद्रण झाले आहे (१९७६).

ह्याराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या आवृत्या, पुनर्मुद्रण, पुरवणी-खंड हे तर निघू शकले नाहीतच पण मराठी विश्वकोशासारखे पुढले सर्व-समावेशक, व्यापक विश्वकोशकार्य उभे रह्यावयास पुढे जवळजवळ ३५ वर्षांचा काळ जावा लागला. परंतु या दरम्यान कमी-अधिक महत्वाचे, लह्यान-मोठे विश्वकोश निर्माण झाले मात्र मह्याराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या मानाने त्यांचा आवाका मर्यादित होता आणि त्यांचा वव्हंशी आधार मह्याराष्ट्रीय ज्ञानकोशच होता. ह्या विश्वकोशांपैकी काही असे : ⇨ ग. रं. भिडे (१९०९-८१) यांचा सचित्र व्यावह्यारिक ज्ञानकोश (५ भाग, १९३५-१९४०). ह्या विश्वकोशाच्या पाचव्या भागाला दोन पुरवण्याही जोडल्या आहेत. ‘अर्वाचीन शास्त्रीय शोधांमुळे अत्यंत व्यापक झालेल्या सध्याच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या हरएक गोष्टींसंबंधीच्या व्यवह्यारपयोगी ज्ञानाचा संग्रह’ करण्याच्या हेतूने भिडे ह्यांनी आपल्या कोशाची रचना केली. ⇨ य. रा. दाते (१८९१-१९७३) यांनी चि. ग. कर्वे (१८९३-१९६०) यांच्या साह्याय्याने तयार केलेला सचित्र सुलभ विश्वकोश (१९४९-५१) सह्या भागांत प्रसिध्द केला. ह्या एक प्रकाराने लघु-ज्ञानकोशच आहे. ह्या कोश निव्वळ मह्याराष्ट्रीय ज्ञानकोशाची छोटी आवृती नसून, यातील लेखांचे धोरण आणि आखणी-मांडणी अगदी वेगळ्या प्रकारची आहे. या कोशात जगातील सर्व विषयांची, व्यवह्यारांची मांडणी सुबोध आणि थोडक्यात सापडेल, असे संपादकांनी सांगितले आहे. यात सु. १३,००० नोंदी आहेत. व्यावह्यारिक ज्ञानकोशकार ग. रं. भिडे यांनी अभिनव मराठी ज्ञानकोशाचे पाच भाग अनेकांच्या सह्याकर्याने तयार करून १९६३ ते १९७९ या काळात प्रसिध्द केले. व्यावह्यारिक ज्ञानकोशाच्या व्यापक बैठकीवर आधारित सुधारून वाढवलेली आवृती म्हणजेच प्रस्तुत अभिनव मराठी ज्ञानकोश असे संपादकांनो सांगितले आहे. ग. रं. भिडे यांनीच बालकोश करण्याची योजनाही आखली होती पण १९४२ मध्ये त्याचा एकच भाग प्रसिध्द झाला आणि ती योजना स्थगित झाली.


मह्याराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री ⇨ यशवंतराव चव्ह्याण ह्यांनी राज्यकारभारासंबंधीचे मूलभतू धोरण सूचित करणारी जी काही सूत्रे सांगितली होती, त्यांनुसार मराठी भाषा व साहित्य ह्यांच्या अभिवृद्धीसाठी १९ नोव्हेंबर १९६० रोजी अस्तित्वात आलेल्या ⇨ मह्याराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळ ह्या मंडळातर्फे मराठी विश्वकोशाची योजना वाई (जि. सातारा) येथे कार्यान्वित झाली (जाने. १९६२). मह्याराष्ट्रातील एक थोर विचारवंत आणि संस्कृत पंडित तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी (१९०१-१९९४) ह्यांची उपर्युक्त मंडळाचे अध्यक्ष आणि मराठी विश्वकोशाचे प्रमुख संपादक म्हणून नियुक्ती करण्यात आली. १९८० साली मह्याराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे विभाजन करण्यात आले आणि मराठी विश्वकोशाच्या प्रकल्पासाठी ⇨ मह्याराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ हे स्वतंत्र मंडळ स्थापन करण्यात आले. ह्या मंडळाच्या अध्यक्षपदी तर्कतीर्थ   लक्ष्मणशास्त्री जोशी ह्यांची नियुक्ती करण्यात आली. ह्या प्रकल्पाच्या अगदी आरंभापासून ते २७ मे १९९४ रोजी त्यांचे निधन होईपर्यंत ते मराठी विश्वकोशाचे प्रमुख संपादक होते. मराठी विश्वकोशाचे पहिले पंधरा खंड (१९७६-९५) त्यांच्या प्रमुख संपादकत्वाखाली तयार झाले. त्यांच्या नंतर उपर्युक्त मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष आणि मराठी विश्वकोशाचे प्रमुख संपादक म्हणून प्रा. मे. पु. रेगे ह्यांची नियुक्ती करण्यात आली.

