भूवैज्ञानिक संस्था व संघटना : प्रस्तुत नोंदीत प्रथम आंतरराष्ट्रीय व परदेशी अणि नंतर भारतातील महत्त्वाच्या भूवैज्ञानिक व संबंधित विषयात कार्य करणाऱ्या संस्थांची व संघटनांची थोडक्यात माहिती दिलेली आहे.आंतरराष्ट्रीय व परदेशी : इंटरनॅशनल जिऑलॉजिकल काँग्रेस : ही सभा १८७८ साली पॅरिस येथे स्थापन झाली. पृथ्वी व इतर ग्रह यांच्याविषयीच्या सैद्धांतिक व प्रयोगिक संशोधनाच्या विकासाला मदत करणे हे या सभेचे उदिष्ट आहे. दर चार वर्षांनी ही सभा भरते. १९६४ मध्ये दिल्ली येथे ही सभा भरविण्यात आली होती. एक्स्टेंडेड ॲबस्ट्रॅक्ट्स, जनरल प्रोसिडींग्ज इ. सभेची प्रकाशने आहेत.
इंटरनॅशनल युनियन ऑफ जिओडेसी अँड जिओफिजिक्स : (IUGG). ही संस्था १९१९ साली स्थापन झाली असून हिचे प्रमुख कार्यालय ब्रूसेल्स (बेल्जियम) येथे आहे. ⇨ भूगणित आणि ⇨ भूभौतिकी यांविषयीच्या प्रश्नांमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज असते व तिच्यातूनच ही संस्था उभी राहिली. हिची पुढील उद्दिष्टे आहेत : पृथ्वीचा आकार व भौतिकी यांच्याशी निगडीत असणाऱ्या समस्यांविषयी चर्चा करणे व तुलनात्मक अभ्यास करणे आणि मिळालेली माहिती प्रकाशित करण्यासाठी साहाय्य करणे. ही संस्था म्हणजे सात संघटनांचा संघ असून संस्थेच्या सर्वसाधारण सभेच्या वेळी त्या एकत्र येतात. यांशिवाय या संघटनांच्याही आपापसात व इतरांशी संयुत्क समित्या स्थापिलेल्या असतात. भूभौतिकीय माहिती गोळा करणे, तिचे विश्लेषण करणे व ती प्रसिद्ध करणे या हेतूने ही संस्था वैज्ञानिक बैठका आयोजित करते व कायमच्या विविध सेवांची हमी देते. १९८२ साली या संस्थेचे ७४ देश सदस्य होते.आययूजीजी क्रॉनिकल, आययूजीजी मोनोग्राफ्स, प्रोसिडींग्ज ऑफ असेंब्लीज ही हिची प्रकाशने असून हिच्या घटक संघटनांची स्वतःची प्रकाशनेही आहेत.इंटरनॅशनल अहसोसिएशन ऑफ व्होल्कॅनोलॉजी अँड केमिस्ट्री ऑफ द अर्थ : १९१९ साली स्थापन झालेल्या या संस्थेचे मुख्यालय नॉटिंगॅम (इंग्लंड) येथे आहे. ज्वालामुखीविज्ञानाविषयीचे आणि पृथ्वीच्या अंतरंगाच्या संघटनांशी निगडीत असणाऱ्या शिलावैज्ञानिक व भूरासायनिक बाबींचे अनुसंधान करणे व त्यांच्याविषयी चर्चा घडवून आणणे हे या संस्थेचे उदिष्ट आहे. Bulletin Volcanologique, कॅटलॉग ऑफ व्होल्कॅनोज ऑफ द वर्ल्ड इन्क्ल्युडींग सोल्फाटेरा फील्ड्स, न्युज लेटर व्होल्कॅनिक डेटा शीट्स ही या संस्थेची प्रकाशने आहेत. इंटरनॅशनल अइसोसिएशन ऑफ जिओडेसी : १९२२ साली स्थापन झालेल्या या संस्थेचे प्रमुख कार्यालय पॅरिस येथे आहे. भूगणितातील सर्व तऱ्हेच्या वैज्ञानिक समस्यांच्या अभ्यासाचा विकास करणे व भूगणितीय संशोधनास उत्तेजन देणे, तसेच या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवून त्यात सुसूत्रता आणणे व मिळणारे निष्कर्ष प्रसिद्ध करणे ही यासंस्थेची उदिष्टे आहेत. १९८२ साली ६१ देशांमध्ये या संस्थेच्या राष्ट्रीय समित्या होत्या. Bulletin Geodeique Travaux de l’ AIG, Bibliographic Geodesique International ही या संस्थेची प्रकाशने आहेत.
