बेंद्रे, दत्तात्रेय रामचंद्र:(३१ जानेवारी १८९६ – २६ ऑक्टोबर १९८१). भारतीय ज्ञानपीठ पुरस्कारविजेते प्रख्यात कन्नड कवी. बेंद्रे यांचे मूळ घराणे रत्नागिरी जिल्ह्यातील केळशीचे. हे बेंद्रे कुटुंब पूर्वी कारणपरत्वे तासगाव, शिरहट्टी व शेवटी धारवाड येथे स्थायिक झाले. धारवाड येथे एका गरीब कुटुंबात कवी दत्तात्रेयरामचंद्र बेंद्रे यांचा जन्म झाला. ‘अंबिकातनयदत्त’ या टोपणनावाने ते कर्नाटकात प्रसिद्ध आहेत.

बेंद्रे यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण धारवाडलाच झाले. पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयातून ते बी. ए. झाले. पुढे मुंबई विद्यापीठातून एम्. ए. पदवी त्यांनी घेतली. १९१८ – ३२ पर्यंत व्हिक्टोरिया हायस्कूल व राष्ट्रीय शाळा धारवाड तसेच गदग, हुबळी इ. ठिकाणी त्यांनी शिक्षक म्हणून नोकरी केलीद. रा. बेंद्रे. ‘नरबली’ या कवितेमुळे १९३२ साली त्यांना तुरुंगवास आणि अज्ञातवास भोगावा लागला. १९४३ पर्यंत त्यांच्या जीवनात स्थिरता नव्हती. नंतर पुण्यातील कॉमर्स कॉलेजमध्ये कन्नडभाषासाहित्याचे प्राध्यापक म्हणून व न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इंग्रजीचे अध्यापक म्हणून ते होते. १९४४ ते ५६ पर्यंत सोलापूर येथील डी. ए. व्ही. कॉलेजमध्ये त्यांनी कन्नडचे प्राध्यापक म्हणून काम केले. १९५६ ते ६६ पर्यंत आकाशवाणीच्या धारवाड केंद्रावर तत्त्वचतुषअटयी सल्लागार म्हणून ते काम पाहत. बेंद्रे यांची मातृभाषा मराठी परंतु १९१६ च्याही आधीपासून त्यांनी मराठी, कन्नड, इंग्रजी व संस्कृतमध्ये कविता रचण्याची साधना केली. १९२२ मध्ये कृष्णाकुमारी नावाचे त्यांचे छोटेसे कथाकाव्य प्रकट झाले. गरी (१९३२), सखीगीत (१९३७), नादलीले (१९३८), मेघदूत (१९४३), गंगावतरण (१९५१), अरळुमरळु (१९५७), नाकु तंती (१९६४), श्रीमाता (१९६८), इदु नभोवाणी (१९७०), मत्ते श्रावण बंतु (१९७३), चतुरोक्तिमत्तु इतर कवनगळु (१९७८) इ. त्यांचे २६ कवितासंग्रह आजवर प्रसिद्ध झाले आहेत. बाहत्तर (१९६९), विनय (१९७२), ओलवे नम्म बदुकु (१९७७) हे त्यांच्या निवडक कवितांचे संग्रह आहेत.