 मानव्यविद्या तसेच विज्ञान व तंत्रविद्या यांतील सर्व विषयांचे ज्ञान एका व्यापक योजनेखाली अकारविल्हे संकलित करण्याचा हेतू मराठी विश्वकोशाच्या प्रकल्पामागे आहे. ह्या विश्वकोश सर्वसामान्य शिक्षितांसाठी तसेच मह्याविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या किंवा त्या पातळीच्या वाचकांसाठी संदर्भग्रंथ म्हणून उपयुक्त ठरावा, अशी अपेक्षा मंडळाने ठेवलेली आहे. मराठी विश्वकोशाची मूळची २०खंडाची योजना आता थोडी बदलण्यात आली आहे. मूळ योजनेत पहिले १७खंड प्रत्यक्ष माहितीचे म्हणजे ‘शरीरखंड’ होते. आता पहिले २०खंड हे शरीरखंड असतील परिभाषा खंड, सूचिखंड आणि नकाशा खंड असे उर्वरित तीन खंड धरून एकंदर योजना २३खंडांची करण्यात आली आहे. मराठी विश्वकोशात वापरलेल्या पारिभाषिक व तांत्रिक शब्दांचा अकारविल्हे रचलेला मराठी-इंग्रजी व इंग्रजी-मराठी असा दुहेरी संग्रह मराठी विश्वकोशाचा १८वा खंड म्हणून १९७३साली प्रसिध्द करण्यात आला. ह्या परिभाषा संग्रह्याची सुधारित आवृत्ती यथावकाश प्रसिध्द करण्याची विश्वकोश निर्मिती मंडळाची योजना आहे. मुलांसाठी कुमार विश्वकोश तयार करण्याचीही ह्या मंडळाची योजना असून ह्या विश्वकोश पुस्तकरूपाने, तसेच बहुमाध्यम तंत्राने (मल्टिमिडिया) तयार करण्यात येणार आहे. पुस्तकरूपाने निघणारा कुमार विश्वकोश ‘ऑक्सफर्ड यूनिव्हर्सिटी प्रेसने’ प्रकाशित केलेल्या ऑक्सफर्ड ज्यूनिअर एन्साय्‌क्लोपीडिआच्या धर्तीवर , एकेका विशिष्ट विषयासाठी वा विषयगटासाठी एकेक खंड’ अशा पद्धतीने १२खंडांत प्रसिध्द करण्याची योजना आहे. अशा प्रत्येक खंडातील नोंदींची मांडणी अकारविल्हे असेल.

 

⇨ पंडित मह्यादेवशास्त्री जोशी (१९०६-१९९२) यांच्या संपादकत्वाखाली भारतीय संस्कृतिकोशाचा दह्या खंडीय प्रकल्प पूर्ण झाला (१९६२-१९७९). या कोशाचा उद्देश देशी भाषा आणि इंग्रजी इ. परदेशी भाषा ह्यांतील भारतीय संस्कृतिविषयक ग्रंथसंपत्तीचे आलोडन करून मह्याराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या धर्तीवर भारतीय संस्कृतिविषयी व्यापक आणि तपशीलवार कोश तयार करणे ह्या होता. भारताच्या विविध सांस्कृतिक परंपरांचे, प्रवाह्यांचे आणि आविष्कारांचे साररूप पण सर्वांगीण दर्शन ह्या कोशात घडवण्याची भूमिका आहे. ह्या कोशाची रचना अकारविल्हे केलेली आहे. आंतरभारतीय दृष्टिकोन व सांस्कृतिक सामंजस्याची भूमिका हे मह्यादेवशास्त्र्यांच्या भारतीय संस्कृतिकोशाचे एक लक्षणीय वैशिष्ट्य होय. त्याचे हिंदी भाषांतरही झाले आहे.

‘भारतीय संस्कृतिकोश मंडळा’ने कुमारांसाठी मुलांचा संस्कृतिकोश ह्या कुमारांना सहजपणे समजेल व त्यांच्या ज्ञानात भर टाकील असा कोशही चार खंडात पूर्ण केला आहे (१९८४-८८). ‘आसेतू हिमाचल असा खंडप्राय भारत, त्याचा इतिह्यास, त्याचा भूगोल त्यातले भिन्न भिन्न भाषी लोक, त्या त्या लोकांनी घडवलेला इतिह्यास, त्यांच्या कल्पना, संकेत आणि सांस्कृतिक बाबी,  ह्यांचा एकत्र परिचय’ कुमारांसाठी घडविणे ह्याह्या कोशाचा हेतू होय.