इंटरनॅशनल युनियन ऑफ क्रिस्टलोग्राफी : ही संघटना पुढील हेतूंसाठी १९४७ साली स्थापण्यात आली : स्फटिकविज्ञानाच्या अध्ययनाविषयीचे आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढविणे स्फटिकविज्ञानाची सर्व बाजूंनी प्रगती होण्यास हातभार लावणे आणि स्फटिकविज्ञानात वापरल्या जाणाऱ्या पद्धती, एकके, नामपद्धती व चिन्हे यांच्या आंतरराष्ट्रीय मानकीकरण्यास (मूलभूत प्रमाणे ठरविण्यास) साहाय्य करणे. १९८२ साली संघटनेचे ३३ देश सदस्य होते. या संघटनेची Ada Crystolographica, जर्नल ऑफ अ प्लाइड किस्टलोग्राफी, स्ट्रक्चर रिपोर्ट्स, इंटरनॅशनल टेबल्स फॉर एक्स-रे क्रिस्टलोग्राफी इ. प्रकाशने आहेत. चेस्टर (इंग्लड) येथे या संघटनेच्या सचिवांचे कार्यालय आहे. इंटरनॅशनल युनियन ऑफ जिऑलॉजिकल सायन्स : ही इंटनॅशनल जिऑलॉजिकल काँग्रेसची घटक संस्था १९६१ साली स्थापन झाली असून तिचे प्रधान कार्यालय पॅरिसला आहे. १९८२ साली हिचे ९० देशांत सदस्य होते. एपिसोड्स, जिऑलॉजिकल न्यूज मॅगॅझीन इ. प्रकाशने ही संस्था प्रसिद्ध करते.इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिस्मॉलॉजी अँड अर्थक्वेक एंजिनिअरिंग : १९६२ साली स्थापन झालेल्या या संस्थेचे कार्यालय टोकियो (जपान) येथे आहे. विकसनशील देशांतील भूकंपविज्ञान, भूकंप अभियांत्रिकी यांविषयीच्या संशोधनाला उत्तेजन देण्यासाठी प्रशिषणाचे व संशोधनाचे कार्य करणे भूकंप व त्याच्याशी निगडीत माहितीचा आढावा घेणे, तिचे विश्लेषण करणे, संशोधन व मार्गदर्शन करणे ही या संस्थेची उदिष्टे आहेत. बुलेटीन ऑफ आयआयएसईई, इंडिव्हिजुअल स्टडी रिपोर्ट इ. या संस्थेची प्रकाशने आहेत.याशिवाय इंटरनॅशनल पॅलिआँटॉलॉजिकल ॲसोसिएशन (स्थापना १९३३), इंटरनॅशनल मिनरालॉजिकल अरसोसिएशन (स्थापना १९५८ इ. आंतरराष्ट्रीय संस्थाही भूविज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत.
