बसरी : ( धेड उंबर, पिपळी, पाकरी, लेंडवा हिं. कहिमल क. कारी बसरी गु. पेप्री लॅ फायकस इन्फेक्टोरिया कुल-मोरेसी). वड, पिंपळ, उंबर, अंजीर यांच्या वंशातील हा लहान पानझडी वृक्ष उत्तरेतील सपाट प्रदेशात व लहान टेकड्यांत सापडतो. हा महाराष्ट्रात रस्त्यांच्या दुतर्फा लावलेला आढळतो. शिवाय सिक्कीम, बंगाल, आसाम, द. भारत, श्रीलंका, ब्रह्मदेश व मलाया येथील जंगलांत हा आढळतो. याची पाने साधी, पातळ, देठ बारीक व लांब सर्व भाग गुळगुळीत कुंभासनी [फुलोरा →पुष्पबंध] अवृंत (बिनदेठाचा), कक्षास्थ (पानांच्या बगलेत) व जोडीने असतात हे फुलोरे गोलाकार (व्यास ६.६ सेंमी.), पिकल्यावर पांढरट व लाल ठिपकेदार असून मे-जूनमध्ये येतात. त्यांच्या तळाशी तीव छेद असून त्यांमध्ये तीन प्रकारची फुले एकत्र असतात पुं-पुष्पे थोडी आणि दोन प्रकारची व स्त्री-पुष्पे अनेक असतात. केसरदल एक परिदले प्रत्येकाच ४-५. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ मोरेसी कुलामध्ये (वट कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. खोडावरील बाहेरच्या सालीपासून साधारण प्रतीचा धागा मिळतो. झाडपाला हत्ती व गुरे खातात. लाकडाचा कोळसा करतात. सालीचा काढा जखमा धुण्यास, श्र्वेतकुष्ठात अंतःक्षेपणाकरिता (इंजेक्शनासाठी) व तोडांस पाणी सुटत असल्यास गुळण्यांकरिता वपारतात. कोवळ्या फांद्या रानटी लोक आमटीत टाकून खतात. पाने व कुभासनी यासंबंधीचे फरक लक्षात घेऊन याचे दोन प्रकार (लँबर्टियाना व पायटियाना) केले आहेत.
वडभुर्ली : (लॅ. फा. मायसोरेन्सिस). हा मोठा वृक्ष बसरीच्या वंशातील असून त्याचा शाखाविस्तार छत्रासारखा असतो. व तो उत्तम छाया देतो. कॉफीच्या मळ्यात हा याचकरिता लावतात. हा भारतात सर्वत्र आढळतो शिवाय ब्रह्मदेश, श्रीलंका येथेही सापडतो. फळांच्या जोड्या (औदुंबरिक) कक्षस्थ, नीरिंगी लाल (२.५ सेंमी. व्यासाच्या) असतात. पाने मोठी व पारंब्या थोड्या असतात. शोभा व सावली यांकरिता हा बागांत लावतात.
ज्ञानसागर, वि. रा.
“