रेडिओ ग्राही: (रेडिओ रिसिव्हर) रेडिओ प्रेषण पद्धतीत श्राव्य कंप्रता (सर्वसाधारण श्रोत्याला ऐकू येऊ शकेल अशा १५ ते २०,००० हर्ट्झ कंप्रता म्हणजे दर सेकंदाला होणारी कंपनसंख्या असेलेल्या) संकेताचे वाहक रेडिओ तरंगाच्या साहाय्याने प्रेषण केले जाते. अशा प्रकारचे संकेत ग्रहण करण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनीय प्रणालीचा येथे मुख्यत्वेकरून विचार केला आहे. या प्रणालीत श्राव्य संकेत हा परमप्रसर, कंप्रता अथवा कला विरूपण [⟶ विरूपण] या पद्धतींचा उपयोग करून वाहक तरंगाशी मिश्रित केला जातो. श्राव्य कंप्रता संकेताचे विद्युत् संकेतात रूपांतर करून त्याचे प्रेषण केल्यास प्रेषणक्रियेची कार्यक्षमता अत्यंत अल्प आहे, असे दाखविता येते. तरंगाच्या कंप्रतेचे मूल्य जेवढे जास्त त्या प्रमाणात प्रेषित ऊर्जेचे प्रमाण वाढते. याकरिता उच्च कंप्रतेचे वाहक तरंग संदेशवहनाकरिता वापरून त्यांमध्ये इष्ट श्राव्य संकेत विरूपण करून मिश्रण केला जातो. पुढील विवेचनाच्या सोईकरिता परमप्रसर विरूपण पद्धती प्रेषण क्रियेत वापरली आहे, असे सुरुवातीस गृहीत धऱले आहे. 

प्रकार : ग्राहीच्या ⇨आकाशकावर (अँटेनावर) एकाच वेळी अनेक निरनिराळ्या कंप्रतांचे विद्युत् तरंग पडत असल्यामुळे ग्राहीमध्ये कंप्रता -निवडक्षमता असणे आवश्यक ठरते. त्यामुळे ग्राही इष्ट कंप्रतेच्या वाहक तरंगाचा स्वीकार करून इतर कंप्रतेचा त्याग करतो. वाहक-तरंग -कंप्रता-संकेताचे विवर्धन व शोधन करून मूळ श्राव्य संकेत पुरेशा विवर्धित शक्तीचा मिळविणे ही ग्राहीची मुख्य कार्ये होत. सध्या पुढे नमूद केलेल्या प्रकारचे ग्राही प्रचारात आहेत : (१) मेलित रेडिओ कंप्रता ग्राही, (२) परासंकरण ग्राही, (३) अतिपुनरूत्पादक ग्राही. यांपैकी पहिल्या दोन प्रकारांचा विशेष उपयोग केला जातो. 

मेलित रेडिओ कंप्रता ग्राही : आ. १ मध्ये मेलित रेडिओ कंप्रता ग्राहीचे मूलभूत स्वरूप दाखविले आहे. 

आकाशकावर पडणाऱ्या संकेतांपैकी इष्ट कंप्रेतेचा संकेत मेलकाच्या (मेलित मंडलाच्या) साहाय्याने निवडला जातो. मेलक हा प्रवर्तक (L) व धारित्र (C) यांची समांतर जोडणी करून तयारकेला जातो

आ. १. मेंलित रेडीओ कंप्रता ग्राहीचे मूलभूत स्वरूप

(या मंडल घटकांची आणि त्यांच्या जोडणी प्रकारांची माहिती ‘विद्युत् मंडल’ तसेच ‘प्रत्यावर्ती विद्युत् प्रवाह’ या नोंदींत दिलेली आहे). निरनिराळ्या कंप्रतांचे विद्युत्दाब संकेत याला एकाच वेळी आदान केल्यास त्यांपैकी एकच कंप्रता संकेत प्रदान अग्राकडे पाठविला जातो. स्वीकार संकेत (f) मूल्य खालील सूत्राने मिळते. 

                                       1……….            

                         F =   2pÖLC

यांपैकी एका प्रचलाच्या (विशिष्ट परिस्थितीत निरनिराळी मूल्ये देता येणाऱ्या स्थिर राशीच्या) मूल्यात बदल करून (बहुशः धारकतेच्या मूल्यात बदल करणे सोईस्कर होते) इष्ट त्या कंप्रतेच्या संकेताचा स्वीकार करणे शक्य होते. 

 आ. २. स्फटिक शोधकयुक्त ग्राही (मेलित रेडीओ कंप्रता) : (१) आकाशक, (२) मेलक, (३) स्फटीक शोधक, (४) शिरःश्रवणी.

या प्रकारची अनेक मंडले एकत्र जोडली असता त्यांची कंप्रता-निवडक्षमता वाढविता येते. या L-C मंडलास  

 आ. ३. एक त्रिप्रस्थ नलिकायुक्त मेलित रेडीओ कंप्रता ग्राही (श्राव्य कंप्रता विवर्धनासह) : (१) आकाशक, (२) मेलक, (३) शोधक व विवर्धक, (४) पुनरुत्पादन, (५) शिरःश्रवणी.