विविध देशांतील महत्तवाच्या संस्थांची व संघटनांची माहिती खाली दिली आहे.ऑस्ट्रेलिया : ब्युरो ऑफ मिनरल रिसोर्सेस, जिऑलॉजी अँड जिओफिजिक्स ही संस्था खनिजांच्या समन्वेषणासाठी ऑस्ट्रेलिया खंड, त्याचा किनारी भाग आणि ऑस्ट्रेलियन अंटार्क्टिक प्रदेश यांच्या विषयीची अधिक अचूक भूवैज्ञानिक माहिती मिळवणे या हेतूने १९४६ मध्ये स्थापन झालेली आहे. या संस्थेचे प्रमुख कार्यालय कॅनबरा येथे असून येथील ग्रंथालयात १९,००० पेक्षा जास्त ग्रंथ आहेत. हिची बी. एम. आर. जर्नल ऑफ ऑस्ट्रेलियन जिऑलॉजी अँड जिओफिजिक्स, बुलेटिन्स, रिपोर्ट्स इ. प्रकाशने आहेत. शिवाय जिऑलॉजिकल सोसायटी ऑफ ऑस्ट्रेलिया ही १९५३ साली स्थापन झालेली संस्था सिडनी येथे आहे.
कॅनडा : जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ कॅनडा या १८४२ मध्ये स्थापन झालेल्या संस्थेचे प्रमुख कार्यालय ओटावा येथे असून तेथील ग्रंथालयात १.५ लाख ग्रंथ आहेत. पूर्ण कॅनडाचे भूवैज्ञानिक संशोधन, मानचित्रण आणि खास अध्ययन करणे हे उद्दिष्ट असलेल्या या संस्थेच्या अनेक शाखा असून करंट रिसर्च हे नियतकालिक संस्थेतर्फे प्रकाशित करण्यात येते. जिऑलॉजिकल ॲसोसिएशन ऑफ कॅनडा या १९४७ साली स्थापन झालेल्या संस्थेचे मुख्यालय वॉटर्लू येथे असून भूविज्ञान व तत्संबंधित विषयांच्या प्रगतीस हातभार लावणे हे तिचे उद्दिष्ट आहे. या संस्थेचे २,८०० पेक्षा जास्त सभासद असून जिओसायन्स कॅनडा व जिओलॉग ही तिची प्रकाशने आहेत.
चीन : चायनीज ॲकॅडेमी ऑफ जिऑलॉजिकल सायन्सेस ही संस्था १९५९ साली स्थापन झाली असून तिचे मुख्य कार्यालय पिकिंग येथे आहे व देशात तिचा १९ शाख्या आहेत. बुलेटिन हे तिचे प्रकाशन आहे. चायना जिऑलॉजिकल सोसायटी या संस्थेचे मुख्यालयही पीकिंग येथे असून १९२२ साली हीची स्थापना झाली. जिऑलॉजिकल रिव्हू व Acta Geologica Sinica ही हिची नियतकालिके होत.
फ्रान्स : Societe Geologique de France ही पॅरिस येथील संस्था १८३० साली स्थापन झाली असून बुलेटिन व मेम्बार्स ही तिची प्रकाशने आहेत. Bureau de Recherches Geologiqueet Miniers ही ऑर्लीअन्स येथील संस्था १९४४ साली स्थापन झाली असून तिचे सु. २,३०० सभासद आहेत. तेथील ग्रंथालयात ५० हजार ग्रंथ असून Bulletin du BRGM, Memoies du BRGM व मिनरल प्रॉस्पेक्टिंग रिव्हू ही तिची प्रकाशने आहेत. याशिवाय फ्रान्समध्ये इतरही अनेक भूवैज्ञानिक संस्था आहेत.