वरील कोशांखेरीज विशिष्ट विषयांना वाहिलेले कोशही मराठीत तयार करण्यात आले आहेत. त्यांची माहिती थोडक्यात अशी:

चरित्रकोश : निरनिराळया धोरणांनी विविध व्यक्तींची चरित्रे संगृहीत करणाऱ्या मराठीतील चरित्रकोशांत ⇨ रघुनाथ भास्कर गोडबोले (–१८८७) ह्यांचा भारतवर्षीय प्राचीन ऐतिह्यासिक कोश (१८७६) आणि भरतखंडाचा अर्वाचीन कोश (१८८१) हे आद्य उल्लेखनीय कोश होत. ह्या कोशांनी मराठीतील चरित्रकोशांचा पाया घातला. ह्यांपैकी पहिल्या भारतवर्षीय प्राचीन ऐतिह्यासिक कोशात प्राचीन काळातील भारतीय व्यक्ती आणि स्थळे ह्यांचा अंतर्भाव आहे. ‘भरतवर्षात पूर्वी आपणामध्ये जे जे प्रख्यात लोक होऊन गेले त्यांचा, त्यांच्या स्त्रिया, त्यांचे पुत्र, त्यांचा धर्म, त्यांचे देश व राजधान्या, तसेच त्या देशातील नद्या व पर्वत इत्यादिकांसहित….. जो इतिह्यास तो’ यात दिला आहे. भरतखंडाचा अर्वाचीन कोश ह्या ग्रंथात अर्वाचीन काळातील व्यक्ती व स्थळे ह्यांची माहिती दिली आहे. कुरूयुद्ध ही प्राचीन व अर्वाचीन काळांना विभागणारी रेषा होय, असे ते मानतात. ह्या कोशांना ऐतिह्यासिक दृष्टीने संदर्भमूल्य आहेच. यानंतरचे विशेष उल्लेखनीय चरित्रकोशकर्ते म्हणजे व्यासंगी प्राच्यविद्यापंडित ⇨ सिद्धेश्‍वरशास्त्री चित्राव (१८९४-१९८४) ह्यांनी ‘भारतीय चरित्रकोश मंडळा’ची स्थापना करून तिच्यातर्फे भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश (१९३२), भारतवर्षीय मध्ययुगीन चरित्रकोश (१९३७) आणि भारतवर्षीय अर्वाचीन चरित्रकोश (१९४६) असे तीन चरित्रकोश संपादून प्रसिध्द केले. भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोशाचे नवे, परिवर्धित संस्करण दोन खंडात संकल्पित आहे (खंड पहिला, १९६८). भारतवर्षीय प्राचीन  चरित्रकोशाची सुधारलेली परिवर्धित हिंदी आवृत्ती १९६४ साली प्रसिध्द झाली. प्राचीन चरित्रकोशात श्रुती, स्मृती, सूत्रे, वेदांगे, उपनिषदे, पुराणे, तसेच बौद्ध आणि जैन साहित्य यांमध्ये निर्देशिलेल्या व्यक्तींची माहिती देण्यात आलेली आहे.

 

गं. दे. खानोलकर ह्यांचा अर्वाचीन मराठी वाड्मयसेवक (७खंड, १९३१-६७) ह्या चरित्रकोशात, मह्याराष्ट्रात ब्रिटिश अंमल सुरू झाल्यापासून मराठी वाड्मयाची ज्यांनी संस्मरणीय अशी सेवा केली, अशा दिवंगत वाड्मयसेवकांचा व त्यांच्या साहित्याचा परामर्श घेतला आहे. प्रत्येक चरित्राच्या शेवटी संबंधित वाड्मयसेवकांच्या ग्रंथांची सूची, तसेच त्यांच्याविषयी व त्यांच्या वाडमयाविषयी झालेल्या लेखनाची सूची दिली आहे. काही चरित्रे इतर अभ्यासकांकडून लिहवून घेतली आहेत. ह्या चरित्रकोशाची रचना अकारविल्हे असून त्याचे ९खंड संकल्पिण्यात आले होते. तथापि सातव्या खंडानंतर त्याचे काम खंडित झाले.