तत्त्वचतुषअटयी मत्तु विर्शे (१९३७), विचार मंजरी (१९४०), महाराष्ट्र तत्त्वचतुषअटयी (१९५९), कन्नड तत्त्वचतुषअटयीदल्लि नाल्कु नायकरत्नगळु (१९६८), हत्तु उपन्यासगळु (१९७२), तत्त्वचतुषअटयीद विराट स्वरूप (१९७४) इ. त्यांचे नऊ तत्त्वचतुषअटयीसमीक्षापर ग्रंथ आहेत. हच्चाटगळु (१९३६, पाच एकांकिकांचा संग्रह) व होस संसारमत्तु इतर नाटकगळु (१९५०, चार नाटकांचा संग्रह) असे त्यांचे दोन नाट्यसंग्रह आहेत. निरामरण सुंदरी (१९४०) मध्ये त्यांच्या काही कथा, ललित निबंध व विनोदी गीते आहेत. संवाद (१९६५) या त्यांच्या मराठी गद्यपद्यसंग्रहास १९६५ चे न. चिं. केळकर पारितोषिक मिळाले आहे. विठ्ठल संप्रदाय (१९६५) व संतमहंतांचा पूर्ण शंभू विठ्ठल (१९८०) हे त्यांचे वैचारिक स्वरूपाचे मराठी ग्रंथ आहेत. १९५८ मध्ये बेंद्रे यांच्या कन्नड अरळुमरळु (सूर्यपान, हृदयसमुद्र, मुक्तकंठ, चैत्यालयजीवनलहरी या पाच काव्यांचा गुच्छ) या संग्रहास तत्त्वचतुषअटयी अकादमीपुरस्कार प्राप्त झाला. गुरू गोविंदसिंग, कबीर वचनावली, अरविंदांचे भारतीय नवजन्म, रवींद्रनाथ टागोर यांच्या १०१ कविता यांचा कन्नड अनुवादही त्यांनी प्रसिद्ध केला. सौंदर्यलहरी, रमणहृदय, आनंदलहरी, अनुभवामृत इ. संतवाङ्‌याचा त्यांनी कन्नडमध्ये पद्यानुवाद केला आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळातील एक सर्वश्रेष्ठ कन्नड कवी व स्वच्छंदतावादी कन्नड काव्याचे अर्ध्वयू म्हणून त्यांना कन्नड साहित्यात मानाचे स्थान आहे. बेंद्रे यांच्या काही कन्नड कविता जर्मन तसेच हिंदी, संस्कृत आणि इतर भारतीय भाषांतही अनुवादित झाल्या आहेत. १९६६ मध्ये म्हैसूर विद्यापीठाने व १९६८ मध्ये कर्नाटक विद्यापीठाने त्यांना सन्मान्य डॉक्टरेट पदवी देऊन त्यांचा गौरव केला. १९६८ साली भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ दिली. १९६९ साली तत्त्वचतुषअटयी अकादमीचे ‘फेलो’ म्हणून त्यांची निवड झाली. १९६६ पासून कर्नाटक राज्याने त्यांना आजन्म निवृत्तिवेतन सुरू केले. १९७२ मध्ये कर्नाटक राज्याने बेंद्रे यांच्या जीवनाविषयी एक साक्षीचित्र काढले.

नाकु तंती ह्या १९६४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या काव्यसंग्रहास १९६२-६६ या कालातील भारतीय साहित्यांतील सर्वोत्कृष्ट ललित कृती म्हणून १९७३ साली भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार लाभला. नाकु तंती (म. शी. चार तंतू वा तारा) मध्ये एकूण ४४ कविता आहेत. यांतील सहा कवितांचा (समकालीन लेखकांशी व लोकशाहीशी संबंधित) अपवाद सोडल्यास उर्वरित सर्व कवितांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशी वैचारिक – भावनिक एकात्मता आढळते. ही एकात्मता ‘चार’ ह्या प्रतिमेची असून ती ह्या सर्वच कवितांचे संरचनात्मक तत्त्व म्हणून वापरली आहे. ‘नाकु तंती’ ह्या शीर्षकाच्या कवितेत कवीच्या व्यक्तिमत्त्वाची चार अंगे वर्णिली आहेत. मी, तू, ते आणि कल्पक आत्मा ही चार अंगे असलेलेकवीचे व्यक्तीमत्त्व आध्यात्मिक व सौंदर्यात्मक अनुभवाच्या सर्वच क्षेत्रांत ह्या ‘चार’ तत्त्वांचा शोध घेते. संग्रहातील सहा सुनीतांतून काव्यनिर्मितीप्रक्रियेचा विषय हाताळला असून त्यातही काव्याच्या चार मूलघटकांचे – शब्द, अर्थ, लय व सहृदय-वर्णन आले आहे. दुसऱ्या एका कवितेत प्रतिमांना साकार करणाऱ्या वाणीच्या परा, पश्यंती, मध्यमा व वैखरी ह्या चार प्रकारांचे वर्णन आहे. त्यांच्या सौंदर्यकल्पनेसही ऐंद्रिय, कल्पनात्मक, बौद्धिक व आदर्शात्मक ही चार अंगे असून ती त्यांच्या सर्वच कवितांचे अधिष्ठान आहे.