प. जर्मनी : प. जर्मनीतील पुढील संस्था भूविज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत : Deutsche Geologische Gesellschaft (स्थापना १८८४, सभासद १,९०० व २ प्रकाशने) Deutsche Mineralogische Gesellschaft (स्थापना १९०८, सभासद १,४०० व १ प्रकाशन) Paleontologische Gesellschaft (स्थापना १९१२ व १ प्रकाशन) Bundesantelt fiir Geowissenschaftenand Rohstoffe (स्थापना १९५८, २ – ५ लाख ग्रंथ व एक प्रकाशन) Geologisch-Palantologisches Institut (स्थापना १९०७, ७० हजार ग्रंथ व १ प्रकाशन).जपान : द ॲसोसिएशन फॉर जिऑलॉजिकल कोलॅबोरेशन ही संस्था भूविज्ञान, खनिजविज्ञान, पुराजीवविज्ञान आणि संबंधित विषयांचा अभ्यास करण्याच्या हेतूने टोकिओ येथे १९४७ साली स्थापन झाली. हिचे ३,००० सभासद असून हिची अर्थ सायन्स व इतर दोन नियतकालिके आहेत. याशिवाय जपानमध्ये भूवैज्ञानिक अध्ययन आणि संशोधन करणाऱ्या पुढील संस्था व संघटना आहेत : सोसायटी ऑफ एक्स्प्लोरेशन जिओफिजिसिस्ट्स ऑफ जपान (स्थापना १९४८, सभासद १,३८० व १ प्रकाशन) जिऑलॉजिकल सोसायटी ऑफ जपान (स्थापना १८९३, सभासद ४,५३४ न १ प्रकाशन) जॅपनीज ॲसोसिएशन ऑफ मिनरॉलॉजिस्ट्स अँड इकॉनॉमिक जिऑलॉजिस्ट्स (स्थापना १९३०, सभासद १,००० व १ प्रकाशन) व्होल्कॅनॉलॉजिकल सोसायटी ऑफ जपान (स्थापना १९३२, सभासद ७२० व २ प्रकाशने) पॅलिआँटॉलॉजिकल सोसायटी ऑफ जपान (स्थापना १९३५, सभासद ४७० व २ प्रकाशने) द क्रिस्टलोग्रफिक सोसायटी ऑफ जपान (स्थापना १९५०, सभासद १,००० व १ प्रकाशन) द जिओडेटिक सोसायटी ऑफ जपान (स्थापना १९४५, सभासद ५०० ग्रंथ ५,००० व १ प्रकाशन) सिस्मॉलॉजिकल सोसायटी ऑफ जपान (१९२९, सभासद १,२०० व २ प्रकाशने) फुकाडा जिऑलॉजिकल इन्स्टिट्यूट (स्थापना १९५४ व २ प्रकाशने) व जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ जपान (स्थापना १८८२, सभासद ४३६, ग्रंथ १६,००० व २ प्रकाशने).
मेक्सिको : मेक्सिकन जिऑलॉजिकल सोसोयटी (स्थापना १९०४, सभासद ३५०, ग्रंथ १२५ व १ प्रकाशन) व मेक्सिकन अ सोसिएशन ऑफ पेट्रोलियम जिऑलॉजिस्ट्स (स्थापना १९४९, सभासद ६०० व १ प्रकाशन) या मेक्सिकोतील भूवैज्ञानिक संस्था होत. नॉर्वे : नॉर्वेजियन जिऑलॉजिकल सोसायटी (स्थापना १९०५, सभासद ७०० व १ प्रकाशन) आणि जिओफिजिकल कमिशन (स्थापना १९१७ व १ प्रकाशन) या नॉर्वेतील भूवैज्ञानिक संस्था आहेत.
