ओहममापक : विद्युत् प्रवाह एखाद्या संवाहकातून जात असताना त्याला जो अडथळा होतो त्याला विद्युत् रोध म्हणतात. रोधाच्या एककाला ओहम ही संज्ञा आहे. ज्या उपकरणाच्या साहाय्याने रोधाचे मूल्य मोजण्यात येते त्याला ओहममापक म्हणतात.

आ. १. ओहममापकाच्या मंडलाचा एक प्रकार : अ - मायक्रोअँपिअरमापक र - अज्ञात रोध र१, र२, र३ - स्थिर रोध र४ - बदलणारा रोध व - विद्युत् घट.

ओहममापकाच्या मंडलांपैकी एक प्रकार आ. १ मध्ये दाखविल्या-प्रमाणे आहे.  हा कोरडा विद्युत् घट आहे. चा रोध काढावयाचा आहे. , , , हे तीन स्थिर मूल्यी रोध आहेत. शिवाय हा बदलू शकणारा रोध आहे. हा मायक्रोअँपिअरमापक आहे. तत्वतः या मायक्रोअँपिअरमापकामधील विद्युत् प्रवाह र२ च्या दोन टोकांमधील विद्युत्‍ दाबावर अवलंबून असतो. हा विद्युत् दाब मधून वाहणाऱ्या प्रवाहावर अवलंबून असतो. चे मूल्य कमी असेल तर अर्थातच मायक्रोअँपिअरमापकामधील प्रवाह जास्त असतो, म्हणून त्यातील काट्याचे विचलन जास्त होते. मायक्रोअँपिअरमापकाच्या मापपट्टीवर ओहमच्या आकड्यांच्या खुणा असतात, त्याच्यावरून चे मूल्य एकदम कळते. रोध व विद्युत् प्रवाह व्यस्त प्रमाणात असतात, त्यामुळे आकड्यांच्या खुणा मापपट्टीवर समान अंतरांवर नसतात. मोठ्या रोधांच्या बाबतीत हे आकडे जवळ जवळ येतात.

निरनिराळ्या मर्यादांमधील चे मूल्य काढण्यासाठी र१, आणि र२ या रोधांची  योजना आहे. जरूरीप्रमाणे त्यांची मूल्ये ठेवून मर्यादामूल्य बदलण्याची सोय असते. कालावधीनंतर विद्युत् घटाचा अंतर्गत रोध वाढत जातो, त्यामूळे च्या मिळालेल्या मूल्यात चूक होण्याचा संभव असतो. यासाठी र४ या बदलू शकणाऱ्या रोधाची योजना आहे. चे मूल्य मोजण्यापूर्वी र४ चे मूल्य असे बदलतात की, शून्य असताना ओहममापकाचा काटा शून्यावर येतो. आता जर चे मूल्य र१, र२व(विद्युत् घटाचा अंतर्गत रोध) यांच्या बेरजेइतके असेल, तर काट्याचे विचलन पहिल्याच्या निम्मे होईल. कालांतराने जसे व चे मूल्य बदलत जाईल तसे या माध्य विचलनाचे मूल्य पण बदलेल. यावरून लक्षात येईल की, चे मोजलेले मूल्य व वर अवलंबून असते. मापपट्टीवरच्या रेषा समसमान अंतरावर नसल्याकारणाने च्या मापनातील अचूकता सगळ्या ठिकाणी सारखी नसते. मापपट्टीच्या मध्यभागी ती  सर्वांत जास्त असल्याकारणाने ओहममापकाचा उपयोग करताना अशी मर्यादा निवडावी  की, काटा पट्टीच्या मध्यभागी येईल.

आ. २. ओहममापकाचा एक प्रकार : ओहममापकाचा एक प्रकार : द, उ - कर्षुकाचे ध्रुव अ, ब - एकाच आसाभोवती फिरणारी वेटोळी र - अज्ञात रोध स - स्थिर रोध.

