फ्रँक्लिन ,  बेंजामिन  :  ( १७ जानेवारी १७०६ – १७ ए ‌‌ प्रिल १७९० ).  अमेरिकेच्या संस्थापक जनकांपैकी  ( फाउंडिंग फादर्स )  एक .  मुद्रक ,  पत्रकार ,  लेखक ,  शास्त्र ज्ञ ,  मुत्स द्दी इ .  अनेक नात्यांनी फ्रॅं ‌ क्लि न यांनी केलेले कार्य मोठे आहे .  बोस्टन  ( मॅसॅचूसेट्‌ स )  येथे जन्म .  आईवडिलांची नावे अनुक्रमे आबायाह  ( फोल्जर )  व जोसाय .  वयाच्या दहाव्या वर्षापासूनच ते वडिलांच्या साबण कारखान्यात काम करू लागले .  वडिलांच्या धंद्यात त्यांना फारसा रस नव्हता .  म्हणून ऐन तारुण्यात ते  ‌ फिलाडेल्फि या या गावी पळून गेले  ( १७२३ ).  तेथे मजुरीपासून अनेक उद्योग त्यांनी केले आणि पुढे स्वतःचा छापखाना काढला .  ते पेनसि ल्व्हे निया गॅझेट नावाच्या वृत्तपत्रात लेख प्रसिद्ध करू लागले .  यातील बहुतेक मजकूर तेच लिहीत .  त्यातील व्यंगचित्रे आणि नकाशांद्वारे कथाकथन ह्या गोष्टी तत्कालीन वाचकांच्या अत्यंत आवडीचे विषय होते .  हे विषय वृत्तपत्राद्वारे मांडणारे बेंजामिन हे वसाहतींत पहिलेच संपादक होते .  त्यांचे हे वृत्तपत्र १७२९ ते १७६६ पर्यंत चालले होते .  त्यातील त्यांचे लेख पुढे पुअर रिचर्ड्‌स ऑल्मनॅक  ( १७३२ – १७५७ )  यात प्रसिद्ध झाले .  त्यातील मार्मिक वचने ,  सुभाषिते व म्हणी फारच लोकप्रिय ठरल्या .

 फिलाडेल्फिया येथे स्वतंत्र धंदा सुरू केल्यानंतर त्यांनी डेबोरा रीड या युवतीशी विवाह केला  ( १७३० ).  डेबोरा पुढे १७७४ मध्ये मरण पावली .  त्यांना एक मुलगा व एक मुलगी होती .

 मुद्रणचा धंदा वीस – बावीस वर्षे केल्यानंतर फ्रॅं क्लि न त्यातून निवृत्त झाले .  त्यांना वृत्तपत्रीय कामगिरीमुळे साऱ्या वसाहतींत एक अभिजातले खक म्हणून मान्यता मिळाली होती .  मुद्रण व्यवसायात असताना त्यांनी पेनसिल्व्हेनिया सभागृहात नोकरी पतकरली  ( १७३६ ).  पुढे ते फिलाडेल्फियाच्या टपाल खात्यात पोस्टमास्टर झाले .  आपल्या कार्यक्षम सेवेने त्यांनी ब्रिटिश शासनाची मर्जी संपादली .  त्यामुळे त्यांस सर्व वसाहतींसाठी असलेले डेप्युटी पोस्टमास्तर जनरल हे पद देण्यात आले  ( १७५३ ).  त्यांनी वसाहतींच्या टपालखात्यात आमूलाग्र सुधारणा करून ते अत्यंत कार्यक्षम केले .  या काळात त्यांनी फिलाडेल्फिया हे शहर सुधारण्याच्या अनेक योजना मांडल्या आणि त्या राबविल्या .

 बेंजामिन फ्रँक्लिन

   पेनसिल्व्हेनिया  ‌ विधिमंडळाने इंग्लंडच्या स्टॅंप ॲक्टमुळे निर्माण झालेल्या तीव्र वादात मध्यस्थी करण्यासाठी फ्रँक्लिन यांना आपला प्रतिनिधी म्हणून १७५७ साली इंग्लंडला धाडले .  ते १७६२ पर्यंत इंग्लंडमध्ये होते .  त्यानंतर जॉर्जिया  ( १७६८ )  व मॅसॅचूसेट् ‌ स  ( १७७० )  या राज्यांचा एजंट म्हणूनही त्यांची इंग्लंडमध्ये नियुक्ती करण्यात आली .  इंग्लंडच्या वास्तव्यात त्यांनी अमेरिकेचा एक प्रभावी प्रवक्ता म्हणून महत्त्वाची कामगिरी बजावली .  १७७३ च्या स्टॅंप ॲक्टला त्यांनी कडाडून विरोध केला आणि आपला निषेध नोंदविला .  या वेळी त्यांनी दोन राजकीय उपरोधिका  –  ॲन एडिक्ट बाय द किंग ऑफ प्रशिया आणि रुल्स बाय विच ए ग्रेट एम्पायर मे बी रि ड्यू स्‌ड टू ए स्मॉल वन प्रसिद्ध केल्या .