रशिया : इन्स्टिट्यूट ऑफ जिऑलॉजी (मॉस्को), इन्स्टिट्यूट ऑफ जिऑलॉजी अँड प्रिकँब्रियन जिओक्रोनॉलॉजी (लेनिनग्राड), इन्स्टिट्यूट ऑफ ह जिऑलॉजी ऑफ ओअर डिपॉझिट्स, पेट्रोग्राफी, मिनरालॉजी अँड जिओकेमिस्ट्री (मॉस्को), ओ वाय्. श्मिट इन्स्टिट्यूट ऑफ अर्थ फिजिस्क (मॉक्सो), ए. ई. फ्येर्समन मिनरालॉजिकल म्युझियम (मॉक्सो), व्ही. आय्. व्हेर्नाड्स्की इन्स्टिट्यूट ऑफ जिओकेमिस्ट्री अँड
ॲजनॅलिटिकल केमिस्ट्री (मॉस्को), ऑल-युनियन सायंटिफिक रीसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स ऑफ मिनरालॉजिकल रॉ मटेरियल्स अँड प्रॉस्पेक्टिंग (मॉक्सो), ए. ए. स्कोचिन्स्की इन्स्टिट्यूट ऑफ मायनिंग (मॉस्को), इन्स्टिट्यूट ऑफ जिऑलॉजी अँड एक्स्प्लॉटेशन ऑफ मिनरल फ्यूएल्स (मॉस्को), इन्स्टिट्यूट ऑफ मिनरालॉजी, जिओकेमिस्ट्री अँड क्रिस्टलोकेमिस्ट्री ऑफ रेअर एलेमेंट्स (मॉस्को), कमिटी ऑन पेट्रोग्राफी (मॉस्को), इंटर-डिपार्टमेंटल कमिटी ऑन स्ट्रॅटिग्राफी (लेनिनग्राड), इंटर-डिपार्टमेंटल कमिटी ऑन टेक्टॉनिक्स (मॉस्को) व ऑल-युनियन पॅलिआँटॉलॉजिकल सोसायटी (लेनिनग्राड) या भूविज्ञान, भूभौतिकी व भूरसायनशास्त्र यांच्या खात्याशी निगडीत असलेल्या रशियातील संस्था आहेत. शिवाय एस्. जिऑलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (लेनिनग्राड), ए यू रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ सब्नरीन जिऑलॉजिकल अँड जिओफिजिक्स, इन्स्टिट्यूट ऑफ जिऑलॉजी (मिंक्स), मिड्ल एशियन रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरल गॅस (ताश्कंद) व मॉस्को एस्. अर्जन्यिक्यीडझे इन्स्टिट्यूट ऑफ जिऑलॉजिकल रिसर्च या रशियातील भूवैज्ञानिक संशोधन संस्था आहेत.
ब्रिटन : जिऑलॉजिस्ट्स असोसिएशन या लंडन येथे १८५८ साली स्थापन झालेल्या संस्थेचे उद्देश भूविज्ञानाची प्रगती व प्रसार करण्यास मदत करणे आणि नव्या भूवैज्ञानिक पद्धतींचे सशोधन व विकास करणे हे आहेत. हिचे सु. २,५०० सभासद असून प्रोसिडींग्ज व सर्क्युलर ही प्रकाशने आहेत.
लंडन येथील इन्स्टिट्यूट ऑफ जिऑलॉजिकल सायन्सेस या संस्थेत जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ ग्रेट ब्रिटन, द जिऑलॉजिकल म्युजियम आणि द ओव्हरसीज जिऑलॉजिकल सर्व्हेज या संस्था समाविष्ट असून या संस्थेचे ग्रंथालय हे जगातील सर्वांत मोठे (नकाशे १.५ लाख ) भूवैज्ञानिक ग्रंथालय आहे. शिवाय जिऑलॉजिकल सोसायटी, लंदन (स्थापना १८०७, सदस्य ५,८७१, अनेक प्रकाशने) मिनरालॉजिकल सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन अँड आयर्लंड, लंडन (स्थापना १८७६, अनेक प्रकाशने) याही संस्था महत्त्वाच्या आहेत.अमेरिकेची संयुक्त संस्थाने : अमेरिकन जिओफिजिकल युनियन या वॉशिंग्टन येथे १९१९ साली स्थापन झालेल्या संस्थेचे १३ हजार सभासद आहेत. हिचे दहा विभाग असून हिची अनेक प्रकाशने प्रसिद्ध होतात.पॅलिआँटॉलॉजिकल सोसायटी या १९०९ साली वॉशिग्टन येथे स्थापन झालेल्या संस्थेचे १, ६५० सभासद असून पुराजीववैज्ञानिक संशोधन प्रसिद्ध करणे व त्याचे विवरण करणे हे या संस्थेचे कार्य आहे. हिची चार नियतकालिके प्रकाशित होतात. यू. एस. जिऑलॉजिकल सर्व्हे ही संस्था १८७९ साली वॉशिंग्टन येथे स्थापन झाली असून हिचे ७ विभाग करण्यात आलेले आहेत. अमेरिकेतील प्रदेशांचे भूमिस्वरूपविषयक व भूवैज्ञानिक मूलभूत नकाशे तयार करणे आणि देशातील खनिज व जल संपत्तीची झालेली वाटणी व तिची गुणवत्ता ठरविणे ही या संस्थेची कामे आहेत.
