विद्युत् सामग्री उद्योग: विद्युत् ऊर्जेचे उत्पादन, प्रेषण, वितरण आणि तिचा विविध कार्यासाठी उपयोग करण्यासाठी अनेक प्रकारच्या यंत्रसामग्रीची, तसेच साधनांची अनिवार्य गरज असते. ही यंत्रसामग्री, साधने तयार करताना प्रथम सुटे भाग तयार करून त्यांची योग्य प्रकारे जुळणी केली जाते. ही विविध कामे करणाऱ्या उद्योगास विद्युत् सामग्री उद्योग असे म्हणतात. या उद्योगाचे स्थूलपणे दोन ठळक भाग पाडता येतील.

मोठी यंत्रे आणि अवजडसामग्री बनविणारे उद्योग: या विभागात निरनिराळी बाष्पित्रे, मोठ्या आकारमानाची जनित्रे, चलित्रे, रोहित्रे, स्विचगिअर, प्रत्यावर्तक, प्रषेण मार्गावरील पोलादी  मनोरे, या मनोऱ्यांवरून जाणाऱ्या मोठमोठ्या संवाहक तारा, निरोधक, उच्च दाबावर आणि मोठ्या विद्युत् प्रवाहासाठी वापरल्या जाणाऱ्या केबली, विविध प्रकारचे  मोठे विद्युत् मंडल खंडक, विलगक इ. अनेक उपकरणांचा व वस्तूंचा समावेश होतो.

लहान यंत्रसामग्री, साधने आणि उपकरणे बनविणारे उद्योग: या विभागात लहान चलित्रे, रोधक तारा, विद्युतीय कार्बनाच्या विविध वस्तू, चिनी मातीचे निरोधक, विद्युत् मंडल खंडक, विद्युत् दाब, विद्युत् प्रवाह इ. विद्युत् राशींचे मापन करणारी विविध उपकरणे, विविध प्रकारचे दिवे, पंखे, बिनतारी यंत्रणा, तारायंत्र, शुष्क विद्युत् घट, संचायक विद्युत् घटमाला, वितळतार, घरगुती विद्युत् जोडणीसाठी वापरले जाणारे साहित्य, तापक, मिश्रक वगैरे घरगुती वापराची विद्युत्  उपकरणे इ. विविध गोष्टींचा समावेश होतो. 

दूरध्वनीचे साहित्य, रेडिओ ग्राही संच, दूरचित्रवाणी संच वगैरे इलेक्ट्रॉनीय उपकरणांचाही याच सामग्रीत विचार होत असे तथापि आता इलेक्ट्रॉनीय अभियांत्रिकी ही स्वतंत्र शाखा बनल्याने या उद्योगाचा विचार स्वतंत्रपणे करतात. [⟶इलेक्ट्रॉनीय उद्योग].

विद्युत् सामग्री उद्योगाची  सुरूवात : १८७६ साली अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे भरलेल्या प्रदर्शनातून या उद्योगाची सुरूवात झाली. या प्रदर्शनात विद्यूत्  संबंधित काही गमतीजमती प्रथमच लोकांसमोर आल्या आणि हळूहळू नित्याचा घरगुती वापरासाठी विजेचा उपयोग करण्याचा विचार सुरू झाला. या विचारातूनच नंतर क्लीव्हलँड येथील ‘वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनी’ने विद्युत् घट संच तारायंत्राचे सुटे भाग, विद्युत् घंटा, विद्युत् ⇨अभिचलित्रे अगदी अल्प शक्ती वापरून मोठ्या शक्तीच्या  विद्युत् मंडलात हवा तो बदल घडवून आणणारी साधने रिले) अशा प्रकारच्या, साध्या परंतु दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे उत्पादन करण्यास सुरूवात केली. अलेक्झांडर ग्रॅहॅमबेल यांनी दूरध्वनीचे कार्य लोकांसमोर आणले. त्यानंतर साधारण एकाच वेळी परंतु दोन भिन्न ठिकाणी स्वतंत्रपणे, दोन एकदिश (एकाच दिशेने वहनारा) प्रवाह जनित्रे (यांत्रिक ऊर्जेचे विद्युत् ऊर्जेत रूपांतर करणारी साधने) तयार झाली (एक बेल्जियममधील झेड्. टी. ग्राम यांनी तयार केले, तर दुसरे क्लीव्हलँड येथील चार्ल्स फ्रान्सिस ब्रश यांनी  तयार केले). १८८० मध्ये⇨टॉम्स आल्वा एडिसन यांनी ‘एडिसन मशीन वर्क्स’ या कंपनीद्वारे एकदिश जनित्रांचे आणि ‘एडिसन लँप वर्क्स’ या कंपनीद्वारे तंतू दिव्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरू केले. त्याच सुमारास न्यू ब्रिटन येथे ई.जे.ह्यूस्टन व ⇨इलिहू टॉमसन यांनी ‘अमेरिकन इलेक्ट्रिक कंपनी’ द्वारा एकदिश प्रवाह पद्धती वापरून प्रज्योत (वायूतून होणारे विजेचे विसर्जन म्हणजे प्रज्योत) प्रदीपन पद्धती आणि प्रज्योत दिवे यांचे उत्पादन सुरू केले. सुरूवातीस १८८४ मध्ये स्प्रेग इलेक्ट्रिक रेल्वे अँड मोटार कंपनीने शंभर छोट्या चलित्रांचे (विद्युत् ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या साधनांचे) उत्पादन केले. त्यानंतर अमेरिकेतील पंधरा कंपन्यांनी थोड्याच काळात पंधरा आणि पंधरापेक्षा जास्त अश्वशक्तीची जवळजवळ दहा हजार चलित्रे तयार केली. १८८६ मध्ये विल्यम स्टॅन्ली यांनी विद्युत् वितरणासाठी एकदिश प्रवाहापेक्षा प्रत्यावर्ती (उलटसुलट दिशांनी वहनाऱ्या) प्रवाहाचा जास्त चांगल्या रीतीने कसा उपयोग होतो, हे प्रात्यक्षिकांद्वारा प्रथमच दाखवून दिले. याच सुमारास इलिहू टॉमसन यांना पहिल्या प्रज्योत वितळजोड (वेल्डिंग) यंत्राचे एकस्व (पेटंट) मिळाले आणि वेस्टिंगहाऊस कंपनीने व्यापारी तत्त्वावर पहिले प्रत्यावर्ती विद्युत् प्रवाह उत्पादन केंद्र सुरू केले. स्प्रेग कंपनीने चलित्रात वापरली जाणारी विद्युत् ऊर्जा मोजणारी ऊर्जामापके प्रचारात आणली. यानंतरच्या काळात वर उल्लेखिलेल्या आणि अमेरिकेतील इतरही बऱ्याच छोट्यामोठ्या कंपन्या विलीन होऊन १८८२ मध्ये ‘जनरल इलेक्ट्रिक कंपनी’ या नावाने एकच मोठी कंपनीस्थापन करण्यात आली. या कंपनीच्या जगातील इतर बऱ्याच देशांत शाखा निघाल्या असून तिने त्या त्या देशातील स्थानिक उत्पदकांशी सहकार्य करून विद्युत् सामग्री उद्योगाच्या प्रगतीला खूप मोठा हातभार लावला आहे. १८८८ मध्ये वेस्टर्न इलेक्ट्रिकल इंन्सुट्रूमेंट कंपनी स्थापन झाली. १८८६ मध्ये रूळावरून आणि रस्त्यावरून धावणाऱ्या गाड्यांसाठी गतिरोधकचा शोध लावणाऱ्या ⇨जार्ज वेस्टिंगहाऊस यांनी वेस्टिंगहाऊस कंपनीची स्थापना केली. अशा रीतीने १८७६-८६ या दशकात विद्युत् सामग्री उद्योगाचा पाया उत्तम रितीने घातला गेला, असे म्हणावयास हरकत नाही.