   सुरुवातीस अमेरिकेतील वसाहती ब्रिटिश साम्राज्यापासून अलग हो ऊ नयेत ,  असे त्यांचे मत होते   पण पुढे ब्रिटिशांच्या हुकूमशाही धोरणामुळे हे त्यांचे मत बदलले .  प्रत्येक वसाहतीने स्वतःपुरते पाहण्याची कूपमंडूक वृत्ती सोडा वी आणि सर्व वसाहतींनी एकत्र ये ऊ न सामुदायिक जीवनाचा पाया घालावा ,  असे अमेरिकन लोकनेत्यांना बजावणाऱ्या द्रष्ट्यांमध्ये फ्रँक्लिन यांची गणना होऊ लागली .  साह जि कच फ्रँक्लिन यांची फिलाडेल्फियातर्फे काँ टिनेंटल काँग्रेसवर निवड झाली  ( १७७५ ).  त्याच वर्षी काँटिनेंटल काँग्रेसने त्यांची पोस्टमास्टर जनरल म्हणून नियुक्ती केली .  त्यांना अमेरिकन स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याच्या मसुदा समितीत घेण्यात आले .  देशाच्या स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात फ्रान्सची मदत मिळविण्यासाठी फ्रँक्लिन यांना फ्रान्स ला   पाठविण्यात आले .  त्यांनी फ्रान्सची मदत तर मिळविलीच   पण फ्रेंच लोकांवर आपल्या व्यक्तिमत्त्वाची विलक्षण छाप पाडली .  पुढे १७८३ मध्ये अमेरिकेच्या स्वातंत्र्याला आंतरराष्ट्रीय मान्यता देणारा तह पॅरिस येथे झाला .  या तहाच्या वाटाघाटीत फ्रँक्लिन यांचा वाटा मोठा होता .  त्यानंतर पेनसिल्व्हेनियाच्या कार्यकारी मंडळाचा अध्यक्ष म्हणून त्यांची दोन वर्षांकरिता नेमणूक झाली .  मे १७८७ मध्ये त्यांनी फिलाडेल्फिया शहरी स्वतंत्र अमेरिकेच्या संविधानाचे स्वरूप निश्चित केले .  ते सर्वानुमते मान्य व्हावे ,  म्हणून त्यांनी फार मोठे परिश्रम घेतले .  त्यानंतर गुलामगिरीविरुद्ध स्थापन झालेल्या संस्थेचे अध्यक्षपद त्यांस देण्यात आले .  काँग्रेसमध्ये या संदर्भात त्यांनी विधेयकही मांडले होते .