यांशिवाय अमेरिकेतील पुढील भूवैज्ञानिक संस्थाही महत्त्वाच्या आहेत : अमेरिकन क्रिस्टलोग्राफिक
ॲणसोसिएशन, न्यूयॉर्क (स्थापना १९५०, सभासद १,८०० व ३ प्रकाशने) अमेरिकन जिऑलॉजिकल इन्स्टिट्यूट, फॉल्स चर्च (स्थापना १९४८,सभासद ३६ हजार व ३ प्रकाशने) जिऑलॉजकल सोसायटी, ब्लॅक्सबर्ग (स्थापना १९५५, सभासद १,४०० व १ प्रकाशन) जिऑलॉजिकल सोसायटी ऑफ अमेरिका, बोल्डर (स्थापना १८८८, सभासद १२,७२० व अनेक प्रकाशने) मिनरालॉजिकल सोसायटी ऑफ अमेरिका, वॉशिंग्टन (स्थापना १९१०, सभासद २,६०० व १ प्रकाशन) सिस्मॉलॉजिकल सोसायटी ऑफ अमेरिका, बर्कली (स्थापना १९००, सभासद १,७०० व १ प्रकाशन) सोसायटी ऑफ इकॉनॉमिक जिऑलॉजिस्ट्स, लेकवुड (स्थापना १९२०, सभासद १,५०० व १ प्रकाशन) आणि सोसायटी ऑफ इकॉनॉमिक पॅलिआँटॉलॉजिस्ट्स अँड मिनरालॉजिस्ट्स तुलसा (स्थापना १९२६, सभासद ५,५०० व २ प्रकाशने).
यांशिवाय द. आफ्रिका, नेदरलँड्स, पेरू, पोर्तुगाल, मलेशिया, मालावी, यूगांडा, श्रीलंका, स्वीडन, डेन्मार्क, ईजिप्त, ऑस्ट्रिया, इटली, चेकोस्लोव्हाकीया, फिनलंड इ. देशांच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था आहेत. तसेच ब्राझील, इझ्राएल, इटली, हंगेरी, केन्या, नेदर्लंड्स, फिनलंड, अर्जेटिना, ऑस्ट्रिया, यूगोस्लाव्हिया, टांझानिया, तुर्कस्थान, व्हेनेझुएला, फिलिपीन्स, पोलंड, पोर्तुगाल, द. आफ्रिका, रूमानिया, स्पेन, श्रीलंका, स्वीडन, स्वित्झर्लंड वगैरे देशांमध्ये भूविज्ञानाचे अध्ययन, संशोधन व प्रसार करणाऱ्या संस्थाही आहेत.भारत : भारतात भूविज्ञान व संबंधित विषयांत संशोधन करणाऱ्या संस्थांची माहिती खाली थोडक्यात दिली आहे.भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था, कलकत्ता : १८५१ साली स्थापन झालेली ही संस्था जगातील एक सर्वांत जुनी भूवैज्ञानिक संस्था आहे. भूविज्ञान, भूभौतिकी, अभियांत्रिकीय भूविज्ञान, खनिजसंपत्ती, समन्वेषण यांचे अध्ययन व संशोधन ही या संस्थेची कामे होत. हिच्या ग्रंथालयात ४,१२,०६० ग्रंथ असून हिच्यामार्फत अनेक नियतकालिके प्रकाशित होतात. [⟶ भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था].