इ.स. १८८७ मध्ये ‘लिंकन इलेक्ट्रिकल कंपनी’ने कार्बन प्रज्योत वितळजोड पद्धतीचे एकस्व मिळविले परंतु विद्युत् वितळजोडकामाची यंत्रे मात्र १९३० नंतरच मोठ्या प्रमाणावर वापरात आली आणि त्यांचा उपयोग करून एक मोठे मालवाहू जहाज बांधण्यात आली. हीच कंपना आज विद्युत् वितळजोड कामाची यंत्रे बनविणारी जगातील एक मोठी नामवंत कंपनी म्हणून ही ओळखली जाते.


 विद्युत् सामग्री उद्योगाची वाढ: विद्युत् सामग्रीच्या सर्वच उत्पादनांस दुसऱ्या महायुद्धानंतर चांगलीच चालना मिळाली जवळजवळ सर्वच लहान मोठ्या उद्योगात विद्युत् चलित्राचा सर्रास वापर सुरू झाला त्यामुळे विद्युत् नियंत्रण साधने, विद्युत् शक्ती उत्पादन आणि वितरण केंद्रासाठी लागणारी सामग्री, संवाहक तारा, केबली, रोहित्रे, (विद्युत् दाब बदलणारी साधने) इत्यादी अनुषगिक यंत्रसामग्रीच्या उत्पादनात प्रचंड वेगाने वाढ होत गेली. आजतर शहरी जीवनातच नव्हे तर खेड्यापाड्यातूनही शेतीला पाणीपुरवठा करण्यापासून ते शेतमालावर होणाऱ्या प्रक्रिया केद्रापर्यंत सर्व ठिकाणी विजेचा उपयोग होत असल्याने या उद्योगाची फारच झपाट्याने वाढ होत आहे.

भारतातील विद्युत् सामग्री उद्योग : भारतात हा उद्योग पहिल्या महायुद्धानंतर सुरू झाला. मात्र विद्योत्तर परिस्थिती व महामंदी यांच्यामुळे तो काही काळ मागे पडला होता कलकत्यात १९२१ साली विजेच्या पंख्याचा कारखाना सुरू झाला. मग केबली व संवाहक तारा बनविणारा कारखाना टाटानगर येथे सुरू झालातर विजेचे दिवे बनविणारा पहिला कारखानाही कलकत्त्यात १९३२ साली सुरू झाला. विद्युत् चलित्रे, रोहित्रे, निरोधक व घटमाला यांचे कारखाने त्यानंतर बऱ्याच कालावधीने उभारले गेले आता हा उद्योग चांगलाच प्रस्थापित झाला असून काही उत्पादनाची निर्यात ही होऊ लागली आहे. विजपुरठ्याची उपलब्धता, संदेश वाहनांचा वाढता व्याप, वातानुकूलन, बिनतारी सेवा, रेल्वे वाहतूक, कापड व मोटारगाडी उद्योगासारख्या उद्योगाचा झालेला विकास आणि शेतीच्या कामातील विजेचा वाढता वापर या सर्व गोष्टींमुळे हा उद्योग झपाट्याने वाढत आहे. 

अवजड विद्युत् सामग्री उद्योग: भारतात अवजड विद्युत् सामग्रीचे उत्पादनही बऱ्याच मोठ्या प्रमाणात होत आहे. यांपैकी काही उत्पादनाची माहीती पुढे दिलेली आहे.

वाफ टरबाइने: भारतात वाफ टरबाइने तयार करणारे सात प्रमुख कारखाने आहेत यांपैकी भोपाळ, हरद्वार  आणि हैदराबाद येथील कारखाने सार्वजनिक क्षेत्रामार्फत (BHEL भेलभारत हेवी इलेक्ट्रकल लि.) चालविले जाताततर खाजगी क्षेत्रात बंगलोर येथे एक (त्रिवेणी इंजिनिअरिंग वर्क्स) आणि नैनी येथ दुसरा कारखाना चालविला जातो. अन्य दोन कारखाने भद्रेश्वर आणि फरिदाबाद या ठिकाणी आहेत [⟶वाफ टरबाइन].