  शास्त्रीय कार्य  :  शुद्ध विज्ञानात आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळविणारे पहिले अमेरिकन शास्त्रज्ञ असा बेंजामिन फ्रँक्लिन यांचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात करण्यात येतो .  विद्युत् स्थितिकीसंबंधी  ( तत्त्व तः स्थिर असणाऱ्या विद्युत् भारांविषयी अभ्यास करणाऱ्या विद्युत् शास्त्राच्या विभागासंबंधी )  त्यांनी महत्त्वाचे संशोधन केले .  त्यांनी मांडलेला व्यापक विद्युत् क्रियेविषयीचा सिद्धांत ही त्यांची सर्वांत महत्त्वाची कामगिरी समजण्यात येते .  विद्युत् भार निर्मिती, भाराचे स्थलांतर ,  स्थिरविद्युत् ‌  प्रवर्तनाने  ( वस्तूवरील विद्युत् ‌  भा राच्या सान्निध्याने दुसऱ्या संवाहक वस्तूवर विद्युत् भार प्रकट होण्याच्या क्रियेने )  वस्तू प्रभारित करणे यांसारख्या स्थिरविद्युतीय  क्रियांचे स्पष्टीकरण करण्यासाठी वा या क्रियांच्या परिणा मांचे भाकीत करण्यासाठी त्यांनी या सिद्धांताचा उपयोग केला .  विद्युतेच्या स्वरुपासंबंधी त्यांनी नावीन्यपूर्ण व प्रभावी अशी  ‘ एक – द्रायू ’ ( प्रवाही पदार्थ )  या नावाने ओळखण्यात येणारी संकल्पना प्रतिपादन केली होती. घर्षणाने होणाऱ्‍या वस्तूंच्या  प्रभा रणा मध्ये विद्युत् भार  (‘ विद्युत् अग्नी ’)  घर्षणाने निर्माण केला जात नसून फक्त गोळा केला जातो असे सांगून या क्रियेत विद्युतीकरणाच्या  ( धन व ऋ ण )  अवस्था सारख्याच प्रमाणात निर्माण होतात ,  हे मूलभूत त त्त्व त्यांनी मांडले . ‘ विद्युत् भारांची अक्षय्य ता ’  म्हणून हे तत्त्व आता ओळखण्यात येते . ‘ लेडन पात्र ’  या नावाने संबोधण्यात येणाऱ्या ⇨ विद्युत् धारित्रा तील भारांच्या वितरणाचे विश्लेषण फ्रँक्लिन यांनी केले होते .  त्यांनी विद्युत् ‌ विषयक शास्त्री य विवेचनात  ‘ पॉझिटिव्ह ’ ( धन ), ‘ निगेटिव्ह ’ ( ऋ ण ), ‘ चार्ज ’ ( भार ), ‘ बॅटरी ’ ( घटमाला )  यांसारखे तांत्रिक शब्द प्रचारात आणले .  पतंगाच्या साहाय्या ने केलेल्या त्यांच्या सुप्रसिद्ध प्रयोगाद्वारे तसेच प्रयोगशाळेत केलेल्या प्रयोगां द्वारे त्यांनी तडिताघात हा विद्युतीय आविष्कार असल्याचे सिद्ध केल [ ⟶  तडित् ‌].  त्याचप्रमाणे या संदर्भात भूसंयोतिज आणि टोकदार विद्युत् संवाहकांच्या क्रियेसंबंधी प्रयोग करून त्यांनी तडित् ‌  निवारक साधनाचा शोध लावला [ ⟶  तडित् संरक्षण ].    गल्फ स्ट्रीम या सागरी प्रवाहासंबंधी तसेच वातावरणीय संनयनी प्रवाह  ( तापल्यामुळे हलक्या झालेल्या हवेची जागा थंड हवा घेत असल्याने निर्माण होणारे वायुप्रवाह )  व वादळांच्या गतीची दिशा यां संबंधी त्यांनी संशोधन केले. मेघनिर्मिती व मेघांचे विद्युतीकरण यांविषयीचे त्यांचे संशोधन  वातावरणविज्ञानात महत्त्वाचे ठरले आहे . ‌ द्वि केंद्री भिंग व फ्रँक्लिन स्टोव्ह हे त्यांचे हे त्यांचे शोधही प्रसिद्ध आहेत .  विद्युत् शास्त्र हे विशेषीकरणाचे एक नवे क्षेत्र म्हणून शास्त्रीय जगतात मान्यता पावण्यास बेंजामिन फ्रँक्लिन यांची मह त्त्व पूर्ण कामगिरी कारणीभूत ठरली .  त्यांच्या या कामगिरीबद्दल लंडनच्या रॉयल सोसायटीच्या कॉप्ली पदकाचा  ( १७५३ )  व परदेशीय सदस्यत्वाचा  ( १७७३ )  बहु मान त्यांना देण्यात आला .  अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटी या अमेरिकेतील पहिल्या कायम स्वरुपाच्या वैज्ञानिक संघटनेचे ते एक प्रमुख संस्थापक होते .  फ्रँक्लिन म्हणजे एक नमुनेदार अमेरिकन व्यक्तीम त्त्व होय .  फ्रँक्लिन यांनी एक सामान्य मुद्रक म्हणून जीवनास प्रारंभ केला आणि छापखान्याच्या क्षेत्रात कारखानदार म्हणून नावलौकिक मिळविला .  गरिबीमुळे त्यांस लहानपणीच शालेय शिक्षणास मुकावे लागले ,  तरी स्वतंत्र व्यासंगाच्या बळावर विविध विषयांचा अभ्यास करून लेखक म्हणून त्यांनी मान्यता मिळविली .  त्यांचे आत्मचरित्र जगातील एक उत्कृष्ट  आ त्मचरित्र मानले जाते .  त्यांना अनेक उ च्च पदे प्राप्त झाली .  त्यांच्या हरहुन्नरी व अष्टपैलू व्यक्तिमत्त्वामुळे अमेरिकेच्या इतिहासात सर्वज्ञ म्हणून त्यांचा गौरव करण्यात येतो .  त्यांच्या स्मरणार्थ अमेरिकेत अनेक मान्यवर संस्था स्थापन करण्यात आल्या .

 संदर्भ : 1. Asimov, Isaac, The Kite that Won the Revolution, New York,  1963 .

          2. Fleming, T. J., Ed. The Founding Fathers : Benjamin Franklin a Biography in His Own Words, New York,  1972 .

          3. Fleming, T. J. The Man Who Dared the Lightning : a New Look at Benjamin Franklin, New York,  1971 .

 करंदीकर ,  शि .  ल .  भ दे ,  व .  ग .