आ. ४. एक ट्रँझिस्टरयुक्त मेलित रेडीओ कंप्रता ग्राही (श्राव्य कंप्रता विवर्धनासह) : (१) आकाशक, (२) मेलक, (३) स्फटिकयुक्त शोधक, (४) विवर्धक ट्रँझिस्टर मंडल, (५) पुनरुत्पादन, (६) शिरःश्रवणी.

 

मेलित मंडल म्हणतात. व त्यामध्ये आदान संकेताच्या विद्युत् दाबाचे थोड्या फार प्रमाणात विवर्धनसुध्दा होते. ⇨शोधक या घटकाचे कार्य वाहक तरंग कंप्रतेपासून इष्ट श्राव्य कंप्रता संकेत अलग करणे हे होय. हे कार्य करण्याकरिता त्याला देण्यात येणाऱ्या संकेताची विद्युत्‌ दाब पातळी काही किमान मूल्याची असावी लागते. 

 आ. ५. पाच नलिकांचा मेलित रेडिओ कंप्रता ग्राही (रेडीओ कंप्रता व श्राव्य कंप्रता विवर्धनासह) : (१) आकाशक, (२) मेलक, (३) रेडिओ कंप्रता विवर्धक, (४) श्राव्य कंप्रता शोधक व विवर्धक, (५) श्राव्य संकेत शक्ती विवर्धक, (६) ध्वनिक्षेपक, (७) शक्ती रोहित्र.

ग्राही जर रेडिओ प्रेषण केंद्राच्याजवळ असेल, तर मेलित मंडलाने केलेले विवर्धन पुरेसे होते. हे शक्य न झाले, तर निराळा रेडिओ कंप्रता विवर्धक [⟶ इलेक्ट्रॉनीय विवर्धक़ ] वापरून हे कार्य करावे लागते. शोधकाच्या प्रदान अग्रातून मिळणारा श्राव्य संकेत ध्वनिक्षेपकाला उद्दीपित करण्यास पुरेसा नसतो. म्हणून श्राव्य कंप्रता विवर्धक [⟶ इलेक्ट्रॉनीय विवर्धक] वापरला जातो. प्रेषण केंद्रापासून थोड्या अंतरावर चांगले कार्य करणारा स्फटिक शोधकयुक्त ग्राही आ. २ मध्ये दाखविला आहे.  

या मंडलामध्ये मेलकापासून मिळणारे विवर्धन पुरेसे होते. यामध्ये विद्युत् पुरवठ्याची सुध्दा आवश्यकता लागत नाही. मेलित रेडिओ कंप्रता प्रकारचीच दोन ग्राही मंडले आ. ३ व ४ मध्ये दाखविली आहेत. आ.३ मध्ये दाखविलेली त्रिप्रस्थ नलिका [⟶ इलेक्ट्रॉनीय प्रयुक्ती] ही जालाकाग्र क्षरण अभिज्ञात (ऋणाग्राकडून जालकाग्राकडे जाणाऱ्या इलेक्ट्रॉनांच्या प्रवाहाच्यागळतीचे अस्तित्व ओळखण्याच्या) पद्धतीने शोधन करून शिवाय संकेताचे विवर्धनसुध्दा करते. आ. ४ मध्ये शोधक म्हणून स्फटिक द्विप्रस्थ वापरला आहे. संकेताचे विवर्धन ट्रँझिस्टरद्वारे होते.वरील दोन्ही मंडलांत रेडिओ कंप्रता विवर्धन नसून फक्त श्राव्य कंप्रता विवर्धन योजना आहेत. शेवटी श्राव्य संकेत शिरःश्रवणीद्वारे ऐकू येतो. 

 आ. ५. पाच नलिकांचा मेलित रेडिओ कंप्रता ग्राही (रेडीओ कंप्रता व श्राव्य कंप्रता विवर्धनासह) : (१) आकाशक, (२) मेलक, (३) रेडिओ कंप्रता विवर्धक, (४) श्राव्य कंप्रता शोधक व विवर्धक, (५) श्राव्य संकेत शक्ती विवर्धक, (६) ध्वनिक्षेपक, (७) शक्ती रोहित्र.

आ. ५ मध्ये पाच नलिकांच्या मेलित रेडिओ ग्राहीचे एक मंडल दाखविले आहे. यामध्ये प्रत्यावर्ती (प्रवाहाचे मूल्य आणि दिशा दर सेकंदास वारंवार उलटसुलट बदलणाऱ्या) विद्युत् पुरवठ्यापासून एकदिश (एकाच दिशेने वाहणारा) विद्युत् पुरवठा कसा मिळवला जातो.


(७) याचीसुद्धा कल्पना येईल. यामध्ये आकाशकापासून मिळणारा संकेत मेलकाच्या (२) साहाय्याने निवडून तो रेडिओ कंप्रता मेलित विवर्धनाचे दोन टप्पे वापरून (३) त्याच कंप्रतेला विवर्धित केला जातो. त्यानंतर श्राव्य कंप्रता शोधक विवर्धक (४) वापरून श्राव्य संकेत वाहक तरंगापासून अलग केला जातो. श्राव्य संकेत पुनरूत्पादन ध्वनिक्षेपकाच्या साह्याय्याने करावयाचे असल्यामुळे श्राव्य संकेताचे शक्ती विवर्धन (५) करावे लागते. सर्व ग्राहींमध्ये ध्वनिक्षेपकाच्या आधी शक्ती विवर्धक टप्पा असतोच.