जल टरबाइने : सार्वजनिक क्षेत्रात हरद्वार आणि भोपाळ येथील भेलच्या कारखान्यातच प्रामुख्याने जल टरबाइने तयार होताततर खाजगी क्षेत्रात बडोद्याच्या ज्योती लिमिटेड या कंपनीत त्यांचे उत्पादन होते. [⟶जल टरबाइन].

जनित्रे : आता बाप्पाविद्युत् केंद्रात २२० मेगावॉटपेक्षा कमी उत्पादन क्षमतेची खनिजे फार क्वचितच वापरली जातात. काही काळातच ५०० मेगावॉट उत्पादन क्षमतेची जनित्रेही वापरात येतील. इलेक्ट्रॉनिकिच्या क्षेत्रात २३५ मेगॅवॉट उत्पादन क्षमतेचे संच वापरात आहेत. धातू आणि खाते यांच्या छोट्यामोठ्या कारखन्यात १५ ते २५ मेगॅवॉट उत्पादन क्षमतेची खनिजे वापरली आहेत तर जलविद्युत् निर्मिती क्षेत्रात पाण्याची उपलब्धता आणि उंची यांचा विचार करून जनित्राची शक्ती ठरविली जाते. जनित्रे उत्पादन करणारे ११ प्रमुख कारखाने भारतात आहेत. यांतील मेलचे तीन कारखाने बडोद्याचा ज्योती लिमेटेड हा करखाना, बंगलोरमधील किर्लोस्कर इलेक्ट्रिक कपंनी इ. कारखाने विशेष प्रसिध्द आहेत. क्रॉम्प्टन-ग्रीव्ह्ज या कंपनीनेही आता या क्षेत्रात पदार्पन केले आहे. [⟶ विद्युत् खनिजे ].

चलित्रे : विद्युत्  ऊर्जेचे यांत्रीक उर्जेत रुपांतर करणारे चलित्र हे सुटसुटीत साठन आहे. त्यामुळे विद्युत्  पुरवठा  आणि उद्योगधंदे, कृषी वगैरेमधील विजेचा वापर यामधील चलित्र हा महत्त्वाचा दुवा आहे. चालक शक्तीचा उगम म्हणून चालित्रे मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. पिठाच्या व तेलाच्या गिरण्या, कापडाचे कारखाने, खाणकाम, वाहतुक, अभियांत्रिकीय कार्यशाळा, शेतीचा तसेच घरगुती व औद्योगिक पणीपुरवठा, लघुउद्योग व कुटीरोद्योग इ. अनेक ठिकाणी  एकदिश व प्रत्यावर्ती चलित्रे वापरतात.

भारतात पी.एस्.जी. अँड सन्स चाँरिटी इंडस्ट्रियल इन्स्टट्युट (कोईमतुर) येथे प्रथम दुसऱ्या महायुध्दापुर्वी चलित्रे  बनविण्यात आली. नतर क्राँम्पुटर पार्किन्सन (वकर्स) लि. मुंबई व किर्लोस्कर ब्रदर्स लि., किर्लोस्करवाडी (१९४७ नंतर किर्लोस्कर इलेक्ट्रिक कं. लि., बंगलोर) या कंपन्या या क्षेत्रात आल्या.दुसऱ्या महायुध्दानंतर चलित्रांचे उत्पादन झपाट्याने वाढले व नविन दहा व कंपन्या या क्षेत्रात उतरल्या पुढे या क्षेत्रात आणखी वाढ होऊन नविन कारखाने उभारले गेले. [⟶ विद्युत् चलित्र].

विद्युत् रोहीत : विद्युत् रोहित्राची क्षमता, जनित्राच्या उत्पादन क्षमतेनुसार आणि तसेच निरनिराळ्या ठिकाणी केल्या जाणाऱ्या विद्युत् पुरवठ्याच्या स्थलसापेक्षा गरजेनुसार ठरवावी लागते. विविध प्रकारच्या विद्युत् पुरवठ्यांसाठी ५० किलोव्होल्ट-अँपिअरपासून मोठमोठ्या जनित्रांसाठी वापरल्या जाणाऱ्या ५०० मेगॅव्होल्ट-अँपिअरपर्यंतच्या क्षमतेची रोहीत्रे बनविली जातात. या शिवाय बुस्टर रोहीत्र, वेल्डिंग रोहीत्र, ⇨एकदिशीकारक,खाणकामासाठी लागणारी रोहीत्रे इ. इतर खास प्रकारची विविध रोहात्रेही तयार केली जातात. भारतात रोहीत्रे तयार करणारे प्रमुख ३२कारखाने असून त्यांच्यामार्फत शक्ती आणी वितरण रोहीत्रे बनविली जातात. वर्षाकाठी सु.५०,००० मेगँव्होल्ट-अँपिअर क्षमतेचे रोहित्रे तयार केली जातात. याशिवाय लहानसहान रोहित्रे तयार करणारे बरेच कारखाने कार्यरत आहेत.१९९५ च्या पुढील काळात एचव्हीडीसी (हाय-व्होल्टेज डायरेक्ट करंट) वितरन व्यवस्था अस्तित्वात येत आसल्यामुळे विशेष प्रकारचे परीवर्तन रोहीत्र तयार करण्याचे तत्रज्ञान विकसित करण्याची आवश्यकता भसणार आहे. या वितरनव्यवस्थेत दीर्घ अंतरावर एकदिश प्रवाह प्रेषण करतात व प्रेषणात होणारी हानी कमी राखण्यासाठी या पध्दतीत सु. १ मेगँव्होल्टपर्यंत एकदिश विद्युत् दाब वापरातात. [⟶ रोहीत्रे ].

