फ्राऊनहोफर , योझेफ फोन : ( ६ मार्च १७८७ – ७ जून १८२६ ). जर्मन भौतिकीविज्ञ . ⇨ वर्णपटविज्ञान विषयक कार्याकरिता विशेष प्रसिद्ध . त्यांचा जन्म बव्हेरियातील स्ट्राउ बिंग येथे झाला . अगदी थोडे प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर त्यांनी १७९८ पासून म्यू निक येथील आरसे तयार करण्याच्या व काच कापण्याच्या एका कारखान्यात उमेदवारी केली . १८०६ मध्ये त्यांनी वैज्ञानिक उपकरणे तयार करणा ऱ्या म्यूनिकजवळील बेनेडि क्ट बॉ इ अर्न येथील एका कारखान्यात नोकरी पत्करली . येथे त्यांनी अनुप्रयु क्त ( व्यवहारोप यो गी ) प्रकाशकीम ध्ये विशेष ज्ञान प्राप्त करून घेण्याबरोबरच गणित व प्रकाशकीय विज्ञान यांचा अभ्यास केला . १८०९ मध्ये ते या कारखान्याच्या प्रकाशी य कर्मशाळेचे व्यवस्थापक आणि १८११ मध्ये कारखान्याचे भागीदार व काच उत्पादनाचे संचालक झाले . १८१८ मध्ये ते कारखान्याचे पू र्ण संचालक झाले व १८१९ मध्ये कारखाना म्यूनिक येथे हलविण्यात आला . कारखान्यात काम करीत असताना त्यांनी प्रकाशकीय उपकरणां ना लागणारी भिं गे व लोलक तयार करण्यासाठी उपयुक्त अशी दोषरहित काच , विवर्ण भिं गांना [ वर्ण विपथन किमान करण्यासाठी योजि ले ल्या भिं गांना ⟶ प्रकाशीय व्यू हां तील विपथन ] पॉलि श करणारे यंत्र , सूर्यबिंबमापक व विवर्ण दूरदर्श क तयार करण्यास यश मिळवि ले . अतिशय सूक्ष्म व सरळ तारा सारख्या अंतरावर अगदी जवळजवळ ठेवून त्यांनी पहिले व्यावहा रिक ⇨ विवर्तन जालक तयार केले आणि त्यांच्या साहाय्या ने सोडियमाच्या वर्णपटातील D रेषांची तरंगलांबी मोजली , तसेच काही ताऱ्यांच्या वर्णपटांचेही निरीक्षण केले . सौर वर्णपटांतील काळ्या दिसणा ऱ्या शोषण रेषांच्या निरीक्षणाकरि ता फ्राऊनहोफर हे विशेष प्रसि द्ध आहेत . डब्ल्यू . एच् . वुलस्टन यांनी यापूर्वी च १८०२ मध्ये या रेषांचे निरीक्षण करून त्यासंबंधी चा वृत्तांत प्रसि द्ध केलेला होता . तथापि या रेषांचे काळजीपूर्वक व अभ्यासपूर्ण निरीक्षण फ्राऊनहोफर यांनीच प्रथमतः केल्यामुळे त्यांच्याच नावाने या रेषा ओळखल्या जातात . त्यांनी यांपैकी ५७६ रेषांची स्थाने नि श्चि त केली आणि त्यांतील प्रमुख रेषांना A ते G ही अक्षरे निर्देशनाकरिता ठरविली . या रेषांची तरंगलांबी मोजून त्यांनी असे अनुमान काढले की , सूर्यापासून प्रत्यक्षपणे येणाऱ्या किरणांच्या वर्णपटातील आणि चंद्र व ग्रह यांपासून परावर्तित झालेल्या किरणांच्या वर्णपटांतील रेषांची सापेक्ष स्थाने कायम असतात . निरनिराळ्या ताऱ्यांच्या वर्णपटांमध्ये मात्र त्यांना रेषांचे वेगवेगळे आकृतिबंध आ ढळून आले व त्यावरून अशा रेषांची निर्मिती प्रकाशाच्या उगमस्थानीच होते , असे त्यांनी प्रतिपादन केले . या निरीक्षणांमुळे पुढील ५० वर्षां त या रेषांविषयीच्या संशोधनाला विशेष चालना मिळाली आणि १८५९ मध्ये जी . आर् . किरखोफ व आर् . डब्ल्यू . बन्सन यांनी दिलेल्या शोषण व उत्सर्जन वर्णपटांच्या स्पष्टीकरणास त्याची परिणती झाली [ ⟶ वर्णपटविज्ञान ]. फ्राऊनहोफर यांनी १८२१ व १८२३ मध्ये प्रकाशीय विवर्तनाच्या [ ⟶ प्रकाशकी ] काही आविष्कारांचे वर्णन व त्यांचे प्रकाशाच्या तरंग सिद्धांतानुसार स्पष्टीकरण दोन निबंधां द्वारे प्रसिद्ध केले . या प्रकाराच्या विवर्तनाला ‘ फ्राऊनहोफर विवर्तन ’ असे संबोधण्या त येते . त्यांनी १८१९ पासून म्यू निक येथील बव्हेरियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसच्या कामात क्रियाशील भाग घेण्यास प्रारंभ केला . कारखान्यातील कामाबरोबरच १८२३ मध्ये ॲकॅडेमीच्या भौतिकीय संग्रहालयाच्या संचालकपदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली व त्याच वेळी रॉयल बव्हेरियन प्राध्यापकपदाचा बहुमान त्यांना देण्यात आला . तथापि प्रकृतीच्या कारणामुळे त्यांना अध्यापनाचे कार्य चालू ठेवता आले नाही . इंग्लंडच्या सोसायटी ऑफ आर्ट् स या संस्थेसह इतर अनेक परदेशी संस्थांचे ते सदस्य होते . एर्लांगेन विद्यापी ठाने त्यांना सन्माननीय डॉक्टरेट पदवी दिली . १८२५ मध्ये त्यांना क्षयरोग जडला व त्यातच त्यांचा म्यूनिक येथे अंत झाला .
भदे , व . ग .
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..