आ. ७. अतिपुनरुत्पादक ट्रँझिस्टरयुक्त ग्राही मंडल (मूलभूत तत्त्व) : (१) आकाशक, (२) मेलक, (३) शोधक व विवर्धक, (४) श्राव्य कंप्रता विवर्धक, (५) पुनरुत्पादक, (६) शिरःश्रवणी.

अतिपुनरुत्पादक ग्राही : अतिपुनरूत्पादक निर्वात नलिकायुक्त व ट्रँझिस्टरयुक्त ग्राही मंडले अनुक्रमे आ. ६ व ७ मध्ये दाखवली आहेत. आ. ६ मधील मंडलात T1 या नलिकेपासून मिळणाऱ्या प्रदान विद्युत् दाब संकेताचा काही भाग L2 व L3 या युग्मित वेटोळ्यांच्या साहाय्याने परत त्याच कलेत (एखाद्या संदर्भाच्या सापेक्ष असणाऱ्या स्थितीत) घन पुनःप्रदाय केला गेला आहे ( आदानामध्ये पुन्हा समाविष्ट केला गेला आहे.) त्यामुळे परिणामी प्रदानात खूप वाढ होते. आ.७ मधील मंडलात Q1 हा ट्रँझिस्टर आ. ६ मधील नलिकेप्रमाणे शोधक व विवर्धक ही दोन्ही कार्ये करतो. L1 व L 2 वेटोळ्यांच्या योगे एकाच कलेतील अथवा घन पुनःप्रदाय होऊन प्रदानात खूप वाढ होते. या प्रदानात रेडिओ कंप्रता व श्राव्य कंप्रता हे दोन्ही घटक असतात. त्यांपैकी रेडिओ कंप्रता घटक C1 या उपमार्गी धारित्रामुळे काढुन टाकला जाऊन, निवळ श्राव्य कंप्रता घटक पुढील श्राव्य कंप्रता विवर्धकाला पुरवला जातो. (४) या अतिरिक्त विवर्धकाची योजना केल्यामुळे अंतिम प्रदान संकेताची तीव्रता खूपच प्रमाणात वाढते. अतिपुनरूत्पादक ग्राहीमध्ये पुनःप्रदायाचे प्रमाण योग्य पातळीवर न ठेवल्यास प्रदानामध्ये विकृती येण्याची संभाव्यता मोठी असते. या कारणामुळे या प्रकारची ग्राही मंडले व्यवहारात फार उपयोगात आणली जात नाहीत. परासंकरण पद्धतीच्या ग्राहीत विकृतीचे प्रमाण सर्वांत कमी असते म्हणून या प्रणाली ग्राहीकरिता विशेष उपयुक्त ठरतात. 

 

परासंकरण ग्राही : परासंकरण ग्राहीचे तत्व आ. ८ मध्ये दाखविले आहे. उदाहरणादाखल रेडिओ वाहक तरंगाची कंप्रता १,००० किलोहर्ट्झ आहे, असे येथे मानले आहे. स्थानिक आंदोलकाद्वारे [⟶ आंदोलक, इलेक्ट्रॉनीय] १,४५६ किलोहर्ट्झ कंप्रतेचा संकेत निर्माण करून त्याचे मिश्रकाच्या साहाय्याने वाहक तरंग संकेताबरोबर मिश्रण करण्यात येते. जवळजवळ कंप्रता असलेल्या दोन संकेतांचे मिश्रण केले असता त्यांमधील ऊर्जा दोन बाजू -पट्ट्यंत (वाहक कंप्रतेच्या वर वा खाली असणाऱ्या कंप्रतांच्या पट्ट्यांत) केंद्रित होते. त्यांपैकी एका बाजू -पट्ट्याची कंप्रता घटक कंप्रतांच्या बेरजेएवढी असते म्हणजे तिचे मूल्य वरील उदाहरणात २,४५६ किलोहर्ट्झ एवढे असेल. योग्य मंडल योजना वापरून हा घटक काढून टाकण्यात येतो. दुसऱ्या बाजू-पट्ट्याची कंप्रता ही दोन कंप्रता घटकांच्या वजाबाकी एवढी म्हणजे येथे ४५६ किलोहर्ट्झ एवढी असते. या घटकाचा उपयोग ग्राहीमध्ये अंतिम श्राव्य संकेत मिळविण्याकरिता करण्यात येतो. या पद्धतीमध्ये निवडक्षमता उच्च प्रतीची असते. 

आ. ९. पंचजालकाग्रयुक्त परिवर्तक नलिका वापरून कंप्रता परिवर्तन करणारे मंडल : (१) आकाशक, (२) मेलक, (३) मिश्रक व स्थानिक आंदोलक, (४) पंचजालकाग्रयुक्त परिवर्तक नलिका, (५) मध्यम कंप्रता प्रदान संकेत (Ebb –नलिकेच्या पट्टिकेस दिलेला एकदिश विद्युत दाब).