संवाहक तारा आणि पोलादी प्रेषण मनोरे: विविध विद्युत् उत्पादन केंद्रे आणि त्यांपासून दूर आंतरावर असणारी विविध विद्युत् पुरवठा केंद्र या सर्वांना एकमेकांशी जोडणाऱ्या संवाहक जाळ्यासाठी ८००, ४००, २३० आणि १०० किलोव्होल्ट या विद्युत् दाबांचा उपयोग केला जातो तर पुरवठा केंद्रापासून होणाऱ्या पुढील वितरणव्यवस्थेसाठई ११, ६·६ व ३·३ किलोव्होल्ट असा विद्युत् दाब वापरला जातो.घरगुती वापरासाठी आणि छोट्याछोट्या कारखान्यांतील यंत्रसामग्रीसाठी त्रिकला ४३० व्होल्ट एवढा विद्युत् दाब वापरातात. विद्युत् प्रवाह मूल्यानुसार विविध प्रकारचे प्रेषण मार्ग व संवाहक तारा वापरातात. या संवाहक तारांना आधार म्हणून पोलादी मनोरे, निरोधक शृंखला, तडीत् संरक्षण वगैरे अन्य सामग्रीचे उत्पादन ही करावे लागते. [⟶ विद्युत् वितरण पध्दती विद्युत् संवाहक शक्तीप्रेषण, विद्युत्].


 स्विचगिअर आणि नियंत्रण यंत्रणा : आंतरप्रांतीय आणि गुंतागुंतीच्या मोठ्यामोठ्या विद्युत् शक्ती प्रणालींत बरीच मोठी विद्युत् शक्ती प्रवाहीत होत असते. या प्रणालीत कोठेही व कधीही दोष उत्पन होऊ शकतो. असे झाल्यास प्रणालीमधील नेमका सदोष भाग इतर भागांपासून लवकरात लवकर अलग करून उरलेल्या प्रणालीतील विद्युत् पुरवठा अखंड चालू ठेवणे आवश्यक असते. यासाठी एकूण प्रणालीतील पुरेशी प्राथमिक संरक्षणयंत्रणा आणि त्याच बरोबर दुसरी पूरक संरक्षण यंत्रणा यांची व्यवस्था असणे अतिशय आवश्यक असते. या कामासाठी वेगवेगळ्या आकारमानांचे ⇨विद्युत् मंडळ खंडक,विलगक (विद्युत् मंडळ खंडीत करणारा किवा विद्युत् प्रणालीपासून साहीत्य वेगळे करणारा घटक)अशा सारखी यंत्रणा वापरली जाते. उच्चदाब यंत्रनेत त्या विवक्षित वेळी वहनारा विद्युत् प्रवाह व विद्युत् दाब यांनुसार तेलात उघडणारे, कमी तेल वापरणारे, हवेत उघडणारे तसेच एसएफ-६ प्रकारचे विद्युत् मंडळ खंडक वापले जातात. कमी दाबाच्या यंत्रणेत एमसीबी, हवेत मंडळ, साधे स्विच, बदलता येण्याजोगे वितळतार धारक (फ्यूज), एचआरसी वितलतार धारक इ. गोष्टींचा उपयोग केला जातो. अत्याधुनिक यंत्रणेत सूक्ष्मप्रक्रियक (मायक्रोप्रोसेसर) आणि संगणक यांचा उपयोग करून एकूण प्रणालीची विश्वसार्हता बरीच वाढविलेली असते. [⟶ विद्युत् मंडळ खंडक विद्युत् मंडळ परिक्षण ]. 

केबली : विद्युत् प्रवाह जमिनि खालुन वाहून नेण्यासाठी केबलींचा (भूमिगत तारांचा) उपयोग प्रमुख्याने केला जातो. विद्युत् उत्पादन केंद्रे मोठे मोठे स्विच-आवार आणि मोठमोठ्या औद्योगिक वसाहतीमध्ये उच्च दाबाच्या केबली वापरल्या जातात. सर्वसाधरणपणे या केबलींभोवती पीव्हीसी (पॉलिव्हिनिल किलोराइड) प्लॅस्टिक, व्हीआयआर व नैसर्गिक किंवा कृत्रिम रबराचे वेष्टन घातले असते. पश्चिम बंगालमधील रूपनारायनपूर येथील सरकारी मालकीच्या ‘हिंदुस्थान केबल्स’ या कारखान्यात संवाहक तारांच्या जोडीला सुक्या गाभ्याच्या केबली, नळ्या वापरून बनविलेल्या समाक्ष केबली आणि प्लॅस्टिक आवरणांच्या लवचिक केबली यांचे उत्पादन होते. [⟶ केबल ].

विद्युत् भट्ट्या : वेगवेगळ्या धातू वितळविण्यासाठी, त्याचे परीष्करण (शुध्दीकरण) करण्यासाठी आणि मिश्रधातूचे उत्पादण करण्यासाठी विविध प्रकारच्या विद्यूत् भट्ट्या तयार करव्या लागतात. तसेच धातूच्या पृष्ठभागवरील उष्णता संस्करणासाठी नियंत्रित तापमानाच्या विविध आकारमानांच्या भट्ट्याही तयार केल्या जातात. [⟶ विद्युत् भट्टी].

विद्युत् कर्षण यंत्रणा :विद्युत् कर्षण यंत्रणेत विजेवर चालणाऱ्या रेल्वेगाड्या,ट्रामगाड्या, बस, मोठ्या कारखान्यातील अंतर्गत वाहतुकीसाठी वापरली जाणारी वाहने, मोठ्या इमारतींतील लिफ्ट, औष्णिक विद्युत् केंद्रातील दगडी कोळसा वाहून नेणारी यंत्रणा, खाणीतीलधातुकाची (अशुध्द रुपातील धातूची)वाहतुक करणारी यंत्रणा आशांसारख्या गोष्टीचा समावेश होतो.यांपैकी बऱ्याच ठिकाणी एकदिश विद्युत् प्रवाह वापरला जातो काही ठिकाणी प्रत्यावर्ती विद्युत् प्रवाहाचे एकदिशकारकामार्फत एकदिश प्रवाहात रूपांतर करून घेऊन एकदिश चरित्र वापरली जातात तर फारच थोड्या ठिकाणी परत्यावर्ती प्रवाहावर चालणाऱ्या चलित्रांचा उपयोग केला जातो. [⟶ विद्युत् कर्षण].

