मायर्स, फ्रेडरिक विल्यम हेन्री : (६ फेब्रुवारी १८४३–१७ जानेवारी १९०१). इंग्रज कवी, समीक्षक, निबंधकार व अतींद्रिय मानसशास्त्राचे प्रसिद्ध संशोधक. जन्म इंग्लंडमधील कंबर्लंड परगण्यातील केझिक ह्या गावी. केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रिनिटी महाविद्यालयातून पदवी घेतल्यावर ते १८६५ मध्ये तेथेच अभिजात वाङ्मयाचे अधिव्याख्याते म्हणून नियुक्त झाले १८७२ पासून त्यांनी ही नोकरी सोडून दिली व शिक्षण निरीक्षक म्हणून नोकरी पत्करली.
सुरूवातीस त्यांनी काही काव्यरचनाही केली. सेट पॉल (१८६७) आणि द रिन्यूअल ऑफ यूथ (१८८२) हे त्यांचे दोन काव्यग्रंथ होत. वाङ्मयीन क्षेत्रातील त्यांचे संस्मरणीय कार्य म्हणजे १८८३ मध्ये प्रसिद्ध झालेले एसेज क्लासिकल व एसेज मॉर्डन हे त्यांचे निबंधग्रंथ होत. वर्ड्स्वर्थच्या काव्याचा त्यांचा व्यासंग गाढा होता. त्यांच्या वड्स्वर्थ (१८८१) या समीक्षापर ग्रंथावरून याचा चांगला प्रत्यय येतो.
उत्तरायुष्यात ते अतींद्रीय मानसशास्त्राच्या संशोधनाकडे वळले आणि हे क्षेत्र अखेरपर्यंत त्यांचे जीवीतकार्य होऊन राहिले. प्रा. सिज्विक, रिचर्ड हॉजसन, एडमंड गर्नी व फ्रँक पॉडमोर यांच्या सहकार्याने त्यांनी १८८२ मध्ये ‘सायकिकल रिसर्च सोसायटी’ ची स्थापना केली. या संस्थेच्या आरंभीच्या काळात तिची संपूर्ण धुरा प्रामुख्याने मायर्स यांनीच वाहिली. संस्था-सदस्यांच्या आत्यांतिक मतांच्या रस्सीखेचीत वैज्ञानिक दृष्टी मंदावू न देता मायर्स यांनी मोठ्या कौशल्याने संस्थेच्या कार्यास योग्य ती दिशा दिली. या कार्यासाठी त्यांनी घेतलेल्या अविश्रांत परिश्रमांची साक्ष त्यांच्या ह्यूमन पर्सनॅलिटी अंड इट्स सर्व्हायव्हल ऑफ बॉडिली डेथ (२ खंड, १९०३) ह्या मौलिक ग्रंथावरून पटते. पॉडमोर व गर्नी यांच्या समवेत त्यांनी फँटझम्स ऑफ द लिव्हिंग (२ खंड, १८८६) हा ग्रंथ लिहिला. त्यांनी सायकिकल रिसर्च सोसायटीच्या इतिवृत्तांतूनही एतद्विषयक अनेक लेख लिहिले. कोणत्याही ज्ञात अतींद्रिय घटनेचा त्यांनी शेवटपर्यंत वैज्ञानिक दृष्टीने पाठपुरावा केला. त्यांच्या वर उल्लेखिलेल्या ह्यूमन पर्सनॅलिटी….. ह्या महत्त्वपूर्ण ग्रंथाविषयी ⇨ विल्यम जेम्स यांनी म्हटले आहे, की भास, संमोहन निद्रा, संचारलेखन, दुहेरी व्यक्तिमत्त्व आणि माध्यम या सर्वांचा एकाच विषयाची ही विविध अंगे होत, ह्या दृष्टीने विचार करण्याचा मायर्स यांचा हा आद्य प्रयत्न आहे. मायर्स यांचा सायन्स अंड अ फ्यूचर लाइफ हा ग्रंथ १८९३ मध्ये प्रसिद्ध झाला. सायकिकल रिसर्च सोसायटीचे एक संस्थापक, अध्वर्यू आणि अतींद्रिय मानसशास्त्राचे आरंभीचे संशोधक म्हणून त्यांचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. रोम येथे ते निधन पावले.
पहा : अतींद्रीय मानसशास्त्र.
संदर्भ : James, William, Memories and Studies, New York, 1911.
कुलकर्णी, वा. मा.