आकाशकापाशी दुसऱ्या कंप्रतेचा संकेत ग्रहण करावयाचा असेल, तर स्थानिक आंदोलकाची कंप्रता योग्य प्रमाणात बदलून त्याच (४५६ किलोहर्ट्झ) कंप्रतेचा बाजू-पट्टा संकेत मिळविणे शक्य होते. अशा रीतीने मध्यम कंप्रता संकेताची कंप्रता सर्व परिस्थितींत स्थिर राहत असल्यामुळे मध्यम कंप्रता विवर्धकाचे अभिकल्पन करणे (आराखडा तयार करणे) सुलभ होते.या विवर्धकाची गुणवत्ता उत्तम ठेवून त्याची किंमतही कमी करता येते. या पद्धतीत प्रदान विवर्धित संकेतात विकृतीचे प्रमाणही कमी असते. मिश्रकाला ‘कंप्रता परिवर्तक’ अथवा ‘परासंकरण विरूपक’ अशाही संज्ञा प्रचारात आहेत. 

आ. १०. पाच नलिकांचा परासंकरण रेडिओ ग्राही (मध्यम कंप्रता विवर्धक व श्राव्य शक्ती विवर्धक यांसह) : (१) आकाशक, (२) मेलक, (३) कंप्रता परिवर्तक, (४) मध्यम कंप्रता विवर्धक, (५) श्राव्य कंप्रता शोधक व विवर्धक, (६) श्राव्य शक्ती विवर्धक. 

या पद्धतीत काही नवीन प्रकारचे व्यत्ययकारी दोष निर्माण होऊ शकतात. हे बहुशः ग्राहीच्या निरनिराळ्या विभागांत (उदा., मिश्रक, श्राव्य कंप्रता शोधक) उत्सर्जित झालेल्या हरात्मक तरंग कंप्रतेमुळे (मूलभूत कंप्रतेच्या पूर्णांकी पटीतील कंप्रतेमुळे) येतात. मंडलाचे योग्य अभिकल्पन व मंडलातील तारांचे परीक्षण करून हे परिणाम काढून टाकता येतात.

 आ. ११. पाच ट्रँझिस्टरांचा परासंकरण रेडिओ ग्राही : (१) कंप्रता परिवर्तक, (२) मध्यम कंप्रता विवर्धक, (३) शोधक, (४) श्राव्य शक्ती विवर्धक, (५) श्राव्य प्रदान.

व्यवहारात मिश्रक व स्थानिक आंदोलक यांची कार्ये एकाच विशिष्ट नलिकेच्या (उदा., पंचजालाकाग्रयुक्त परिवर्तक नलिका) द्वारे करता येतात.

पंचजालाकाग्रयुक्त परिवर्तक नलिकेचे कंप्रता परिवर्तनाचे कार्य आ.९ मध्ये दर्शविले आहे. मेलकाने (२) निवडलेल्या संकेत पंचजालकाग्राच्या खालून तिसऱ्या जालकाग्रावर दिला जातो. नलिकेचे ऋणाग्र, पहिले जालाकाग्र आणि पट्टिका यांच्यामुळे हार्टली प्रकारचा आंदोलक [⟶आंदोलक, इलेक्ट्रॉनीय] तयार होतो. याची कंप्रता आंदोलक वेटोळे, T2 आणि घारित्रे C1 व C2 यांमुळे निर्धारित होते.या आंदोलकाकरिता लागणारा जालकाग्रावरचा अवपात (इष्ट कार्यबिंदू प्रस्थापित करण्यासाठी जालकाग्र व ऋणाग्र यांना लावण्यात येणारा एकदिश विद्युत् दाब) R1 व C4 यांच्यामूल्यांनीठरविला जातो.

पाच नलिकांच्या प्रत्यावर्ती व एकदिश विद्युत्म पुरवठ्यांवर चालणाऱ्या परासंकरण रेडिओ ग्राहीचे प्रातिनिधिक मंडल आ. १० मध्ये दाखविले आहे. आतापर्यंतच्या विवेचनावरून आकृतीतील विभाग (५) पर्यंतचे कार्य सहज लक्षात येईल. मंडलात यापुढे एक शक्ती विवर्धक जोडून ध्वनिक्षेपकास भरपूर ऊर्जा मिळेल अशी व्यवस्था केलेली असते. या पद्धतीच्या ट्रँझिस्टर ग्राही मंडलाचे स्वरूप आ. ११ वरून लक्षात येईल.

रेडिओ ग्राहीची गुणवत्ता : ग्राही मंडलाची गुणवत्ता ठरविण्याकरिता खालील गोष्टींचा विचार करण्यात येतो.

संवेदनक्षमता : एका ठराविक तीव्रतेचा प्रदान संकेत मिळण्याकरिता आवश्यक अशा किमान आदान संकेताच्या मूल्याने याचे मापन करता येते. रेडिओ कंप्रता, मध्यम कंप्रता व श्राव्य कंप्रता विभागांतील विवर्धकांच्या कार्यक्षमतेवर ग्राहीची संवेदनक्षमता अवलंबून राहील, हे उघड आहे . विवर्धनाकरिता अधिक टप्पे वापरून संवेदनक्षमता वाढविता येते. नलिका किंवा ट्रँझिस्टर ग्राहीमध्ये या प्रयुक्तींची जेवढी संख्या जास्त तेवढी त्यांची संवेदनक्षमता जास्त असते.

 

निवडक्षमता : इष्ट कंप्रतेचा संकेत अचुकपणे निवडून त्यामध्ये नजीकच्या कंप्रता संकेताचा व्यत्यय किती कमी प्रमाणात होतो यावर या प्रचलाचे मूल्यांकन केले जाते. ग्राहीमध्ये जेवढे जास्त कंप्रता पट्टे असतील त्या प्रमाणात निवडक्षमता जास्त असते. काही आधुनिक ग्राहीं-मध्ये इष्ट रेडिओ केंद्राशी संपर्क जोडण्याकरिता एक अतिरिक्त सूक्ष्म मेलन योजना असते. यामुळे ग्राहीची निवडक्षमता वाढते.