बाष्पित्रे: विविध प्रकारची बाष्पित्रे बनविनारे सु.२० छोटेमोठे कारखाने भारतात आहेत. त्यांची वार्षिक उलाढाल सु. हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. [⟶ बाष्पित्रे].

छोटे विद्युत् साधने तयार करणारे उद्योग : अवजड विद्युत् यंत्रसामग्रीचे उत्पादन सर्वसाधरणपणे ग्रहाकांच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन केले जाते. तथापि लहान उपकरणांचे उत्पादन मात्र महोत्पादन पध्दातीने पुष्कळ मोठ्या प्रमाणावर केले जाते.त्यामुळे त्यांची किंमत कमी ठेवता येते. परिणामी त्यांचा खप वाढतो आणि त्यांची किंमत आणखी कमी करता येते. भारतातील आशा काही उत्पादनांची माहिती पुढे दिली आहे.

घरगुती वापरातील उपकरणे : आज घराघरातून अनेक विद्युत् उपकरणे वापरली जातात. या उपकरणात वातानुकूलक, प्रशीतक, पाणी तापविण्याचा बंब, चूलासंच, पाव भाजण्याचे यंत्र, अंग शेकण्याची पिशवी, गरम पांघरूण, धुलाई यंत्र, इस्त्री,दाढी करण्याचे यंत्र कॉफीपात्र, प्रारणतापक, भांडी-बश्या विसळण्याचे यंत्र, केर फाढण्याचे निर्वातक यंत्र इ. अनेक उपकरणाचा सामावेश होतो.

या छोट्या छोट्या उपकरणांच्या निर्मितीत सर्वत्र साधर्म्य रहावे व त्याबरोबर त्यांचा दर्जा चांगला आणि कायम राखला जावा म्हणून भारतीय मानक संस्था त्या त्या उत्पादनासाठी विशिष्ट प्रमाण पद्धती ठरवून देते आणि या प्रमाण पध्दतीनुसार उत्पादकांना उत्पादन करावे लागते. उत्पादीत मालाची सरकारी तपासणी अधिकाऱ्याकडून चाचणी होऊन मग त्यास मानक चिन्ह प्राप्तकरण्यात येते.

अशा तऱ्हेच्या मध्यम आणि लहान आकारमानांच्या विद्युत् उपकरण सामग्रीचे भारतात अनेक छोटे मोठे कारखाने आहेत. हे सर्व खाजगी मालकीचे असून ते सामान्यपणे मुंबई, कलकत्ता, चेन्नई, बंगलोर, हैदराबाद, हरीहर, पुणे, बडोदा, अहमदाबाद, दिल्ली यांसारख्या मोठ्या शहरात आहेत. [⟶ गृहोपयोगी उपकरणे ].  

विविध विद्युत् मापके : विद्युत् प्रवाह विद्युत् दाब इ. विद्युत् राशीचे मापन करण्यासाठी विद्युत् प्रवाहमापक, व्होल्टमापक, ऊर्जामापन यांसारखी उपकरणे तयार करणे आवश्यक असते तसेच स्वयंचल अभियांत्रिकीसाठी लागणारी उपकरणे अभिकल्पून (आराखडा बनउवून) ती बनविण्यासाठी रशियाच्या मदतीने इन्स्ट्रूमेंटेशन लिमिटेड या नावाचा कारखाना राजस्थानातील कोटा येथे स्थापन केलेला आहे. [⟶ विद्युत् राशिमापक विद्युत् उपकरणे].  

निरोधक :  कोणताही विद्युत् अपारक पदार्थ निरोधक म्हणून वापरता येतो उदा., पोर्सलिन, काच, अभ्रक, रबर, रेशीम, पॅराफिन वगैरे. पोर्सलिन व काच यांचे हव्या त्या आकारचे आणि आकारमानाच्या वस्तू बनविता येतात. तसेच पर्सनल ठिकाण असून ते आर्द होत नाही. त्यामुळे त्याचा या उद्योगात खूप उपयोग होतो. (उदा., घरगुती जोडण्या, नीच आणि उच्च विद्युत् दाबाची कामे) स्टीॲटाइट, रुटाइल, कॉर्डिएराइट, क्लिनोएन्स्टॅटाइट इ.खास पोर्सलिन प्रकार आहेत.


 बिहारमधील रंचीजवळ ‘इलेक्ट्रिकल इक्किपमेंट फॅक्टरी’ आणि ‘हाय टेन्शन इन्शुलेटर फॅक्टरी’ असे सरकारी मालकीचे दोन कारखाने आहेत. पहील्या  कारखान्यात प्रेषण मार्गासाठी लागणारे लोखंडीमनोरे,विद्युत् स्विच फलक, मंडळ खंडक व विलग अशा प्रकारचे विविध साहित्य तयार होते. तर दुसऱ्या कारखान्यात विद्युत् प्रेषण मार्गासाठी लागणारे २२० किलोव्होल्ट दाबाचे साखळीचे निरोध संच आणि ३३ किलोव्होल्ट दाबाचे खिळीवरचे निरोदक ठोकळे तयार होतात. कर्नाटकातील बंगलोर येथे अशाच प्रकारच्या उत्पादणासाठी ‘म्हैसूर पोर्सलिन फॅक्टरी असून तेथे एपॉक्सी रेझीनांचा वापर करून साचेबंद निरोधक तयार केले जातात. [⟶ निरोधन, विद्युत्]. केरळ राज्यात कुंडारा येथील ‘केरळ सिरॅमिक्स कंपनी’ आणि कोचीन येथील ‘केरळ इलेक्ट्रिकल्स अँड आलाइड कंपनी या दोन सरकारी कारखान्यात मध्यम आणि कमी विद्युत् दाबाच्या सर्व प्रकारच्या पोर्सलिन साहित्याची निर्मिती होते.