 त्यांच्या कवितांतील ही अधिष्ठानभूत तत्त्वचतुषअटयी भावली नाही, तर त्यातील सघन अर्थवत्ता व जटिल संश्लिष्टता आकलन होणे कठीण जाते. नाकु तंतीतील काव्याचा हेतू केवळ अनुभवाची नवीन क्षेत्रे धुंडाळणे हाच नसून परिचित अनुभवांचाही नव्या दृष्टीने अर्थ लावणे व विवरण करणे हा आहे. कवी विश्वाशी असलेल्या आपल्या नात्याचा कवितेद्वारे शोध घेतो आणि ह्या विश्वाचे नियमन करणाऱ्या तत्त्वाचे विवरण आत्मशोध घेण्याच्या प्रयत्नातून करतो. हे संवाद (हार्मनी) तत्त्व आत्मसात करणे अवघड असले, तरी अपरिहार्यही आहे. या संग्रहाची शेवटची कविता ‘शिशुमार देवतेचे अंगाईगीत’ ही असून तीत देवतेचा जन्मोत्सव वर्णिला आहे. हा जन्म मानवतेच्या सर्व स्वप्नांच्या, आकांक्षांच्या साक्षात्काराचे, साफल्याचे प्रतिक आहे.

अरविंद ‌तत्त्वचतुषअटयी व तत्त्वज्ञान यावरील बेंद्रे यांचे लिखाण त्यांच्या तत्त्वचतुषअटयी द विराट स्वरूपमध्ये संग्रहीत आहे.

धारवाडच्या गेळेयर गुंपू या अभ्यासंमडळाच्या निर्मितीत बेंद्रे यांचा सिंहाचा वाटा आहे. गेळेयर गुंपूमध्ये असलेले मित्रमंडळी आज कर्नाटकात प्रख्यात लेखक म्हणून प्रसिद्धी पावली आहे. बेंद्रे यांनी काही काळ जीवन, जयकर्नाटक, वाग्भूषणस्वधर्म या कन्नड पत्रिकांचे संपादक म्हणूनही काम पाहिले. १९४३ मध्ये शिमोगा येथे भरलेल्या सत्ताविसाव्या कन्नड तत्त्वचतुषअटयी संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना बहाल करून त्यांच्या ‌तत्त्वचतुषअटयीसेवेचा गौरव करण्यात आला.

आधुनिक कन्नड काव्याच्या संदर्भात बेंद्रे यांनी केलेले कार्य थोर व मौलिक स्वरूपाचे आहे. लोकपरंपरांचा वापर करून त्यांनी कन्नड भाषेला सामर्थ्य आणि लवचिकपणा तर प्राप्त करून दिलाच पण तिला तरल मानवी भावना व अनुभव यांच्या आविष्काराचे एक समर्थ साधनही बनविले. गूढवादाचा शोध घेणाऱ्या श्रेष्ठ प्रतीच्या भावकवितारूपाने त्यांनी कन्नड काव्य अधिक समृद्ध व संपन्न केले. निसर्ग, प्रेम, देशभक्ती, सामाजिक जाणीव व आध्यात्मिक चिंतन ही त्यांची आवडती विषयसूत्रे आहेत. गांधीयुगातील सर्वश्रेष्ठ स्वच्छंदतावादी कन्नड कवी म्हणून त्यांना कर्नाटकात मानाचे स्थान आहे. मुंबई येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ: Gokak, V. K. D. R. Bendre: Poet and Seer, Bombay, 1970.

बेंद्रे, वा. द.