खनिज तेल व नैसर्गिक वायू आयोग, डेहरराडून : १९५६ साली स्थापन झालेल्या या आयोगामार्फत भारतातील खनिज तेलाचे भूवैज्ञानिक व भूभौतिकीय समन्वेषण केले जाते. खनिज तेलाचे शोध घेणे व ते मिळविण्यासाठी व्यवस्था करणे, खनिज तेलाचे परिष्करण करणे व खनिज तेल रसायनांविषयी संशोधन करणे ही या आयोगाची कार्ये होत. या आयोगाने समुद्रकिनाऱ्यानजिकच्या भागातही खनिज तेलासाठी समन्वेषण करून खनिज तेलाचा शोध लावला असून ते तेथून किनाऱ्यावर आणण्याची व्यवस्थाही केला आहे. [⟶ खनिज तेल बाँबे हाय].इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम, डेहराडून : हीसंस्था १९६० साली स्थापन झाली असून ती पुढील कामे करते: खनिज तेल परिष्करण, नैसर्गिक वायू व खनिज तेल रसायने यांवरील प्रक्रिया यांविषयी संशोधनाचे व विकासाचे काम करणे पर्यायी इंधनांचा विकास करणे तंत्रज्ञांना प्रशिक्षण देणे व खनिज तेल पदार्थांची मानके बनविण्यासाठी भारतीय मानक संस्थेला मदत करणे. हिच्या ग्रंथालयात १२,००० ग्रंथ व ९,००० नियतकालिके आहेत. आर्. अँड डी. न्यूजलेटर, पेट्रोलियम कॉन्झर्व्हेशन ॲयब्स्ट्रॅक्ट व ॲ०न्युअल रिपोर्ट ही या संस्थेतर्फे प्रसिद्ध होणारी नियतकालिके हेत.नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, हैदराबाद : १९३१ साली हिची स्थापना झाली. खनिज समन्वेषण आणि भूकंपीय, भूचुंबकीय, विद्युतीय, भूरासायनिक व पुराभूभौतिकीय अभ्यासांद्वारे होणारे पृथ्वीच्या अंतरंगाचे अनुसंधान यांविषयी मूलभूत व अनुप्रयुक्त संशोधन ही संस्था करते. हिच्या ग्रंथालयात २०,००० ग्रंथ असून बुलेटिन, ऑब्झर्व्हेटरीज डेटा व प्रोग्रेस इन जिओफिजिक्स ही हिची नियतकालिके आहेत.इंडियन ब्यूरो ऑफ माइन्स, नागपूर : यासंस्थेची स्थापना १९४८ साली झाली. हिची ११ विभागीय कार्यालये असून हिच्या ग्रंथालयात ५०,००० ग्रंथ आहेत. खनिजसंपत्तीचे परिरक्षण व विकास करणे, खाणी व खनिजे यांच्या विकास कार्यक्रमांना मदत करणे, खाणकाम व खनिजांवरील प्रक्रिया यांबाबतीत तांत्रिक सल्ला देणे, खनिजांविषयाची आकडेवारी गोळा करणे व ती इतरांना पुरविणे आणि कमी दर्जाच्या धातुकांचे (कच्च्या रूपातील धातूंचे) शुद्धीकरण व खाणकामाच्या खास समस्या यांचे संशोधन ही या संस्थेची कामे आहेत. इंडियन मिनरल्स इयरबुक, मिनरल स्टॅटिस्टिक्स ऑफ इंडीया, मिनरल स्टॉक्स, मिनरल इंडस्ट्री ॲट अ ग्लान्स इ. अनेक नियतकालिके ही संस्था प्रसिद्ध करते.