अनंत लक्ष्मण जोशी ह्यांचा मराठी सारस्वत (२खंड, १९८६ १९९२) ह्या चरित्रकोशात १९८४पर्यंतच्या विद्यामान साहित्यिकांच्या चरित्रात्मक माहितीचा समावेश आहे. मराठीत कोणत्याही विषयावर ज्यांचे किमान एक पुस्तक प्रसिध्द झालेले आहे, अशा सर्व लेखकांची थोडक्यात माहिती देण्याचा जोशी ह्यांनी प्रयत्न केला आहे. मात्र ही माहिती प्रत्येक लेखकाचे काही चरित्रात्मक तपशील व त्याच्या प्रकाशित ग्रंथांचा निर्देश एवढ्यापुरतीच मर्यादित असल्यामुळे ह्या कोशाचे स्वरूप काहीसे सूचीसारखे झाले आहे.


अन्य काही चरित्रकोश असे : (१) संगीत शास्त्रकार व कलावंत यांचा इतिह्यास (१९३५, कर्ता लक्ष्मण दत्तात्रेय जोशी) ह्या संगीतशास्त्रकार, गायक, वादक यांचा सूचीसह वर्गवारीने तयार केलेला चरित्रकोश आहे. (२) शास्त्रज्ञांचा चरित्रकोश (१९६८, प. न. जोशी). ह्यात प्राचीन काळापासून अंतराळ युगापर्यंत सु. सोळाशे शास्त्रज्ञ, संशोधक, तंत्रज्ञ ह्यांचा परिचय करून दिला आहे. (३) क्रांतिकारकांचा चरित्रकोश (शं. रा. दाते). ह्यात भारतातील अडीचशे क्रांतिकारकांची चरित्रे, त्यांच्या छायाचित्रांसह देण्यात आली आहेत. (४) स्वातंत्रसैनिक : चरित्रकोश (खंड १-१९७१ न. र. फाटक). स्वातंष्यलढ्यात प्रत्यक्ष देहदंड, कारावास भोगलेल्या व स्वातंत्र्यपूर्वकाळात समाजाच्या निरनिराळ्या क्षेत्रांत काम केलेल्या स्वातंत्र्यसैनिकांची ह्यांत वर्णानुक्रमे माहिती आहे. (५) जागतिक शास्त्रज्ञकोश (१९९१, प्र. न. जोशी). प्राचीन काळापासून वर्तमान काळापर्यंतच्या सु. दोन हजार शास्त्रज्ञ, यंत्रज्ञ,संशोधक ह्या ंचा परिचय ह्या कोशात दिलेला आहे.

विशिष्ट घराण्याचा कुलवृत्तांत देताना-उदा., आपटे घराण्याचा इतिह्यास (१९१४) – त्या घराण्यातील अनेक व्यक्तींची चरित्रे, चरित्रविषयक टिपणे दिलेली दिसतात. ह्यांना काटेकोर अर्थाने चरित्रकोश म्हणता येणार नाही म्हटले जातही नाही. मात्र ह्या कुलवृत्तांतांचाही सामाजिक-सांस्कृतिक माहितीच्या दृष्टीने उपयोग आहे. मह्याराष्ट्र जीवनमध्ये शं. ग. दाते ह्यांनी संकलित केलेली, मह्याराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील प्रमुख व्यक्तींची चरित्रविषयक टिपणेही उल्लेखनीय आहेत.

तत्वज्ञानकोश : पुणे येथील ‘मराठी तत्वज्ञान-मह्याकोश मंडळा’तर्फे प्रसिध्द झालेला प्रा. दे. द. वाडेकरसंपादित मराठी तत्वज्ञान-मह्याकोश (३खंड, १९७४) ह्या तत्वज्ञान ह्या विषयाला वाहिलेला, मराठीतील पहिला कोश होय. तत्वज्ञानातील सर्व शाखोपशाखा व विषयोपविषय ह्यांचा समावेश ह्यात करण्यात आला आहे. मह्याराष्ट्रीय, भारतीय आणि परदेशांतील अधिकारी व्यक्तींचे साह्याय्य ह्या कोशाला मिळाले आहे.