 

तद्‌रूपता : ग्राहीमधून मिळणाऱ्‍या प्रदान संकेताची आदान श्राव्य संकेताशी ज्या प्रमाणात तद्रूपता असते, त्यावरून या गुणधर्माचे मूल्य ठरते. प्रदान संकेतात आदान संकेताची सर्व वैशिष्ट्ये यावीत अशी साहजिकच अपेक्षा असते. ग्राहीचा हा गुणधर्म त्यामधील विवर्धकाच्या व ध्वनिक्षेपकाच्या कंप्रता प्रतिसादावरून निश्नित होतो. उत्तम तद्रूपता असण्याकरिता वरील दोन्ही प्रयुक्तींचा कंप्रता प्रतिसाद वक्र ३० ते २०,००० हर्ट्झ या पट्ट्यात सपाट असावा लागतो. अशा प्रकारच्या ग्राहीस उत्तम तद्रूपी संच म्हणतात. [⟶ उत्तम तद्रूपता ध्वनि प्रणाली].

 

स्थैर्य : ग्राहीला स्थिर परमप्रसर व स्थिर कंप्रता असलेला आदान संकेत दिला असता त्यापासून काही कालखंडात त्याच मूल्याचा संकेत प्रदान संकेत मिळत राहणे, हे या गुणधर्माचे वैशिष्ट्य आहे. ग्राहीला आ. १२. स्वयंचलित तीव्रता नियंत्रण : (१) शोधक, (२) रेढीओ कंप्रता आदान, (३) श्राव्य कंप्रता प्रदान, (४) मागील नलिकांच्या जालकाग्रांकडे.पुरविण्यात येणाऱ्या विद्युत् पुरवठ्याच्या मूल्यात कालानुसार होणारे स्वैर बदल तसेच बदलत्या तापमानामुळे होणारे बदल यांपासून प्रदाना-मध्ये फरक पडू नये याकरिता त्यामध्ये स्थैर्य असावे लागते. काही वेळा ग्राहीमध्ये अनैच्छिक पुनःप्रदान होऊन त्यामध्ये आंदोलने निर्माण होऊन प्रदानामध्ये शिट्टीसारखा आवाज सुद्धा ऐकू येतो. याकरिता ग्राहीला स्थैर्य असणे आवश्यक असते. आंदोलने निर्माण होण्याची संभाव्यता कमी करण्याकरिता मंडलात विशेष योजना करता येते. ऋण पुनःप्रदाय योजना (मूळ संकेताची शक्ती कमी होईल अशा प्रकारे प्रदान संकेताचा काही भाग आदान संकेताला देण्याची योजना) करून ग्राहीचे स्थैर्य वाढविले जाते.

 

संकेत/गोंगाट गुणोत्तर : प्रत्येक ग्राहीमध्ये निरनिराळ्या कारणांमुळे अनावश्यक असे जे संकेत मिळतात त्यांमुळे इष्ट संकेत ग्रहण करण्यामध्ये व्यत्यय येतो. यास गोंगाट म्हणतात. रेडिओ ग्राहीमध्ये ऐकू येणारी घरघर या गोंगाटामुळेच उत्पन्न होते. सर्वसाधारणपणे ग्राहीमध्ये आढळणारे गोंगाटाचे पुढील प्रकार आहेत : (१) नलिकेच्या अरेखीय विकृतीमुळे [⟶ इलेक्ट्रॉनीय प्रयुक्ति] हरात्मक कंप्रता उत्पादन होऊन निर्माण आ. १३. खर्च स्वराच्या कंप्रतेसाठी : (अ) प्रबलक मंडल (आ) निर्बलक मंडल : (१) आदान संकेत (२) प्रदान संकेत.होणारा गोंगाट, (२) रोधकासारख्या मंडल घटकामध्ये उष्णतेमुळे निर्माण होणारा जॉन्सन गोंगाट, (३) मंडलामधील विवर्धकातील नलिकांच्या घटकांच्या तसेच धारित्रे आणि वेटोळी यांसारख्या घटकांच्या कंपनांमुळे निर्माण होणारा ध्वनिग्राहकी गोंगाट, (४) वातावरणीय विद्युत् क्षोभामुळे (उदा., तडित्) येणारा गोंगाट आणि (५) प्रत्यावर्ती विद्युत् पुरवठ्यापासून काही प्रसंगी मिळणारा नाद गोंगाट. चांगल्या ग्राहीमध्ये संकेत/गोंगाट हे गुणोत्तर जितके जास्त तितकी ग्राहीची गुणवत्ता जास्त, हे उघड आहे. यांपैकी बहुतेक सर्व प्रकारच्या गोंगाटांचे प्रमाण, मंडलाचे योग्य अभिकल्पन करून किंवा त्यातील घटकांचा योग्य विन्यास (मांडणी) करून अथवा विशिष्ट प्रकारची अतिरिक्त दमन मंडले त्यात वापरून कमी करता येते. [⟶ विद्युत् गोंगाट].

