फ्रिजिया  :  आशिया मायनरमधील  ( वि द्यमान मध्य तुर्कस्तान )  एक प्राचीन प्रदेश इ .  स .  पू .  १३००  ते  ७००  च्या दरम्यान या प्रदेशात फ्रिजियन संस्कृती नांदत होती .  ‘ फ्रिजिस ’  हे नाव ग्रीकांनी येथील लोकांस दिले . फ्रिजिया हीं संज्ञा त्यावरूनच रूढ झाली .  होमर व हिरॉडोटस यांच्या लेखनातून फ्रिजियन संस्कृतीबद्दल माहिती मिळते .  इंडो – युरोपि अ न भाषाकुटुंबातील एक भाषा बोलणा रे हे लोक इ . स .  पू . दुस ऱ्‍या सहस्त्रकात थ्रेस बेटावरून किंवा मॅसिडोनियातून तुर्कस्तानातील हॅलिस नदीच्या पश् ‍ चिमेकडील प्रदेशात आले ,  असे म्हटले जाते .  त्यांनी सँगेरिअस व मि अँडर या नद्यांमधील पठारावर वस्ती केली .  हिटाइट साम्राज्याच्या पाडावात यांचा काही वाटा असावा ,  असे काही इतिहासकारांचे मत आहे .  हिटाइटांच्या अस्तानंतर संपूर्ण आशिया मायनरवर त्यांची सत्ता होती .  इ . स . पू .  आठ व्या शतकातील ॲ सिरियनांच्या आक्रमणा मुळे फ्रिजि य न पश् ‍ चिमेकडे रेटले गेले . आरंभीचा फ्रिजियन राजा गॉर्डिअस याजपाशी केवळ एक बैलजोडी होती .  तिच्या आधारे त्याने एका संपन्न राष्ट्राचा पाया घातला ,  अशी दंतकथा प्रचलित आहे .  राजा मिडास हा त्याचा मुलगा .  त्याच्या अफाट संपत्तीमुळेच ग्रीकांमध्ये त्याच्यासंबंधी ‘ हात लावील त्याचे सोने करणारा मिडास ’  अशी दंतकथा रूढ झाली .  फ्रिजियन राजांची नावे आलटूनपालटून गॉर्डि अ स व मिडास अशीच सापडतात .  अनसायरा म्हणजे सध्याचे अंकारा ही त्यांची राजधानी होती .  फ्रिजि य न राजसत्ता नष्ट झाली ,  तरी फ्रिजि य न लोक व संस्कृती इसवी सना च्या आरंभापर्यंत टिकून होती .  शेतकी ,  मेंढपाळी आणि उत्तम घोड्याची पैदास ,  हे या लोकांचे मुख्य व्यवसाय होते .  शिबली ही त्यांची प्रमुख मातृदेवता आणि एटिस हा त्यांचा शेतीचा किंवा जननाचा देव होता .  शिबली ही मातृदेवता एटीसच्या प्रेमात पडली आणि तिने आपल्या सन्मानार्थ त्यास पौ रूषत्वा चा त्याग करण्याची सक्ती केली .  म्हणून तिचे पुजारी ब्रह्मचर्य पाळतात ,  अशी दंतकथा प्रचलित आहे .  या फ्रिजियन पुराणकथेचा ग्रीक पुराणकथांवर फार मोठा परिणाम झाला ,  असे मानले जाते .  दरवर्षी पेरणी व कापणीच्या हंगामात एटिसचे मोठे उत्सव साजरे के ले जात . शिबली मंदिरात देवदासींची पद्धत प्रचलित होती .  शिबलीची पूजा पुढे रोमन लोकांतही टिकून होती .  कॉकेशस पर्वताकडून आलेल्या सिमिरियन लोकांनी इ .  स .  पू .  ७००  च्या सुमारास फ्रिजियन सत्ता नष्ट केली .  सिमिरियन लोकांचाही पुढे सिथि य न लोकांनी पराभव केला .  त्यानंतर फ्रिजिया लिडियन साम्राज्याचा एक भाग झाला.

ब्राँझचे फ्रिजियन पूजापात्र, गॉर्डिअम, इ. स. पू. ९ वे–७ वे शतक.

 पुढे तो इराणी साम्राज्यात समाविष्ट झाला. यावेळी फ्रिजियन लोक ग्रीकांना गुलाम म्हणून विकले जात. यानंतर तो भाग मॅसेडोनियाच्या ताब्यात गेला व पुढे रोमन साम्राज्याचा एक भाग बनला. (इ.स.पू. ११६). बायझंटिन साम्राज्याच्या काळात फ्रिजिया नामशेष झाले.

  

 दुसऱ्या महायुद्धानंतरच्या उत्खननात येथे, विशेषतः गॉर्डिअम या ठिकाणी अनेक अवशेष आढळले. त्यांत काही कोरीव काम केलेली थडगी व मंदिरे आढळून आली आहेत. फ्रिजियनांच्या भाषेचे स्लाव्होनिक, आर्मेनियन आणि हिटाइट भाषांची अनेक बाबतीत साम्य आढळले. काही शब्द ग्रीक शब्दांशी जुळणारे आहेत. फ्रिजियन लिपीही आरंभीच्या ग्रीक लिपीशी बरीच मिळतीजुळती आहे. या दोन्ही लिपींचे मुळ फ्रिजियन भाषेत असावे.

  

स्वातंत्राची प्रतीक मानलेली फ्रिजियन टोपी मूळ ग्रीक शिल्पाकृतीची रोमन प्रतिकृती, इ.स.पू.७ वे शतक

  फ्रिजियन कलेचा आविष्कार गिरिशिल्पांतून आढळतो. खडकांत कोरलेले मंदिरांचे दर्शनी भाग, असे या गिरिशिल्पांचे स्वरुप होते. याचे नमुने एस्किशेहिर व आफ्योन या गावांच्या दरम्यान पहावयास मिळतात. ही मंदिरे मुख्य मातृदेवता शिबली किंवा अगडीस्टिस यांची आहेत. फ्रिजियनांना काष्ठशिल्प व धातुकामाची चांगली माहिती होती. मृत्स्नाशिल्पकलेत हे लोक निष्णात होते. चांदी व ब्रॉंझ यांची अलंकृत भांडी उत्खननांत आढळून आली. यांशिवाय भरतकामातही ते वाकबगार होते. त्यांचे गालिचे प्रसिद्ध होते. विणकामाची कला येथून इतर प्रदेशांत पसरली असे म्हटले जाते. फ्रिजियनांची उंच शंक्वाकार टोपी स्वातंत्र्याचे प्रतिक म्हणून प्रसिद्ध होती. त्यांच्या वास्तुकलेवर ग्रीकांच्या डोरीक व आयोनिक शैलींचा प्रभाव आढळतो.

 संदर्भ : Haspels, C. H. E. The Highlands of Phrygla, Vol. 2., Princeton, 1971.

  

 माटे,  म. श्री.