वाङ्‌मयकोश : मुंबई येथील ‘मराठी संशांधन मंडळा’ ने गं. दे. खानोलकर ह्यांच्या प्रेरणेने व नेतृत्वाने १९६८सालापसून मराठी वाङ्‌मयकोशाचा प्रकल्प ह्याती घेतला होता. मराठी वाड्मयाविषयी त्याचप्रमाणे साहित्यशास्त्र, साहित्यविषयक संज्ञा व समीक्षा ह्यांच्या संदर्भातील माहितीची गरज भागविण्यासाठी चार खंडांच्या वाङ्‌मयकोशाची योजना आखण्यात आली. ती अशी : खंड पहिला : मराठी ग्रंथकार : विभाग पहिला, १०५०ते १८५७. खंड दुसरा : मराठी ग्रंथकार : विभाग दुसरा, १८५८ते १९७५. खंड तिसरा : मराठी ग्रंथपरिचय. खंड चौथा : साहित्यसमीक्षा. ह्यांपैकी खंड पहिला गं. दे. खानोलकर ह्यांच्या संपादकत्वाखाली १९७७मध्ये प्रसिध्द झाला. पुढे उर्वरित खंडांच्या संदर्भात ह्या योजनेचे स्वरूप काहीसे बदलत जाऊन ते पुढीलप्रमाणे ठेवण्यात आले : खंड दुसरा : भाग १ : मराठी ग्रंथकार : १८५८ते १९६०  ह्या कालावधीतील दिवगंत ग्रंथकारांची चरित्रे व वाङ्‌मय ह्यांचा परिचय. खंड दुसरा : भाग २ : मराठी ग्रंथकार : १९६०ते १९९३  ह्या कालखंडातील दिवंगत ग्रंथकारांची चरित्रे व वाङ्‌मय ह्यांचा परिचय . खंड तिसरा : मराठी ग्रंथपरिचय आणि खंड चौथा : साहित्य-समीक्षा-संज्ञा-कोश. खंड दुसरा, तिसरा व चौथा ह्यांचे काम सुरू आहे.

नागपूर विद्यापीठाच्या स्नातकोत्तर मराठी विभागाच्या वतीनेही मराठी वाङ्‌मयकोशाचे काम चालू होते.मराठी भाषा व वाङ्‌मय यांच्या आरंभापसून १८५०पर्यंतचे ग्रंथकार व ग्रंथ ह्यांचा परामर्श घेणारा ह्या वाङ्‌मयकोशाचा पहिला खंड १९७४मध्ये प्रकाशित झाला.

समाजविज्ञान कोश : पुण्याच्या समाजविज्ञान मंडळातर्फे सह्या खंडाचा भारतीय समाजविज्ञान कोश (१९८६-९३) स. मा. गर्गे ह्यांच्या प्रमुख संपादकत्वाखाली प्रसिध्द झाला. इंग्रजी भाषेतील समाजविज्ञान कोशांची रचना, मराठी वाचकांची गरज आणि काही व्यावह्यारिक अडचणी विचारात घेऊन समाजविज्ञानांपैकी, नागरिकांच्या जीवनाला अनेक अंगांनी व्यापणारे समाजशास्त्र, अर्थशास्त्र व राज्यशास्त्र हे तीन विषय आणि त्यांना पूरक-पोषक ठरणाऱ्या काही तत्सम विषयांच्या नोंदी या कोशात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

या कोशाची रचना करताना भारतीय संदर्भ कटाक्षाने ठेवण्यात आला आहे. भारताची परिस्थिती, प्रगती, समस्या आणि संकल्प ह्या संबंधीचे संदर्भ अधिक विस्ताराने व संख्येने दिले जावेत, असा विचार ह्या कोशाची योजना करताना ठेवलेला आहे. ह्या कोशाचा वाचक मह्याविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा असावा, असे गृहीत धरलेले आहे. त्याचा सह्यावा खंड मराठी-इंग्रजी व इंग्रजी-मराठी अशा स्वरूपातील परिभाषेचा असून समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि तत्सम विषयांसाठी उपयुक्त अशा सु. पंचवीस हजार शब्दांचा ह्या खंडात अंतर्भाव आहे.

शोधविज्ञानकोश : संशोधन वा तत्सम कार्याशी संबंधित अशा विविध संज्ञा, संकल्पना, प्रक्रिया, पद्धती इत्यादींच्या संदर्भात उपयुक्त असा एक शोधविज्ञानकोश (५खंड, १९८५) दु. का. संत ह्यांनी तयार केला आहे. त्यांच्या पाच खंडांतील विषयविभागणी अशी : (खंड १)-संशोधन : इतिह्यास, तत्वज्ञान, मानसशास्त्र इत्यादी. (खंड २)-शोधप्रकल्पसिद्धी : अवस्था, पद्धती, प्रक्रिया इत्यादी. (खंड ३)-आधुनिक शोधायुधे, शोधपूरक शास्त्रे, ज्ञानक्षेत्रांची शोधवैशिष्ट्ये इत्यादी. (खंड ४)-शोध-अहवाल, शोधप्रबंध सिद्धता, मूल्यमापन इत्यादी. (खंड ५)-विविध संकीर्ण संदर्भ व शोधपूरक माहिती.