शुल्क विद्युत् घट व संचायक विद्युत् घटमाला :शुष्क विद्युत् घट वाहून न्यायला सोयीचे असतात.त्यामुळे त्यांचा विविध उपकरणात व साधनांत मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. स्फुरदीप, सायकलचे दिवे विजेऱ्या, खळणी, रेडिओ ग्राही संच, टपाल व तारखात्यातील साहित्य,श्रवन यंत्र, वातावरण वैज्ञानिक उपकरणे,संदेशवहनाची फिरती साम्रागी, घड्याळे, ध्वनिमुद्रक व पुनरुत्पादक संच इ. असंख्य ठिकाणी शुष्कविद्युत् घट वापरतात. या विद्युत् घटांचा बिट्रिश कंपनीने भारातातील पहिली कारखाना (ईव्हरेडी कंपनी) १९२६ साली कलकत्त्याला सुरू केला व १९३६ साली तो अमेरिकेच्या नॅशनल कार्बन कंपनीने घेतला. एस्ट्रेला बॅटरीज लि. (मुंबई) हा शुष्कविद्युत् घटांचा पहिला भारतीय कारखाना आहे. दुसऱ्या महायुध्दात या घटांची मागणी खूप वाढली पण ती देशातील उत्पादनाने भागविले जाई. १९४७ नंतर शुष्क विद्युत् घटांचे अनेक कारखाने निघाले.

कलकत्त्याच्या ट्रॉपिकल ॲक्युम्युलेटर्स लि. कंपनीने १९७१ साली प्रथमच भारातात संचायक विद्युत् घटमालानिर्मितीचा प्रयत्न केला. १९३९ पर्यंत असे आणखीन पाच कारखाने येथे सुरू झाले  होते. दुसऱ्या महायुध्दाच्या काळात मुंबईला व कलकत्त्याला आणखी एक कारखाना सुरू झाला. १९४८ नंतर कालकत्ता, बंगलोर चनई , दिल्ली, कोल्हापूर व मुंबई येथे आणखी कारखाने निघाले.त्यानंतर अनेक कंपन्या या क्षेत्रात आल्या. [⟶ विद्युत् घट ].

विद्युत् कार्बन : कार्बनाचे विद्युत् सामग्री उद्योगात अनेक उपयोग आहेत. कारण कार्बन विद्युत् संवाहक असून त्याचा वितळबिंदू ३,५००°से. असल्याने उच्च तापमानाला तो मऊ वा दुर्बल होत नाही. या गुणधर्मांमुळे त्याची जागा घेऊ शकेल असे दुसरे द्रव्य उपलब्ध नाही. संरक्षण (पृष्ठभागी ऑक्साइडचा थर तयार होण्यास) व रसायनांचे परीणाम यांस कार्बन विरोध करतो. विद्युत् भट्ट्यांची विद्युत् अग्रे, प्रज्योत दिवे किंवा प्रदिपन कार्बन स्पर्शक, विद्युत् घट, रोधक इ. अनेक ठिकाणी विद्युत् कार्बन वापरतात.

विजेचे पंखे : भारातात छतावरचे, टेबलावरचे, आगगाडीच्या डब्यातले, घोडीवरचे (स्टँडवरचे) इ. प्रकारचे पंखे तयार होतात. इंडिया इलेक्ट्रिक वर्क्स लि. (कलकत्ता) हा भारतातील विजेचे पंखे बनविणारा पहिला कारखाना होय (१९२२). नंतर असे आणखी कारखाने निघाले. ते  मुख्यतः कलकत्ता, मुंबई, व दिल्ली येथे आहेत. [⟶ पंखा].

जोडणी साहीत्य : द्वितीयक वितरण व वापर यांकरीता विविध प्रकारचे जोडणीचे साहीत्य वापरतात.उदा., स्विचे, भिंतीवरच्या गुडद्या (प्लग), कोटर (सॉकेट), दिवाधारक (होल्डर), संयोगकारक (ॲडॅप्टर), तार-वाहक नळ, पट्ट्याव झाकण पट्ट्या व साहित्य जोडणीसाठी वापरतात. यांकरिता बेकेलाइट, प्लॅस्टिक, पितळ, पोर्सलिन. इत्यादींचा वापर करतात.

विजेचे दीवे : प्रज्योत दिवे, प्रदीप्त दिवे व विर्सजन दिवे हे प्रकाश मिळविण्यासाठी वापरातात. यांपैकी प्रदिप्त दिवे आधिक प्रमाणात वापरतात. कारण ते साधे, स्वस्त व सुरक्षित आहेत. ते रंगीतही असतात. उच्च प्रखरता असलेले प्रज्योत दिवे छायाचित्रण, चलच् चित्रपट प्रक्षेपण व शोधदीप येथे वापरतात कमी प्रखरता असलेले प्रज्योत दिवे चलच्चित्रपट प्रक्षेपणासाठी वापरतात तर ज्योत प्रज्योत दिवे छायाचित्रणात वापरातात. [⟶ विद्युत् दिवे ].