तिर्यक् वेटोळीयुक्त ओहममापक : आ.२ मध्ये दाखविल्याप्रमाणे याची रचना असते. हे एका कायम कर्षुकाचे ध्रुव आहेत. आणि  ही एकामेकांशी ठराविक कायम कोन करणारी व एकाच आसाभोवती फिरणारी दोन तिर्यक् (तिरपी) वेटोळी  आहेत. त्यांचे विचलन त्यांना जोडलेल्या काट्यावरून समजू शकते. मधील विद्युत् प्रवाह अशा दिशेने जातात की, कर्षुकीय क्षेत्रामुळे त्या वेटोळ्यांवर कार्य करणारी धूर्णी परिबले (फिरविण्यासाठी किंवा पिरगळण्यासाठी लागणाऱ्या प्रेरणा) एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असतात. सरतेशेवटी हा वेटोळ्यांचा संच अशा ठिकाणी स्थिर राहतो की, ही दोन विरोधी धूर्णी परिबले सममूल्य असतात. अर्थात हे स्थिरावणे सर्वसामान्य अँपिअरमापकाप्रमाणे एखाद्या स्प्रिंगच्या ताणावर अवलंबून नाही. ज्याचे मूल्य काढावयाचे आहे तो हा रोध च्या मंडलात आहे आणि च्या मंडलात हा स्थिर रोध आहे. ज्या कोनातून एकूण संच फिरतो तो कोन त्या दोन वेटोळ्यांमधून  वाहणाऱ्या प्रवाहाच्या गुणोत्तरावर अवलंबून असतो. रेखांकित पट्टीवर प्रत्यक्ष ओहमच्याच खुणा केलेल्या असल्यास चे मूल्य सरळ मिळू शकते. या मापपट्टीवरील आकड्या-आकड्यांमधील अंतर पुढील गोष्टींवर अवलंबून असते : (१) या दोन वेटोळ्यांमधील कोन आणि (२) कायम कर्षुकाच्या या दोन ध्रुवांचा आकार. या दोन ध्रुवांचा आकार. या ओहममापकाने १० -६ ते १०” ओहम रोध मोजता येतो.

आ. ३. मेगर : अ, ब - तिर्यक् वेटोळी र - मोजावयाचा रोध र१, र२ - रोध ज - जनित्र द, उ - कर्षुकाचे दक्षिण व उत्तर ध्रुव.

मेगर : विद्युत संवाहकावरील निरोधक (प्रतिबंध करणाऱ्या) वेष्टनाचा रोध जरूर तितक्या उच्च मूल्याचा आहे की नाही, हे पहाण्यासाठी विशेषतः याचा उपयोग होतो. वरील तिर्यक् वेटोळीयुक्त ओहममापकाच्या तत्त्वाचाच उपयोग करून जम्स बिडल यांनी हे उपकरण तयार केले. आ. ३ मध्ये दाखविल्याप्रमाणे याची रचना असते. हे हाताने चालविता येण्याजोगे एकदिश प्रवाही जनित्र आहे. त्यावर ५०० व्होल्ट इतका विद्युत् दाब निर्माण होतो. काही काही उपकरणांत १,००० किंवा २,००० व्होल्ट इतका विद्युत् दाब निर्माण होतो. नवीन धर्तीच्या मेगरमध्ये एक शुष्क विद्युत् घट, मंडल तोडजोडकारक, प्रवर्तक वेटोळे (विद्युत् गुणधर्मामुळे विद्युत् प्रवाहाच्या बदलास विरोध किंवा विलंब करणारे संवाहक तारेचे वेटोळे) व ट्रँझिस्टर यांच्या साहाय्याने हा विद्युत् दाब मिळवतात. आकृतीमध्ये हा मोजावयाचा रोध आहे. आणि ही दोन तिर्यक् वेटोळी आहेत , कर्षुकाचे ध्रुव आहेत. र₁ आणि र₂ हे योग्य असे रोध आहेत. वेटोळ्यांचे विचलन काट्याने समजते. मेगरचे वैशिष्ट्य असे आहे की, काट्याचे विचलन दोन वेटोळ्यांतील विद्युत् प्रवाहांच्या गुणोत्तरावर अवलंबून असते. म्हणून जनित्रामध्ये कमीजास्त विद्युत् दाब निर्माण झाला तरी त्याचा विचलनावर परिणाम होत नाही. काही हजार ओहमपासून १०¹¹ ओहम पर्यंत रोध मेगरवर  मोजता येतो. विद्युत् दाबाचा उपयोग त्या त्या विद्युत् दाबाला निरोधन कितपत कार्यक्षम आहे हे समजण्यासाठी होतो.

संदर्भ :  Golding , E. W.  Electrical Measurements and Measuring Instruments, London, 1962.

पाटणकर, भा. वि.