दैवतकोश : एखाद्या विशिष्ट दैवताविषयी सर्वांगीण माहिती देणारे कोशही मराठीत झाले आहेत. त्यांची काही उदाहरणे अशी : (१) प्रल्ह्याद कृष्ण प्रभुदेसाईसंपादित आदिशक्तीचे विश्वस्वरूप अर्थात् देवीकोश (४खंड, १९६७-१९७२). आदिशक्ती, तिचे तात्विक स्वरूप, तिची उपासना, वैदिक, पौराणिक इ. विविध देवता ह्यांचा संक्षिप्त परिचय ह्या कोशात करून दिलेला आहे. (२) अमरेंद्र गाडगीळसंपादित श्रीगणेशकोश (७खंड, १९६८). श्रीगणेशाच्या उपासकांना व अभ्यासकांना उपयुक्त असा ह्या कोश आहे. विविध ग्रंथातून आलेली गणेशविषयक माहिती, तसेच गणेशस्थाने, गणेशमूर्ती इत्यादींची माहिती ह्या कोशात संकलित केली आहे. ह्या कोशाची रचना अकारविल्हे नसून विषयानुरोधाने केलेली आहे. अमरेंद्र गाडगीळ यांनीच संपादिलेला आणखी एक दैवतकोश म्हणजे श्रीरामकोश (६खंड, १९७३-८१). श्रीराम आणि रामायण ह्यांच्याविषयी केवळ भारतातीलच नव्हे, तर जगातील सर्व प्रकारची माहिती यात समाविष्ट केलेली आहे. रामकथेचा जगभरचा प्रवास, तिची विविध भाषांतील रूपे, रामायणविषयक संशोधन-चिकित्सा, त्याचा सर्वांगीण अभ्यास, रामोपासना व रामोपासक, रामस्थाने, राममूर्ती ह्यांचा परिचय ह्या कोशात आला आहे. आवश्यक तेथे छायाचित्रे दिली आहेत. वाल्मीकि-रामायणाचे सर्वांगीण दर्शन मह्याकवी वाल्मीकी व इतर सोळा वाल्मीकी, रामायण स्थलदर्शन इ. विषयांचा परामर्शही ह्या कोशात घेतला आहे. ह्याचा आणखी एक विशेष म्हणजे वाल्मीकि-रामायणचा समग्र मराठी अनुवाद ह्याही ह्या कोशाचा एक भाग आहे. अमरेंद्र गाडगीळ ह्यांनी हनुमानकोशही संपादिला आहे. प्र. न. जोशीसंपादित श्रीदत्तात्रेय ज्ञानकोश (१९७४) प्रामुख्याने दत्तात्रेयाशी निगडित अशा महत्वाच्या विषयांनुसार रचलेला आहे. दत्त ह्या दैवताचा इतिह्यास, दत्तसंप्रदायाचा विकास, दत्तोपासना, दत्तविषयक ग्रंथ, संस्कृत व मराठी कविता, भूपाळ्या, आरत्या, प्रमुख दत्तभक्त, दत्तक्षेत्रे, दत्तोपासनेच्या प्रेरणेतून धार्मिक-सामाजिक-सांस्कृतिक कार्य ह्या संबंधीची माहिती ह्या कोशात अंतर्भूत आहे.

ह्याशिवाय ‘नृसि हकोश समिती’च्या वतीने निघालेला नृसिंहकोश (१९९१),तसेच पुण्याच्या ‘प्रसाद प्रकाशना’ तर्फे दत्त, हनुमान इ. देवतांचे निघालेले कोश निर्देशनीय आहेत.