कर्नाटक राज्यात ‘न्यू गव्हर्नमेंट एजिंनिअरिंग फॅक्टरी’ येथे जर्मनीच्या सहकार्याने उच्च व मध्यम विद्युत् दाबासाठी वापरली जाणारी व सर्व प्रकारची विद्युत् मंडल विलगक साधने. स्विचफलक व ६·६ किलोव्होल्ट विद्युत् दाबापर्यंतची चिलित्रतयार होतात. तसेच १०० मेगँव्होल्ट-अँपिअर क्षमतेपर्यंतची रोहित्रे पण येथे तयार होतात. अशा प्रकारची पण याहून मोठ्या क्षमतेची चलित्रे, वितळकाम रोहित्रे, जनित्रे आणि विद्युत् प्रणालीसाठीची संरक्षण सामग्री बंगलोर येथील ‘किलोस्कर इलेक्ट्रिक कंपनी’ या खाजगी कारखान्यात तयार होतो. याचीच एक शाखा ‘किर्लेस्कर आशिया लि.’ ही या वेगवेगळ्या प्रकारची अभिचालित्रे कमी दाबाची यंत्रणा तयार करते. तसेच ‘दीपक केबल्स’ व ‘रेम्को’ या कंपन्या एनॅमलवेष्टित व कागदवेष्टित केबली तयार कारतात. मुंबई व पुणे क्रॉम्प्टन-ग्रीव्ह्ज, क्रॉम्प्टन पार्किन्सन, लार्सनटुब्रो, भारत बिजली, फिनोलेक्स केबल्स, फिलिप्स इंडीया इ. विविध कंपन्यांमधून रोहित्रे जनित्रे, अनुस्फुरित नळ्या, विद्युत् मंडल खंडक आणि विलगक, केबली इ. वस्तूंचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. 


 विद्युत् सामग्री उद्योगासाठी लागणारा कच्चा माल : जनित्रे व चलित्रे यांच्या निर्मितीसाठी निरोधक वेष्टित वर्तुळकार छेदाच्या संवाहक तारा किंवा कागद अथवा सूतवेष्टित चौकोनी छेदाच्या तांब्याच्या जाड पट्ट्या संवाहक म्हणून वापरतात. कार्बनाच्या कांड्या अथवा वड्या स्पर्शकांसाठी उपयोगी पडतात. निरोधक साहित्य म्हणून काचित (काचलेपित) सुती फिती आणि अभ्रक यांचा वापर केला जातो. याशिवाय साधे धारवे, पितळी पट्ट्या, विविध आकारमानांचे स्क्रू इ. जोडणी,साहित्य वापरले जाते. तसेच गाभा व बाह्य आवरण यांसाठी निरोधक वेष्टन असलेले सिलिकॉन मिश्रित पोलादी पत्रे, ओतीव लोखंडी आणि पोलादी दंड यांचा उपयोग करतात.

रोहित्री तयार करण्यासाठी विशिष्ट मिश्रधातुयुक्त सिलीकॉन पोलादी पत्र्याची कातरणे गाभ्यासाठी वापरावी लागतात. तसेच निरोधकवेष्टित वर्तुळाकार अथवा पट्टीच्या आकाराच्या तांब्याच्या अथवा ॲल्युमिनियमांच्या संवाहक पट्ट्या, विविध प्रकारचे लाकूड पोलादी नळ्या तसेच बेकेलाईट, एबोनाईट रेझिनयुक्त निरोधी कागदाच्या वस्तू निरोधक म्हणून वापरातात. याशिवाय चिनी मातीच्या मायनी (पुंगळ्या, बुशिंग्ज), रोहीत्र ठेवण्यासाठी लोखंडी पेटी आणि तिलाथंड ठेवण्यासाठी निरोधक तेल इ. साहित्य वापरावे लागते.

स्विच फलकांसाठी पोलादी पत्र्यांची पेटी व तिच्यावर बसविलेली विविध विद्युत् राशिमापक उपकरणे, मंडल विलगक, विद्युत् मंडल खंडक, विद्युत् धारक आणि उपकरण रोहित्रे या आवश्यक गोष्टी होत.

  

भारतातील विद्युत् समाग्रीची उत्पादनक्षमता (१९९३-९४) 

 

विद्युत् सामग्री 

उत्पादन 

एकक 

(१) 

प्रत्यावर्ती चालित्रे 

 

हजार किवॉ. 

 

अ) घसरकडी 

२७६ 

हजार किवॉ. 

 

ब) खार पिंजरा 

२,५३६ 

हजार किवॉ.  

 

क) ज्वालाप्रतिबंधित 

१२६ 

हजार किवॉ. 

(२)

उच्च दाब चलित्रे 

७११ 

हजार किवॉ. 

(३) 

प्रत्यावर्ती जनित्रे 

१,६६८ 

हजार किवॉ. 

(४) 

एकदिश चलित्रे/जनित्रे

१९२ 

हजार किवॉ. 

(५) 

स्विच गिअर

   
 

१) अभिचालित्रे 

१७४ 

हजार 

 

२) स्पर्शक 

८०७ 

हजार 

 

३) चलित्र आरंभक

८८१ 

हजार 

 

४) लघुतम मंडल खंडक 

४,४११ 

हजार 

 

५) कमी विद्युत् दाब मंडल खंडक 

२०९ 

हजार 

 

६) उच्च विद्युत् दाब मंडल खंडक

१८,०२८ 

हजार 

 

७) एचआरसी वितळतारधारक 

७,३९७ 

हजार 

(६) 

केबली आणि संवाहक तारा 

   
 

(१) शक्ती केबली 

३० 

हजार टन 

 

(२) पीव्हीसी/व्हीआयआर तारा 

३,०११ 

हजार मीटर 

 

(३) एनॅमलवेष्टित तारा 

७,००० 

टन 

(७) 

विद्युत् धारक 

   
 

(१) कमी व उच्च दाब विद्युत् धारक 

५,९६२ 

हजार 

 

(२) आरभक धारक 

४,६५६ 

हजार 

(८) 

रोहित्र

   
 

(१)वितरण रोहित्र

६,४९२ 

हजार किवॉ. अँपिअर 

 

(२)शक्ती रोहित्र

३१,८८५ 

हजार किवॉ. अँपिअर 

 

