मेयो, लॉडर्र रिचर्ड साउथवेल बूर्क : (२१ फेब्रुवारी १८२२–८ फेब्रुवारी १८७२). ब्रिटिशांकि त हिंदुस्थानचा गर्व्हनर-जनरल व व्हाईसरॉय (कार १८६९–७२). त्याचा जन्म डब्लिन (आर्यंलंड) येथे आयरिश सरदार घराण्यात झाला. ट्रिनिटी महाविद्यालय (डब्लिन) येथून त्याने पदवी घेतली. तत्पूर्वी बहुतेक युरोपीय देशांचा त्याने प्रवास केला होता. (१८३८–३९). १८४५ मध्ये त्याने रशियाचा प्रवास केला आणि सेंट पीटर्सबर्ग अँड मॉस्को हे प्रवासवर्णन लिहिले. नंतर आर्यंलंडमधील दुष्काळग्रस्त भागात त्याने काम केले. या कार्या मुळे त्याची १८४७ मध्ये किल्‌डेअरमधून ब्रिटिश संसदेवर निवड झाली. सु. वीस वर्षे तो संसदेचा सदस्य होता. लॉर्ड लेकॉनफील्ड याची मुलगी ब्लांची विनडॅम हिच्याशी त्याचे लग्न झाले. (१८४८). त्याच्या चुलत्याच्या मृत्यूनंतर त्याच्या घराण्याकडे आर्यंलंडची सरदारकी आली व नास हे बिरुद मिळाले. (१८५२) त्याला आर्यंलंडचे मुख्य सचिव करण्यात आले. (१८५२–६६). आर्यंलंडच्या राजकीय चळवळीत राजद्रोहाला त्याचा कणखर विरोध होता तथापि धार्मिक बाबतीत किंवा जमिनीची नुकसानभरपाई देण्यासंबंधी तो समझोत्याची भूमिका अंगी कारीत असे. हिंदुस्थानात व्हाईसरॉय म्हणून मेयोची नियुक्ती झाली (१८६८) पुढे ग्लॅडस्टननेही त्यास मान्यता दिली. नंतर मेयोला सेंट पॅट्रिक् सची सरदारकी देण्यात आली. इजिप्तला धावती भेट देऊन मेयो जानेवारी १८६९ मध्ये हिंदुस्थानात व्हाईसरॉय म्हणून आला. यावेळी वायव्य सरहद्दीवरून रशियाचे संभाव्य आक्रमण आणि अफगाणिस्थानातील अंतर्गत यादवी हे दोन प्रमुख प्रश्न होते. त्यासाठी अफगाणिस्थानचा आमीर शे रअली याची त्याने अंबाल्याला भेट घेतली (मार्च १८६९). त्यांच्यात समझोता करार झाला पण मेयोने तहाला मान्यता दिली नाही तसेच वारस म्हणून त्याच्या अब्दुल्ला जान या मुलासही संमती दिली नाही मात्र ब्रिटिशां च्या सहकार्याचे आश्वासन त्यास दिले. एकूण सरहद्दीवरील सत्ताधीशांशी त्याचे धोरण समझोत्याचे होते. त्यांनतर त्याने ईशान्य भारतातील लुशाई टोळ्यांचा बंदोबस्त केला (१८७१–७२). त्याने शासनाची खालावलेली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मिठावर कर लादला आणि अर्थखात्याचे विकेंद्रीकरण केले. त्यामुळे इलाखे आणि केंद्र यात खर्चाची विभागणी झाली. आणि पैसा उपलब्ध झाला. त्यातून पाटबंधारे, रेल्वे, सार्वजनिक बांधकाम, जंगले यांच्या विकासासाठी आवश्यक ते अर्थसहाय्य दिले. त्याच्याच कारकीर्दीत हिंदुस्थानात शिरणगती करण्याची पद्धत सुरू झाली (१८७०). सांख्यिकीय पद्धतीने त्याने देशाच्या प्रगतीचा आढावा घेऊन कृषी व व्यापार विभाग सुरू केला. अजमीर येथील यूरोपीयन धर्तीवरचे मेयो कॉलेज त्याच्याच प्रेरणने सुरू झाले. स्थिरस्थावर झाल्याने त्याने हिंदु स्थानातील अनेक स्थळांना भेटी दिल्या. अंदमानला तो आला असता, पोर्ट ब्लेअर येथे शेरअली नावाच्या अफगाण कैद्याने त्याचा खून केला.

संदर्भ : 1. Hunter, W. W. The Earl of Mayo and the Consolidation of Queen’s Rule in India, Oxford, 1931.  

            2. Hunter, W. W. Life of Lord Mayo, Oxford, 1929.

देवधर, य. ना.