स्थळकोश : विविध स्थळांच्या माहितीला वाहिलेले कोशही आहेत. मह्यानुभाव पंथाच्या कुमरे आम्नायातील मुनिव्यास ह्यांनी रचिलेला स्थानपोथी (चौदावे शतक) ह्या ग्रंथाचा निर्देश ह्या संदर्भात करता येईल. मह्यानुभाव पंथीयांस पूज्य असलेल्या ⇨ चक्रधरांचे (सु. १९९४-१२७४) जेथे पाय लागले, अशा तीर्थस्थानाची (सु. दोनअडीचशे गावे) तपशीलवार नोंद ह्या ग्रंथात आहे. तत्कालीन मह्याराष्ट्राची कल्पना ह्या स्थानापोथीतून येऊ शकते. एक प्रकारे ह्या चक्रधरांच्या चरित्रकार्याचा संदर्भकोशही आहे कारण लीळाचरित्रातील विविध लीला केव्ह्या, कोणत्या स्थळी व कोणत्या प्रसंगाने घडल्या हेही स्थानपोथीकार सांगतात. म. प. सिद्धेश्‍वरशास्त्री चित्राव ह्यांचा प्राचीन भारतीय स्थलकोश (१९६९) निर्देशनीय आहे. वैदिक साहित्य, कौटिलीय अर्थशास्त्र, पाणिनीचे व्याकरण, वाल्मिकी-रामायण मह्याभारत, पुराणे, मध्ययुगीन संस्कृत आणि शब्दकोश साहित्य, तसेच फार्सी, ग्रीक, बौद्ध, जैन, चिनी साहित्य शिलालेख ह्यांमध्ये निर्दिष्ट अशा भौगोलिक स्थळांची साधार माहिती देण्याचे उद्दिष्ट ह्या कोशाच्या रचनेमागे आहे. ह्या कोशातील ‘प्राचीन’ ह्या शब्दाची व्याप्ती-‘स्थूल मानाने भारताच्या सांस्कृतिक इतिह्यासातील सिंधू-संस्कृतीच्या उदयापासून मुसलमानी आक्रमणापर्यंत (इ. स. पू. २९०० ते इ. स. ९००)’- अशी स्वीकारलेली आहे. परंतु प्राचीन स्थळांची उत्तरकालीन माहिती ‘स्थापत्य, शिल्प आणि उत्खननावशेष जागच्या जागी नमूद करून हे स्थलवर्णन’ अद्ययावत बनविण्याचा प्रयत्न केला आहे. ‘बृहद् भारतीय’ म्हणजे मध्य आणि आग्नेय आशियातील ज्या ज्या देशांत भारतीय संस्कृतीचा प्राचीन काळी विस्तार झाला ते प्रदेश, अशी ‘बृहद् भारतीय’ ह्या संज्ञेची व्याप्ती कोशकर्त्यांनी मानली आहे.


व्यायामकोश : बडोद्याच्या दत्तात्रय चिंतामण करंदीकर (मुजुमदार) यांनी व्यायामज्ञानकोश (१०खंड, १९३६-४९) संपादिला आहे. यात व्यायामाचा इतिह्यास, अर्भकांचे व्यायाम, मुलामुलींचे देशी-विदेशी, मैदानी-मर्दानी खेळ, मेहनती-कसरतींचे प्रकार, शर्यती, स्वास्थविचार अशी विविध प्रकारची माहिती दिलेली आहे. ह्याची रचना अकारविल्हे नाही, तर विषयवार आहे.

विज्ञानकोश : रघुवीर सामंत ह्यांनी ज्ञान पारिजात या नावाने शास्त्रीय विवेचनाला वाहिलेल्या सात भागांच्या (संपादकांच्या भाषेत सात ‘परड्यां’च्या) निर्मितीचा संकल्प केला होता. तथापि पहिले  दोन भागच प्रसिध्द झाले, असे दिसते (१९६२ – १९६४). ह्या पहिल्या दोन भागांत ‘अथांग अंतराळामधील अनंत विश्वाची आणि त्या अफाट पार्श्‍वभूमीतच भ्रमणाऱ्या आपल्या अतिशय जवळच्या-जिव्ह्याळ्याच्या पृथ्वी-चंद्र यांची सर्वांगीण अशी बरीचशी माहिती’ देण्याचा प्रयत्न संपादकांनी केला आहे. चित्रे, आकृत्या अशी सुनिदर्शनेही आहेत. दोन्ही भागांच्या अखेरीस शास्त्रीय संज्ञा, व्याख्या इ. विषयवारीने दिल्या आहेत. ज्ञान पारिजाताची रचनाही अकारविल्हे नसून विषयवारीने ‘यथाक्रम, प्रकरणश:’ आहे.

सुधाकर भालेराव आणि वसंत कर्डिले ह्यांच्या सुगमविज्ञानकोशात (१९७१) नऊशेहून अधिक संज्ञांची, तसेच निवडक शास्त्रज्ञ व महत्वाचे शोध ह्यांची माहिती दिली आहे. ह्यांची रचना अकारविल्हे आहे.

चुनेकर, सु. रा.