 

ग्राहीमधील विशेष योजना :स्वयंचलित तीव्रता नियंत्रक : रेडिओ ग्राहीचा ध्वनितीव्रता नियंत्रक स्थिर ठेवला असता सुद्धा काही वेळा ग्राहीपासून मिळणाऱ्या ध्वनी संकेताच्या तीव्रतेत फरक पडतो, असा अनुभव येतो. ही तीव्रता कालानुसार कमीजास्त होते. यास क्षीणीभवन असे म्हणतात. हा परिणाम दूरच्या रेडिओ प्रेषण केंद्रापासून संकेत ग्रहण करीत असताना विशेषेकरून अनुभवास येतो. एक विशिष्ट मंडल वापरून या परिणामाचे प्रमाण कमी करता येते. या मंडलास स्वयंचलित तीव्रता नियंत्रक असे म्हणतात. यामागील तत्त्व आ.१४. उच्चतम स्वराच्या कंप्रतेसाठी : (अ) प्रबलक मंडल (आ) निर्बलक मंडल : (१) आदान संकेत, (२) प्रदान संकेत.असे की, प्रदान अग्री प्रदान संकेताच्या मूल्यात वाढ (किंवा घट) झाल्यास त्यातील काही भाग योग्य कलेत पुनःप्रदाय करून श्राव्य शोधकाच्या मागे जोडलेल्या एक किंवा दोन निर्वात नलिकांच्या जालकाग्रावरील अवपातामध्ये योग्य तो बदल करण्याकरिता वापरतात. त्यामुळे प्रदानाचे मूल्य परत मूळ मूल्यांकावर स्थिरावले जाते. हे कार्य ज्या तऱ्‍हेने केले जाते त्याचे स्वरूप आ. १२ मध्ये दाखविले आहे. (३) या प्रदान अग्री तेथील श्राव्य कंप्रता संकेतात जर काही कारणामुळे वाढ झाली, तर A या बिंदूवरच्या ऋण विद्युत् दाबात वाढ होईल. संकेतातील विद्युत् दाब कालानुसार बदलत असल्यामुळे, त्याच प्रकारचा अतिरिक्त दाब A या ठिकाणी मिळेल. यापासून स्थिर एकदिश विद्युत् दाब मिळविण्याकरिता वरील चल विद्युत् दाबाचा, R2 रोधकाद्वारे C3 हे धारित्र भारित करण्याकरिता उपयोग केला जातो. C3 वरील अशा प्रकारे मिळणारा अतिरिक्त ऋण विद्युत् दाब, शोधकाच्या मागे असलेल्या नलिकेतील जालकाग्रावरचा अवपात जास्त व्यस्त वा ऋण करण्याकरिता वापरला जातो. यामुळे परिणामी शोधकाच्या आदान अग्रावर येणाऱ्‍या संकेताचे मूल्य स्वयंरीत्या कमी होते. आ. १० मध्ये R5 व C11 या घटकांचा या कार्याकरिता उपयोग होतो. यामुळे मिळणारा विद्युत् दाब संकेत VT1 व VT2 या नलिकांच्या जालकाग्रांना देण्यात येतो.

 

आ. १५. रेडीओ ग्राहीमधील खर्ज व उच्चतम स्वरांकरिता वापरलेली प्रबलक व निर्बलक मंडले : (१) खर्ज स्वरासाठी, (२) उच्चतम स्वरासाठी, (३) प्रवलक, (४) निर्बलक, (५) आदान, (६) प्रदान.स्वर नियंत्रण : ध्वनिसंकेताच्या तीव्रतेची पातळी कमी केल्यास मानवी श्रवण प्रणालीची खर्ज व उच्चतम या दोन्ही श्राव्य कंप्रतांकरिता असलेली संवेदनमक्षता कमी होते, असे आढळते. त्यामुळे रेडिओ ग्राहीमध्ये कंप्रता पट्ट्याच्या दोन्ही टोकांस असलेल्या घटकांकरिता प्रबलक व निर्बलक अशी मंडले वापरून त्यांची तीव्रता सापेक्षतेने कमीअधिक करण्याची व्यवस्था केलेली असते. धारित्राचा संरोध (प्रत्यावर्ती विद्युत् प्रवाहाला होणारा एकूण रोध) कंप्रता वाढविल्यास कमी होतो या गुणधर्माचा उपयोग या मंडलांत केलेला असतो. याकरिता (खर्ज स्वराच्या कंप्रतेसाठी) वापरण्यात येणारी मूलभूत मंडले आ. १३ मध्ये दाखविली आहे. आ. १३ (अ) मध्ये लघुकंप्रतेकरिता C2धारित्राचा संरोध R1 आणि R2 यांच्या सापेक्षतेने जास्त असल्यामुळे जवळजवळ सर्व आदान संकेत प्रदान अग्री मिळतो. याउलट आ. १३ (आ) मध्ये जर C1 धारित्राचा संरोध R3 पेक्षा मूल्याने खूप जास्त असेल, तर लघुकंप्रता दाब मुख्यत्वेकरून C1 वर मिळेल व त्याचे प्रमाण प्रदान अग्री कमी होईल.

उच्चतम स्वराच्या कंप्रतेसाठी प्रवलन व निर्बलन करण्यासाठी वापरात असलेली मंडले आ. १४ मध्ये दाखविली आहेत. आ. १५ मध्ये वरील मंडलांच्या प्रत्यक्ष ग्राही मंडलात करण्यात आलेला वापर दाखविला आहे.

