बैगा : भारतातील मध्य प्रदेशातील विशेषतः मंडला, विलासपूर, बालाघाट दुर्ग या जिल्ह्यात आढळणारी एक आदिवासी जमात. छत्तीसगढ भागातील बैगा-चाक हे त्यांचे मूळ ठिकाण. वांशिकदृष्ट्या मुंडा किंवा कोलारियन वंशाची ती शाखा असावी. बैगांच्या सात शाखा असून त्या विविध भू-विभागांत राहतात. प्रत्येकामध्ये स्थानिक वैशिष्ट्ये आढळतात. बैगा दिसायला सुंदर, कसदार शरीरयष्टीचे व लांबट मस्तिष्काचे आहेत. कमरेभोवती केवळ एक फडके हा स्त्रियांचा पारंपारिक वेष असून त्या चांदीचे व बीडचे विविध दागिने परिघान करतात.
कुटकीची पेज, भात, क्वचित मासे, आणि हंगामी फळे ही त्यांचे अन्न असून ही जमात गोत्रांची एक जात होते. जात आंतरवैवाहिक तर गोत्रे बहिर्वेवाहिक असतात.
आते-मामे भावंडांचा विवाह अधिमान्य असून विधवा-विवाह व सेवा-विवाह मंजूर आहेत. बहुपन्नीत्वाच्या प्रथेला विशेष महत्व दिले जाते. पंचांसमोर गगवताची काडी मोडून काउीमोड घेऊ शकतात.
नूतन अर्भकाच्या रूपाने कुटुंबातील पूर्वजच आले, असे समजून चांदीचा तुकडा बुडविलेल्या पाण्याने त्याचे पाय धुतात, तीर्थ म्हणून ते पाणी पितात. जावळाचे वेळी मामाकडून बालकाच्या नामकरणविधी करतात.
बैगांत भूत-बाधा, जादू-टोण्यामुळे मृत्यू येतो, अशी समजूत आहे. दफन करताना कोयता, सुप व वाळफा भोपळा प्रेताच्या शेजारी ठेवतात. घुबडांना बही देतात. त्यातील मुताच्या नावाचा वाटा काढून बाकीचा खाऊन टाकतात. वाघाच्या हल्ल्यामुळे मृत्यू आल्यास, मृतांस शांती मिळवण्याकरता, तसेच त्या वाघाचा परत कोणावर हल्ला होऊ नये म्हणून खास विधी करतात. दसरा, होळी, व हरळी देवीचा उत्सव साजरे करतात. निसर्गाला देव मानतात. बडादेव (उंबराचे झाड), ठाकूर देव (गावची जमीन व सीमा), दुनहादेव (रोगराई व अपघात) व भीमसेन (पाऊस) यांचे पूजन करतात.
यांना घनदाट अरण्यात राहण्याची आवड असून २०-२५ घरांचे गाव असते. बदलत्या शेती-पद्धतीमुळे टिकाऊ घरे ते बांधत नाहीत.
मंढके, म. वा.
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..