यर्स, फ्रेडरिक विल्यम हेन्री : (६ फेब्रुवारी १८४३-१७ जानेवारी १९०१). इंग्रज कवी, समीक्षक, निबंधकार व अतींद्रिय मानसशास्त्राचे प्रसिद्ध संशोधक. जन्म इंग्लंडमधील कंबर्लंड परगण्यातील केझिक ह्या गावी. केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रिनिटी महाविद्यालयातून पदवी घेतल्यावर ते १८६५ मध्ये तेथेच अभिजात
वाङ्मयाचे अधिव्याख्याते म्हणून नियुक्त झाले १८७२ पासून त्यांनी ही नोकरी सोडून दिली व शिक्षण निरीक्षक म्हणून नोकरी पत्करली.
सुरूवातीस त्यांनी काही काव्यरचनाही केली. सेट पॉल (१८६७) आणि द रिन्यूअल ऑफ यूथ (१८८२) हे त्यांचे दोन काव्यग्रंथ होत. वाङ्मयीन क्षेत्रातील त्यांचे संस्मरणीय कार्य म्हणजे १८८३ मध्ये प्रसिद्ध झालेले एसेज क्लासिकल व एसेज मॉर्डन हे त्यांचे निबंधग्रंथ होत. वर्ड्स्वर्थच्या काव्याचा त्यांचा व्यासंग गाढा होता. त्यांच्या षड्स्षर्थ (१८८१) या समीक्षापर ग्रंथावरून याचा चांगला प्रत्यय येतो.
उत्तरायुष्यात ते अतींद्रीय मानसशास्त्राच्या संशोधनाकडे वळले आणि हे क्षेत्र अखेरपर्यंत त्यांचे जीवीतकार्य होऊन राहिले. प्रा. सिज्विक, रिचर्ड हॉजसन, एडमंड गर्नी व फ्रँक पॉडमोर यांच्या सहकार्याने त्यांनी १८८२ मध्ये ‘सायकिकल रिसर्च सोसायटी’ ची स्थापना केली. या संस्थेच्या आरंभीच्या काळात तिची संपूर्ण धुरा प्रामुख्याने मायर्स यांनीच वाहिली. संस्था-सदस्यांच्या आत्यांतिक मतांच्या रस्सीखेचीत वैज्ञानिक दृष्टी मंदावू न देता मायर्स यांनी मोठ्या कौशल्याने संस्थेच्या कार्यास योग्य ती दिशा दिली. या कार्यासाठी त्यांनी घेतलेल्या अविश्रांत परिश्रमांची साक्ष त्यांच्या ह्यूमन पर्सनॅलिटी अंड इट्स सर्व्हायव्हल ऑफ बॉडिली डेथ (२ खंड, १९०३) ह्या मौलिक ग्रंथावरून पटते. पॉडमोर व गर्नी यांच्या समवेत त्यांनी फँटझम्स ऑफ द लिव्हिंग (२ खंड, १८८६) हा ग्रंथ लिहिला. त्यांनी सायकिकल रिसर्च सोसायटीच्या इतिवृत्तांतूनही एतद्विषयक अनेक लेख लिहिले. कोणत्याही ज्ञात अतींद्रिय घटनेचा त्यांनी शेवटपर्यंत वैज्ञानिक दृष्टीने पाठपुरावा केला. त्यांच्या वर उल्लेखिलेल्या ह्यूमन पर्सनॅलिटी….. ह्या महत्त्वपूर्ण ग्रंथाविषयी ð विल्यम जेम्स यांनी म्हटले आहे, की भास, संमोहन निद्रा, संचारलेखन, दुहेरी व्यक्तिमत्त्व आणि माध्यम या सर्वांचा एकाच विषयाची ही विविध अंगे होत, ह्या दृष्टीने विचार करण्याचा मायर्स यांचा हा आद्य प्रयत्न आहे. मायर्स यांचा सायन्स अंड अ फ्यूचर लाइफ हा ग्रंथ १८९३ मध्ये प्रसिद्ध झाला. सायकिकल रिसर्च सोसायटीचे एक संस्थापक, अध्वर्यृ आणि अतींद्रिय मानसशास्त्राचे आरंभीचे संशोधक म्हणून त्यांचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. रोम येथे ते निधन पावले.
पहा : अतींद्रीय मानसशास्त्र.
संदर्भ : James, William, Memories and Studies, New York, 1911.
कुलकर्णी, वा. मा.
“