(३)विद्युत् दाब रोहित्र

७६ 

हजार किवॉ. अँपिअर 

 

(४)विद्युत् प्रवाह रोहित्र

९,७४५ 

हजार किवॉ. अँपिअर 

(९)  

विद्युत् मापके

   
 

(१) ऊर्जा मापके 

४,१९३ 

हजार 

 

(२) जास्तीत जास्त मागणी दर्शकासह ऊर्जा मापके 

५,१९३ 

— 

 

(३) विविध प्रकारची दर्शक उपकरणे 

५९६ 

हजार 

याशिवाय धोकासुचक विद्युत् दिप, वितळताराधारक आणि विविध नियत्रक अभिचालित्रे बसविलेली आसतात. यांतील स्विचांचे स्पर्शक ताब्याचे अथवा त्यांवर चांदीचा मुलामा दिलेले आसतात. स्विच फलकाच्या जोडणीसाठी वापरले जाणारे स्क्र, नटबोल्ट इ. लोखंडी सामान गंजुनये म्हणून त्यांच्यावर कॅडमियमाचे विलेपन केलेले असते.


 उघडे विद्युत् संवाहक बनविताना तांब्याच्या जाड पट्ट्या अथवा नळ्यांचा वापर केला जातो आणि विद्युत् संवाहक केबलीसाठी ॲल्युमिनियमाच्या तारा अथवा पोलादी कण्यावर वेष्टित ॲल्युमिनियम तारांचा वापर करतात.  

निरोधक ठोकळे बनवण्यासाठी प्रामुख्याने पोर्सलिनाचा वापर होतो. त्यासाठीच कृत्रिम काच अथवा एपॉक्सी रेझीनांचे सांचेबंद ठोकळे सुध्दा वापारतात. संवाहकावरील निरोधक आवरण म्हणून रबर विशिष्ट कागद किंवा पीव्हीसी यांचा उपयोग करतात. साधे दिवे बनविण्यासाठी काचेचे फुगे, नळ्या, टंगस्टनाचा रोधक तंतु (तार) पितळी पत्र्याची टोपणे, लाख , डांबर , आर्गॉन वायू इ. साहित्याची आवश्यकता असते. प्रकाशक्षेपकात वापरले जाणारे प्रज्योत दीवे बनविण्यासाठी पोलादी पत्रा, पोर्सलिनाच्या नळ्या आणि कार्बनाच्या कांड्या नापरतात. घरगुती वापरातील विविध विद्युत् उपकरणाच्या निर्मितीसाठी पोलाद, ॲल्युमिनियम आणि पितळी पत्रे वापरातात.याशिवाय निरोधक म्हणून अभ्रकाच्या वेगवेगळ्या जाडीच्या पट्ट्या आणि फलक, चिनी मातीचे मनी आणि ठोकळे, तसेच ॲस्बेस्टासाचे पुठ्ठे इ. पदार्थ वापरातात. प्लॅस्टिक, रबर,मॅग्नेशियम ऑक्साइड वैगरे इतर बरेच पदर्थ अन्य भागासाठी उपयोगात आणले जातात. विद्युत् भट्ट्या बनविताना अनेक उष्णतेवर टिकून राहण्यासाठी मुख्यतः निकेल-क्रोमियम या मिश्रधातूपासून बनविलेल्या तारा आणि पट्ट्या एकसरी आणि अनेकसरी पध्दतीनी जोडतात, जेथे जेथे विद्युत् शक्तीपासून यांत्रिक शक्ती मिळविण्यासाठी लहान मोठी चलित्रे वापरली जातात, तेथे तेथे त्याच्या स्थिर बैठकीसाठी ओतीव लोखंडाच्या चौकटी आणि जाळ्या वापरातात.त्याचबरोबर लहानमोठे स्कू,नटबोल्ट इ. किरकोळ वस्तूही वापरातात.  

मोठमोठ्या उद्योगधंद्यात वितळजोडकामांसाठी प्रज्योत आवश्यक असते. त्यासाठी उच्च दर्जाच्या कार्बनाची अग्रे वापरली जातात. कार्बन हा विद्युत् संवाहक असून तो ३,४००° से. तापमानासही टिकू शकतो आणि त्यावर गंज चढत नाही. अशी अग्रे बनविताना त्यांचा मुख्य गाभा बनवण्यासाठी डांबरी कोळसा किंवा पट्रोलियम केक यांसारख्या पदार्थांचा मूळद्रव्य म्हणून उपयोग करतात आणि साधे पातळ डांबर किंवा सुके डांबर हे बंधक द्रव्य म्हणून वापरले जाते. शुष्क विद्युत् घट बनवण्यासाठी जस्त आणि पितळचे पत्रे जास्ताचे ऑक्साइड, मँगॅनीज डाय-ऑक्साईड, ग्रॅफाईड, अमोनिया, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पारा यांची संयुगे, कागदी पुठ्ठा आणि कार्बनाची अग्रे वापरली जातात. संचायक विद्युत् घटमाला तयार करण्यासाठी बाहेरील वेष्टनम्हणून रबर मिश्रणाची पात्रे आणि झाकणे आणि मुख्य घटमालेसाठी शिसे, अँटिमनी, शिशाचे ऑक्साईड, सल्फ्यूरिक अम्ल, लाकडी किंवा प्लॅस्टिकाचे विभाजक पडदे आणि रबराची विविध प्रकारची मिश्रणे वापरली जातात.  

वर वर्णन केलेल्या विद्युत् सामग्रींपैकी काहीचे १९९३-९४ मधील भारातातील उत्पादन कोष्टकात दिले आहे.  

पहा : अभियांत्रिकीय उद्योग केबल विद्युत् संवाहक. 

संदर्भ : C.S.I.R. The wealth of India, industrial products, part-Ill, new Delhi, 1953.

ओक, वा.रा. कोळेकर, श.वा.