यांशिवाय गोंगाटाचे दमन करण्याकरिता विशेष मंडल योजना करण्यात येतात. यामध्ये ऋण पुनःप्रदाय क्रियेचा बराच उपयोग होतो.आ. १६. कंप्रता-विरूपित ग्राहीचे कार्य

 

कंप्रता-विरूपित ग्राही : आतापर्यंत परमप्रसर-विरूपित संकेताच्या ग्राहीच्या कार्याविषयी विवेचन केले आहे. ही पद्धत कमी खर्चाची म्हणून जास्त प्रचारात आहे. कंप्रता-विरूपित पद्धतीने संकेत प्रेषण केल्यास त्यामध्ये संकेत/गोंगाट हे गुणोत्तर खूप जास्त मूल्याचे असते. या प्रकारच्या प्रेषणात मानवनिर्मित गोंगाटामुळे [उदा., क्ष-किरण यंत्रे, निऑन प्रकाशनलिका, ज्यात विद्युत् शलाका निर्माण होतात अशी विद्युत् चलित्र (मोटर) इ. उपकरणे] विकृती निर्माण होण्याचा संभव फार कमी असतो. कंप्रता-विरूपण पद्धतीत वाहक तरंगाची कंप्रता स्थायी मूल्यापासून श्राव्य संकेताच्या परमप्रसरानुसार बदलते परंतु वाहक तरंगाचा परमप्रसर मात्र स्थिरच राहतो [⟶ विरूपण]. संकेत माध्यमातून (वातावरणातून) जाताना जरी वाहक तरंगाच्या परमप्रसरामध्ये काही बदल झाला, तरी ग्राही मंडलामध्ये त्याचा परमप्रसर एका ठराविक स्तरापर्यंत आणून मगच त्याला शोधक विभागात प्रवेश करू देतात. त्यामुळे याचा परिणाम प्रदानात दिसून येत नाही. शोधन क्रियेमध्ये कंप्रता-विरूपित संकेताचे परत परमप्रसर-विरूपित संकेतात रूपांतर होते. आ. १६ मध्ये कंप्रता-विरूपित ग्राही मंडलाचे कार्य तत्त्वतः दाखविले आहे.

या प्रकारच्या प्रेषणाकरिता खूपच उच्च कंप्रतेच्या वाहक तरंगाचा उपयोग करतात (३० मेगॅहर्ट्झ ते कित्येक शेकडो मेगॅहर्ट्झ एक मेगॅहर्ट्झ = १० हर्ट्झ). यामधील मध्यम कंप्रता सुद्धा बरीच जास्त म्हणजे १२ मेगॅहर्ट्झ या मूल्याची असते. या टप्प्याच्या विवर्धकाचा कंप्रता पारक पट्टा १५० किलोहर्ट्झ या रूंदीचा असतो. मऱ्‍यादक या विभागात संकेताच्या परमप्रसरात झालेला अनावश्यक बदल नाहिसा करून पुढील विभेदक/शोधक टप्प्यात एकाच स्थिर परमप्रसराचा कंप्रता-विरूपित संकेत मिळेल अशी व्यवस्था केलेली असते. बहुतेक आधुनिक कंप्रता-विरूपित ग्राहीमध्ये शोधकास विभेदक म्हणतात. या प्रकारच्या ग्राहीत (१) फॉस्टर-सीली विभेदक किंवा (२) गुणोत्तर शोधक [⟶ शोधक] याचाच मुख्यत्वेकरून उपयोग केलेला असतो. ग्राहीचे यापुढील भाग म्हणजे श्राव्य कंप्रता विवर्धक आणि ध्वनिक्षेपक यांचे कार्य आधी वर्णन केलेल्या ग्राहींमधील भागांप्रमाणेच असते.

 

ग्राही आकाशक : ग्राहीकरिता आकाशकाची निवड करताना त्याद्वारे (१) महत्तम विद्युत् शक्ती शोषली जावी, (२) ग्राह्य संकेतात संकेत/गोंगाट या गुणोत्तराचे प्रमाण उच्च असावे, (३) मिळणाऱ्‍या संकेतात व्यत्ययाचे प्रमाण किमान असावे. आकाशकाला चांगल्या प्रमाणात दिशादर्शिकत्त्व (दिशेची निवड करण्याचा गुणधर्म) असल्यास व त्याची योग्य दिशेने स्थापना केल्यास त्यापासून मिळणाऱ्‍या संकेत ऊर्जेचे प्रमाण वाढविता येते पण आकाशकाची निवड व रचना ठरविताना त्यासभोवती असलेला परिसर, संकेत तरंगाची लांबी, संकेत येण्याची दिशा, ग्राहीच्या मंडलाचे स्वरूप इ. बाबींचा सुद्धा विचार करावा लागतो. परिसरात असणाऱ्‍या गृहोपयोगी व कारखानदारीकरिता प्रस्थापित केलेल्या विद्युत् पुरवठा करणाऱ्‍या तारा आणि त्यांमध्ये उपयोगात येत असलेली विद्युत् यंत्रे यांमुळे जो उपद्रव होऊ शकतो तोदेखील लक्षात घ्यावा लागतो. आकाशकापैकी काही वेटोळी चौकटीच्या स्वरूपात असतात व त्याची दोन्ही टोके ग्राहीस जोडावी लागतात. याउलट काही उघड्या टोकाची असतात. यामध्ये आकाशकाचे दुसरे टोकच फक्त ग्राहीला जोडलेले असते. या दुसऱ्‍या प्रकारचे आकाशक कोणत्याही दिशेकडून येणाऱ्‍या व कोणत्याही कप्रतेच्या तरंगाकरिता काम देऊ शकतात. त्यामुळे आकाशकाचा हाच प्रकार जास्त प्रचारात आहे. प्रेषणकेंद्र ग्राहीपासून फार दूर नसेल, तर या आकाशकांमधून पुरेशी ऊर्जा मिळू शकते व त्यामधील कमी प्रमाणाच्या दिशादर्शिकत्वापासून काही फारसा तोटा होत नाही [⟶ आकाशक].

