मा जृ-युआन : (१२६५–१३२५). चिनी कवी आणि नाटककार. त्याच्या जीवनाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही परंतु तो एक महत्त्वाकांक्षी मनुष्य होता आणि युआन ह्या परकी –मंगोलियन–राजवंशाच्या सत्तेखाली त्याला त्याच्या पात्रतेनुसार स्थान आणि प्रतिष्ठा न मिळाल्यामुळे तो अलिप्त, एकाकी जीवन जगू लागला. माजृ–युआनने सुंदर गीते आणि १४ संगीतिका लिहिल्या आहेत. ‘सॉरो ऑफ द हान कोर्ट’ (इं. शी.) ही त्याची संगीतिका विशेष प्रसिद्ध आहे. हान राजवटीतील एका दरबारी स्त्रीची ही शोकात्मिका आहे.

जुंग, यान (इं.) कुलकर्णी, अ. र. (म.)