बेर्यमान, याल्मार फ्रेड्रिक एल्गेरस : (१९ नोव्हेंबर १८८३-१ जानेवारी १९३१). स्वीडिश नाटककार आणि कादंबरीकर. जन्म स्वीडनमधील अरब्रू ह्या शहरी. शिक्षण अप्साला विद्यापीठात. Maria, Jesu moder (१९.५, इं.शी.) ही त्याची पहिली नाट्यकृती. येशू ख्रिस्त आणि कुमारी मेरी ह्यांच्याकडे पाहण्याचा एक मौलिक मानसशास्त्रीय दृष्टीकोण मांडण्याचा त्याचा प्रयत्न ह्या नाट्यकृतीतून दिसून येतो. पुढे संकुल मानसिक अवस्थांचे प्रभावी चित्रन हे त्याच्या एकुनच लेखनाचे एक लक्षणीय वैशिष्ट्य होऊन बसले. Marionettspel (१९१७) व Swedenhielms (१९२५) ह्या त्याच्या उत्कृष्ट नाट्यकृतींपैकी काही होत.
`हिज ग्रेसीस बिल'(१९१०, इं. शी.),`गॉड्सऑर्किट'(मुळ १९१९, इं. भा. १९२४),`दाय रोडऍडदाय स्टाफ'(मूळ १९२१, इं. भा.१९३७) ह्या त्याच्या काही विशेष उल्लेखनीय कादंबऱ्या. मानवी मनात खोल शिरण्याची त्याची प्रवृत्ती ह्या कादंबऱ्यातही दिसून येते. बर्लिनमध्ये तो निधन पावला.
कुलकर्णी, अ.र.