ब्यूट:  ही भौगोलिक संज्ञा फ्रेंच भाषेतील असून तिचा सर्वसाधारण अर्थ टेकडीवजा उंचवटा असा होतो. ही संज्ञा विशेषतः अमेरिकेच्या पश्चिम भागातील अशा प्रकारच्या भूआकारंस उद्देशून वापरली जाते. सपाट पृष्ठाच्या भूभागाचे,

तांबड्या वालुकाश्माचा ब्यूट,कँब्रीया,वायोमिंग राज्य,अमेरिका

म्हणजे टेबललँडचे, मोठ्या प्रमाणात व  दीर्घकाळ क्षरण होऊन ब्यूटची निर्मिती होते.⇨मेसां पासून विदारणाने अलग झाल्यामुळे सभोवतालच्या भूप्रदेशात ठसठशीतपणा उठून दिसणारा टेकाडासारखा भूआकार म्हणजे ब्यूट होय. ॲरिझोना व न्यू मेक्सिको राज्यांत ब्यूट आढळतात. माँटॅना राज्यात खडक-मातीच्या ढिगासही ब्यूट म्हटले जाते. कॅलिफोर्नियातील एका लाव्हा शंकूस ‘लॅसन ब्यूट’ असे नाव आहे. ओसाड, निमओसाड प्रदेशांतही ब्यूट आढळतात.

 

पहा : मेसा.                                    

सावंत, प्र.रा. करमरकार, प्र. र.