 

पृथक् संकेत ग्रहण : अतिदूरच्या अंतरावरील प्रेषणकेंद्रापासून मिळणारे तरंग पृथ्वीच्या वर असलेल्या ⇨आयनांवरामुळे परावर्तित होत असल्याने ग्रहण करता येऊ शकतात, हे सर्वश्रुतच आहे [⟶ रेडिओ तरंग प्रसारण]. या परावर्तित ⇨विद्युत् चुंबकीय तरंगांमध्ये अंशतः ध्रुवीकरण होते म्हणजे त्याच्या विद्युत् क्षेत्र सदिशामध्ये क्षितिजसमांतर घटकाचे सरासरी प्रमाण अधिक होते. आयनांबरातील अस्थिरतेमुळे या घटकाचे मूल्य बऱ्‍याच वेळा बदलत असते. त्यामुळे ग्राहीद्वारे मिळणाऱ्‍या संकेताची तीव्रता कमीजास्त होऊन त्यामुळे क्षीणीभवन हा परिणाम अनुभवास येतो. ग्राहीमध्ये स्वयंचलित तीव्रता नियंत्रण योजनेमुळे या परिणामाचा निरास होऊ शकतो पण याचे प्रमाण फारच वाढले, तर या योजनेचा उपयोग होऊ शकत नाही कारण प्रदान संकेताच्या तीव्रतेत या मंडलामुळे जी वाढ होते त्याच वेळी गोंगाटाचे प्रमाणही खूप वाढते व त्यामुळे ही योजना वापरण्यात फायदा राहात नाही. पृथक् ग्रहण क्रिया वापरून वरील दोघाचे पुष्कळ प्रमाणात निराकरण करता येते. या पद्धतीत (१) पृथक् स्थानीय व (२) पृथक् कंप्रता असे दोन प्रकार प्रचारात आहेत. पहिल्या प्रकारात एकाच कंप्रतेचे तरंग एकाच वेळी भिन्नभिन्न स्थळी असलेल्या अनेक आकाशकांच्या द्वारे प्रथम ग्रहण केले जातात. या आकाशकांचे परस्परांमधील अंतर ग्राह्य तरंगलांबीच्या अनेक पटींनी जास्त असल्यामुळे यांतील काही आकाशकांमध्ये ग्रहण केले गेलेले संकेत जरी क्षीण असले, तरी त्यांपैकी एखाद्या आकाशकामध्ये येणाऱ्‍या संकेताची तीव्रता पुरेशी असण्याचा संभव असतोच. या सर्व आकाशकांकडून मिळालेले संकेत एकत्रित करून ग्राहीला पुरवले जातात.

पृथक् कंप्रता ग्रहण पद्धतीत ग्राह्य संकेत हा एकाच वेळी निरनिराळ्या कंप्रतांच्या प्रेषण केंद्रांपासून उपलब्ध असावा लागतो. त्यामुळे इष्ट संकेत एकाच वेळी अनेक आकाशकांमधून तितक्याच ग्राहींतून प्रदान केला जातो. मागील पद्धतीप्रमाणे या सर्व ग्राहींची प्रदाने एकत्रित केली जातात. आयनांबराच्या अस्थिरतेमुळे सर्व कंप्रतांचे संकेत एकाच क्षणी क्षीण होत नाहीत, या तत्त्वाचा उपयोग या पद्धतीत केला जातो.

पहा : आंदोलक, इलेक्ट्रॉनीय आकाशक इलेक्ट्रॉनीय प्रयुक्ति इलेक्ट्रॉनीय विवर्धक शोधक.

संदर्भ : 1. American Radio Relay Lengue, Radio Amateur’s Handbook, Newington, Conn.,

       1979.

    2. Carr, J. J. The Complete Handbook of Radio Receivers, 1980.

    3. Henderson, H. Radio Reception, New York, 1963.

    4. Henney, K. Radio Engineering Handbook, New York, 1959.

    5. Langford-Smith, F. Radio Engineer’s Handbook, London, 1963.

    6. Marcus, W. Levy. A. Elements of Radio Servicing, St. Lonis, 1967.

    7. Mitial,G. R. Applied Electronics, Delhi, 1971.

    8. Sluezberg, M. Osterheld, W. Essentials of Radio-Electronics, Tokyo, 1961.

          9. Terman, F. E. Electronic and Radio Engineering, New York, 1955.                         

                                               चिपळोणकर, व. त्रिं. जोशी, मु. य.