सेंट्रल मायनिंग रिसर्च स्टेशन धनबाद : १९५६ साली स्थापन झालेल्या या संस्थेच्या ग्रंथालयात १६,११२ ग्रंथ आहेत. खाणकामातील सुरक्षा व्यवस्था, आरोग्य व कार्यक्षमता यांच्याविषयीचे संशोधन या संस्थेमार्फत केले जाते. तसेच खाणकाम उद्योगाच्या गरजांचा आढावा घेणे, नव्या पद्धतीच्या तंत्रांची चाचणी घेणे, आयात करण्यात येणाऱ्या पदार्थांना पर्याय सुचविणे इ. कामेही येथे केली जातात.बिरबल सहानी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलिओबॉनी, लखनौ : १९४६ साली स्थापन झालेल्या या संस्थेचे ग्रंथालय समृद्ध आहे. येथे वनस्पतींच्या जीवाश्मांचे (शिळारूप अवशेषांचे) पूर्णतया वैज्ञानिक दृष्टीने संशोधन केले जाते. या संसोधनाचा आर्थिक भूविज्ञान, तसेच दगडी कोळसा व खनिज तेल यांचे पूर्वेक्षण (एकाद्या क्षेत्रात आर्थिक दृष्ट्या पुरेसा मोठा साठा आहे की नाही, हे ठरविण्यासाठी करण्यात येणारे निरिक्षणाचे व तपासणीचे काम) यांच्यातील वापराविषयीही तेथे संशोधन केले जाते. जिओडेटिक अँड रिसर्च ब्रँच, डेहराडून : भारतीय सर्वेक्षण संस्थेची ही शाखा १८०० साली स्थापन झाली असून तिच्या ग्रंथालयात ५५,००० ग्रंथ आहेत. येथे भूगणिताचे व त्याच्याशी संबंधित अशा भूभौतिकीय विषयांचे संशोधन केले जाते या मध्ये उपकरण योजनेचा विकास व संशोधनही येते. हिचे अहवाल व तांत्रिक प्रकाशने प्रसिद्ध होतात. मिनरालॉजिकल सोसायटी ऑफ इडीया, म्हैसूर : ही संस्था १९५९ साली स्थापन झाली. संशोधनाद्वारे तसेच परिषदा, बैठका व चर्चासत्रे आयोजित करून स्फटिकविज्ञान, खनिजविज्ञान, शिलाविज्ञान, इत्यादींच्या ज्ञानात भर टाकणे, हे हिचे उद्दिष्ट आहे. हिच्या ग्रंथालयात १,५०० ग्रंथ असून इंडियन मिनरालॉजिस्ट हे हिचे नियतकालिक आहे. मिनरल इन्फर्मेशन ब्यूरो, दिल्ली : खनिजांचे पूर्वेक्षण व समन्वेषण या बाबतीत ही संस्था मदत करते.मायनिंग, जिऑलॉजिकल अँड मेटॅलर्जिकल इन्स्टिट्यूट ऑफ इंडीया कलकत्ता : १९०६ साली स्थापन झालेल्या या संस्थेच्या ग्रंथालयात ३,५०० ग्रंथ असून ट्रॅन्झक्शन्स व न्यूजलेटर ही हिची नियतकालिके होत.यांशिवाय जिऑलॉजिकल, मायनिंग अँड मेटॅलर्जिकल सोसायटी, कलकत्ता (स्थापना १९२४ जर्नल व बुलेटिन ही नियतकालिके) इंडियन असोसिएशन ऑफ जिओहायड्रॉलॉजिस्ट्स, कलकत्ता (स्थापना १९६४, इंडियन जिओहायड्रॉलॉजी हे नियतकालिक) जिऑलॉजिकल सोसायटी ऑफ इंडीया, बंगलोर (स्थापना १९५९ जर्नल हे नियतकालिक) पॅलिआँटॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडीया, लखनौ. (स्थापना १९५६) वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिऑलॉजी (डेहराडून) भूकंपविज्ञानाची मध्यवर्ती वेधशाळा (शिलाँग) इंडियन ॲकॅडमी ऑफ जिओसायन्स (उस्मानिया विद्यापीठ, हैदराबाद) सेंट्रल माइन प्लॅनिंग अँड डिझाइन इन्स्टिट्यूट (रांची) स्कूल ऑफ रिसर्च अँड ट्रेनिंग इन अर्थक्वेक एंजिनिअरिंग (रूडकी विद्यापीठ, रूडकी)
ॲलकॅडमी ऑफ अर्थ अँड एन्व्हायरन्मेंटल सायन्सेस (विक्रम विद्यापीठ, उजैन) इ. भूविज्ञानाशी निगडीत संस्था आणि संघटना भारतात आहेत.
ठाकूर, अ. ना.
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..