आपण ज्या विश्‍वाचा एक भाग आहोत, त्याचे ज्ञान शक्य तितके मिळविण्याची धडपड ह्या माणसाच्या माणूस म्हणून होणाऱ्या विकासाचा गाभ्याचा भाग होय. हे ज्ञान प्राप्त करीत असतानाच विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांपवर त्याचे वेगवेगळ्या ज्ञानक्षेत्रांमध्ये वर्गीकरण करून ती क्षेत्रे आपल्या स्वतंत्र व सूक्ष्मसखोल अभ्यासाने समृद्ध करणे, त्यांच्या परस्परांशी असलेल्या आंतरिक संबंधांचे भान ठेवणे आणि ज्ञानाच्या अंतिम एकात्मतेची जाणीव निर्माण करणे हेही ह्या विकासाच्या इतिह्यासात माणसाने घडवून आणले आहे. मानवी   ज्ञानाच्या सर्व क्षेत्रांतील विकासाचे अद्ययावत स्वरूप ज्यांतून प्रतिबिंबित होईल अशा प्रकारच्या छोट्या-मोठ्या संकलनपर ग्रंथांतून ते ज्ञानेच्छूंना शक्य तितक्या सुविधेने प्राप्त करून देणे ही विश्वकोशनिर्मिती मागील प्रेरणा होय. ती अबाधित राखून काळाच्या ओघात विश्वकोशाने भाषा, शैली, मांडणी अशा वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळी रूपे धारण केली, त्या त्या कालखंडाच्या बदलत्या सामाजिक गरजांचाही विचार केला आणि मोठ्यांपासून छोट्यापर्यंत सर्व प्रकारच्या वाचकवर्गासाठी उपयुक्त कामगिरी बजावली. ही उपयुक्तता प्रत्येक विश्वकोशाच्या स्वरूपानुसार कमी-अधिक स्वरूपाची असू शकेल. जगातील विविध भाषिक समाजांमध्ये विश्वकोशाचरचनेची कामे झाली आहेत आणि होत आहेत. भारतासारख्या बहुभाषिक देशातही विविध भाषांतून विश्वकोशरचना कशी चालू आहे,  ह्याची काही कल्पना वर थोडक्यात दिलेल्या परिचयातून येऊ शकेल. विश्वकोशनिर्मिती हे स्वत:ला आधुनिक म्हणवणाऱ्या प्रत्येक भाषिक समाजाचे एक अपरिह्यार्य अंग होऊन बसले आहे. अशा प्रत्येक समाजाच्या सांस्कृतिक अस्मितेशीही ते निगडित झालेले आहे. एखाद्या भाषेत विश्वकोशनिर्मिती झालेली नसणे, ही बाब आता त्या भाषाक्षेत्रातील एकंदर कामगिरीमधील एक महत्वाचे न्यूनत्व व्यक्त करणारी ठरते. विश्वकोशाचे आजचे स्वरूपपुढील काळात आणखीही बदलू शकेल परंतु विश्वकोशर्निर्मिती चालूच राहील आणि अधिकाधिक भाषा तिच्या निर्मितीत सहभागी होतील.

पह्या : कोशवाङ्‌मय.

कुलकर्णी, अ. र.

संदर्भ : 1. Collison, Robert L., Encyclopaedias : Their History Throughout the Ares, 2nd Ed. 1966.

        2. Datta, Amaresh Encyclopaedia of Indian Literature, Vol II, New Delhi, 1988.’

        3. International Symposium on Encyclopaedias, Journal of World History, Vol. 9. No. 3. 1966.

        4. Kister, K.F. Best Encyclopaedias : A Guide to General and Specialised Encyclopaediasl  1986.

        5. Library of Congress, Circle of Knowledge, 1979.

        6. Saxl, Fritz, “ Illustrated Mediaeval Encyclopaedias” in Lectures, 2, Vols., 1957.

        7. Symposium, “ The Uses of Encyclopaedias : Past, Present and Future” in American Behavioral Scientist, 6:3-40, 1962.

        8. Walford, Authur J.Walford’s Guide to Reference material, 2 Vols., 19809-82.

        9. Walsh, S.Padraig, Anglo-American General Encyclopaedias, 1968.       १०. केतकर, श्रीधर व्यंकटेश, माझे बारा वर्षांचे काम उर्फ ज्ञानकोशमंडंळाचा इतिह्यास, पुणे, १९२७.

       ११.गोखले, द. न. डॉ. केतकर, मुंबई, १९५९.

       १२. जाधव, रा. गं. “आधुनिक मराठी ज्ञानसंकलक कोशरचना : स्वरूप् व उपयुक्तता”, लेख १ व २  नवभारत, जानेवारी १९९८ फेब्रुवारी १९९८.       १३.  वैद्य, सरोजिनी पौडवाल, सुषमा जोशी, अनिता मह्याजन, कविता, संपा. कोश व सूची वाङ्‌मय: स्वरूप आणि साध्य, मुंबई, १९९७.